✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 12/09/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १६६६: आग्ऱ्याहून सुटका, शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले. १९३०: विल्फ्रेड र्‍होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला. १९४८: भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तिसंग्रामास पोलिस अॅक्शन असे म्हटले जाते. १९५९: ल्युना-२ हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले. १९९८: डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. २००२: मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण. २००५: हाँगकाँगमधील डिस्नेलँड सुरू झाले. २०११: न्यूयॉर्क शहरातील ९/११ मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले. 💥 जन्म :- १८८०: सुविख्यात क्रांतिकारक व थोर तपस्वी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट १८९४: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक विभूतिभूषण बंदोपाध्याय १८९७: नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्युरी १९१२: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी 💥 मृत्यू :- १९२६: मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे १९५२: शास्त्रीय गायक रामचंद्र कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व १९७१: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ १९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी १९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग १९९२: हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर १९९६: संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते पं. कृष्णराव चोणकर १९९६: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राजस्थान सरकारनं सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात केली दोन टक्क्यांची वाढ, आता महागाई भत्ता 7 टक्क्यांवरून 9 टक्क्यांवर* --------------------------------------------------- 2⃣ *जम्मू-काश्मीरमधला उधमपूर जिल्हा हागणदारीमुक्त, 75 हजार शौचालय केले तयार* ---------------------------------------------------  3⃣ *मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टात मागासवर्ग आयोगाचा प्रगती अहवाल सादर. 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करणार, मागासवर्ग समितीची हायकोर्टात ग्वाही.* --------------------------------------------------- 4⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अंगणवाडी सेवकांशी संवाद साधत, त्यांच्या मानधनात केली वाढ* --------------------------------------------------- 5⃣ *नांदेड : महापालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी भाजपाच्या गुरप्रीतकौर सोढी यांची नियुक्ती.* --------------------------------------------------- 6⃣ *भारत वि. श्रीलंका महिला क्रिकेट सामन्यात स्मृती मानधनाची फटकेबाजी, भारतीय महिलांचा श्रीलंकेवर मोठा विजय* --------------------------------------------------- 7⃣ *भारत वि. इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडमध्ये शतक झळकावणारा पंत ठरला भारताचा पहिला यष्टीरक्षक* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= आजच्या दैनिक रामप्रहर मध्ये प्रकाशित लेख " पोशाख : व्यक्तीची ओळख " http://ramprahar.com/wp-content/uploads/2018/09/Ram-Prahar-12-September-2018-Page-4.jpg पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लिक करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *समर्थ रामदास* त्यांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर (२४ मार्च १६०८, येथे झाला. हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते.पर्यावरणावर एवढे प्रबोधन आणि लिखाण करणारे ते महान संत होते. दिनांक १३ जानेवारी १६८१ सज्जनगड येथे मृत्यू झाला. त्यांचे दासबोध आणि मनाचे श्लोक हे साहित्य प्रसिद्ध आहे तर जय जय रघुवीर समर्थ हे वचनप्रसिद्ध आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करावं, जग अपोआप सुंदर बनतं *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) ' हिरण्य 'कोणत्या धातुचे वैदिक नाव आहे ?* सोने *०२) स्वामी विवेकानंद यांचे जन्मनाव काय होते ?* नरेंद्र *०३) जिम कार्बेट पार्क कुठे आहे ?* उत्तराखंड *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● शिवकन्या शशी ● श्रीपाद चंद्रकांत कुलकर्णी ● स्वप्नील पुलकंठवार, देगलूर ● विकास पाटील  ● साईनाथ बोदुलवार ● श्याम कांबळे ● पुंडलिक बिरगले ● शिवा शिवशेट्टे ● केतन जोशी ● साहिल सुगुरवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *योग्य वापर* हल्ली चोरही रोज सोन्याच्या ताटात खातात पैशावाले नुसतेच रिकामा भार वहातात असलेल्या साधन संपत्तीचा योग्य वापर केला पाहिजे आहे त्या गोष्टीचा सहज उपभोग घेता आला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 15*      *यह तन विष की बेलरी* *गुरु अमृत की खान |* *सीस दिए जो गुरु मिले* *तो भी सस्ता जान ||* अर्थ गुरूचे जीवनातील महत्त्व सांगताना महात्मा कबीर सांगतात की हे शरीर विषवल्ली समान आहे. माणूस देहिक सुखाच्या मागे लागतो. शरीर शृंगार, देह सजावट व शरीराच्या ठेवणीकडे ध्यान पुरवण्यातच जीवनाचा सारा वेळ निघून जातो. खरं तर शरीर नाशीवंत आहे. शरीरविषक आवश्यक बाबी पुरवायला हव्यात. शारीरिक सौंदर्य/श्रीमंती काल मर्यादित आहे. हृदयाची श्रीमंती मात्र अक्षय असते. मनाची सफाई केली तर हे जीवन आनंद व समाधानानं भरून जातं. त्याला जन कळवळ्याची चाड असते. मनाच्या जडणघडणीसाठी स्वतःपाशी जगाकडे पाहण्यासाठी दिव्य दृष्टीची गरज असते. ही दिव्य दृष्टी मानवाठायी उत्पन्न होते ती गुरूमुळं. अज्ञानात खितपत लोकांना गांजणारा अंगुलीमाल तथागतांच्या सान्निध्यात येतो. बुद्धांची प्रेमळ दृष्टी त्याच्यावर पडते. त्यांच्या उपदेशाने त्याचा जीवनविषयक दृष्टीकोन आरपार बदलून जातो. अंगुलीमालाचं हृदय परिवर्तन होतं. पूर्वाश्रमीच्या कोणत्याही रानटीपणाच्या खुणा त्याच्या ठायी दिसत नाहीत. तो मानवतावादाचा पुरस्कर्ता बनतो. जग त्याच्याशी कसेही वागले तरी तो अहिंसेचा पुजारी होतो. हे सार गुरूपदेशातलं रहस्य होतं. गुरू अमृतरूपी कुंभ आहेत. ज्याला खरा गुरू मिळाला तो तो अमर झाला आहे. याला इतिहास साक्ष आहे. सांदिपनी-कृष्ण, द्रोण-अर्जून अशा असंख्य गुरू शिष्याच्या जोड्या सिंहावलोकन करता नजरेपुढे सहज फेर धरतील. गुरू शिष्याला कर्तव्याची जाणीव करून देतात. निकोप मनाची घडवणूक करून देण्याची किमया गुरूंचीच ! गुरूंच्या चरणी मस्तक झुकवणंंच काय प्रसंगी प्राणार्पणही कमीच आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= रंग कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी रंगांना कधीच भेदभाव,जातियता, प्रांतियता किंवा विषमता नाही.त्यांना कुठेही कॅनव्हासवर,कागदावर किंवा भिंतीवर वापरा कधीच काही म्हणत नाहीत.कितीही आणि कुठेही वापरले किंवा मिसळले तरी त्यांच्या वेगवेगळ्या छटा सौंदर्यात भर टाकतात आणि पाहणा-याच्या दृष्टीत अगदी सहज भरुन जातात.पाहाराही थक्क होऊन जातो तो विचार करायला लागतो की, वेगवेगळे असूनही एकात्मतेचे दर्शन घडवतात हे त्यांच्याकडून खरेच शिकायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *दिव्यदृष्टी - Divine vision* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *नदीपार* ब्रह्मदेशाचा (सध्याचा म्यानमार) राजा बोडायाया हा विशेष प्रसिद्ध होता. तो कुशल प्रशासक तर होताच, पण त्याचे सैन्यही बलाढ्य होते. त्याचे राज्य सर्वात बलिष्ठ समजले जाई. या शूर राजाचे अंतःकरण दयाळू होते. त्याने अनेक पॅगोडे बांधले आणि देशभरातील धर्मगुरूंची बडदास्त राखली. बालपणाच्या मित्रांचीदेखील त्याने चांगली दखल घेतली. यु पॉ हा त्याचा मित्र. त्याच्याबरोबर एकाच धर्मगुरूकडे तो सहाध्यायी होता. बालपणापासून त्यांचे संबंध मैत्रीचे राहिले होते. एक दिवस राजेसाहेब आपल्या लवाजम्यासह इरावद्दी नदीवर सहलीसाठी गेले. ब्रह्मदेशातील या सर्वांत मोठ्या नदीला ब्रह्मी लोक ‘इतरावत्ती माता’ म्हणतात. ते जिथे गेले होते, तिथे नदीचे पात्र विस्तीर्ण, नजरेच्या टप्प्यात न भरणारे होते. दिवस मावळला. राजाला कंटाळा आला. त्याला यु पॉ ची थट्टा करायची लहर आली. यु पॉ आता दरबारी खूशमस्कर्‍या होता. त्याला मंत्र्याचा दर्जा होता. ‘यु पॉ ही नदी ओलांडून जाशील का ?’ ‘होय महाराज !’ त्याने तत्काळ उत्तर दिले. ‘तू मला खूश करण्यासाठी हे म्हणतोयस, हे मला ठाऊक आहे; पण ही थट्टा नाही.’ ‘महाराज, खरंच मी नदी पार करून दाखवतो.’ ‘मग आताच्या आता नदी ओलांड पाहू ।’ हे ऐकल्यावर यु पॉने आपला सॅरॉग वर उचलला आणि तो किनार्‍यावर येरझारा घालू लागला. बर्‍याच वेळाने राजाने विचारले, ‘ अरे, तू थांबलास का ?’ ‘महाराज, मी बोटीची वाट पाहतोय.” ‘बोटीने तर कोणीही सामान्य माणूस जाईल, मग तूच कशाला हवा ?’! युपॉने राजापुढे गुडघे टेकले. जमिनीवर डोके टेकवून तो म्हणाला, ‘महाराज, त्या सामान्यांतला मी एक सामान्य माणूस आहे.’ राजेसाहेब त्यावर खळखळून हसले, झालं! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment