*पारख* जीवनातील जगणे अवघड झाले येथे अंतसमय येता मरण बेकार झाले येथे मावळत्या सूर्याला नाही नमस्कार येथे अन् डुबत्या नौकेस नाही आधार येथे जीवनातील जगणे...... गोरगरिबाचे, दिन हिनाचे स्वप्न साकार होईना येथे अन् साहसही हळवा होतो सत्याचे चालेना काही येथे जीवनातील जगणे...... भ्रष्टाचार्यांच्या सुकाळात सज्जनांचे साथीदार थोडे येथे सत्य असत्य ह्यातील फरक म्हणूनच जाणतात पारखे येथे जीवनातील जगणे..... सत्य हे कडू लागे लबाडीचे काम करतात येथे खरे बोलण्यार्यांना तोंड दाबून बुक्कयांचा मार देतात येथे जीवनातील जगणे अवघड झाले अंतसमय येता मरणही बेकार झाले येथे 〰〰〰〰〰〰 ✍© प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰

No comments:

Post a Comment