✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 18/09/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९८१ - फ्रांसमध्ये मृत्युदंड बेकायदा.१९९० - लिश्टनस्टाइनला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश. १९९७ - टेड टर्नरने संयुक्त राष्ट्रांना १ अब्ज अमेरिकन डॉलर दान केले.१९९८ - आयकानची स्थापना. 💥 जन्म :- १९५८ - विन्स्टन डेव्हिस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९५८ - डेरेक प्रिंगल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९७० - डॅरेन गॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९७१ - लान्स आर्मस्ट्रॉँग, अमेरिकन सायकल शर्यत विश्वविजेता 💥 मृत्यू :- १९९९ - अरुण वासुदेव कर्नाटकी, चित्रपट दिग्दर्शक. २००२ - शिवाजी सावंत, मराठी साहित्यिक. २००४ - डॉ. भालचंद्र दिनकर फडके, मराठी समीक्षक, साहित्यिक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचे विलिनीकरण करण्याचा सरकारचा निर्णय - राजीव कुमार* --------------------------------------------------- 2⃣ *जालना : मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देणार - राज्यपाल सी. विद्यासागर राव* ---------------------------------------------------  3⃣ *कर्नाटकमध्ये पेट्रोल व डिझेल दोन रुपयांची स्वस्त, कर्नाटक सरकारचा दिलासादायक निर्णय* --------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली - लालप्रसाद यादव आणि राबडी देवी यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, रेल्वे कॅटरींग घोटाळ्याप्रकरणी बजावली नोटीस.* --------------------------------------------------- 5⃣ *पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी शरद कळसकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी* --------------------------------------------------- 6⃣ *दिल्ली क्रिकेट संघटनेचा वीरेंद्र सेहवागने दिला राजीनामा* --------------------------------------------------- 7⃣ *Asia Cup 2018: रवी शास्त्री यांच्या अनुपस्थितीत महेंद्रसिंग धोनी बजावतोय प्रशिक्षकाची भूमिका* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *भीक मागणे एक दुष्कृत्य* https://goo.gl/C34hWu पूर्ण लेख वाचण्यासाठीवरील निळ्या अक्षरावर क्लिक करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *थेऊर - चिंतामणी* थेऊर हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील एक गाव आहे.येथे अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे.थेऊरचा गणपती चिंतामणी या नावाने ओळखला जातो. ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्‍न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्‍न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्‍न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्‍न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.          *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'माय जर्नी ट्रान्सफॉर्मिंग ड्रीम्स इन टू अँक्शन' ही साहित्यसंपदा कोणाची ?* डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम *२) मुंबईतील 'हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' हा तेल शुद्धीकरण कारखाना कधी सुरू झाला ?* जुलै १९५४ *३) कॅमेरूनची राजधानी कोणती ?* योन्डे *४) आयएमएफचे विस्तारित रूप काय ?* इंटरनॅशनल मॉनेटरी फंड *५) आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे राष्ट्रा-राष्ट्रांमधील संघर्ष सोडवण्याचे काम कोणाचे ?* आंतरराष्ट्रीय न्यायालय *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● किरण इंदू केंद्रे ● सुदर्शन वाघमारे ● सचिन महाजन ● रामकृष्ण काकाणी ● देवेंद्र गडमोड ● योगेश शंकरोड ● सुनील पाटील बोमले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *जोश* त्याच त्या गाण्यांचा देवाला डोस आहे नव्या कार्यकर्त्याचा नवा नवा जोश आहे नको ते गाणे ऐकून गणपतीही वैतागतो थोडी शांतता ठेवण्याची भक्ताला मागण मागतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 19* *पतिबरता मैली भली* *गले कांच को पोत |* *सब सखियाँ में यो दिपै* *ज्यो रवि ससी को ज्योत ||* अर्थ मानसाचं व्यक्तिमत्व त्याच्या वर्तनावरून समजतं. चारित्र्यामध्ये शील जपणं अत्यंत महत्वपूर्ण माणलं गेलंय. ज्याला चारित्र्याची जोपासना करता आली त्याचं व्यक्तिमत्व आपोआपच खुलून दिसतं. रग्गड श्रीमंतीत जगणारी, सर्व सुख सोयीं उपभोगणारी , उंची वस्त्रे, अलंकार मिरवणारी, रूप गर्विता असेल. ती शिलाचं पावित्र्य जपत नसेल तर ती क्षण भंगूरतेला भुलून भौतिक सुखाच्या आहारी आत्मसन्मान गमावलेली व्याभिचारिणीच होय. तिच्यात आणि कळवातनीत काय फरक आहे ? द्रव्य लालसेपोटी आपलं सर्वस्व कुणापाशीही त्या गहान टाकित असतात. त्या देहाच्या व भ्रष्ट वासनेच्या पूजकंच मानल्या पाहिजेत. अशा शेकडो रुपगर्विता लावण्यवतीं पेक्षा फुटक्या मण्याचीही अपेक्षा न ठेवणारी. पतिव्रतेचा पातिव्रत्य धर्म जपणारी स्त्री दिसायला कुरूप असो की रंगाने काळी. भलेही तिच्या अंगावर दागदागिने नसू देत . तिला नेसायला उंची वस्त्र नसली तरी तिच्या पातिव्रत्यामुळे ती इत्तर स्त्रीयांधूनही आपसुकच उठून दिसते. भौतिक दारिद्र्य असलं तरी तिच्याकडं मनाची श्रीमंती असते . भलेही चारचौघीत मिरवण्या इतपत सौंदर्य तिच्याठायी नसलं तरी तिच्या पातिव्रत्यापुढे व तपश्चर्येसमोर त्या रूपगर्विता व लावण्यवती पार फिक्या पडतात. चंद्र सूर्याला तेज पुरवण्याचं सामर्थ्य पतिव्रतेच्या तपोबलात असतं . एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= या माणसाची परोपकारी वृत्ती नाही, दुस-याला काही देण्याची इच्छा नाही, दुस-याच्या भल्याचा कधीच विचार करत नाही, दुस-यांनी आपल्यासाठी कितिही मदत केली तरी चालेल पण आपण कुणाच्या मदतीला धावून जायचे नाही अशी असणारी माणसे फक्त स्वार्थी आणि आपमतलबी असतात हे खरे आहे. अशी माणसे इतरांच्या कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही त्यांच्या जीवनात पूरेपूर स्वार्थीवृत्ती भरलेली असते अशा लोकांचा सहवास कुणालाही नको असतो. ते तेव्हाच इतरांच्या मनातून निघून गेलेले असतात. * व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सहवास - Coitus*💐 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रसन्न मन* एकदा देवळात भागवत कथेची सांगता झाली.तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवरा-आवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी भेटेल?’’  सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढय़ात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, “पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं ! परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’ आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मनाने नाही कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले. हव्यास आणि हट्ट सोडणे महत्त्वाचे परमार्थ वेगळे काय शिकवतो? *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment