*कविता - हसरी मूर्ती*
हिरव्या हिरव्या गालिच्यावर
हसरी मूर्ती होती एक छान
आईच्या प्रेमळ पदराखाली
बिलगली होती छान छान
बागेतल्या त्या रंग-बिरंगी
सुमनाचा सुवास होता छान
स्पर्श होता मायेचा प्रेमळ
हरवूनी जाती सारे देहभान
नभाच्या त्या छायेखाली
नाती होती वात्सल्याची
सुगंधी फुलांनी सजली होती
हसरी मूर्ती चिमुकल्यांची
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment