कविता - ताटवा आनंदाचा
नभी मेघ फिरूनया सारे
पाऊसधारा पडून अंगणी
रूप बघेे धरतीचे सारे
ताटवा आनंदाचा असे मनी
सूर्य हळूच डोकावूनी पाही
आकाशी अलगद उठे रवी
सोनेरी किरणे तो दावी
रूप धरञीचे चमकवी
पानापानात पडती थेंब टपोरे
फुलाफुलात फिरती भोवरे
मोती नभातून गळे सारे
जसे रूप धरा रचले मनोरे
सरी भिजवी तनामनाला
अंगी झेलूनीया तुषार
ताटवा आनंदाचा फुलला
हर्षआनंद मनी जाहला फार
प्रीत फुलती धरतीवर
असे नाते घट्ट तिचे आकाशी
बि रुजती, अंकुरती
पिके उगवती मातीशी
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment