कविता - मनातलं मनाशी एकटेपणातच मन रमवावे एकटेपणानेच हे जीवन जगावे मनातलं मनाशी हितगुज एकट्यानेच मग मनाला सांगावे डोळ्यात आलेल्या अश्रूंना आपणच मग पुसावे,अन् हृदयातल्या वेदनेला मग एकट्यानेच समजुनी सांगावे स्वःतावर विश्वास ठामपणे ठेवून आत्मविश्वासाने जगावे,अन् आलेल्या संकटांना मग घाबरून न जाता,संघर्षाने जीवन जगावे आपले अश्रू आपण पुसले तरी दुसऱ्यांचे अश्रू मात्र पुसावे, देऊन मदतीचा हात इतरांना जीवन एकटेच जगावे व्यथा ही जीवनाची कोणतीही मनातल्या मनाशी सांगावी उजेडाने साथ सोडली तरीही अंधाराशी मात्र घट्ट मैत्री करावी कुणाच्या मदतीची ,आधाराची अपेक्षा न करावी, अन् करताच आले तर सहकार्याची भावना बाळगून माणुसकी निभवावी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

No comments:

Post a Comment