डोळ्यात माझ्या
डोळ्यात माझ्या आठवणीचे बोल
आईबाबाचे पुण्य अनमोल
झाले मी कृतज्ञ त्यांच्या ठायी कैसी फेडू मी त्यांची ऋणायी
कष्टाचे हे मोल त्यांचे
अप्रतीम होते बोल तयांचे
ध्यानी मनी रुजले मज
सत्य हे उमजले आज
स्मरण तुझे होताच आई
डोळ्यात माझ्या पाणी येई
तृप्त होउन नयन माझे मग
आठवणीत तुझ्याच राही
आईवडिलाची पुण्यायी
सार्थकी लागली जीवनी
संस्काराची ही शिदोरी
ठेवीली मी माझ्या अंतःकरणी
पानाफुलांचा कळसात
आईवडील आहे माझ्या काळजात कितीही
थोरवी मी त्यांची गाईन
ऋणाईत त्यांच्या राहीन
ऋणाईत त्यांच्या राहीन
ऋणाईत त्यांच्या राहीन
〰️〰️〰️〰️〰️〰️
✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
No comments:
Post a Comment