*कविता - लक्तरे* जन्मदाती माझी प्रिय आई बघताना तिच्याकडे मी येई जगण्यास स्फूर्ती माझ्या ममतेची मूर्ती माझी आई किती दुःख झेलले जीवनात लक्तरे अंगाची काढून ती जगली सतत काबाडकष्टात मुलाबाळास भरविते घास ती दिसे लेकरात सुख तिजला मायेचा पदर पांघरून आम्हा भासे झोपडीत पंढरी तिजला प्रेम साऱ्यांना देई आम्हा माझी आई आहे ज्ञानज्योती देती आम्हा मूल्यशिक्षणाचे धडे शिकवण संस्काराची मिळती पदोपदी वाट चांगली दावे गडे माझी आई आहे देवाचीये रूप पदर तिचा शितपंख्याहून थंड माझ्या आईरूपीची प्रेमज्योत सदा नित्य चालते अखंड 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

No comments:

Post a Comment