✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 जून 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!सातवा भाग -------https://m.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7279747092041643/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *३० जून २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९७:ब्रिटनने चीनकडुन ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेटांच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.**१९८६:केन्द्र सरकार व मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.**१९७८:अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.**१९७१:सोयुझ-११ या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.**१९६६:कोका सुब्बा राव यांनी भारताचे ९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९६५:भारत व पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.**१९६०:काँगोला (बेल्जियमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४४:मुंबईच्या ’सेंट्रल’ सिनेमात ’प्रभात’चा ’रामशास्त्री’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात ललिता पवार या अभिनेत्रीवर खलनायिकेचा कायमचा शिक्‍का बसला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: डॉ.निलेश साबळे-- मराठी दूरदर्शन निवेदक आणि चित्रपट अभिनेते**१९७४: विठ्ठल मारोती जाधव -- कवी, कथाकार,लेखक**१९७०: भारती अनील भाईक -- लेखिका, कवयित्री* *१९६९: सनत जयसूर्या – श्रीलंकेचा क्रिकेटपटू**१९६६: डॉ.संजीवकुमार अभिमन्यू सोनवणे-- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९६२:प्रफुल्ल शिलेदार-- प्रसिद्ध लेखक, कवी* *१९५७:जनाबाई कचरु गि-हे-- लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या* *१९५६:विजय सुरवाडे-- लेखक व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ संशोधक,अभ्यासक व संग्राहक**१९४३:सुधा विनायक नरवाडकर -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९४३:सईद मिर्झा – दिग्दर्शक आणि पटकथालेखक**१९४१:प्रा.सुधीर सहस्त्रबुद्धे-- लेखक कवी* *१९४१:श्रीधर रघुनाथ दिक्षीत -- कादंबरीकार**१९३७:दिनकर जोशी-- गुजराती भाषेचे प्रसिद्ध लेखक* *१९३२:दत्ता केशव कुलकर्णी-- मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतले एक नाटककार, दिग्दर्शक, पटकथाकार, गीतलेखक आणि संवादलेखक(मृत्यू: १८ जानेवारी २०१९)**१९२८:कल्याणजी वीरजी शाह – 'कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू (मृत्यू: २४ ऑगस्ट २०००)**१९२३: निवृत्ती पवार -- प्रसिद्ध शाहीर (मृत्यू:१० जून २००२)**१९१२:मो.रा.वाळंबे अर्थात मोरेश्वर रामचंद्र वाळंबे-- शिक्षणतज्ज्ञ व मराठी भाषेचे व्याकरणकार(मृत्यू:२१ मार्च १९९२)* *१८९५:वासुदेव वामन फडणवीस -- समीक्षक, पत्रकार (मृत्यू:२० मे १९४६)**१४७०:चार्ल्स (आठवा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ७ एप्रिल १४९८)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९९:कृष्णा बळवंत तथा कृ. ब. निकुंब – सहजसुंदर काव्याविष्काराचा प्रत्यय घडवणारे मराठी काव्यसृष्टीतील कवी(जन्म:९ आगस्ट १९२०)**१९९७:राजाभाऊ साठे – शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक**१९९४:बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार,कवी,अभिनेते,निर्माते,लेखक व दिग्दर्शक (जन्म: २५ सप्टेंबर १९२६)**१९१७:पितामह दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय (जन्म: ४ सप्टेंबर १८२५)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न, अहमदनगरचे काळे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गेल्या सहा महिन्यात 4,434 मुली बेपत्ता, सत्ताधाऱ्यांनी बाष्कळ वक्तव्ये न करता महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं; शरद पवारांचा हल्लाबोल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यभरात बकरी ईद उत्साहात साजरी, अनेक ठिकाणी सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम पार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापुरात 4 जुलैपासून ईव्हीएम तपासणी; जिल्हा प्रशासनाकडून लोकसभेची तयारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चेची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मंत्रिमंडळ विस्तारात 'रिपाइं'ला मंत्रीपद मिळावे ; राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपद दिल्यामुळे सौरव गांगुली हैराण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पितामह दादाभाई नौरोजी*भारतीय राजकारणातील भीष्माचार्य दादाभाई नौरोजी (जन्म : वर्सोवा-मुंबई, ४ सप्टेंबर, इ.स. १८२५; - मृत्यू ३० जून, इ.स. १९१७) हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी ॲन्ड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूम व दिनशा एडलजी वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते.दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक. जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते. भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते. इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हाउस ऑफ कॉमन्सचे सभासद बनणारे ते पहिले भारतीय. भारताच्या लुटीच्या सिद्धान्ताचे जनक. १८८३ साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा क़िताब देण्यात आला.मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय. ते रा.गो. भांडारकर यांचे आवडते भारतीय प्राध्यापक होते. महंमद अली जिना हे त्यांचे खाजगी सचिव होते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्व सद्गुणांचा सुंदर पाया म्हणजे नम्रता.➖कन्फूशियस*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?२) पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द नाईल' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?३) हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करतांना शवाबरोबर काय पुरत असत ?४) टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत ?५) राज्यात एकमेव हत्ती कॅम्प कोठे आहे ?*उत्तरे :-* १) डॉ. रवींद्र शोभणे २) इजिप्त ३) मातीची भांडी ४) इलान मस्क ५) कमलापुर, ता. अहेरी, जि. नाशिक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 स्नेहल आयरे, सामाजिक कार्यकर्ती, मुंबई👤 विठ्ठल जाधव, साहित्यिक, बीड👤 सतिश गादेवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 सुरेश पांचाळ, सहशिक्षक, नांदेड👤 नागोराव तिप्पलवाड, बरबडा👤 विष्णू भाऊराव सोरते, सहशिक्षक👤 ज्ञानेश्वर पाटील कऱ्हाळे👤 नामदेव आव्हाड👤 शिवाजी नाईकवाडे👤 शिवकुमार छपरे👤 पांडुरंग सलगरे👤 विठ्ठल होंडे👤 शेख शाहरुख, पांगरी👤 आगंद तरसे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सांग पां रावणा काय जाले। अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥ म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं। बळे लागला काळ हा पाठिलागी ॥१३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनात श्रध्दा असणं, सोबत चांगले विचार असणं, सदैव प्रयत्न असणे, प्रामाणिकपणा, नि:स्वार्थ पणाची भावना असणं, कोणाच्याही विषयी तिरस्कार नसणं व आपुलकी असणं हे सर्व आपल्यात ठेवून जर.. आपण कार्य करत राहिले किंवा इतरांना हसवत ठेवले तर...त्यातून जो समाधान आपल्याला मिळेल.. कदाचित तो जगापेक्षा वेगळा ही असू शकतो असे अनेकदा आपण ऐकले असणार. .. म्हणून असेच आपले जगणे असायला पाहिजे ज्यातून आंनद ही मिळेल आणि इतरांनाही आपल्याला जास्त नाही पण,थोडं तरी वाटता येईल कारण,वाटल्याने आपले धन कमी होत नाही तर...वाढतच जाते म्हणून आपण त्याच प्रकारची विचारसरणी व माणुसकी ठेवून जगावे ज्यातून जगण्याचा खरा अर्थ आपल्याला कळेल..🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मित्र*विनोद आणि अजय यांची खूप चांगली मैत्री होती. ते एकाच वर्गात शिकत होते. विनोद मन लावून शिकायचा पण अजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे. वर्गात शिक्षक शिकवत असताना अजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती ह्याच लक्ष न देण्याच्या कारणावरून पण विनोद मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शाबासकी मिळवायचा.एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवीत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता.पण अजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता. त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले,”हे तू काय केले आहेस? मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते पण तू दोन्ही बाजूने लिहीले आहेस.” आता अजय घाबरला. कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला सांगितले होते आणि सुट्टी होण्यास फक्त दोनच तास राहिले होते. अजयला घाबरलेल्या अवस्थेत पाहून विनोदने त्याला त्याच्या लक्ष न देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व शिक्षकांकडून परवानगी घेवून बाजारात जावून नवीन वही आणली. इतकेच नाही तर अजयसोबत बसून त्याचा गृहपाठ पूर्ण केला आणि त्याची वही शिक्षकांकडे जमा केली. त्या दिवसापासून अजयने आपल्या स्वभावात बदल केला आणि तो कोणतेही ठिकाणी लक्षपूर्वक काम करू लागला.तात्पर्य- लक्षपूर्वक काम करणे आणि विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करणे या दोन गोष्टी पाळल्यास अनेक संकटावर मात करता येते. तसेच होणारे नुकसान टाळता येते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment