✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 जून 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!चौथा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7274677382548614/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_सामाजिक न्याय दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०००:पी. बंदोपाध्याय या भारतीय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.**१९९९:पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या हस्ते शिवाजीराजांची मुद्रा असलेले २ रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा समारंभ पुणे येथे झाला.**१९९९:नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करुन माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.**१९७४:नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ**१९७४:ओहायो (अमेरिका) येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.**१९६८:पुणे महापालिकेने उभारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे उद्‍घाटन झाले.**१९६०:मादागास्करला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९६०:सोमालियाला (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१७२३:रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: सुजित शिवाजी कदम -- कवी* *१९८७:प्रणव सखदेव-- मराठी लेखक, कवी, युवासाहित्यिक अनुवादक* *१९७८:डॉ० रावसाहेब मुरलीधर काळे-- वऱ्हाडी बोलीचा भाषाशास्‍त्रीय अभ्‍यासक* *१९७६:वर्षा पतके-थोटे-- लेखिका,कवयित्री* *१९७६:डॉ सतीश नारायण कामत-- प्रसिद्ध लेखक संपादक* *१९६९:धर्मेंद्र प्रधान--भारत सरकारमध्ये केंद्रीय मंत्री**१९६८:संजय विठ्ठल कळमकर-- विनोदी लेखक,वक्ते आणि कथाकथनकार* *१९६५:राजेंद्र बलभीम भोसले-- कवी, कादंबरीकार, कथाकार, समीक्षक, लेखक* *१९५१:गॅरी गिल्मोर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९४८:चंद्रशेखर गाडगीळ-- मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील भारतीय पार्श्वगायक (मृत्यू:२ ऑक्टोबर, २०१५)**१९४२:प्रा.डॉ.मदन पांडुरंग कुलकर्णी- ज्येष्ठ सुप्रसिद्ध समीक्षक,पूर्वअध्यक्ष विदर्भ संशोधन मंडळ,नागपूर**१९४१:शरद पिदडी-- कवी**१९३४:इंद्रायणी प्रभाकर सावकार --मराठी लेखिका**१९२५:शांता मधुकर रानडे-- लेखिका, अनुवादक (मृत्यू:५ डिसेंबर २०१८)* *१९२२:शंकर पांडुरंग रामाणी -- प्रसिद्ध गोमंतकीय मराठी कवी.(मृत्यू:२८ नोव्हेंबर २००३)**१९१४:शापूर बख्तियार – ईराणचे ७४ वे पंतप्रधान (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९१)**१९०५:कमलाबाई विष्णू टिळक-- कथाकार(मृत्यु:१० जून १९८९)**१८९२:पर्ल एस. बक – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३८) अमेरिकन लेखिका (मृत्यू: ६ मार्च १९७३)**१८८८:नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ 'बालगंधर्व' – गायक व अभिनेते (मृत्यू: १५ जुलै १९६७)**_१८७४:छत्रपती शाहू महाराज – सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक (मृत्यू: ६ मे १९२२)_**१८७३:अँजेलिना येओवार्ड ऊर्फ ’गौहर जान’ – गायिका व नर्तिका (मृत्यू: १७ जानेवारी १९३०)**१८२४:लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ (मृत्यू: १७ डिसेंबर १९०७)**१७३०:चार्ल्स मेसिअर – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: १२ एप्रिल १८१७)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२००५:एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू (जन्म:१८ मार्च १९४८)**२००४:यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता (जन्म:६ सप्टेंबर १९२९)**२००१:वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार (जन्म: २५ मार्च १९३२)**१९४३:कार्ल लॅन्ड्स्टायनर – नोबेल पारितोषिकविजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ (जन्म: १४ जून १८६८)*   *_सामाजिक न्याय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेडमध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इजिप्तच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केळी संशोधन केंद्रासाठी 100 कोटींची तरतूद, मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर होणार : गुलाबराव पाटील*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उत्तर भारतात पावसाची जोरदार हजेरी, मान्सूनसाठी अनुकूल वातावरण; हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रात यावर्षी मुबलक पाऊस; प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक यांचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अंमळनेर येथे होत असलेल्या 97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कालच्या दिवशी 40 वर्षांपूर्वी भारतानं पहिला विश्वचषक जिंकून क्रिडाविश्वावर छाप सोडली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सामाजिक न्याय दिवस*राज्य शासनाकडून २६ जून हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून जाहीर झालेला आहे. राजर्षी शाहू महाराजांचा हा जन्म दिवस. सामाजिक न्याय प्रस्थापित होण्यासाठी त्यांचं कार्य खूप महत्त्वाचे आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक हक्क. स्त्री-पुरुष समानता, समाजातील सर्वच थरातील व्यक्तींना विकासाची, शिक्षणाची संधी, ही सामाजिक न्यायाची उद्दिष्टे आहेत.सामाजिक न्याय म्हणजे काय? तर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेप्रमाणे विकासाच्या संधी देणे, अथवा मिळवून देणे. कोणाचेही शोषण होणार नाही. किमान प्राथमिक गरजा पूर्ण होतील हे बघणे. आर्थिक सत्ता केंद्रित होणार नाही, ही दक्षता घेणे. समाजातील, आर्थिक, दुर्बल घटकांना सुरक्षितता वाटेल, असे वातावरण असणे, हीच सामाजिक न्यायाची संकल्पना आहे.छत्रपती रा. शाहू महाराजांनी समाजातील तळागाळातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य केले. ते रयतेचे राजे म्हणूनच ओळखले जातात. महाराजांनी पुनर्विवाह कायद्याला मान्यता दिली. कोणत्याही वर्गासाठी ते कोणतेही द्वेष मनात नव्हते. माणसाला माणूस समजण्यात येणार नाही, तोपर्यंत विकास होणार नाही, असे मत त्यांचे होते. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिष्यवृत्ती घेऊन परदेशात शिक्षणासाठी गेले होते, पण शिष्यवृत्ती संपल्यामुळे त्यांना परत यावे लागले. महाराजांना ही गोष्ट समजल्यावर ते स्वतः मुंबईत गेले आणि त्यांनी आंबेडकर यांना पुढील अभ्यास सुरू ठेवायला मदत केली. शोषित, मागासवर्गीयांना आंबेडकर यांच्या रूपात नेता मिळाल्याचे शाहू महाराजांनी जाहीर केले होते.राज्य शासनाच्या वतीने २६ जून हा त्यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अति कष्ट व संकटे सहन केल्यानंतर मनुष्य ज्ञानी व विनम्र बनतो.➖फ्रँकलीन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मुंबई शेअर बाजार जगातला कितव्या क्रमांकाचा शेअर बाजार आहे ?२) जगातला प्रथम क्रमांकाचा शेअर बाजार कोणत्या देशाचा आहे ?३) पहिल्यांदाच ज्युनिअर महिला हॉकी आशियाई चषक - २०२३ कोणत्या देशाने जिंकले ?४) जगात सर्वाधिक अणुबॉम्ब असणारे प्रथम तीन देश कोणते ?५) कोल्हापूर येथील राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'राजश्री शाहू पुरस्कार' कोणाला जाहीर झाला ?*उत्तरे :-* १) ५ व्या २) अमेरिका ३) भारत ४) रशिया ( ४४८९ ), अमेरिका ( ३७०८ ), चीन ( ४१० ) ५) डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 रमेश इटलोड, विषय शिक्षक, धर्माबाद👤 गणेश आरटवार, फोटोग्राफर, धर्माबाद👤 नवीन कॅरमकोंडा, नांदेड👤 कृष्णा भोरे👤 बालाजी पाटील सावंत👤 पुरुषोत्तम रेड्डी चाकरोड👤 संतोष रेड्डी, धर्माबाद👤 अंकुश कामगोंडे, धर्माबाद👤 राजेश उमरेकर, नांदेड👤 नारायण ईबीतवार👤 सुरेश यादव👤 मनीष अग्रवाल👤 शेख बाशु👤 अनिल पाटील भुसारे, माहूर👤 कैलास स्वामी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी। दुःखाची स्वयें सांडि जीवी करावी॥ देहेदु:ख ते सूख मानीत जावे। विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें ॥१०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांवर चिखल फेकण्या आधी जरा स्वतः विषयी अशा सर्वच गोष्टींची शेवटपर्यंत आपण गॅरंटी द्यावी.तेव्हाच इतरांवर चिखल फेकण्याचा प्रयत्न करावे.कारण इतरांवर चिखल फेकणे तर.. फार सोपे काम असते .पण,आपल्यावर जेव्हा कोणी चिखल फेकतात त्याचे डाग काढणे मात्र तेवढेच कठीण असते. म्हणून असे कोणतेही व्यर्थ काम करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *फुशारकी*एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.तात्पर्य – आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment