✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 जून 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!सहावा भाग -------https://m.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7279105912105761/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *२८ जून २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९८:संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍कविषय्क सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्‍नास वर्षे पूर्ण झाली.**१९९४:विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वी एकाच सामन्यात चार गोल करण्याची कामगिरी नऊ खेळाडूंनी केली होती.**१९७२:दुसर्‍या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ**१८४६:अ‍ॅडॉल्फ सॅक्स याने पॅरिस, फ्रान्समधे ’सॅक्सोफोन’ या वाद्याचे पेटंट घेतले.**१८३८:इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९७९:प्रा.डॉ.नवनाथ अंगद शिंदे -- लोकसाहित्य,आदिवासी,साहित्याचे अभ्यासक, समीक्षक,लेखक* *१९७२:मंगेश देेेेसाई-- मराठी चित्रपट कलाकार* *१९७०:डॉ.माधव शोभणे -- कवी,लेखक* *१९७०:मुश्ताक अहमद – पाकिस्तानी क्रिकेटपटू व प्रशिक्षक**१९६३:वासवदत्ता अग्निहोत्री -- कवयित्री* *१९६२:डॉ.चंद्रकांत वि. जोशी -- कवी,कथाकार,कादंबरीकार,समीक्षक* *१९५६:अंतोन चांगदेव त्रिभुवन -- लेखक**१९५६:डॉ.गिरीश दाबके -- सुप्रसिद्ध जेष्ठ मराठी साहित्यिक* *१९५१:डॉ.एस.एम.कानडजे-- प्रसिद्ध समीक्षक* *१९३७:डॉ.गंगाधर पानतावणे – प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक(मृत्यू:२७ मार्च, २०१८)**१९३४:रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे कसोटीपटू (मृत्यू:१८ जुलै २००१)**१९२८:बाबूराव सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०००)**१९२२: भालचंद्र गजानन खांडेकर -- गीतकार,कवी (मृत्यू:२८ जून १९९०)**१९२१:नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान, (मृत्यू: २३ डिसेंबर २००४)**१७१२:रुसो – फ्रेन्च विचारवंत, लेखक व संगीतकार (मृत्यू: २ जुलै १७७८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१०: चंद्रकांत कामत -- बनारस तबला घराण्याचे हिंदुस्थानी शास्त्रीय तबला वादक(जन्म:२६ नोव्हेंबर १९३३)* *२०००:विष्णू महेश्वर ऊर्फ ’व्ही. एम.’ तथा दादासाहेब जोग –उद्योजक(जन्म:६ एप्रिल १९२७)**१९९९:रामचंद्र विठ्ठल तथा रामभाऊ निसळ – स्वातंत्र्यसैनिकांचे नेते व झुंजार पत्रकार* *१९९०:भालचंद्र गजानन खांडेकर -- गीतकार, कवी(जन्म:२८ जून १९२२)* *१९८७:पं.गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (जन्म:३० जानेवारी १९११)**१९७२:प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, ’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक (जन्म: २९ जून १८९३)**१८३६:जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १६ मार्च १७५१)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *खान्देशसाठी जळगावला स्वतंत्र विभागीय आयुक्तालय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : शिक्षकांची निवडणूक ड्युटी रद्द करा, अन्यथा मुलांना शिक्षण विभागात शिकवायला पाठवू; शिक्षक संघटनांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त धडाकेबाज IAS अधिकारी सुनील केंद्रेकरांचा स्वेच्छानिवृत्ती; न्यायालयाकडून 'त्या' योजनेसंबंधी सहकार्याची विचारणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद; राज्यातील अनेक भागात मुस्लीम बांधवांचा कुर्बानी न करण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईत ऑरेंज अलर्ट, मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रथमच विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत.. ४ ते ६ जुलै दरम्यानच्या दौऱ्यात त्या कोराडी, वर्धा आणि सेवाग्रामला भेट देणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *झिम्बाब्वेनं विक्रम रचला, 400 धावांचा पल्ला केला पार, फक्त 5 धावांनी भारताचा रेकॉर्ड कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पी. व्ही. नरसिंहराव*पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली. नारसिंहाराव यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील करीमनगर जिल्ह्यातील वंगारा या गावी 28 जून 1921 रोजी झाला. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ अशा तीन विद्यापीठांमध्ये झाले. त्यांना मातृभाषा तेलुगूबरोबरच इंग्लिश, मराठी, उर्दू, कन्नड आणि हिंदी भाषा या भाषाही अवगत होत्या.त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. 23 डिसेंबर 2004 रोजी त्यांचा मृत्यू झाला. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कष्ट ही एक अशी चावी आहेजे नशीबात नसलेल्या गोष्टींचेसुध्दा दरवाजे उघडते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशाच्या सौर मोहिमेचे नाव काय आहे ?२) राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार कायद्यासमोर सर्व समान आहेत ?३) संयुक्त अरब अमिरातीचे ( युएई ) चलन कोणते ?४) गोरखपूरमध्ये १९२३ साली स्थापन झालेल्या 'गीता प्रेस' प्रकाशनाला २०२१ चा कोणता पुरस्कार जाहीर झाला ?५) जगात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण कोणत्या देशात आहेत ?*उत्तरे :-* १) आदित्य एल-१ २) कलम १४ ३) दिऱ्हम ४) गांधी शांतता पुरस्कार ५) भारत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्री मार्तंड भुताळे, देगलूर👤 प्रभाकर लखपत्रेवार, पत्रकार, नायगाव👤 रामदास कदम👤 रवी जयंते👤 शुभम डी. पाटील👤 अभिषेक लाकडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना मानसीं दु:ख आणूं नको रे। मना सर्वथा शोक चिंता नको रे॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी। विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जिथं जाऊ, तिथं खाऊ अन् तिथेच एखाद्या व्यक्ती विषयी आपले मन तृप्त होईपर्यंत गाठोडं सोडण्याची काही लोकांना फार सवय असते. पण, ते गाठोडं सोडण्याआधी एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावे आपण कोणाविषयी कितीही तिखट, मीठ लावून सांगितले आणि गाठोडं सोडलं तरी ऐकणारा समोरचा व्यक्ती आपल्या सारखा असेलच असे नाही अनुभवी व हुशार सुद्धा असू शकते. म्हणून उगाचच कोणाचे नको ते गाठोडे सोडण्यात वेळ वाया घालवू नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुंगी व कोशातील किडा*एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, ‘अरेरे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटले पाहिजे.’ यावर किडा काहीच बोलला नाही. पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुनः तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडले असून तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते. ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला. तो तिला म्हणाला, ‘अग, त्या दिवशी बंदिवान म्हणून तू माझी कीव करीत होतीस, माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस, तोच कोशातला किडा मी आहे हे लक्षात घे. आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार. तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो.’ इतके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला.तात्पर्य - संकटात असलेला माणूस पुनः कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment