✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 जानेवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Avhr7Lmcy/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ राष्ट्रीय भौगोलिक दिवस _*•••••••••••••••••••••••••••••••••• 🟡 *_ या वर्षातील २७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟡 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟡•••••••••••••••••••••••••••••••••*२००७: बाबुराव रामचंद्र बागुल यांना जन्मस्थान पुरस्कार जाहीर* *१९७३: पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले ’व्हिएतनाम युद्ध’ संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.**१९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था ’बालभारती’ या नावाने ओळखली जाते.**१९४५: दुसरे महायुद्ध – रशियाच्या _’रेड आर्मी’_ने पोलंडमधील _’ऑस्विच’_ येथील छळछावणीतील बंदिवानांची मुक्तता केली.**१९४४: दुसरे महायुद्ध – ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला.**१८८८: वॉशिंग्टन डी. सी. येथे _'द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी'_ची स्थापना* 🟡 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟡 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: अरविंद उन्हाळे -- गझलकार* *१९७९: जितेंद्र जोशी भारतीय अभिनेता**१९७६: श्रेयस तळपदे -- हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता**१९७४: चामिंडा वास -- श्रीलंकेचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू**१९६९: विक्रम भट्ट -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व कथाकार**१९६७: बॉबी देओल – हिन्दी चित्रपट कलाकार**१९६३: डॉ. उत्तम भगवान अंभोरे -- मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी, लेखक**१९६३: आरती अंकलीकर टिकेकर -- भारतीय शास्त्रीय गायिका* *१९५७: अरुणा सुभाष गर्जे -- कवयित्री**१९५५: शशिकांत वसंत तिरोडकर -- कवी**१९५१: आनंद दिघे -- धर्मवीर नावाने प्रसिद्ध शिवसेनेचे ज्येष्ठ नेते (मृत्यू: २६ ऑगस्ट २००१ )**१९४५: चंद्रकला नंदकिशोर भार्गव -- लेखिका**१९३४: मुकुंद विष्णू टेकाडे -- बालसाहित्यिक, लेखक* *१९२७: वसंत विठ्ठल गाडे (गाडे गुरुजी)-- संघटक, संस्थापक, [विनोबा विचार केंद्र नागपूर] (मृत्यु: २४ जुलै २०१४ )**१९२६: जनरल अरुणकुमार वैद्य – भारताचे १३ वे लष्करप्रमुख (मृत्यू: १० ऑगस्ट १९८६ )**१९२४: साबू दस्तगीर -- भारतीय अभिनेता (मृत्यू: २ डिसेंबर १९६३)**१९२२: अजित खान ऊर्फ ’अजित’ – हिन्दी चित्रपटांतील चरित्र अभिनेते (मृत्यू: २२ ऑक्टोबर१९९८ )**१९२०: स्नेहलता यशवंत किनरे -- कवयित्री* *१९०९: डॉ. सविता भीमराव आंबेडकर (माईसाहेब) -- सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका (मृत्यू: २९ मे २००३ )* *१९०९: श्याम नीळकंठ ओक -- चित्रपट समीक्षक, लेखक(मृत्यू: १० मार्च १९८२ )**१९०५: राजाराम प्रल्हाद कानिटकर -- लेखक संपादक* *१९०१: लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी – महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्गाते,विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक आणि साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष, १९२३ मध्ये कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी _’तर्कतीर्थ’_ ही पदवी संपादन केली. (मृत्यू: २७ मे १९९४ )**१८५०: एडवर्ड जे. स्मिथ – आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान (मृत्यू: १५ एप्रिल १९१२ )* 🟡 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟡••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: अनिल अवचट -- सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध लेखक (जन्म: २६ ऑगस्ट १९४४ )**२०१६: दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी -- आधुनिक मराठी साहित्यातील विख्यात समीक्षक आणि ललित निबंधकार (जन्म: २५ जुलै १९३४ )**२०१३: ठाकूरदास बंग -- थोर गांधीवादी विचारवंत (जन्म:१९१७)**२००९: आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती, केन्द्रीय मंत्री, कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी (जन्म: ४ डिसेंबर १९१० )**२००८: डॉ. सुरेश महादेव डोळके -- धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, महानुभाव साहित्याचे संशोधक व ज्येष्ठ साहित्यिक (जन्म: २१ सप्टेंबर १९२६ )* *२००८: सुहार्तो – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ८ जून १९२१ )**२००७: कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (जन्म: ६ डिसेंबर १९३२ )**२०००: पु.वि. बेहेरे ऊर्फ राजाभाऊ बेहेरे --- मेनका, माहेर आणि जत्रा या मराठी मासिकाचे संपादक (जन्म: ११ जून १९३१)**१९९७: झिया सरहदी -- पटकथा लेखक आणि भारतीय उद्योग उद्योग क्षेत्रांचे दिग्दर्शक (जन्म:१९१४)**१९८९: वामन भार्गव पाठक -- मराठीतील सुप्रसिद्ध कवी, समीक्षक आणि साहित्यिक(जन्म: १९ ऑगस्ट १९०५)**१९८६: निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक (जन्म: १४ ऑक्टोबर १९३१)**१९६८: सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ ’कुमुदबांधव’ – नाटककार व साहित्यिक (जन्म: २६ मे १९०२ )**१९४७: पॉल हॅरिस – रोटरी क्लबचे संस्थापक (जन्म: १९ एप्रिल १८६८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुलगी सासरी जाताना एका पित्याने व्यक्त केलेल्या भावनाहृदयस्पर्शी कविता *दिल्या घरी सुखी राहा ....*..... पूर्ण कविता पाहण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशभरात 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ध्वजारोहण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्म भूषण तर 11 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आता नरिमन पॉईंट वांद्रे अंतर केवळ १५ मिनिटांत, प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना मोठी भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील उत्कृष्ट कलाकार नम्रता संभेराव यांचा 'सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्री' पुरस्काराने सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *धाराशिव जिल्ह्यात आगामी पाच वर्षात गाव तेथे एस टी बस सुरू करण्याचा प्रयत्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरची अमृता पुजारी पराभूत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महिला क्रिकेट विश्वचषक मध्ये बांगलादेशला पराभूत करून भारत उपांत्य फेरीत दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 माधव बोमले, बिलोली👤 दत्तराम बोमले👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वसंत बापट - विश्वनाथ वामन बापट*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गोंदिया जिल्ह्याचे नव्याने नियुक्त झालेले जिल्हा परिषद अध्यक्ष कोण आहेत ?२) महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?३) महात्मा फुलेचे ब्रीदवाक्य काय होते ?४) 'समय' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) FTII चे फुल फॉर्म काय आहे ? *उत्तरे :-* १) लायकराम भेंडारकर २) साल्हेर ( १५६७ मी. ) ३) सत्यमेव जयते ४) वेळ ५) फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 केस कुरळे का होतात ? 📒आपले केस केरटीन या प्रथिनाचे बनलेले असतात. त्यातले काही सरळसोट का राहतात, तर इतर वेडीवाकडी वळणे घेत कुरळे का बनतात, याचं रंगीत प्रथिनांच्या रचनेतच सामवले आहे. प्रथिने ही अमिनो आम्लांची बहुवारिक साखळीच असते. प्रथिनांमध्ये एकूण २० वेगवेगळ्या प्रकारची अमिनो आम्ल असतात. त्यातल्या प्रत्येकाच्या रेणूची अंतर्गत तसंच त्रिमिती रचना वेगवेगळी असली तरी प्रत्येक अमिनो आम्लाच्या एका टोकाला आम्लधर्मीय कार्बोक्सील हा रेणूंचा गट असतो, तर दुसर्या टोकाला अल्कलीधर्मीय अमिनो गट असतो. साखळी गुंफण्यासाठी जेव्हा एका अमिनो आम्लाचा रेणू शेजारच्या दुसऱ्या अमिनो आम्लाशी जोडला जातो तेव्हा हे अमिनो आणि कार्बोक्सील रेणू एकमेकांशी पेप्टाइड बंध तयार करतात. अशा रीतीने प्रथिनांची प्राथमिक रचना असणारी हि सरळसोट साखळी तयार होते. या अमिनो आम्लांवर इतर अणुही असतात. ते टोकाला नसून मधल्या अंगाच्या दोन्ही बाजूंना पसरलेले असतात. ते जराशा दूरवर असलेल्या अमिनो आम्लावरच्या दुसर्या रेणूशी संधान बांधून इतर बंध तयार करतात. त्यामुळे मग या साखळ्या सरळसुत न राहता त्यांच्यामध्ये वेटोळी किंवा मोड तयार होतात. प्रथिनांची द्वितीय स्तरावरची रचना तयार होऊ लागते.या प्रकारच्या बंधामध्ये सल्फरचे अणुही सहभागी होतात. कित्येक अमिनो आम्लांच्या मध्यभागावर सल्फरचे अणु असतात. त्यांचा संपर्क दुसऱ्या कोणत्यातरी साखळीत त्यांच्यापासून दूरवर असणाऱ्या अमिनो आम्लाच्या अंगावरच्या सल्फरच्याच अणुशी आला, कि त्यांच्यामध्ये एक पूल तयार होतो. त्याला डायसल्फाईड ब्रिज असे म्हणतात. या पुलांमुळे मग त्या प्रथिनांच्या सरळ असलेल्या साखळीला बाक येतो. त्याची वेटोळी बनतात. केसांमध्ये अशा सल्फरच्या पुलांची संख्या वाढली तर ते कुरळे होतात. जर त्यांची संख्या कमी झाली तर ते सरळ राहतात. केसांमध्ये किती पाणी आहे, यावरही त्यांच्या या रचनेत काही बदल होतात; पण ते कायमचे नसतात. केस कोरडे झाले कि परत आपले मूळ रूप धारण करतात.काही जण केसांवर काही प्रक्रिया करून त्याचे स्वरूप बदलू पाहतात. सरळ केस असलेली व्यक्ती आपले केस कुरळे करून घेते. तसे करताना ती त्यांच्यातल्या सल्फर पुलांची संख्या वाढवत असते; पण हि स्थिती तात्पुरतीच असते. कारण नव्याने वाढलेले केस परत सरळच राहतात. कालांतराने मग सरळ वळण देण्याच्या प्रयत्नांची होते. काही दिवसांनी ते आपले मुळचे कुरळेपण परत मिरवू लागतात.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगात्रजीवना अगा नारायणा । कां नये करुणा दासाची हे ॥१॥ अच्युता केशवा ये गा दीनानाथा । सर्वज्ञ समर्था कृपामूर्ति ॥२॥ चिद्घना चिद्रूपा विरंचीच्या बापा । करावी जी कृपा सर्वांभूतीं ॥३॥ तुझें म्हणविलें उपेक्षिसी जरी । नामा म्हणे हरी ब्रीद काय ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज असेल आणि त्या व्यक्तीला न कळताच नि:स्वार्थ भावनेने मदत केल्याने जो, समाधान आपल्याला मिळत असते तो, समाधान जगावेगळा असतो. आणि याच विषयी जेव्हा त्या व्यक्तीकडून सकारात्मक विचार इतरांकडून ऐकायला मिळत असतात त्यावेळी मात्र आपल्याला सर्वच काही मिळाल्यासारखे वाटते. या प्रकारची भूमिका पार पाडताना तेवढे काळीज मोठे असावे लागते. असे काळीज प्रत्येकांकडे असणे आवश्यक आहे. कारण या जीवनात सर्वच काही कमावता येतो पण, अडचणीत सापडलेल्या माणसांच्या मदतीसाठी धावून जाणे हाच खरा माणुसकी धर्म आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बदलण्याची संधी*सरधोगा जिल्ह्यातील खुशाबनगर येथे दिवाण मदनगोपाल राहत असत. अनेक राजवाड्यांचे मालक असलेल्या मदनगोपाल यांना दारूचा मोठा शौक होता. विलायती दारूच्या अनेक पेट्या त्यांच्या घरी त्यांनी साठवून ठेवलेल्या होत्या. मदनगोपाल एकदा सुगंधित थंड खोलीत विश्रांती घेत पहुडले होते. रखरखत्या उन्हात एका तेजस्वी साधूने त्यांच्या खोलीत प्रवेश केला. दिवाणसाहेबांनी हात जोडून त्या साधूला स्थान ग्रहण करण्यास सांगितले. साधू महाराज म्हणाले, "दिवाणसाहेब, मी इथे आलो आहे ते तुमच्याकडून एक वचन घेण्यासाठी, बोला मला वचन देताल काय" दिवाणजी म्हणाले, "तुम्ही जे मागताल ते जर माझ्याकडे उपलब्ध असेल तर निश्चित वचन देण्यास मी बांधिल असेन. साधू म्हणाले," तुमची सर्वात प्रिय वस्तू म्हणजे दारू तुम्ही सोडून द्याल एवढेच वचन मला द्या." मदनगोपाल पहिल्यांदा कचरले पण वचन पूर्ण करण्यासाठी ते तयार झाले. त्यांनी नोकरांना बोलावले व दारूच्या सगळ्या बाटल्या फोडून टाकायचा आदेश दिला. नोकरांनी साधूच्यादेखतच सर्व बाटल्या फोडून टाकल्या. साधूला आनंद वाटला, त्यांनी परत जाताना दिवाणसाहेबांकडून पुन्हा कधीही दारू पिणार नाही असे वचन घेतले व निघून गेले. साधू गेल्यावर एक नोकर दिवाणजीकडे आला व म्हणाला, "महाराज आजच्या रात्रीपुरती दारू मी एकेठिकाणी लपवून ठेवली आहे, आणू का" दिवाणजींनी त्याला ती बाटली आणावयास सांगून नोकराने ती बाटली आणताच त्यांनी ती बाटलीही स्वतःच्या हाताने फोडली व आयुष्यात पुन्हा कधीच दारूला स्पर्श केला नाही. पुढे वृंदावनला जाऊन त्यांनी दीक्षा घेतली. मदनगोपाल यांच्या आयुष्याची दिशाच त्या एका प्रसंगामुळे बदलून गेली. पुढे श्रीकृष्णप्रेमात बुडालेल्या मदनगोपाल यांनी "निमाईचंद" हे उत्कृष्ट उर्दू पुस्तक लिहीले.तात्पर्य - स्वतःला बदलण्याची संधी मिळाल्यावर प्रत्येकाने त्याचा लाभ घेतला पाहिजे. कदाचित त्या संधीतूनच आपल्या आयुष्याला कलाटणी मिळून आयुष्याचे सोने घडू शकते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment