✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1AEYibVoKA/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔴 *_भारतीय वर्तमानपत्र दिवस_*🔴 🔴 *_ या वर्षातील २९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔴 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: हंगेरीने दक्षिण कोरियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.**१९७५: इंडियन नॅशनल थिएटर निर्मित आणि पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ’ती फुलराणी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.**१९५५: भारतीय कामगार किसान पक्षाची स्थापना**१९५३: संगीत नाटक अकादमी ची स्थापना**१८८६: कार्ल बेंझ याला जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्‍या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.**१८६१: कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.**१८५३: नासिक येथे नाशिक सार्वजनिक वाचनालयाची स्थापना**१७८०: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी ’कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर’ या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले. ’हिकी’ज बेंगॉल गॅझेट’ या नावाने ओळखले जाणारे हे वृत्तपत्र म्हणजे भारतातील पत्रकारितेची सुरुवात मानली जाते.* 🔴 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔴••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७१: डॉ. मिलिंद लक्ष्मणराव इंदूरकर -- कवी, लेखक व संगीततज्ञ* *१९७०: राज्यवर्धनसिंग राठोड – ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज पूर्व केंद्रिय क्रीडा राज्यमंत्री**१९६२: गौरी लंकेश -- बंगळूरच्या पत्रकार व कार्यकर्त्या,(मृत्यू: ५ सप्टेंबर २०१७ )**१९६१: संजीव गोयंका -- भारतीय अब्जाधीश उद्योगपती**१९६०: प्रमोद देशपांडे --- कवी, अनुवादक**१९५९: अनिल कुलकर्णी -- प्रकाशक अनुबंध प्रकाशन संस्था**१९५९: डॉ. रेषा अकोटकर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९५२: दिलीप हरिहरराव देशपांडे -- लेखक* *१९५१: सुलक्षणा महाजन -- मराठी लेखिका आणि अनुवादिका* *१९५१: अँडी रॉबर्टस – वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज**१९५१: इकबाल मुकादम -- प्रसिद्ध लेखक, कवी* *१९४८: भास्कर देशमुख -- मराठी लेखक* *१९३४: प्राचार्य रामदास तुकाराम भगत -- लेखक**१९३२: अंबिका रमेशचंद्र सरकार -- कथालेखिका,अनुवादक**१९२९:भगवान राघवेंद्र नाईक -- लेखक* *१९२६: डॉ.मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ,नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९९६ )**१९२२: प्रो. राजेंद्रसिंग ऊर्फ ’रज्जू भैय्या’– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक (मृत्यू: १४ जुलै २००३ )**१८९१: चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे (कवी चंद्रशेखर) -- मराठी कवी (मृत्यू: १७ मार्च १९३७ )**१८६६: रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक (मृत्यू: ३० डिसेंबर १९४४ )**१८६०: अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही. (मृत्यू: १५ जुलै १९०४ )**१८५३: मधुसूदन राव – आधुनिक ओडिया साहित्याच्या तीन प्रवर्तकांतील एक प्रवर्तक. ओरिसावर मराठ्यांचे राज्य असताना महाराष्ट्रातून जी कुटुंबे ओरिसात जाऊन स्थायिक झाली,त्यांपैकी एका कुटुंबात जन्म. (मृत्यू: १९१२ )**१८४३: विल्यम मॅक किनले – अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १४ सप्टेंबर १९०१ )**१७३७: थॉमस पेन – अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक (मृत्यू:८ जून १८०९ )* 🔴 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔴••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:अरविंद जोशी -- अभिनेता, नाटककार आणि दिग्दर्शक(जन्म: १९३६ )**२०१९: जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस -- भारतीय कामगार संघटना, राजकारणी,आणि पत्रकार (जन्म: ३ जून १९३०)**२०१४: मनोहर बाळकृष्ण कुलकर्णी --प्राध्यापक, लेखक, संशोधक (जन्म: १० सप्टेंबर १९३०)**२०११: श्रीकांत वसंत देशपांडे -- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील गायक (जन्म:१२ जून १९४८)**२००३: पंढरी बाई -- भारतीय अभिनेत्री(जन्म: १९३० )**२००१: प्रा.राम मेघे – महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री* *२०२०: पंडित देवेन्द्र मुर्देश्वर -- ज्येष्ठ बासरी वादक (जन्म: १९ सप्टेंबर १९२३)**१९९५: रुपेश कुमार –रुपेरी पडद्यावरील खलनायक,निर्माते व दिग्दर्शक* *१९९३: रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय – गणितज्ञ* *१९६३: सदाशिव आत्माराम जोगळेकर – लेखक व संपादक.अहिल्या आणि इतर कथा,संयुक्त महाराष्ट्राचा ज्ञानकोश,सुलभ विश्वकोश ही त्यांची काही पुस्तके आहेत.(जन्म १९ नोव्हेंबर १८९७ )* *१९६३: रॉबर्ट फ्रॉस्ट – अमेरिकन कवी (जन्म: २६ मार्च १८७४ )**१९३४: फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. (जन्म: ९ डिसेंबर १८६८ )**१८२०: जॉर्ज (तिसरा) – इंग्लंडचा राजा (जन्म: ४ जून १७३८ )**१५९७: महाराणा प्रताप – मेवाडचा सम्राट (जन्म: ९ मे १५४० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोबाईल क्रांती आणि जीवन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी 25 फेब्रुवारी रोजी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *31 जानेवारी पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनला होणार सुरुवात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु संबोधित करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *माजी शिक्षणमंत्र्यांनी घेतलेले निर्णय रद्द, पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण, एक राज्य एक गणवेशातही सुसूत्रता नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात महाविद्यालयात निवडणुका होणार सुरू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात AI विद्यापीठाची होणार स्थापना, विद्यापीठासंदर्भात समिती गठीत करण्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जसप्रीत बुमराह ठरला ICC Men’s Cricketer of the Year पुरस्काराचा मानकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *तिसऱ्या T20सामन्यात भारताचा 26 धावानी पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शशिकांत संगम, शिक्षक, नांदेड👤 सुनील वानखेडे, शिक्षक, किनवट👤 नरेंद्र जोशी, शिक्षक, नांदेड👤 राजेश्वर सुरकूटवार, धर्माबाद👤 वीरभद्र करे👤 कोंडीराम केशवे, शिक्षक, लातूर👤 कु. वेदश्री दर्शन येवतीकर ( दुसरा वाढदिवस )*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सार्वजनिक काका - गणेश वासुदेव जोशी*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रसन्नता हे आत्म्याचे आरोग्य आहे व उदासीनता हे आत्म्याचे विष आहे. - स्टेनिसलास*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'मधमाशांचे कर्दनकाळ'* असे कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?२) भारतामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा केव्हा लागू झाला ?३) वादळाची दिशा आणि गती कोणत्या एककामध्ये मोजली जाते ?४) थरचे वाळवंट भारतातील किती राज्यात पसरले आहे ?५) लपविलेला बॉम्ब शोधण्यासाठी कोणत्या प्राण्याला प्रशिक्षण दिले जाते ? *उत्तरे :-* १) वेडा राघू ( Green bee eater ) २) सन १९७२ ३) नेफोमीटर ४) राजस्थान, गुजरात, हरियाणा ५) कुत्रा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लोकर* 📙**************** थंडीची चाहूल लागली की लोकरीची आठवण होतेच. उबदार वस्तू, कपडे, पांघरुणे, मोजे, टोप्या या लोकरीच्या बनवल्या जातात. लोकरीचे कपडे महाग असतात; पण नीट वापरले, तर टिकाऊ असतात. हल्ली पर्यायी प्रकार म्हणून कृत्रिम लोकर बाजारात आहे. आॅरलाॅन या कुत्रिम धाग्यांचा वापर त्यात असतो. पण खरी लोकर व तिची उब ही वेगळीच. लोकर ही मुख्यतः मेंढ्यांपासून मिळवली जाते. काही अन्य प्राण्यांची लोकरही जगात वापरतात, पण ते प्राणी व त्यांची लोकर केवळ त्याच भागात वापरली जाते. लामा, याक ही त्यांची काही उदाहरणे. लोकर म्हणजे एक प्रकारचा केसासारखाच धागा असतो. पण हा धागा मुळापासून काढल्यानंतरही म्हणजे मृत झाल्यावरही स्थितिस्थापकत्व राखू शकतो. हवेतील आर्द्रता, पाणी, शरीरातील घाम यांना शोषून घेणे व गरजेप्रमाणे पुन्हा आपोआप कोरडे होणे हा लोकरीचा प्रमुख गुण. त्यामुळेच पावसाची भुरभुर असताना लोकरीचा स्वेटर अंगात असेल, तर वेळ निभावून जाते व स्वेटर आपोआप वाळत जातो. दुसरा लोकरीचा प्रमुख गुण म्हणजे मूळ आकार पुन्हा मिळवणे. त्यामुळे ताणली, दाबली, चुरगाळली, तरी लवकर शक्यतो मूळ आकार घेते.  घाण, धूळ, माती, तेलकटपणा यांपासूनही लोकरीचे कपडे झटकन सोप्या रीतीने स्वच्छ होऊ शकतात. या सर्व गुणांमुळेच लोकर आजही स्वतःची मागणी टिकवून आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील मरीनो जातीच्या मेंढ्या आणि दक्षिण आफ्रिका व अर्जेंटिना येथील मेंढ्या ही जगातल्या लोकर पैदाशीची प्रमुख साधने. पश्मीना जातीच्या मेंढ्या ही याला उपयुक्त असतात. त्यांचा धागा खूप लांब, चिवट व पाहिजे त्या जाडीचा काढता येतो. मेंढीची लोकर यांत्रिक कात्रीने कापून पाण्यात भिजवून मग वाळवतात. एका मेंढीची लोकर शक्यतो सलग एकाच गठ्ठ्याप्रमाणे काढली जाते. हिवाळ्यानंतर हा प्रकार करतात म्हणजे पुढच्या हिवाळ्यापर्यंत मेंढी पुन्हा स्वतःचे संरक्षण करू शकते. कापलेली लोक कार्डिंग मशिनवर कातून तिचे जाड दोर वळले जातात. त्यांना रंग देऊन व त्यांच्यावर प्रक्रिया करून मग योग्य तो ताण देत, पीळ देत त्यापासून लोकरीचे गुंडे बनवले जातात. कापड विणायचे असले, तर लोकरीबरोबर थोडाफार सुताचा वापरही केला जातो. लोकरीला दिलेला रंग पक्का असतो व त्यामुळे तिला चकाकी येते.लोकरीचा कपडा अंगावर घातला की, तिच्यातील धाग्यांमध्ये अडकून राहिलेली हवा हीच मुळी मुख्यत: आपल्या शरीरावरील ऊब व बाह्य गारवा यांमध्ये इन्सुलेशनप्रमाणे काम करते. त्यामुळे निर्माण झालेली ऊब टिकून राहते. चहाच्या किटलीवर टिकोझी (Tea-Cozy) यासाठीच घालतात. लोकरीच्या कपड्यांना ते टोचू नयेत म्हणून आतून मऊ अस्तर लावण्याची ही पद्धत आहे. लोकरीचे कपडे वापरण्याचा काळ हा वर्षांतील थंडीचा काळ एवढाच असतो. अन्य वेळी ते ठेवून दिले जातात. लोकर खाणारे एक प्रकारचे किडे हे कपडे कुरतडतात. त्यामुळे हे कपडे ठेवताना नेहमीच कीटकनाशक औषधांचा वापर आवश्यक ठरतो. अन्यथा हवाबंद कपाटात कपडे ठेवावे लागतात. या प्रकारच्या किड्यांना कसर जातीचे किडे म्हणतात. चकचकीत, लहान, झपाट्याने हालचाल करणारे हे किडे खास करून लोकरीवरच वाढतात. लोकरीचे स्वेटर, शाली हाताने विणणे हे काम जगभराच्या स्त्रिया कलाकुसरीने व आवडीने करत आल्या आहेत. या क्षेत्रात आता यांत्रिक पद्धतीने जरी काम होत असले, तरीही आवडीच्या व्यक्तीने विणलेला स्वेटर जास्त आवडीने वापरला जातो, याला यानंतरही बाधा येईलसे वाटत नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जन्ममरणाचें भय मज दाविसी । तें म्यां ह्रषिकेशी अंगिकारलें ॥१॥ आतां माझी चिंता तुज कां पंढरिनाथा । असो दे भलभलता भलतेंच ठायीं ॥२॥ सुखदुःख भोगणें माझें मी जाणें । तुज तंव भोगणें नलगे कांहीं ॥३॥ नामा म्हणे माझे हेचि मनोरथ । होईन शरणागत जन्मूजन्मीं ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण किती खरे बोलत आहोत हे जरी इतरांना जास्त माहीत नसले तरी आपल्यालाच माहीत असते. पण खोटे बोलून स्वतः चे समाधान कोणत्या रितीने आपण करत आहो हेही आपल्याच जास्त माहीत असते आणि त्याही पलीकडे जो कोणी सभोवताली पसरलेला असतो त्याला तर सर्व काही माहीत असते.म्हणून माणसाने एवढेही खोटे बोलू नये.व इतरांची दिशाभूल करू नये. त्यापेक्षा खरे बोलताना जरी कोणी ऐकले नाही तरी चालेल पण एक दिवस खरेपणाच आपला आधार होत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *नाव मोठे .......* एका बेडकाचे पोर नदीकाठी बसून तेथे एका वेताच्या जाळीकडे मोठ्या कौतुकाने पाहात होते. त्याची आई जवळच होती. तिच्याजवळ त्याने त्या वेताच्या हिरव्या पानांची व त्यांच्या भक्कम कांडांची फार स्तुती केली. काही वेळाने मोठे वादळ झाले आणि त्याच्या जोराने ती वेताची जाळी उपटली गेली व सगळे वेत नदीतून सैरावैरा वाहू लागले. त्यातला एक मोडका वेत त्या बेडकीच्या हाती लागला. तो आपल्या पोरास दाखवून ती म्हणाली, 'मघाशी जो वेत तुला इतका भक्कम दिसत होता, त्याची आता काय स्थिती झाली आहे ती पाहिलीस का ?'तात्पर्यः- नाम बडे दर्शन छोटे ! अशा वस्तू बर्‍याच असतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment