✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जानेवारी 2025💠 वार - ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1H1WJwJBJv/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚛️ *_आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन_* ⚛️•••••••••••••••••••••••••••••••• ⚛️ *_राष्ट्रीय बालिका दिवस_* ⚛️••••••••••••••••••••••••••••• ⚛️ *_ या वर्षातील २४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⚛️ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚛️•••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:अ‍ॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.**१९७६:’बर्मा शेल’ या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव ’भारत रिफायनरीज’ असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून ’भारत पेट्रोलियम’ (BPCL) असे करण्यात आले.**१९७२:गुआममध्ये इ. स.१९४४ पासून लपलेला जपानी सैनिक,शोइची योकोइ सापडला.त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.**१९६६:भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.**१९६६:एअर इंडियाचे 'कांचनगंगा' हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ.होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.**१९४३:पुण्यातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार**१९४२:दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.**१९१६:नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.**१८६२:बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली.**१८५७:दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.**१८४८:कॅलिफोर्निया गोल्डरश – कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले. या बातमीमुळे जगभरातून लाखो लोक सोने मिळवण्यासाठी कॅलिफोर्नियात दाखल होऊ लागले.* ⚛️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚛️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: सरोजकुमार सदाशिव मिठारी -- लेखक, पत्रकार**१९८०: अतुल माधवराव राऊत -- कवी**१९७४: जयंत देवाजी लेंझे -- कवी* *१९७३: संदीप प्रभाकर मणेरिकर -- लेखक तथा दैनिक नवप्रभातचे उपसंपादक**१९७१: संतोष चंद्रकांत गायकवाड -- लेखक**१९७१: प्रा. डॉ. गणेश नत्थुजी चव्हाण -- प्रसिद्ध भरकाडीकार, लेखक, वक्ते, संपादक* *१९५६: रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर -- कवी, लेखक, संपादक**१९५६: प्रा. अशोक दगाजी शिंदे -- कवी, लेखक, संपादक* *१९५३: भगवान ठग -- प्रसिद्ध कवी आणि अनुवादक (मृत्यू: २२ जानेवारी२००९ )**१९५२: विजया दयानंद चिंचुरे -- लेखिका, कवयित्री**१९४७: जयप्रकाश बाळकृष्ण म्हात्रे -- विज्ञान चळवळीचे कार्यकर्ते, वक्ते, लेखक* *१९४४: रामदास पाध्ये -- बोलक्या बाहुलीचे निर्माते आणि त्यांचे प्रयोग करणारे कलाकार* *१९४४: अशोक शेवडे -- चित्रपट आणि नाटक विषयांवरील ज्येष्ठ पत्रकार (मृत्यू: १८ मार्च २०२१ )**१९४३: सुभाष घई – प्रसिद्ध हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक**१९३९: नामदेव वासुदेव लोटणकर -- कवी* *१९३६: लक्ष्मण बाकू रायमाने -- मराठी व कानडी साहित्याचे गाढे अभ्यासक, लेखक आणि समीक्षक**१९२६: जय ओम प्रकाश -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक(मृत्यू: ७ ऑगस्ट २०१९ )**१९२४: कर्पूरी ठाकुर -- भारतीय स्वतंत्र सेनानी बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री (मृत्यू : १७ फेब्रुवारी १९८८)* *१९२४: मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: २८ डिसेंबर २००० )**१९२३: रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री ’सांगत्ये ऐका’ नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७१ )**१९१८: वामन बाळकृष्ण भागवत -- लेखक, संस्कृत भाषातज्ज्ञ (मृत्यू: ९ फेब्रुवारी २००४ )* ⚛️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚛️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: आनंद विनायक जातेगावकर --मराठी कथालेखक व कादंबरीकार(जन्म: ६ जून १९४५ )**२०११: स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक (जन्म: ४ फेब्रुवारी १९२२ )**२००५: अनुताई लिमये – गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यात सक्रीय सहभाग घेणार्‍या स्वातंत्र्यसेनानी आदिवासी महिला व बालकांच्या कल्याणासाठी झटणार्‍याव सामाजिक कार्यकर्त्या**२०००: केशव पांडुरंग जोग -- राष्ट्रीय संस्कृत व्याख्याता, संशोधक (जन्म: २६ मार्च १९२५ )**१९९६: वसंत देव -- भारतीय लेखक, गीतकार आणि पटकथा लेखक (जन्म: २९ सप्टेंबर १९२९)**१९८९: रत्नमाला -- भारतीय चित्रपट सृष्टीतील महिला अभिनेत्री(जन्म: २२ जून १९२४)**१९६६: एअर इंडियाचे ’कांचनगंगा’ हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ.होमी जहांगीर भाभा मृत्यूमुखी पडले. (जन्म: ३० ऑक्टोबर १९०९ )**१९६५: विन्स्टन चर्चिल – दुसर्‍या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक,वृत्तपत्रकार,थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: ३० नोव्हेंबर १८७४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त*मतदार राजा जागा हो .....!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुण्यातील अपार्टमेंटचा अनोखा पॅटर्न, सौर ऊर्जेमुळे दरमहा ३५ हजारांची बचत; राज्यातील पहिले १००% सौर ऊर्जेवर चालणारे अपार्टमेंट*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पाणी व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी, बारामतीच्या काऱ्हाटीसह सहा गावांच्या 'वॉटर वारियर्स'ना प्रजासत्ताक दिनी दिल्लीत विशेष सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दावोसमधून 15 लाख 70 कोटींची गुंतवणूक आणली:विदर्भ, एमएमआर, मराठवाड्यासह नाशिकसाठी करार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एसटी बस अपघात रोखण्यासाठी कठोर पावलं, बसस्थानकांवर तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, परिवहनमंत्री मिसाळ यांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे : मराठी गझलेचा नवा अध्याय:राजन लाखे यांच्या 'गझलायन' संग्रहाचे प्रकाशन, मराठी गझल जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हरित हायड्रोजन उत्पादनाच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी मोठी कामगिरी, भारती विद्यापीठाच्या विज्ञानम संघाला स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये संयुक्त विजेतेपद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महिला क्रिकेट विश्वकप - भारताने श्रीलंकेचा 60 धावाने हरवून सलग तिसरा सामना जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 राहुल तांबे, मुंबई👤 मेघा हिंगमिरे👤 आशिष कोटगिरे👤 सोनू राजेंद्र येरमलवाड👤 प्रशांत उकिरडे, सहशिक्षक, बार्शी👤 रेश्मा कासार, पुणे👤 सिध्दांत मनूरकर, पाथर्डी👤 योगेश फत्तेपुरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोरोपंत - मोरेश्वर रामचंद्र पराडकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या गावाला *'सैनिकाचे गाव'* म्हणून ओळखले जाते ?२) जागतिक स्तरावरील पहिली मानव - रोबोट मॅरेथॉन स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे ?३) भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे ?४) 'मातीखालची माती' हे व्यक्तीचरित्र कोणाचे आहे ?५) ग्रामसेवकावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते ? *उत्तरे :-* १) कातूर्ली, ता. आमगाव २) चीन ( बीजिंग ) ३) कलम ५२ ४) आनंद यादव ५) गटविकास अधिकारी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चोरा ओढोनियां नेईजे जैं शुळीं । चालतां पाउलीं मृत्यु जैसा ॥१॥ तैसी परी मज जाली नारायणा । दिवसेंदिवस उणा होत असे ॥२॥ वृक्षाचिये मुळीं घालितां कुर्‍हाडी । वेंचे तैसी घडी आयुष्याची ॥३॥ नामा म्हणे हेंही लहरीचें जल । आटत सकळ भानुतेजें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वयाने लहान असलेल्यांकडून जेव्हा छोटीशी चूक होते तेव्हा सर्वजण त्याला नको त्या शब्दात बोलत असतात.पण,तीच चूक जेव्हा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीकडून होते त्यावेळी वयाने लहान असणारा समजावून सांगतो अशावेळी त्याला शहाणपणा शिकवू नको म्हणून हाकलून लावतात.बरेचदा वयाने मोठा असलेला माणूस समजदार असतोच असे नाही तर वयाने लहान असणारा सुद्धा अनुभवी असू शकतो म्हणून एखाद्याला कमी लेखून त्याचा अपमान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रामाणिक पहारेकरी*एकदा शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजून खुप दूर होता. पण दिवस मावळायला खूपच थोडा अवधी राहिला होता. राजगडावर पोहचणं शक्य नव्हतं. सहाजिकच महाराजांनी वाटेत असलेल्या एका गढीवजा किल्ल्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात महाराज सोबत्यांसह इच्छित छोट्या किल्ल्यावर पोहचले. परंतु दिवस मावळला होता आणि त्याही गडाचे दरवाजे बंद झाले होते.' आता काय करायचं ?' असाप्रश्न साऱ्यांच्याच चेहऱ्यावर उमटला. पण दिवस मावळून अर्धा घटकाही झाला नव्हता. महाराज सोबत होते. ते काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास सगळ्यांना होता.गडाचे दरवाजे बंद झालेत हे पाहून महाराज पुढे सरसावले. त्यांनी आवाज दिला, " कोण आहे रे पलीकडे ? दार उघड.""तुमी कोण हायसा ? " पहारेकऱ्यानं दरडावून विचारलं.पहारेकऱ्याचा दरडावणीचा स्वर ऐकून महाराजांना हसू आलं. तरही हसू दाबत महाराज म्हणाले," आम्ही महाराज आहोत."पण दरवाजावरचा पहारेकरी महाराजांनाच ओळखत नव्हता तर महाराजांचा आवाज कुठून ओळखणार. त्याला वाटलं ही काहीतरी शत्रूची चाल आहे. कुणीतरी महाराजांच्या नावाखाली आत घुसायला बघतोय.तो आपला विचार करत राहिला आणि इकडून शिवाजी महाराजांनी पुन्हा आवाज दिला, "आरे, उघड की दरवाजा.""तुमी कुणी बी असा पण दरवाजा उघडाया न्हाय जमायचं पाव्हणं. आवं सांजच्यापासून तांबडं फुटूस्तोवर काय बी झालं तरी गडाचा दरवाजा उघडायचा न्हायी आसा शिवाजी महाराजाचाच हुकुम हाय. आन आमचं महाराज काय बी झालं तरी सवताचा हुकूम सवता कधीच मोडाया सांगत नाहीत असं समदी म्हणत्यात. आवं कुणी बी लुंग्या मुंग्या यईल आन महाराजांचं नाव घिवून दार उघडाया सांगण. आमाला एवढं कळंना व्हय. तवा तुमी कुणी बी असा रातभर भायीरच बसा. दिस उजाडल्यावर बघू आपण काय आसन ते." महाराजांकडे आता कुठलाच मार्ग नव्हता. धाक दडपशाही करून त्यांनीच घालून दिलेला शिरस्ता त्यांना मोडायचा नव्हता. महाराजांनी आख्खी रात्र गडाबाहेर उघड्यावर काढली. सकाळ झाली. गडाला जाग आली. हळूहळू किलकिले होत गडाचे दरवाजे उघडले. पहारेकऱ्यानं रात्रीचे पाहुणे दारातच असल्याचं पाहिलं. त्यांची नीट खातरजमा करूनत्यांना आत घेतलं. पण चौकशी करताना जेव्हा पहारेकऱ्याच्या कळालं कि ज्यांना रात्री आपण दरवाजावर आडवलं ते खरोखरच महाराजच होते तेव्हा मात्र त्याचे धाबे दणाणले. त्याला त्याचा कडेलोट दिसू लागला. चेहरा भीतीने पंधरा पडला. पहारेकऱ्याची अवस्था महाराजांच्या लक्षात आली. तोशांत पावलानं पहारेकऱ्याजवळ गेले. त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. स्वतःच्या गळ्यातला कंठा काढून त्याच्या गळ्यात घातला. आणि म्हणाले, "तुमच्यासारख्या प्रामाणिक सोबत्यांच्या जिवावरच आमचं स्वराज्य उभं आहे. "•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment