✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 जानेवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_25.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील १८वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००५:एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.**१९९९:नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.**१९९८:मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९९७:नोर्वेच्या बोर्ग आऊसलंडने एकट्याने व कोणाच्याही मदतीशिवाय अटलांटिक महासागर पार केला.**१९७४:इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.**१९५६:संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार**१९११:युजीन बी.इलायने सानफ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु.एस.एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.**१७७८:कॅप्टन जेम्स कूक हा हवाई बेटांवर पोचणारा पहिला युरोपियन बनला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७५:मोनिका बेदी-- भारतीय अभिनेत्री आणि टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता**१९७३:प्रा.डॉ.रंजन दामोदर गर्गे-- विज्ञान लेखक,विविध पुरस्काराने सन्मानित* *१९७२:विनोद कांबळी –भारतीय क्रिकेटपटू**१९७१:महेंद्र भाऊरावजी सुके-- पत्रकार, लेखक**१९६६:अलेक्झांडर खलिफमान – रशियन बुद्धिबळपटू**१९५८:भूपेंद्र दामोदर संखे-- कवी,लेखक**१९५८:तुका उत्तमराव मोहतुरे-- लेखक,कवी**१९४७:प्रकाश गोपाळ सावरकर-- लेखक* *१९४५:डॉ.विजया वाड --प्रसिद्ध लेखिका, बालसाहित्यिक,मराठी विश्वकोश मंडळाच्या पूर्व अध्यक्षा**१९४५:माधवी करमळकर -- लेखिका* *१९३७:अरविंद रघुनाथ मयेकर --ख्यातमान सतारवादक आणि संगीतकार(मृत्यू:३० मार्च २०१९)**१९३३:जगदीश शरण वर्मा – भारताचे २७ वे सरन्यायाधीश (मृत्यू:२२ एप्रिल २०१३)**१९२५:मनोहरराय लक्ष्मणराव सरदेसाय-- कोकणी कवी,निबंधकार व अनुवादक (मृत्यू:२२ जून २००६)**१९२५:गजानन जोहरी-- लेखक* *१९०९:द.ग.देशपांडे (बाबुराव जाफराबादकर)-- लेखक,संगीत,नाटय क्षेत्रात योगदान* *१८९५:वि.द.घाटे तथा विठ्ठल दत्तात्रेय घाटे-- मराठी कवी,लेखक(मृत्यू:३ मे १९७८)**१८८९:शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ – नाट्यछटाकार (मृत्यू:१ आक्टोबर १९३१)**१८८९:देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी.व्ही.जी.– कन्नड कवी व विचारवंत (मृत्यू:७ आक्टोबर १९७५)**१८४२:न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक,धर्मसुधारक,अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश (मृत्यू:१६ जानेवारी १९०९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६:आशा पाटील --मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाट्यक्षेत्रातील अभिनेत्री (जन्म:१९३६)**२०१५:शकुंतला महाजन तथा ’बेबी शकुंतला’ –वयाच्या ८२ व्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली.(जन्म:१७ नोव्हेंबर १९३२)**२०११:पुरुषोत्तम दास जलोटा-- भारतीय शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायक(जन्म :९ सप्टेंबर १९२५)**२००३:हरिवंशराय बच्‍चन – हिन्दी कवी (जन्म:२७ नोव्हेंबर १९०७)**१९९६:एन.टी.रामाराव – तेलगू अभिनेते, दिग्दर्शक,निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री (जन्म:२८ मे १९२३)**१९८३:आत्माराम रावजी भट – कृतिशील विचारवंत,’मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे संस्थापक (जन्म:१२ मे १९०५)**१९४७:कुंदनलान सैगल – गायक व अभिनेते (जन्म:११ एप्रिल १९०४)**१९३६:रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक (जन्म:३० डिसेंबर १८६५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* * Chavhan Shriram माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एका शेतकऱ्याची आत्मकथा*नमस्कार ....!मी एक शेतकरी आपल्याशी संवाद करीत आहे. या भारतातील जवळपास ७५ टक्के जनता खेड्यांत राहते आणि येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती म्हणूनच भारत देश कृषिप्रधान आहे असे म्हटले जाते. भारतातील संपूर्ण व्यवहार हा शेतीवरच अवलंबून आहे. शेतातून निघणा-या उत्पादनावरच भारताचा विकास अवलंबून आहे. इतरांना जगवणारा, उत्पादक असा मी शेतकरी मात्र फारच बिकट अवस्थेत दिसून येतो. कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळीनुसार मी उभ्या जगाचा पोशिंदा आहे. मात्र ..................... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्र्याचे मिशन दावोस, 20 ते 24 जानेवारी मध्ये दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नारायणगावाजवळ भीषण अपघात, 9 ठार व 8 जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 65 लाख प्रॉपर्टी कार्डचे वाटप*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बांगलादेश ने लादलेल्या 10 टक्के आयात शुल्कामुळे लासलगावी लाल कांदा घसरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *NTA च्या नियमात बदल, नीटच्या फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची धावपळ, नाव बदल करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उत्तर भारतात धुक्याची चादर, जनजीवन विस्कळीत, दिल्लीत 117 विमानांना उशीर तर 27 रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *खो-खो विश्वचषकामध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *रेणू* 📙 *************मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. अणूची रचना काहीशी सूर्यमालेसारखी असते. अणूचे बहुतेक सर्व वस्तुमान अणूकेंद्रात असते. धनविद्युतभारित प्रोटॉन आणि तेवढ्याच वस्तुमानाचे पण विद्युतभार नसलेले न्यूट्रॉन यांनी अणुकेंद्र बनते. त्याच्याभोवती विविध कक्षांत इलेक्ट्रॉन घिरट्या घालीत असतात. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या समान म्हणून अणू मात्र विद्युतभाराच्या दृष्टीने किंवा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. चांदी, सोने इत्यादी अशा प्रकारची धातूरूप मुलद्रव्ये वगळता सृष्टीतील बाकी सर्व पदार्थ हे रेणूंनी बनलेले असतात. रेणू म्हणजे दोन किंवा अधिक अणू एकत्र गुंफून झालेली रचना. ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन ही मुलद्रव्ये त्यांच्या रेणूंची बनलेली असतात. त्यांच्या प्रत्येक रेणूत दोन अणू असतात. पाणी हे संयुग. ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे दोन अणू एकत्र आले की, पाण्याचा एक रेणू बनतो. नित्याच्या आढळतील बहुसंख्य पदार्थ संयुग स्वरूपातच असतात. शिवाय अनेक मुलद्रव्येही त्यांच्या रेणूंचीच बनलेली असल्यामुळे आपल्या पर्यावरणातील सारे विश्व रेणूंचे बनले आहे असे म्हणता येईल. रेणूंचे काही गुणधर्म विलक्षण आहेत. ऑक्सिजन आणि हायड्रोजन एकत्र येऊन बनणाऱ्या पाण्याचे गुणधर्म त्याच्या घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्माहून किती वेगळे ! साखर तर हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन यांनी बनते. परीक्षानळीत साखर तापवली की खाली काळा साका आणि नळीच्या तोंडाशी पाण्याचे बारीक थेंब मिळतात. कितीतरी प्रकारचे अणू एकत्र येऊन प्रचंड रेणू बनू शकतात. अमिनो आम्ले, प्रथिने, डीएनए हे सर्व गुंतागुंतीच्या रचनांचे रेणूच आहेत. मात्र तरीही रेणू खूप लहान असतो, हे विसरायचे नाही. घोटभर पाण्यात सहावर तेवीस शून्य इतके रेणू असतात ! असे असंख्य रेणू एकत्र येऊन पदार्थ बनतो. हे रेणू एकमेकांशी कसे गुंफलेले आहेत, यावर पदार्थाचे भौतिक गुणधर्म ठरतात. गुंफण घट्ट असेल, तर पदार्थ घन असतो. अगदी शिथिल असेल, तर द्रवरूप आणि प्रत्येक रेणू सुटा असेल तर पदार्थ वायुरूप असतो. रेणूची हालचाल तापमानावर अवलंबून असल्याने उष्णता देऊन पदार्थ वितळता येतो आणि द्रवाचे वायूत रूपांतर करता येते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम ठाणेदार , पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.*संकलन :- प्रमिला सेनकुडे **ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला *'इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क'* म्हणून मान्यता देण्यात आली ?२) महाराष्ट्रात 'पहिला राज्य क्रीडा दिवस' केव्हा साजरा करण्यात आला ?३) वैनगंगा नदी कोणत्या नदीला मिळते ?४) भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?५) 'भूगोल दिन' केव्हा साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) पेंच व्याघ्र प्रकल्प २) १५ जानेवारी २०२४ ३) वर्धा / गोदावरी ४) रघुराम अय्यर ५) १४ जानेवारी*संकलन :- जैपाल ठाकूर *जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 Vijaya Wad, प्रसिद्ध बालसाहित्यिक👤 Prabhakar Rajeshwar Kamtalwar, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, धर्माबाद👤 रामनाथ खांडरे, करखेली👤 त्र्यंबक आडे, नांदेड👤 Mahesh Govindwar , सहशिक्षक, माहूर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••करी वृत्ती जो संत तो संत जाणा। दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा॥ उपाधी देहेबुद्धीते वाढवीते। परी सज्जना केविं बाधु शके ते॥१६८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आलेल्या दु:खाला कंटाळून जाणे म्हणजे जीवन जगणे नव्हे. दु:ख हे दोन दिवसाचे पाहुणे असतात सदैव लक्षात असू द्यावे. भलेही सुख खूप काही देत असेल तरी जे आपल्याला पाहिजे ते कधीच देत नाही म्हणून सुखाच्या मोहात पडू नये आणि दु:खाला कंटाळू नये . खऱ्या अर्थाने दु:खच जीवन जगण्यासाठी मार्ग दाखवत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राक्षस, चोर आणि ब्राह्मण*एका गावात एक द्रोण नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजापाठ करून जे द्रव्य मिळेत, त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी एका यजमानने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या. दानात मिळालेल्या त्या दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं. एके काळी शिळी पोळी भाजी खाणार तो ब्राह्मण! गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला. द्रोण ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी बघायची अन् ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या, असा त्या चोराचा डाव होता. एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोराची गाठ एका राक्षसाबरोबर पडली. परस्परांनी एकमेकांना 'तू कुठे अन् का जातोस,' ते विचारलं. चोर म्हणाला, 'मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे. पण तू कुठे चालला आहेस?' अरे, मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे. ह्या ब्राह्मणानं मंत्र-तंत्र करून माला दूर घालवायचं, माझं अन्न-पाणी तोडलंय, पण आज मी त्यालाच खाणार आहे झालं! दोघांचही लक्ष एक निघालं. दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला. तो चोर अन् राक्षस हे दोघं त्या ब्राह्मणाच्या दारांत आले. दोघांनीही घरात डोकावून पाहिले, तर तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता. राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार, तोच चोर म्हणाला, अरे थांब! मी आधी दोन्ही गायी घेऊन जातो, मग तू त्याला खा. त्यावर राक्षस म्हणाला, वा रे वा! मोठा शहाणाच आहेस की तू!तू गायींना नेताना त्या हंबरल्या, तर तो जागा होणार नाही का ! मग मी काय करू? राक्षसाचं हे म्हणणं चोराला पटेना अन् चोर आपली घाई सोडेना. असं करता-करता हळूहळू त्यांचे एकमेकांचे आवाज तापू लागले. परस्परांतला संवाद संपू लागला. अन् वाद-विवाद भांडणं चालू झाली. त्यात त्या दोघांनी आपल्या मोठ्या आवाजचं भात राहिलं नाही. ते आवाज ऐकून गायी हंबरल्या. मोत्यानं भुंकायला सुरूवात केली. ब्राह्मणही झोपेतून जागा झाला. त्याने राक्षस अन् चोराला पकडून आरडा-ओरडा केला. त्या आवाजानं शेजारी मंडळी काठ्या, मशाली इ. घेऊन धावत आले. त्यांना पाहून राक्षस आगलील आणि चोर लोकांना पाहून धूम पळून गेला. तात्पर्य : फुकट शब्दानं शब्द वाढवून वादविवाद करू नये. भांडणाने फायदा तर होणे दूरच, पण अनेकदा नुकसानच होते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक- स्तंभलेखक ना. सा. येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment