✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 जानेवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1CtV1LU1JW/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔰 *_राष्ट्रीय पर्यटन दिन_*🔰•••••••••••••••••••••••••••••••• 🔰 *_राष्ट्रीय मतदार दिन_* 🔰•••••••••••••••••••••••••••••••• 🔰 *_ या वर्षातील २५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔰 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔰•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना ’भारतरत्‍न’**१९९५: अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले. रशियन सरकारच्या रडारवर ते दिसू लागताच अमेरिकेने अण्वस्त्र सोडले असावे, असा संशय रशियन अधिकार्‍यांनी व्यक्त केल्यामुळे रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी अमेरिकेवर अण्वस्त्रे डागण्यासाठी ’न्युक्लिअर ब्रिफकेस’ हातात घेतेली होती!**१९९१: मोरारजी देसाई यांना ’भारतरत्‍न’**१९८२: आचार्य विनोबा भावे यांना ’भारतरत्‍न’**१९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.**१९४१: ’प्रभात’चा ’शेजारी’ हा चित्रपट रिलीज झाला.**१९१९: पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.**१८८१: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.**१७५५: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.*🔰 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔰••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: मयूर बाळकृष्ण बागुल -- लेखक**१९८४: स्वाती बाळासाहेब ठुबे-खोडदे -- कवयित्री* *१९७५: एकता अशोक मेनकुदळे --- लेखिका**१९७१: डॉ. मिलिंद चोपकर -- लेखक, संपादक* *१९५९: बाळ कांदळकर -- कवी**१९५८: कविता कृष्णमूर्ती – प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९५५: मोहन कल्लाप्पा हवालदार -- ज्येष्ठ पत्रकार, लेखक**१९५४: मदन रामसिंह हजेरी -- कादंबरीकार, बालकथाकार**१९५२: प्रकाश नथुभाऊ खरात -- कवी, लेखक (मृत्यू: १९ एप्रिल २०२१ )**१९५१: हेमलता प्रदीप गीते -- प्रसिद्ध कवयित्री**१९५१: अर्चना पंडित -- कवयित्री**१९३८: सुरेश विनायक खरे – मराठी नट, लेखक, दिग्दर्शक, जाहिरातपटकार, चित्रपट पटकथालेखक, नाट्यावलोकनकार, संवादक, मुलाखतकार, आणि मराठी नाटककार व समीक्षक**१९३३: दिनेश वामन वाळिंबे -- कवी**१९३१: डॉ. रामचंद्र विश्वनाथ मंत्री -- लेखक**१९१७: श्रीपाद दत्तात्रेय कुलकर्णी -- लेखक**१९१६: बापूसाहेब गोविंदराव लाखनीकर-- संस्थापक, लेखक (मृत्यू: २६ डिसेंबर २००१ )**१९१४: जगन्नाथ शामराव देशपांडे -- प्राचीन मराठी संशोधक, संपादक* *१८८६: पांडुरंग नरसिंह पटवर्धन -- इतिहास संशोधक (मृत्यू: ६ जुलै १९२१ )**१८८३: आनंदीबाई धोंडो कर्वे ऊर्फ बाया कर्वे -- मराठी सामाजिक-शैक्षणिक कार्यकर्त्या (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९५० )* *१८८२: व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका (मृत्यू: २८ मार्च १९४१ )**१८७४: डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार (मृत्यू: १६ डिसेंबर १९६५ )**१८६२: रमाबाई रानडे – ’सेवा सदन’च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू: १९२४ )**१७३६: जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ (मृत्यू: १० एप्रिल १८१३ )**१६२७: रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ३० डिसेंबर १६९१ )* 🔰 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*🔰 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: मधुकर दत्तात्रय तथा म.द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म: १ फेब्रुवारी १९२७ )**१९९६: प्रशांत सुभेदार – रंगभूमी व चित्रपटांतील गुणी अभिनेते* *१९८०: लक्ष्मणशास्त्री दाते – सोलापूरचे ’दाते पंचांग’कर्ते (जन्म: १८९० )**१९६४: शंकरराव रामचंद्र कानिटकर-- शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक(जन्म: ११ जुलै १८८७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वाना हार्दीक शुभेच्छा*26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *“जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान हा नवा नारा आहे. शेती हा फायदेशीर व्यवसाय आहे” - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कारखान्यात स्फोट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मध्यप्रदेश च्या सरकारने राज्यातील 17 धार्मिक शहरात दारूबंदी डॉ. मोहन यादव यांचा ऐतिहासिक निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एस टी च्या तिकिटात 14.97 टक्के वाढ, रिक्षा व टॅक्सीमध्ये ही 3 रुपयांची वाढ, सर्वसामान्य नागरिकांना झटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष'*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बालसाहित्य बोलीभाषेत असावे, मुलांच्या भावविश्वाला समजेल अशी पुस्तके हवीत, बालकुमार साहित्य संमेलनात मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियम मध्ये आज भारत वि. इंग्लंडचा दुसरा T20 सामना रंगणार, पाच T20 च्या मालिकेत भारत 1-0 ने पुढे आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्रीमती कल्पना दत्तात्रय हेलसकर, उपक्रमशील शिक्षिका, जालना👤 प्रा. वैशाली देशमुख, लेखिका, कुही नागपूर👤 ललेश पाटील मंगनाळीकर, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 रामदास भोकरे, नांदेड👤 गंगाधर ईबीतवार👤 नरेश दंडवते, नांदेड👤 मुजीब फारुखी, उर्दू हायस्कुल धर्माबाद👤 मुजीब पठाण👤 राहुल आवळे, शिक्षक, पुणे👤 अंबादास कदम, नांदेड👤 राजीव सेवेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विंदा करंदीकर - गोविंद विनायक करंदीकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नम्रता माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा देते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *स्वर्गीय नर्तक* हा कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे ?२) स्वर्गीय नर्तक या पक्ष्याला हिंदीमध्ये काय म्हणतात ?३) राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो ?४) 'समुद्र' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'जन गण मन' या गीताला 'राष्ट्रगीत' म्हणून केव्हा मान्यता मिळाली ?*उत्तरे :-* १) मध्यप्रदेश २) दूधराज ३) २५ जानेवारी ( २०११ पासून ) ४) सागर, सिंधू, रत्नाकर, जलधी, पयोधी, जलनिधी ५) २४ जानेवारी १९५०*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🐝 *मधमाशी चावल्यावर काय होतं ?* 🐝डासांचा चावा असं म्हटलं जातं, पण मधमाशीचा असतो तो डंख. याचं कारण म्हणजे जेव्हा मधमाशी डसते तेव्हा ती एक विष आपल्या शरीरात सोडत असते. सहसा मधुपर्काच्या शोधात असलेली मधमाशी डंख करत नाही; पण ती तुडवली गेली आणि एखाद्या व्यक्तीपासून तिच्या पोळ्याला धोका आहे असं तिला जाणवलं तर मात्र त्वेषानं तुटून पडते. तरीही मधमाशी एकदाच डंख करू शकते, कारण डंख करण्यासाठी तिच्या अंगी जो एक सुईसारखा अवयव असतो, याला स्टिंग असंच म्हणतात, तो तुटून आपल्या शरीरातच अडकून पडतो. खरंतर ही सुई साधी नसते. या सुईच्या दोन्ही बाजूला तिला जोडलेले दोन काटेरी पट्टे असतात. ते वर खाली होऊ शकतात. यातला एक पट्टा आपल्या कातडीत शिरून तिथे अडकून पडतो. त्यामुळे तो आणखी आत ओढला जाऊन सुईला आपल्याबरोबर ओढून नेतो. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूचा काटेरी पट्टा आपली हालचाल करू लागतो. असं करत ते सुईला कातडी पार करून आपल्या मांसल स्नायूपर्यंत पोचवतात. त्यावेळीच ते विष शरीरात सोडलं जातं. हे सारं सव्यापसव्य करताना त्या काटेरी दातांसकट ती सुई मांसल भागात चांगलीच रुतून बसते. त्यामुळे ती परत बाहेर काढली जाऊ शकत नाही. पण माशी तसा प्रयत्न करते तेव्हा ती सुई तुटते. ती सुई माशीच्या पोटाला जोडलेली असल्यामुळे त्या ओढाताणीत तो पोटाचा भागही तुटून पडतो. ते सहन न होऊन माशी मरून पडते. विषाबरोबरच माशी एक गंधयुक्त रसायन, याला फेरोमोन म्हणतात, तिथं आणि हवेत पसरवते. त्याच्या अोढीनं इतर माशाही तिथं आकर्षित होतात. अशा वेळी मग एकाऐवजी अनेक माशांचा डंख पचवावा लागतो. सहसा या विषाचा फारसा परिणाम होत नाही. मात्र जळजळ आणि खाज येऊ लागते. काही जणांना या विषाची अॅलर्जी असते. त्यांना मात्र सावधगिरी बाळगावी लागते. तातडीने उपचार करून घेणं योग्य ठरतं. अन्यथा या अॅलर्जीची प्रतिक्रिया तीव्र होऊन ती घातकही ठरू शकते. या विषात मेलिटिनबरोबरच हिस्टमिनही असल्यामुळे सहसा हिस्टीमिनला नाकाम करणारी उपाययोजना केली जाते.उतारवयातल्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना जर अनेक मधमाशांचा डंख झाला तर मात्र काही वेळा स्नायूंना इजा होऊ शकते. तसंच मूत्रपिंडांच्या कामातही बाधा आणली जाऊ शकते. तोंडात किंवा गळ्याजवळ डंख झाला तर त्यापायी श्वासनलिकेचं नियंत्रण करणारे स्नायू बाधित होतात व श्वासोच्छ्वासाला अडथळा होऊ शकतो. परंतु अशी परिस्थिती क्वचितच उद्भवते.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••छंदिस्त हें मन माझें पंढरिनाथा । न सोडीं सर्वथा पाय तुझे ॥१॥ यासि काय करूं सांगा जी विठ्ठला । स्नेह कां लाविला पूर्वीहूनि ॥२॥ कांसवीचीं पिलीं सोडोनि निराळीं । दृष्टि पान्हाइलिं अमृतमय ॥३॥ तैस मी जवळुनि असेन पैं दुरी । दृष्टि मजवरी असों द्यांवी ॥४॥ तान्हें वछ घरीं धेनु चरे वनीं । हंबरे क्षनक्षनां परतोनि ॥५॥ नामा म्हणे देवा सलगी करीं निकट । झणें मज विकुंठ्ह पद देसी ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्याला जे हवे ते मिळविण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपण करत असतो.कारण हवं ते मिळविल्या शिवाय पाहिजे तसे समाधान मिळत नाही. पण,जरा आपल्या आजुबाजूलाही थोडी दृष्टी टाकून बघावे. कारण काहींना तर दोन घास खायला अन्न सुध्दा मिळत नाही आणि नेसायला वस्त्र सुद्धा नसते. त्यांचे जीवनही माणसाचेच आहे. मात्र माणूसच, माणसाला ओळखत नसल्याने माणुसकी संपत चालली आहे. यावर विचार करण्याची गरज आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दुस-याबाबतचा दृष्टीकोन*स्टार्मवेल नावाचे एक इंग्रज पत्रकार होते. ते एखाद्याची मुलाखत घेणार असतील तर त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी ते उघडपणे बोलून दाखवत असत.एकदा स्टार्मवेल यांना श्रीकृष्ण मेनन यांची मुलाखत घ्यावयाची होती. स्टार्मवेल यांनी आक्रमकपणे पहिलाच प्रश्न मेनन यांना विचारला," मिस्टर मेनन, तुम्ही अत्यंत गरीबीतून वर आलेला आहात. तुम्ही शाळेत वॉच स्काऊट म्हणून काम करत होता. एका इंग्रज महिलेने तुम्हाला आधार दिला व त्यांनीच तुम्हाला लंडनला पाठविले. तेथे कायदा आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेऊन तुम्ही भारतात परत आला. येथे पुन्हा तुम्हाला संघर्ष करावा लागला. त्याचवेळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे तुमच्याकडे लक्ष गेले. त्यांनी तुम्हाला योग्य संधी दिली. आज तुम्ही त्यांच्या जवळचे आहात. नेहरूंच्या मंत्रिमंडळात तुमची वर्णी लागणार आहे असे बोलले जात आहे. म्हणजेच तुम्ही तळातून उठून आकाशात जाऊन ठेपणार आहात. पण मिस्टर मेनन तुम्ही मला खरेच सांगा की, तुम्ही कम्युनिस्ट आहात हे खरे आहे का." मेनन यांनी शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाले," तुम्ही माझे जे कौतुक केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मलाही तुमचे कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे तुम्ही रस्तोरस्ती पेपर विकून तुमचे पोट भरत होता. तेथूनच तुम्ही मोठे झालात, आता तुम्हाला चांगला पगार मिळतो आहे. पण मलाही तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की, खरेच सांगा की तुम्ही एक अनौरस संतान आहात काय." मेनन यांच्या सडेतोडपणामुळे स्टार्मवेल यांची बोबडी वळाली आणि त्यांनी तो विषय टाळून दुस-या प्रश्नाकडे वळाले. तात्पर्य – दुस-याच्या खाजगी आयुष्यात डोकावताना त्याला दुःख देणा-या गोष्टींबाबत चर्चा न केलेली बरी असते. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही गोष्टी या अतिखासगी या प्रकारात मोडतात त्यामुळे दुस-याच्या आयुष्यात ढवळाढवळ न केलेलीच चांगली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment