✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 जानेवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2019/10/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌐 *_ या वर्षातील २१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌐 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌐•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: ’फायर अँड फरगेट’ या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.**१९७२: मणिपूर आणि मेघालय यांना राज्याचा दर्जा मिळाला.**१९६१: इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट**१८०५: होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.**१७९३: राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.**१७६१: थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.* 🌐 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: लोकनाथ काळमेघ-पाटील -- पत्रकार, स्तंभलेखक**१९८६: सुशांत सिंग राजपूत -- भारतीय प्रसिद्ध सिने-अभिनेता ( मृत्यू: १४ जून २०२०)**१९८३: संतोष वसंत साळवे -- कवी**१९७४: कीर्ती गायकवाड केळकर -- अभिनेत्री**१९६५: गणेश परशराम उदावंत -- कवी, लेखक, दै. सामना वृत्तपत्राचे उपसंपादक* *१९५८: भूपेंद्र गणवीर -- वरिष्ठ संपादक , लेखक**१९५६: जयश्री जोशी -- प्रसिद्ध लेखिका, अनुवादक* *१९४९: रमेश रामकृष्ण बेलगे -- प्रसिद्ध कवी* *१९४८: सरोज सुधीर टोळे -- कवयित्री, लेखिका, संपादिका**१९४८: युसुफ हुसेन -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेता (मृत्यू: ३० ऑक्टोबर २०२१ )**१९४७: डाॅ. अश्विनी रमेश धोंगडे -- प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका* *१९४५: ललिता देसाई ऊर्फ आशू -- मराठी नाट्य‍-चित्रपटअभिनेत्री**१९४४: वसंत दत्तात्रेय गुर्जर -- मराठीतील प्रसिद्ध कवी* *१९३५: गजानन विठ्ठल साळवी -- लेखक**१९३३: रंगनाथ रामदयाल तिवारी -- मराठी व हिंदी भाषेतील प्रसिद्ध लेखक**१९३३: हनुमंत अनंत ऊर्फ ह.अ.भावे -- दुर्मिळ साहित्य प्रकाशित करून मराठी वाङ्मयामध्ये मोलाची भर घालणारे ‘वरदा’ प्रकाशनचे संचालक (मृत्यू: १८ जून २०१३ )**१९३२: राजदत्त -- ज्येष्ठ दिग्दर्शक**१९२४: अ. ज. राजुरकर-- “चंद्रपूरचा इतिहास” या पुस्तकाचे लेखक (मृत्यू: सप्टेंबर १९९२ )**१९२४: प्रा. मधू दंडवते – रेल्वे मंत्री,अर्थतज्ञ (मृत्यू: १२ नोव्हेंबर २००५ )**१९२१: शरच्चंद्र मुक्तिबोध -- कवी, समीक्षक, कादंबरीकार (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९८४ )**१९१०: शांताराम आठवले – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार.’ भाग्यरेखा’, ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ वगैरे अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते.(मृत्यू: २ मे १९७५ )**१८९४: माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ – कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९३९ )**१८८५: वासुदेव कृष्ण भावे --- चरित्रकार (मृत्यू: १९ नोव्हेंबर १९६३ )**१८८२: वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक (मृत्यू: २० जुलै १९४३ )**१८७४: बाळकृष्ण अनंत भिडे -- मराठी इतिहासकार, कवी व समीक्षक (मृत्यू: २ मे १९२९ )**१८५७: गंगाधर रामचंद्र मोगरे -- मराठीतील कवी, मराठीतील उपहासकाव्याचे जनक.(मृत्यू: ११ जानेवारी १९१५ )* 🌐 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: मृणालिनी साराभाई -- भारतीय नृत्यांगना (जन्म: ११ मे १९१८)**१९९८: सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख (जन्म: २१ जून १९१६ )**१९८०: माधव भास्कर आचवल -- समीक्षक, ललित लेखक (जन्म: ३ नोव्हेंबर १९२६ )**१९७८: भवानीशंकर श्रीधर पंडित -- कवी, समीक्षक ( जन्म: २८ एप्रिल १९०६ )**१९६५: हरिकीर्तन कौर ऊर्फ ’गीता बाली’ – अभिनेत्री (जन्म: १९३० )**१९५९: सेसिल डी मिल – अमेरिकन चित्रपट अभिनेता,निर्माता व दिग्दर्शक (जन्म: १२ ऑगस्ट १८८१ )**१९५०: एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल – इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार (जन्म: २५ जून १९०३ )**१९४५: रास बिहारी घोष – क्रांतिकारक (जन्म: २५ मे १८८६ )**१९४३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली.(जन्म: २३ मार्च १९२३ )**१९२४: ब्लादिमिर लेनिन – रशियन क्रांतिकारक (जन्म: २२ एप्रिल १८७० )**१७९३: लुई (सोळावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २३ ऑगस्ट १७५४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - बहिणीची शपथ*..... पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्पने घेतली शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पीएम सूर्यघर योजनेत मोठी संधी:छतावरील सौरऊर्जा प्रकल्पातून दरमहा 360 युनिट मोफत वीज, अनुदानासह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 31 जानेवारी पासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, आदिती तटकरेंच्या गोटात सावध भूमिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोल्हापूर : लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचे दर्शन २४ जानेवारीपर्यंत बंद रहाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सरकारच्या माध्यमातून भजनी कलाकारांना मानधन दिले जाईल – मंत्री नितेश राणे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दिल्ली : इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषकात पुरुष आणि महिला संघाने मिळविले पहिले विश्वचषक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 कुलदीप सूर्यवंशी, पत्रकार, बिलोली👤 संतोष हेंबाडे, शिक्षक, धर्माबाद👤 विजय माने👤 पिराजी कटकमवार👤 अनिल मुपडे👤 ऋषिकेश एस. पवार👤 साईनाथ जगदमवार👤 विष्णू रावणगावकर👤 कृष्णराज महानुभाव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अनिल - आत्माराम रावजी देशपांडे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यात असणारी अपूर्णता पाहून कधीही निराश होऊ नका , कारण आपल्या दोषांचे भान होण्यानेच आपले दोष कमी होत असतात. -- फॕनेलाॕन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पहिला महिला खो-खो विश्वकप कोणी पटकावला ?२) महिला खो-खो विश्वकपचा अंतिम सामना कोणत्या दोन संघात झाला ?३) पहिला खो-खो विश्वकप कोठे आयोजित करण्यात आला होता ?४) 'ड्रीम रन' हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?५) खो-खो या खेळाची सुरूवात कोणत्या देशात झाली ? *उत्तरे :-* १) भारत २) भारत व नेपाळ ३) भारत ४) खो-खो ५) भारत *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌺 *फुलं रंगीबेरंगी का असतात ?* 🌺➖➖➖➖➖➖➖➖➖अनेक झाडांची फुलं तर्‍हेतर्‍हेचे मनोहारी रंग धारण करतात. ते रंग बघायलाही आपल्याला आवडतं. अशा रंगेबिरंगी फुलांनी नटलेली आपली बाग सुंदर दिसते. कित्येक फुलांना अतिशय चांगला सुगंधही असतो. तोही आपला आनंद द्विगुणित करतो. तरीही आपल्या आनंदासाठी फुलांना रंग आणि सुगंध असतो, असं आपल्याला म्हणता येईल का ? कारण जिथं मानववस्ती नाही अशा ठिकाणच्या झाडांनाही रंगेबेरंगी व सुगंधी फुलं असतात. रानावनात वाढणाऱ्या झाडांची शोभाही अशा फुलांनी बहरून येते. याचा अर्थ निसर्गानं दुसऱ्याच कोणत्या तरी कारणांसाठी रंग आणि गंध बहाल केला असणार.ती कारणं समजून घेण्यासाठी फुलांचं मुख्य निसर्गदत्त काम काय असतं, याचा विचार करायला हवा. प्रत्येक सजीवाच्या अंगी आपलं पुनरुत्पादन करण्याची यंत्रणा असते. पुनरुत्पादनाशिवाय तो सजीव तगून राहू शकत नाही. एवढेच काय पण पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेशिवाय नवनव्या प्रजातींचा उगमही अशक्य झाला असता. त्यामुळे प्रत्येक सजीव पुनरुत्पादनाला अतिशय महत्त्व देतो. वनस्पतींच्या पुनरुत्पादनात फुलं कळीची भूमिका बजावतात.फुलांच्या अंतर्गत रचनेकडे लक्ष दिल्यास त्यातील दोन अवयव आपलं लक्ष वेधून घेतात. स्टॅमेन किंवा पुबीजांडातून पुंकेसर बाहेर पडतात. ते पिस्टिल किंवा स्त्रीबीजांडातील स्त्रीकेसरांवर पडले की त्यांच्या समागमातून पुढील पिढीची नांदी म्हटली जाते. पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचं मिलन होणं त्या वनस्पतीच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक असतं. कित्येक फुलांमध्ये हे मीलन स्वयंपूर्णरित्या होत असलं, तरी बहुतांश वनस्पतींच्या फुलांमध्ये या प्रक्रियेसाठी दुसर्‍या कोणीतरी मध्यस्थाच्या मदतीची आवश्यकता भासते. वारा ही कामगिरी पार पाडत असला तरी तो पूर्णांशाने हे काम करू शकत नाही. त्यासाठी मग पक्षी किंवा मधमाश्यांसारख्या कीटकांची गरज भासते. ते काम करावं म्हणून मग पक्षी आणि मधमाशा यांना उद्युक्त करणं जरुरीचं असतं. त्यांना काहीतरी मधाचं बोट लावल्याशिवाय ते तरी या कामगिरीसाठी का तयार व्हावेत ? मधमाशांना तर अक्षरश: मधाचं बोट लावलं जातं. फुलांमध्ये असलेला मधुरस शोषून घेऊन मधमाशा त्याचं मधात रूपांतर करतात. तरीही आपल्याकडे अशा मधुरसाचे कोण आहेत, हे मधमाश्यांना कळावं कसं ? त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी मग ही फुलं रंगीबेरंगी परिवेष धारण करतात. त्यातही मध्यस्थ कोण आहे यावर फुलांचा रंग निर्धारित केला जातो. मधमाशांना निळा रंग आवडतो, तर हमिंगबर्डसारख्या पक्ष्यांना लाल, गुलाबी किंवा जांभळ्या रंगांचं आकर्षण असतं. फुलपाखरं पिवळ्या, नारिंगी रंगांकडे ओढली जातात. काही फुलं दिवसाउजेडी फुलत असली तरी काही सूर्यास्तानंतरच फुलतात. त्या वेळी मग त्यांचा रंग पक्षांना वा कीटकांना दिसावा कसा ? त्यासाठी मग रंगांशिवाय या फुलांना सुगंधही दिला जातो. त्याच्या दरवळापायी मग हे फलनाला मदत करणारे मध्यस्थ त्याच्याकडे खेचून आणले जातात. त्यांना मधुरस मिळता मिळता त्यांच्याकडून पुंकेसराचा शिडकावा स्त्रीकेसरांवर होतो. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेला चालना मिळते.*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गाणीं मी गाईलों भाटीं वाखाणिलों । जन्मोनियां जालों दास तुझा ॥१॥ आतां माझी लाज राखें नारायणा । झणीं केविलवाणा दिसों देसी ॥२॥ माये दुर्‍हाविलों मोहें मोकलिलों । सोये पैं चुकलों संसाराची ॥३॥ आपवर्गिं सांडिलों प्रवृत्ती दंडिलों । मीपना मुकलों मायबापा ॥५॥ नामा म्हणे तुझ्या चरणाची आवडी । लागली न सोडी चित्त माझें ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसं बरेच मोठे असतात. जसे की,वयाने,अनुभवाने, धनसंपत्तीने तर विचारसरणीने. काहीजण मनाने मोठे असतात. पण,जी व्यक्ती शुन्यातून विश्व निर्माण करत असते ती व्यक्ती नि:स्वार्थ भावनेने मदत करत असते. तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने मोठी असते.अशाच व्यक्तीला निसर्ग सुद्धा वंदन करत असतो.म्हणून स्वतः मोठेपणाची बाजी मारण्यापेक्षा लहान व्यक्तीला नेहमीच मोठ्या मनाने समजून घ्यावे. मोठे होण्यासाठी कुठेही धावाधाव करावी लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दुस-याबाबतचा दृष्टीकोन*स्टार्मवेल नावाचे एक इंग्रज पत्रकार होते. ते एखाद्याची मुलाखत घेणार असतील तर त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी ते उघडपणे बोलून दाखवत असत. एकदा स्टार्मवेल यांना श्रीकृष्ण मेनन यांची मुलाखत घ्यावयाची होती. स्टार्मवेल यांनी आक्रमकपणे पहिलाच प्रश्न मेनन यांना विचारला," मिस्टर मेनन, तुम्ही अत्यंत गरीबीतून वर आलेला आहात. तुम्ही शाळेत वॉच स्काऊट म्हणून काम करत होता. एका इंग्रज महिलेने तुम्हाला आधार दिला व त्यांनीच तुम्हाला लंडनला पाठविले. तेथे कायदा आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेऊन तुम्ही भारतात परत आला. येथे पुन्हा तुम्हाला संघर्ष करावा लागला. त्याचवेळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे तुमच्याकडे लक्ष गेले. त्यांनी तुम्हाला योग्य संधी दिली. आज तुम्ही त्यांच्या जवळचे आहात. नेहरूंच्या मंत्रिमंडळात तुमची वर्णी लागणार आहे असे बोलले जात आहे. म्हणजेच तुम्ही तळातून उठून आकाशात जाऊन ठेपणार आहात. पण मिस्टर मेनन तुम्ही मला खरेच सांगा की, तुम्ही कम्युनिस्ट आहात हे खरे आहे का." मेनन यांनी शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाले," तुम्ही माझे जे कौतुक केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मलाही तुमचे कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे तुम्ही रस्तोरस्ती पेपर विकून तुमचे पोट भरत होता. तेथूनच तुम्ही मोठे झालात, आता तुम्हाला चांगला पगार मिळतो आहे. पण मलाही तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की, खरेच सांगा की तुम्ही एक अनौरस संतान आहात काय." मेनन यांच्या सडेतोडपणामुळे स्टार्मवेल यांची बोबडी वळाली आणि त्यांनी तो विषय टाळून दुस-या प्रश्नाकडे वळाले.तात्पर्य - दुस-याच्या खाजगी आयुष्यात डोकावताना त्याला दुःख देणा-या गोष्टींबाबत चर्चा न केलेली बरी असते. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही गोष्टी या अतिखासगी या प्रकारात मोडतात त्यामुळे दुस-याच्या आयुष्यात ढवळाढवळ न केलेलीच चांगली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment