✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 जानेवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2022/09/mahatma-gandhi.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟠 *_हुतात्मा दिन_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_कुष्ठरोग निवारण दिन_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_ या वर्षातील ३० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟠••••••••••••••••••••••••••••••••• *१९९९: पण्डित रविशंकर यांना ’भारतरत्‍न’**१९९७: महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.**१९९४: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.**१९३३: अ‍ॅडॉल्फ हिटलरचा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष (चॅन्सेलर) म्हणून शपथविधी झाला.**१६४९: इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याचा शिरच्छेद करण्यात आला.* 🟠 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟠 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: प्रेरणा योगेश देशमुख -- लेखिका, कवयित्री**१९७५: अनुप सोनी -- भारतीय अभिनेता**१९६९: प्रदीप मनोहर पाटील -- लेखक, कवी**१९६६: सुहास किर्लोस्कर -- चित्रपट संगीताचे विविधांगी विश्लेषण करणारे लेखक**१९५९: निर्मिती सावंत -- मराठी अभिनेत्री* *१९५३: सुधीर कोर्टीकर -- नाणे संग्रहाक, छायाचित्रकार, कवी, लेखक**१९५१: जयंत गुणे -- लेखक, अनुवादक**१९४९: डॉ. सतीश आळेकर – प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते**१९४८: स्मिता राजवाडे -- कादंबरी, कथा, ललित, काव्यसंग्रह, अनुवादित कवितासंग्रह, बालसाहित्य, नाटक अशी त्यांची १७ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.(मृत्यू: १८ जानेवारी २०२२ )**१९४५: सदानंद हरी डबीर -- कवी, गीतकार, गझलकार**१९४३: भगवान माधवराव परसवाळे -- कवी**१९३६: पं. दिनकर पणशीकर जयपूर अत्रोली घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक(मृत्यू: ३ नोव्हेंबर २०२० )**१९३३: शांताराम राजेश्वर पोटदुखे -- पत्रकार, माजी खासदार, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा लेखक (मृत्यू: २३ सप्टेंबर २०१८ )**१९३०: सुनिता भास्कर देवधर -- लेखिका* *१९२९: रमेश देव – हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक(मृत्यू: २ फेब्रुवारी, २०२२ )**१९२७: प्राचार्य मोतीचंद्र गुलाबचंद शहा -- लेखक**१९२७: ओलोफ पाल्मे – स्वीडनचे २६ वे पंतप्रधान (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९८६ )**१९१७: वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ (मृत्यू: २७ जुलै २००७ )**१९११: पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (मृत्यू: २८ जून १९८७ )**१९१०: सी. सुब्रम्हण्यम – गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००० )**१८९५: शंकरराव दत्तात्रय देव -- विचारवंत, लेखक (मृत्यू: ३० डिसेंबर १९७५ )**१८९१: गोपाळ रामचंद्र परांजपे -- विज्ञान लेखक (मृत्यू: ६ मार्च १९८१ )**१८८२: फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १२ एप्रिल १९४५ )**१८७४: बाळकृष्ण अनंत भिडे -- मराठी इतिहासकार, कवी व समीक्षक (मृत्यू:२ मे १९२९)* 🟠 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟠••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: नंदू घाणेकर -- ज्येष्ठ संगीतकार व फिल्म मेकर (जन्म: ४ नोव्हेंबर १९५८ )**२०२०: विद्या बाळ -- मराठी स्त्रीवादी लेखिका/संपादिका (जन्म: १२ जानेवारी १९३७ )**२००४: रमेश अणावकर -- मराठी संगीतातील प्रसिद्ध गीतकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३२)**२००१: वसंत शंकर कानेटकर --- लोकप्रिय मराठी नाटककार,लेखक,कादंबरीकार आणि विचारवंत.(जन्म: २० मार्च १९२२ )**२०००: आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर – मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते* *१९९६: गोविंदराव पटवर्धन – हार्मोनियम व ऑर्गन वादक**१९८८: बॅ.शेषराव कृष्णराव वानखेडे -- क्रिकेट प्रशासक आणि माजी अर्थमंत्री (जन्म:२४ सप्टेंबर १९१४)**१९४८: काशीबाई कानिटकर -- मराठी भाषेतील लेखिका व स्त्रीवादी समाजसुधारक होत्या.मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणार्‍या अन्यायाविषयी त्यांनी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठवला (जन्म: २० जानेवारी १८६१ )**_१९४८: मोहनदास करमचंद गांधी- ’महात्मा’गांधी - राष्ट्रपिता (जन्म: २ ऑक्टोबर १८६९ )_**१९४८: ऑर्व्हिल राईट – आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (जन्म: १९ ऑगस्ट १८७१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता - महात्मा गांधी*महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामतील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते. त्यांनी देशहितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. स्वातंत्र्य चळवळीतील ते असे नेते होते ज्यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबून ब्रिटीश राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडले होते. महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणूनही संबोधले जाते. ............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाकुंभमेळ्यात उत्तर प्रदेशातील संगम तीरावर चेंगराचेंगरी, 30 जणांचा मृत्यू, 60 जण जखमी, मृतांपैकी 25 जणांची ओळख पटली असल्याची माहिती डीआयजी वैभव कृष्णा यांनी दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्रयागराज कुंभमेळ्यातील दुर्घटनेबाबत राष्ट्रपती व पंतप्रधान यांनी दुःख व्यक्त केलं, मृताच्या कुटुंबियांना 25 लाख रु. मदत जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात लोककला व लोकवाद्य शिकणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अमरावती येथे 52वे राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उदघाटन, हे प्रदर्शन 2 फेब्रुवारी पर्यंत खुले राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यातील सरकारी शाळांमधील शालेय शिक्षणाची गुणवत्ता घसरलेलीच; तिसरी ते पाचवीच्या 50% विद्यार्थ्यांना वाचताही येईना, असरच्या सर्वेक्षणातून राज्यातील शिक्षण क्षेत्राचे विदारक चित्र समोर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी व 12 वीच्या परीक्षेला 15 फेब्रुवारी पासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रा. बालाजी कोंपलवार, अध्यक्ष बाभळी बंधारा कृती समिती, धर्माबाद👤 शंकर माने👤 राजेश पटकोटवार, धर्माबाद👤 सचिन रामदिनवार, शिक्षक, मुखेड👤 सारिका सब्बनवार, शिक्षिका व लेखिका, कुंडलवाडी👤 बालाजी पुलकंठवार, शिक्षक धर्माबाद👤 मगदूम अत्तार, सहशिक्षक, देगलूर👤 देवराज बायस👤 सुरज एडके👤 सतिश गणलोड👤 शिवकुमार माचेवार👤 सतीश गणलोड👤 रंजना भिसे, शिक्षिका, पालघर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महात्मा गांधी - मोहनदास करमचंद गांधी*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दृष्ट लोकांबरोबर शत्रुत्वच चांगले. त्यांच्याबरोबर मैत्री न ठेवलेलीच बरी. - संत तुलसीदास*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'आद्य शेतकरी / अभियंता'* असे कोणत्या कीटकाला म्हटले जाते ?२) भारत सरकारने समाजकल्याण खाते केव्हा स्थापन केले ? ३) जगात यू-ट्यूबचे सर्वाधिक यूझर्स कोणत्या देशात आहेत ?४) 'साथ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) १९७२ मध्ये कोणत्या संघटनेने महाराष्ट्राला साक्षरता प्रसार गौरवाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिले ?*उत्तरे :-* १) वाळवी, उधई ( Termite ) २) १४ जून १९६४ ३) भारत ४) सोबत , संगत ५) युनेस्को *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••✨ *तारे का लुकलुकतात ?* ✨ """"""""""""""""""""""""""""""""""""""""'ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार' यासारख्या बालगीतांमधून आपल्याला लहानपणापासूनच तारे लुकलुकतात, हे मनावर बिंबवलं जातं. 'टिमटिम करते तारे' सारख्या गीतांमधून हा समाज बळावतोच. तरीही तारे का लुकलुकतात, या सवालाचं मोहोळ घोंगावतच राहतं. तारे स्वयंप्रकाशित असतात. म्हणजे त्यांच्या अंतरंगात धडधडत असणाऱ्या अणुभट्ट्यांमधून जी ऊर्जा बाहेर पडते ती प्रकाशलहरींच्या रूपात उत्सर्जित केली जाते. या प्रकाशाचे किरण अनंत अवकाशातून प्रवास करताना बहुतांश निर्वात पोकळीतून जात असतात. ते जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांना आपल्या या धरतीच्या सभोवती असलेल्या वातावरणातून प्रवास करावा लागतो. वातावरण ज्यांचं बनलेलं आहे त्या वायूंच्या ढगांमधून त्यांना पार पडावं लागतं. हे वायूचे ढग स्थिर नसतात. ते सतत हलत असतात. आकाशात जेव्हा आपण ढग पाहतो तेव्हा ते एका जागी स्थिर तर नसतातच; पण त्यांचे आकारही सतत बदलत असताना आपल्याला दिसतात. याचाच अर्थ वायु स्थिर नसतात. ते सतत हलत असतात. हवाही अशीच सतत हलत असते. त्यांच्यामधून जेव्हा ते किरण पार होतात तेव्हा मग ते किरणच स्थिर नसून सतत हलत असल्यासारखं वाटत राहतं. त्यामुळे तारे लुकलुकत असल्यासारखं वाटतं. वास्तविक हलत असते ती हवा.असं जर आहे तर मग मंगळ, शुक्र, गुरू यांसारख्या ग्रहांवरून परावर्तीत होणारा प्रकाशही त्याच वातावरणातून प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचत असतो. त्यापायी मग ते ग्रहही लुकलुकत असलेले दिसावयास हवे; पण तसं होत नाही. एवढंच कशाला पण जो आपल्याला प्रकाश देतो आणि जो आपला जीवनदाता आहे तो सूर्यही एक ताराच आहे; पण त्याचा प्रकाश तर स्थिर असतो. तो लुकलुकताना दिसत नाही. तेव्हा मग तारेच लुकलुकतात आणि ते हलत्या हवेपायी होतं हे कितपत खरं आहे ? वास्तविक कोणताही ग्रह काय किंवा तारा काय हा बिंदूमात्र नसतो. त्याला विशिष्ट आकारमान असतं. व्याप्ती असते. त्यामुळं आपल्या नजरेत ते बिंबासारखे किंवा चकतीसारखे असतात. त्यांच्यापासून निघणारा प्रकाश झोतासारखा असतो, एकमेव किरणासारखा नसतो. त्यामुळे त्याने झोताचे सर्वच किरण हलत्या हवेतून जातांनाही एकसाथ हालत नाहीत. त्यामुळे तो झोत लुकलूकल्यासारखा वाटत नाही. सूर्यापासून निघणारा प्रकाशही असाच झोतस्वरूप असतो. त्यामुळे तो विशाल पसरतो, लुकलुकत नाही; पण तारे आपल्यापासून लक्षावधी, कोट्यवधी प्रकाशवर्ष अंतरावर असतात, त्यामुळे इतक्या दूरवरून य त्यांचं बिंब एखाद्या बिंदूसारखंच दिसतं. त्यांच्यापासून प्रत्यक्षात जरी प्रकाशझोत निघत नसेल असला तरी तो एखाद्या एकमेव किरणासारखाच वाटतो. क्षीणही झालेला असतो. त्यामुळे मग हलत्या हवेतून येताना तोही हलल्यासारखा होतो. तो तारा लुकलुकतो.*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जन्मल्यापासूनि सोशिले प्रवास । वियोग पहावया जाले आतां ॥१॥ आतां एक करीं धावणिया धांवा । बुडतों केशवा काढीं मज ॥२॥ लाभ नव्हे हानि जाली भागाभाग । तूंचि पांडुरंग पुरविसी ॥३॥ नामा म्हणे ऐसें सर्वस्व रक्षिलें । पाषाण तारिले जळामाजीं ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••डोळ्यांना काजळ न लावता देखील ते डोळे सुंदर दिसत असतात.फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा. कानाची किंमत तेव्हा असते जेव्हा वाईट ऐकणे टाळणे व चांगले ऐकून इतरांना सांगणे, मुखाचे गुणगान तेव्हा केले जाते ज्यांचे विचार सकारात्मक असतात व त्यातून निघणारे प्रत्येक शब्द मोलाचे असतात.शरीरात जेवढे काही अवयव असतात त्या सर्व अवयवांची काळजी नीट घेतल्याने ते अवयव आपले शेवटपर्यंत आधार होत असतात. म्हणून परिस्थिती कशीही आली तरी चालेल पण आपले विचार व आपला योग्य मार्ग कधीही सोडू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अंगीकारलेली माणुसकीची वागणूक*एका सिंहाने एक हरिण मारले व त्यास तो फाडून खाणार इतक्यात त्या वाटेने एक चोर जात होता. तो चोर सिंहाला म्हणाला, 'अरे सिंहा, या हरणाचं अर्ध मांस तुझ व अर्ध माझं.' हे ऐकून सिंह त्यास म्हणाला, 'अरे, निगरगट्ट माणसा, तुझा इथे काहीही संबंध नसता, एकदम पुढे येऊन मी मारलेल्या हरणाचं अर्ध मांस तू मागतोस, या तुझ्या वागण्याबद्दल मी तुला शिक्षा करण्यापूर्वी तू इथून चालता हो, नाही तर फुकट मरशील.' हे ऐकून तो चोर भिऊन पळून गेला.इतक्यात दुसरा एक भला माणूस त्या वाटेने चालला असता सिंहाला पाहून त्याला टाळण्यासाठी दुसर्‍या वाटेने जाऊ लागला. ते पाहून सिंहाने त्याला आदराने हाक मारली व म्हणाला, 'अरे भल्या माणसा, भिऊ नकोस. तुझ्या चांगल्या वागण्यामुळे या हरणाच्या मांसाचा अर्धा भाग घेण्यास तू अगदी योग्य आहेस. ये आणि हा वाटा घेऊन जा.' सिंहाने दोन वाटे केले. एक त्यास देऊन दुसरा त्याने स्वतः खाल्ला व अरण्यात निघून गेला.*तात्पर्यः माणसाची एकनिष्ठता आणि प्रामाणिकपणाचे वागणे पाहून सभ्य व भिडस्त लोकांना इतरजण आपण होऊन मान देतात त्या दिलेल्या  मानाचा मान टिकवून ठेवणे हे आपल्या वागण्यावर असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment