✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 जानेवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15zLvZsySQ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••✍️ *_जागतिक हस्ताक्षर दिन_* ✍️••••••••••••••••••••••••••••••••• ✍️ *_ या वर्षातील २३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍️ *_महत्त्वाच्या घटना:_* ✍️•••••••••••••••••••••••••••••••••*२००२:वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनिअल पर्ल याचे कराचीतुन अपहरण**१९९७:मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.**१९७३:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले.**१९६८:शीतयुद्ध – उत्तर कोरियाने अमेरिकेची यू.एस.एस.प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.**१९४३:दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने त्रिपोली (लिबीयाची राजधानी) शहर जिंकले.**१९३२:’प्रभात’च्या ’अयोध्येचा राजा’ची हिन्दी आवृत्ती’अयोध्याका राजा’ मुंबईत प्रदर्शित झाली.**१८४९:डॉ.एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर बनली.**१७०८:छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.* ✍️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ✍️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: कीर्ति नागपुरे -- भारतीय अभिनेत्री**१९९०: देविदास महादेव सौदागर -- प्रसिद्ध लेखक, कवी(साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार प्राप्त)**१९७१: मेघना जोशी -- कवयित्री* *१९६९: अनिल मनोहर कपाटे (अनिल शेवाळकर) -- कवी, कथाकार, कादंबरीकार* *१९६६: भागवत घेवारे -- कवी* *१९६६: डॉ. विजयकुमार देशमुख -- प्रसिद्ध कवी**१९६२: मेधा इनामदार -- लेखिका* *१९५५: भगवान कृष्णा हिरे -- प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, लेखक,तज्ञ परीक्षक* *१९५३: डॉ. विलास चिंतामण देशपांडे -- प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, संपादक* *१९५२: अशोक बाबुराव लोणकर -- कवी, लेखक, संपादक**१९५०: आसावरी काकडे -- प्रसिद्ध मराठी-हिंदी कवयित्री आणि गद्यलेखिका**१९४७: मेगावती सुकार्नोपुत्री – इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष**१९४७: रमेश सिप्पी -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक व निर्माता**१९४७: डॉ. प्रमिला जरग -- लेखिका**१९४६: विजय पांडुरंग शेट्ये -- कवी, लेखक**१९४६: डॉ. सुभाष सावरकर -- साहित्यिक, समीक्षक, संपादक (मृत्यू: २३ सप्टेंबर २०१३ )**१९३९: अ‍ॅड.जयंत काकडे -- प्रसिद्ध साहित्यिक, व्यंगचित्रकार* *१९३५: विलास शंकरराव साळोखे -- लेखक**१९३५: प्रमोद सच्चिनानंद नवलकर --- जेष्ठ साहित्यिक, माजी मंत्री (मृत्यू: २० नोव्हेंबर २००७ )**१९३४: सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ एप्रिल १८६४ )**१९२६: बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे -- महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक,राजकारणी,संपादक, व्यंगचित्रकार (मृत्यू: १७ नोव्हेंबर २०१२ )**१९२०: श्रीपाद रघुनाथ जोशी --- कोल्हापूर येथील मराठी लेखक, शब्दकोशकार व अनुवादक (मृत्यू: २४ सप्टेंबर २००२ )* *१९१५: कमलनयन बजाज – उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव,बजाज आटो,बजाज इलेक्ट्रिकल्स,उदयपूर सिमेंट इ. कंपन्यांचे अध्यक्ष (मृत्यू: १ मे १९७२ )**१८९८: पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक,पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य (मृत्यू: १७ डिसेंबर १९५६ )**१८९७: नेताजी सुभाषचंद्र बोस -- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ )**१८१४: सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९३ )*✍️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ✍️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: प्रा. डॉ. अनिल नितनवरे -- मराठीचे गाढे अभ्यासक, कवी, प्रयोगशील एकांकिकाकार तथा समीक्षक (जन्म: १९६५ )**२०१०: पं. दिनकर कैकिणी – शास्त्रीय गायक (जन्म: २ ऑक्टोबर १९२७ )**२००८: राजाभाऊ देव -- हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील थोर गायक, गुरू(जन्म: १३ सप्टेंबर १९१७ )**१९९२: ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर– भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढेअभ्यासक (जन्म: १५ मे १९०४ )**१९८९: साल्वादोर दाली – स्पॅनिश चित्रकार. (जन्म: ११ मे १९०४ )**१९८२: मुद्दू बाबू शेट्टी -- हिंदी चित्रपटातील स्टंटमन,अॅक्शन कोरिओग्राफर आणि अभिनेता (जन्म: १ जानेवारी १९३८ )**१९५९: विठ्ठल नारायण चंदावरकर – शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित**१९३१: अ‍ॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (जन्म: १२ फेब्रुवारी १८८१ )**१९१९: राम गणेश गडकरी – प्रसिद्ध नाटककार, कवी व विनोदी लेखक(जन्म:२६ मे १८८५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त*सुंदर अक्षर : एक दागिना*कुणाचे सुंदर हस्ताक्षर पाहिले की आपण सहज म्हणून जातो, अरे व्वा ! काय सुंदर मोत्यासारखे अक्षर आहे. त्याच्या लेखनाची खूप तारीफ करतो. सुंदर अक्षर काढण्यासाठी तशी मेहनत आणि सराव करावा लागतो. ते ही एक तपश्चर्या आहे, नाही का ? ............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि सुकन्या समृद्धी योजनेला दहा वर्षे पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रीय आरोग्य अभियानाला पाच वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यभरातल्या सर्व बसस्थानकावर वर्षभर स्वछता मोहीम, मोहिमेला आजपासून होणार सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रिलायन्स सोबत 3 लाख कोटींचा करार, 3 लाख रोजगार होतील उपलब्ध - मुख्यमंत्री*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाची मोठी कारवाई, 3 हजार 600 हेक्टर क्षेत्राचा बोगस पिक विमा रद्द, सरकारच्या तिरोजीचा भुर्दंड वाचला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोलकता येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 विकेटनी मिळविला विजय, अभिषेक शर्माची जोरदार फटकेबाजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 मुखीत अहमद, शिक्षक, नांदेड👤 एम. बी. ढगे👤 नम्रता उबाळे, तिवसा, आष्टी👤 शंकर नरवाडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*माधव जूलियन- माधव त्र्यंबक पटवर्धन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आदर दिला तरच आपली मूल्ये आणि संस्कार टिकून राहतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ) बाबत धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे ?२) महाराष्ट्रामध्ये कोणत्या परिसराला 'आल्लापल्ली अरण्य' असे म्हणतात ?३) भारतीय महिला संघाकडून सर्वात जलद एकदिवसीय शतकाचा विक्रम कोणी केला आहे ?४) 'साप या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) मुंबईतील वानखेडे स्टेडियमला १९ जानेवारी २०२५ ला किती वर्षे पूर्ण झाली ? *उत्तरे :-* १) महाराष्ट्र २) चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचा पूर्व भाग ३) स्मृती मानधना ४) सर्प, भुजंग, अही ५) ५० वर्षे *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आपल्याला भूक का लागते ?* 📙 आपलं शरीर सतत काम करत असतं. जेव्हा आपण विश्रांती घेत असतो किंवा झोपेत असतो तेव्हाही श्वसन, रक्ताभिसरण, हृदयाची धडधड यांसारख्या प्रक्रिया चालूच असतात. त्यामुळे शरीराला सतत ऊर्जेची गरज भासते. हिचा पुरवठा अखंड असण्यासाठी शरीराला वेळोवेळी पोषण मिळणं आवश्यक असतं. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा हे पोषण मिळतं. ते साठवूनही ठेवलं जातं. पण तो साठा संपला की परत पोषक पदार्थ शरीराला मिळण्याची गरज असते. याचीच जाणीव आपल्याला करून देण्यासाठी भुक लागण्याची भावना निर्माण होते.आपल्या मेंदूमधील हायपोथॅलॅमस या अवयवामध्ये भुकेवर नियंत्रण ठेवणारं केंद्र असतं. त्याला संदेश मिळाला की ते कार्यरत होतं आणि भुकेची भावना जागृत करतं. त्या केंद्राला मिळणारे संदेश विविध प्रकारचे असतात. त्यातले काही शरीराच्या आतून उत्पन्न होतात. म्हणजेच ते अंतर्गत असतात, तर काही बाहेरून येणारे असतात.शरीराला ऊर्जा मिळते ते ग्लुकोजच्या ज्वलनातून. त्यामुळे रक्तात ग्लुकोजचं प्रमाण एका निर्धारित पातळीवर नेहमी राहील याची व्यवस्था केलेली असते. ते जर त्या पातळीपेक्षा फारच चढलं तर ते आरोग्याला बाधक असल्यानं इन्सुलीन या संप्रेरकाचा पाझर सुरू होतो. ते संप्रेरक ग्लुकोजची निर्धारित पातळी राखण्यात मदत करतं. जर ग्लुकोजची पातळी या निर्धारित प्रमाणापेक्षा फारच घसरली तर तो संदेश मिळून भुकेचं केंद्र जागृत होतं. त्यावेळी आपण पुरेसं अन्न पोटात टाकलं तर मग भुक मिटल्याची भावनाही याच केंद्रातून निर्माण केली जाते.आपल्या पोटाचं आकारमानही विशिष्ट पातळीवर ठेवण्याची व्यवस्था केली जाते. तसंच ते काही विविक्षित प्रमाणात भरलेलं असेल हेही बघितलं जातं. पोट जर रिकामं झालं तर ते आकुंचन पावून त्याचं आकारमान घटतं. भुकेचं केंद्र जागृत करायला तोही एक संदेश पुरतो. अशा वेळी पाणी पिऊन आकारमान वाढवलं तरीही भुक भागल्याची भावना निर्माण होते.आज जरी आपल्याला हवं तेव्हा अन्न उपलब्ध होत असलं तरी आदिमानवाच्या काळात जेव्हा रानावनात कंदमुळे गोळा करून किंवा शिकार करून मनुष्यप्राणी आपली पोषणाची गरज भागवत होता. तेव्हा अन्न केव्हा मिळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे असं ते मिळालं की प्रत्यक्ष पोषणाची आवश्यकता असो-नसो, त्याच्या दर्शनाने किंवा गंधानंही भुकेची भावना चाळवली जात असे. उत्क्रांतीच्या ओघात हा गुणधर्म टिकून राहिला आहे. त्यामुळे स्वादिष्ट अन्न दिसलं किंवा त्याचा दरवळ नाकपुड्यांना चाळवून गेला म्हणजेही आपल्याला भूक लागते.*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घालूनि आसन साधिला पवन । घेतलें जीवन अंतरिक्षीं ॥१॥ पराहस्तें तृप्ति नव्हे जी दातारा । कृपा करुणा करुणा करा केशिराजा ॥२॥ जीवाचें जीवन तूं सर्वांचें कारण । धांव मजालागुन केशिराजा ॥३॥ अनाथाचा नाथ हेंज ब्रीद साचार । झणें माझा अव्हेर करिसी देवा ॥४॥ विष्णुदास नामा अंकियेला तुझा । विनवी केशिराजा प्रेमसुखें ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनेकदा वादळवारा येत असते.आणि नुकसान करून जाते. पण, जे काही नुकसान झाले असते त्याला व्यवस्थितपणे करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. पण, अचानक जेव्हा जीवनात वादळ,वारे न सांगता येतात तेव्हा मात्र तेच वादळ,वारे जगणेच नकोसे करून टाकत असते अशा प्रसंगी एका चांगल्या व्यक्तीची गरज असते. कारण ती व्यक्ती त्या वादळातून बाहेर काढण्यासाठी मदत करत असते म्हणून अशा भयानक प्रसंगी चुकीचे पाऊल उचलू नये तर चांगल्या विचारी माणसाच्या सहवासात रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मनःशांतीचे रहस्य*एका गावात एक महात्मा राहत होते. ते अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचे म्हणून ओळखले जात. त्यांना कोणत्याही गोष्टीचा कधीच राग येत नसे. कुणी त्यांच्याशी कधी उद्धटपणे बोलला किंवा गैर वागला तरी त्यांच्या कपाळावर कधीच आठी उमटत नसे. ते सदैव हसतमुख व आनंदी राहत असत. ज्या लोकांना त्यांचे हे वागणे आवडत नसे ते लोक त्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असत. परंतु महात्म्याच्या तोंडून कधीही एखादा वेडावाकडा उदगार देखील बाहेर पडत नसे कि चेह-यावरही कधी त्रासिक भाव उमटत असे. अनेक लोकांनी जंग जंग पछाडले तरी महात्म्याला राग काही आलेला कुणीच पाहिला नव्हता शेवटी त्यांच्या या संयमशीलतेचे रहस्य काय असावे हे विचारण्यासाठी काही लोक महात्म्याकडे गेले. त्यांच्यातील एकाने विचारले, "महाराज, तुम्ही कधीच रागवत नाही, चिडत नाही, शांत कसे काय राहू शकता. तुमच्यात इतकी सहनशक्ती कोठून आली आहे." महात्म्यांनी उत्तर दिले, "मित्रांनो, ज्यांचे उद्दिष्ट अत्यंत उच्च पातळीवर जायचे असते त्यांना खालच्या पातळीवर जायची कधीच गरज पडत नाही. मी खालच्या पातळीवर कधीच उतरायला तयार नसतो. मला असे वाटते की, माझ्याबद्दल लोकांना काय वाटायचे ते वाटू दे पण आपले मन विरोधी विचारांनी कलुषित करून घ्यायचे नाही. मी जेव्हा जमिनीकडे नजर टाकतो तेव्हा क्षमाशीलतेचे मोठे प्रतिक दिसून येते. लोकांनी किती त्रास दिला जमिन क्षमा करते. आपल्या गरजा किती मर्यादित आहेत हे भान जर प्रत्येकाने ठेवले तर प्रत्येकजण माझ्याइतका शांत होऊ शकतो. ज्यांच्या मनात करूणा आणि सगळयांना सारखे लेखण्याची भावना असते तो निर्विकार वृत्तीनेच राहतो."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment