✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/126o5UjRjsG/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☸️ *_ या वर्षातील २२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☸️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☸️•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: ’आय.एन.एस.मुंबई’ ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली.**१९७१: सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९६३: अंधांसाठी देहराडून येथे राष्ट्रीय ग्रंथालयाची स्थापना**१९५८: इजिप्त व सीरिया यांचा संयुक्त राष्ट्र स्थापनेबद्दलचा कौल जाहीर झाला त्यानुसार पहिले अध्यक्ष म्हणून गमाल अब्दुल नासार यांची निवड झाली**१९४७: भारतीय घटनेची रुपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर**१९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.**१९०१: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.* ☸️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☸️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७६: प्रतिक पुरी-- मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांतून लेखन करणारे लेखक आणि मुक्त पत्रकार**१९७५: रितू शिवपुरी -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल**१९७२: नम्रता शिरोडकर -- भारतीय सिने अभिनेत्री व मॉडेल**१९६८: प्रा. डॉ. शैलेश विश्वनाथ त्रिभुवन -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९६६: सुनील गंगाधरराव वेदपाठक -- लेखक तथा जिल्हा सत्र न्यायाधीश**१९६३: प्रा. दीपक देशपांडे --महाराष्ट्राचे हास्य सम्राट, कॉमेडियन**१९६०: प्रा. डॉ. कृष्णा वसंतराव साकुळकर -- लेखक* *१९५२: विजय कुवळेकर -- माजी माहिती आयुक्त,लेखक,वक्ते**१९४५: प्रा. डॉ. वि. स. जोग -- प्रसिद्ध ज्येष्ठ समीक्षक, विचारवंत**१९४१: गंगाराम महादेव गवाणकर -- लेखक* *१९३७: विश्वनाथ शंकर चौघुले -- लेखक* *१९३६: माधुरी मधुकर किडे -- ज्येष्ठ लेखिका* *१९३५: उषा भास्करराव हस्तक -- लेखिका* *१९३४: विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४ )**१९३२: वसंत वामनराव मून -- संपादक, संशोधक (मृत्यू: १ एप्रिल २००२ )**१९२२: प्रा. शांता बुध्दीसागर -- लेखिका**१९२०: प्रा. ह. श्री. शेणोलीकर – संतसाहित्याचे अभ्यासक (मृत्यू: ८ जुलै २००३ )**१९१६: सत्येन बोस – बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक(मृत्यू: ९ जून १९९३ )**१९१६: हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (मृत्यू: १५ जानेवारी १९९४ )**१९०९: यू. थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७४ )**१८८९: भास्कर पांडुरंग हिवाळे -- लेखक,संस्थापक ( मृत्यू: ७ सप्टेंबर १९६१ )**१५६१: सर फ्रँन्सिस बेकन – इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी (मृत्यू: ९ एप्रिल १६२६ )* ☸️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☸️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: किर्ती शिलेदार -- मराठी गायिका अभिनेत्री व लेखिका (जन्म:१६ ऑगस्ट १९५२)**२०२१: नरेंद्र चंचल -- प्रतिष्ठित भजन आणि हिंदी चित्रपट गीतांचे ते गायक(जन्म: १६ ऑक्टोबर १९४० )**२०१४: अक्किनेनी नागेश्वरा राव -- भारतीय अभिनेता आणि निर्माता (जन्म: २० सप्टेंबर १९२४ )**२००४: अलका इनामदार -- ज्येष्ठ अभिनेत्री**१९७८: हर्बर्ट सटक्लिफ – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २४ नोव्हेंबर १८९४ )**१९७५: ’काव्यविहारी’ धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी (जन्म: १६ नोव्हेंबर १८९४ )**१९७३: लिंडन बी.जॉन्सन – अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २७ ऑगस्ट १९०८ )**१९७२: स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (जन्म: ३ ऑक्टोबर  १९०३ )**१९६७: डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि'गदर पार्टी’ चे शिल्पकार (जन्म: ७ नोव्हेंबर १८८४ )**१९०१: व्हिक्टोरिया – इंग्लंडची राणी,हिने ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य केले.(जन्म: २४ मे १८१९ )**१७९९: होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे – ऑस्ट्रियन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक**१६८२: समर्थ रामदास स्वामी (जन्म: १६०८ )**१६६६: ५ वा मुघल सम्राट शहाजहान याचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन (जन्म: ५ जानेवारी १५९२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्यातील चढ-उतार*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *संभाजीनगरातील मर्मबंधा गव्हाणे यांची भरारी, आंतरराष्ट्रीय अतिथी नेतृत्व कार्यक्रमासाठी निवड, देशातील 5 महिला पटकथा लेखिकांचाही समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुणे - 'मी गीता बोलतीय' पुस्तकाचे प्रकाशन, भगवद्गीतेतून मिळतो आदर्श जीवनाचा मार्ग, लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सरकारी कार्यालयात फेऱ्या मारणे होणार बंद, जन्म-मृत्यू दाखला मिळणार व्हाट्सअप्पवर, आंध्रप्रदेश सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दावोसमध्ये गडचिरोलीसाठी पहिला करार, 5 हजार 200 कोटींची गुंतवणूक, 4 हजार रोजगार निर्मिती होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सीमेवर आणीबाणी ते पॅरिस करारातून माघार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *संत साहित्याचे अभ्यासक व प्रसिद्ध कीर्तनकार हभप डॉ. किसन साखरे महाराज यांचे पुण्यात निधन, आळंदीत अंत्यसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *U19 Womens T20 World Cup 2024 : टीम इंडियाच्या महिला संघाने यजमान मलेशिया संघावर तब्बल 10 विकेट्सने विजय मिळवला असून त्यांनी विजयासाठी दिलेलं टार्गेट अवघ्या 17 बॉलमध्ये केलं पूर्ण केलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 संगीता संजय जाधव, मुख्याध्यापिका, KGBV, धर्माबाद👤 हरीश बलकेवाड👤 स्वप्नील ईबीतवार, धर्माबाद👤 श्याम पोरडवाड👤 महेश मुदलोड👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोविंदाग्रज - राम गणेश गडकरी*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंद हे अमृत आहे ; परंतु हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी मंथन करणे आवश्यक आहे. दुःखाचे मंथन केल्याने आनंदरुपी अमृत प्राप्त होते. - पराशर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पहिला पुरूष खो-खो विश्वकप कोणी पटकावला ?२) पुरूष खो-खो विश्वकपचा उपविजेता संघ कोणता ?३) भारतीय महिलांनी कोणत्या संघाविरुध्द खो-खो सामन्यात १७५ गुण मिळवत विश्वविक्रम रचला ?४) 'समाधान' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारत सरकारने कोणत्या आयोगाच्या जागी निती आयोगाची स्थापना केली आहे ? *उत्तरे :-* १) भारत २) नेपाळ ३) दक्षिण कोरिया ४) आनंद, संतोष ५) नियोजन आयोग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आपल्याला पाच बोटे का असतात ?* 📙खरं तर हा प्रश्न, आपल्याला पाचच बोटं का असतात, असा विचारायला जायला हवा. आपल्या हातांना तसंच पायांना पाच पाच बोटंच असतात. क्वचित काही जणांना एका किंवा दोन्ही हातांना वा पायांना सहावं बोट असतं. सहापेक्षा अधिक बोटं सहसा आढळत नाहीत; पण सहा बोटं असणंही अपवादात्मकच आहे. ती काही सामान्य स्थिती नाही. बरं, फक्त मनुष्यप्राण्याच्या बाबतीतच ही स्थिती आहे असं नाही. कोंबड्या, उंदीर, मांजर, कुत्रा, वाघ, सिंह, वानर अनेक प्राण्यांच्या पायांना पाच बोटं असतात. खुरं असणाऱ्या जनावरांना पाचापेक्षा कमी बोटं असतात. म्हणजेच त्यांची एकापेक्षा अधिक बोटं जोडली जाऊन त्यांचं एकच एक जाडजूड बोट तयार होतं. त्यामुळे त्यांच्या बोटांची संख्या पाचापेक्षा अधिक होत नाही. हे असं का होतं ? बोटांवर ही पाचाची मर्यादा का पडली ? असे प्रश्न मनात उमटायला लागतात. याला जसं उत्क्रांतीच्या प्रवाहाचं कारण आहे तसंच सर्व प्राणीमात्रांच्या वाढीला कारणीभूत असणाऱ्या जनुकांची प्रणालीही जबाबदार आहे. उत्क्रांतीच्या प्रवाहात ज्या एखाद्या गुणधर्मामुळे जीवनकलह सुसह्य़ व्हायला त्या विशिष्ट पर्यावरणात तगून राहायला मदत होते, त्या गुणधर्माचा जतन होतं. झाडाच्या फांदीवरची पकड घट्ट होण्यासाठी किंवा हातात पकडलेल्या वस्तूवरची पकड घट्ट होण्यासाठी पाच बोटांची मदत होते, हे स्पष्ट झाल्यावर त्या गुणधर्माच्या प्रकटीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जनुकांचं संवर्धन झालं. उत्क्रांतीच्या ओघात प्राण्यांच्या नवनवीन प्रजाती उदयाला येताना या गुणधर्मात बदल होण्याचं टळलं.प्रत्येक प्राण्याची सुरुवात एकमेव फलित पेशीपासून होत असते. प्रथम त्या पेशीचं विभाजन होऊन दोन पेशी जन्माला येतात. याच प्रकारे केवळ विभाजन होऊन पेशींच्या संख्येत वाढ होते. या सर्व पेशी हुबेहुब एकसारख्या असतात. त्यानंतर विशिष्ट काळी या पेशींपासून वेगवेगळ्या अवयवांच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रचली जाते. ती होण्यासाठी त्याला कारक असणारी जनुकं कार्यान्वित होतात. त्यांना 'होमिओबॉक्स जीन्स' असं म्हणतात. त्याच्या प्रभावापोटी गर्भामधील अवयवांकुराचं पाच भागांमध्ये विभाजन होतं. त्यातील काही भाग शरीराच्या पुढच्या भागातील अवयवांच्या निर्मितीच्या कामाला लागतात, तर इतर पाठीमागील अवयवांच्या निर्मितीचं काम करायला लागतात. या अवयवांकुराचे असे पाचच भाग होत असल्यामुळं मग हातापायांना फुटणाऱ्या बोटांच्या संख्येवरही मर्यादा येते. शिवाय अशी पाच बोटं त्यांच्यावर सोपवल्या जाणार्‍या पकडीच्या कामासाठी पर्याप्त असल्यामुळं त्यांच्या संकेत काही बदल करण्याचं प्रयोजनच पडलं नाही. जेव्हा कधी या जनुकांमध्ये होणाऱ्या उत्परिवर्तनापायी पाचाहून अधिक बोटं तयार होतात त्या वेळीही ते अतिरिक्त बोट पाचांपैकी कोणत्या तरी एका बोटाला जोडलेलंच राहतं. हृतिक रोशनच्या डावीकडील हाताच्या अंगठ्याकडे पाहा म्हणजे याची खात्री पटेल.*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुण दोष माझे पाहों नको आतां । तारिसी अनंता मज आतां ॥१॥ अगाध महिमा काय वानूं हरी । गोकुळाभीतरीं गाई राखी ॥२॥ अंबऋषीसाठीं जन्म सोशियले । महत्त्वाचे केले हूड स्वयें ॥३॥ नामा म्हणे तुझे नामाचेनि बळ । प्रसादें केवळ लाधलों मी ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके नेहमीच वाचून काढावे त्यातून ज्ञान मिळत असते. सोबतच त्यातून मार्गदर्शन सुध्दा मिळत असते. तसेच आपल्या जीवनात जे काही प्रसंग, अडीअडचणी आले असतील त्या परिस्थितीला सुद्धा कधीही विसरू नये. जसं की पुस्तके आपल्याला घडवत असतात तसेच ज्या परिस्थितीतून आपण गेलेलो असतो ती परिस्थिती सुद्धा आपल्याला अनुभवाने परिपूर्ण बनवत असते.तो अनुभव पैशाने विकत घेता येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दुस-याबाबतचा दृष्टीकोन*स्टार्मवेल नावाचे एक इंग्रज पत्रकार होते. ते एखाद्याची मुलाखत घेणार असतील तर त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी ते उघडपणे बोलून दाखवत असत. एकदा स्टार्मवेल यांना श्रीकृष्ण मेनन यांची मुलाखत घ्यावयाची होती. स्टार्मवेल यांनी आक्रमकपणे पहिलाच प्रश्न मेनन यांना विचारला," मिस्टर मेनन, तुम्ही अत्यंत गरीबीतून वर आलेला आहात. तुम्ही शाळेत वॉच स्काऊट म्हणून काम करत होता. एका इंग्रज महिलेने तुम्हाला आधार दिला व त्यांनीच तुम्हाला लंडनला पाठविले. तेथे कायदा आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेऊन तुम्ही भारतात परत आला. येथे पुन्हा तुम्हाला संघर्ष करावा लागला. त्याचवेळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे तुमच्याकडे लक्ष गेले. त्यांनी तुम्हाला योग्य संधी दिली. आज तुम्ही त्यांच्या जवळचे आहात. नेहरूंच्या मंत्रिमंडळात तुमची वर्णी लागणार आहे असे बोलले जात आहे. म्हणजेच तुम्ही तळातून उठून आकाशात जाऊन ठेपणार आहात. पण मिस्टर मेनन तुम्ही मला खरेच सांगा की, तुम्ही कम्युनिस्ट आहात हे खरे आहे का." मेनन यांनी शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाले," तुम्ही माझे जे कौतुक केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मलाही तुमचे कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे तुम्ही रस्तोरस्ती पेपर विकून तुमचे पोट भरत होता. तेथूनच तुम्ही मोठे झालात, आता तुम्हाला चांगला पगार मिळतो आहे. पण मलाही तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की, खरेच सांगा की तुम्ही एक अनौरस संतान आहात काय." मेनन यांच्या सडेतोडपणामुळे स्टार्मवेल यांची बोबडी वळाली आणि त्यांनी तो विषय टाळून दुस-या प्रश्नाकडे वळाले. तात्पर्य – दुस-याच्या खाजगी आयुष्यात डोकावताना त्याला दुःख देणा-या गोष्टींबाबत चर्चा न केलेली बरी असते. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही गोष्टी या अतिखासगी या प्रकारात मोडतात त्यामुळे दुस-याच्या आयुष्यात ढवळाढवळ न केलेलीच चांगली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment