✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 जानेवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~या समुहात join होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💮 *_ या वर्षातील २८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 💮 *_महत्त्वाच्या घटना:_* 💮••••••••••••••••••••••••••••••••• *२०१०: १९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.**१९७७: मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८६: चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.**१९६१: ’एच. एम. टी. वॉच फॅक्टरी’ हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला**१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.**१६४६: मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध* 💮 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*💮 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: श्रुती हासन -- तमिळ-भारतीय चित्रपट अभिनेत्री, गायिका, संगीतकार**१९६८: मिलन अर्जुन लुथरिया -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक**१९६१: उदय नागोराव बरडे -- कवी* *१९६१: कमलाकर बापू राऊत -- कवी, लेखक, संपादक**१९५८: दिनेश भैय्यालाल नखाते -- लेखक**१९५३: सुधीर शांताराम थत्ते -- मराठी लेखक**१९५३: रेवती रमेश गोळे -- कथा लेखिका**१९५३: मीना अनिल टाकळकर -- अनुवादक (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००९ )**१९५०: डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी -- महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत, वक्ते, संपादक**१९४८: डॉ अरुणा कौलगुड -- लेखिका**१९४८: प्रा. बी. ए. खरात -- लेखक, संपादक* *१९४८: अरुण तुळजापूरकर -- कवी तथा निवृत्त बँक अधिकारी**१९४२: विजयराव यशवंतराव देशमुख (श्री सद्गुरुदास महाराज) -- प्रसिध्द शिवकथाकार, प्रेरक नि प्रभावी वक्तृत्व, विविध ग्रंथाचे लेखन**१९३९: प्रतापसिंह राणे -- गोव्याचे माजी मुख्यमंत्री* *१९३७: सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर – चित्रपट व भावगीत गायिका. त्यांनी हिन्दी, मराठी, गुजराथी, बंगाली, पंजाबी,इ.अनेक भाषांत गाणी गायिली आहेत.**१९३५: दिगंबर कृष्ण गाडगीळ -- निसर्गप्रेमी, पक्षीमित्र, लेखक* *१९३३: मनमोहन -- भारतीय अभिनेते(मृत्यू:२६ ऑगस्ट १९७९ )**१९३०: पं. जसराज – मेवाती घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक (मृत्यू: १७ ऑगस्ट २०२० )**१९२९: गुलशन नंदा -- भारतीय कादंबरीकार आणि पटकथा लेखक (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९८५)**१९२५: डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष (मृत्यू: २३ सप्टेंबर २००४ )**१९१४: रूप के. शौरी -- भारतीय निर्देशक, निर्माता,अभिनेता(मृत्यू: ३ जानेवारी १९७३ )**१९१३: राजेंद्र केशवलाल शाह -- गुजराती भावकवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते (मृत्यू: २ जानेवारी २०१० )**१८९९: फील्डमार्शल के.एम.करिअप्पा – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख (मृत्यू: १५ मे १९९३ )**१८९४: आनंदीबाई जयवंत -- कथालेखिका, कादंबरीकार (मृत्यू: १२ ऑगस्ट १९८४ )* *१८६७: जनार्दन विनायक ओक -- कोशकार (मृत्यू:२२ एप्रिल १९१८)**१८६५: ’पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८ )**१४५७: हेन्‍री (सातवा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २१ एप्रिल १५०९ )*💮 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💮••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: शंकर सारडा -- साहित्यिक आणि समीक्षक (जन्म: ४ सप्टेंबर १९३७ )**२००७: ओंकार प्रसाद तथा ओ.पी.नय्यर – संगीतकार (जन्म: १६ जानेवारी १९२६ )**१९९७: डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां.वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ,पद्मभूषण (१९७१) (जन्म: २७ जुलै १९११ )**१९९६: बर्न होगार्थ – जंगलचा सम्राट टारझन याला कार्टुनद्वारे अजरामर करणारे अमेरिकन व्यंगचित्रकार,लेखक,शिक्षणतज्ञ (जन्म: २५ डिसेंबर १९११ )**१९८९: हसमुख धीरजलाल सांकलिया -- भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे एक पुरातत्त्ववेत्ते (जन्म: १० डिसेंबर १९०८ )**१९८४: सोहराब मेहेरबानजी मोदी – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित (१९७९), ’मिनर्व्हा मुव्हीटोन’तर्फे त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले.(जन्म: २ नोव्हेंबर १८९७ )**१८५१: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १७७५ )**१६१६: संत दासोपंत समाधिस्थ (जन्म: २४ सप्टेंबर १५५१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फ्रेश मॉर्निंग बुलेटिन समुहात join होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकून सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र देशात अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत मिळणार पैसे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नाशिक - कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा जनस्थान पुरस्काराची घोषणा, नाटककार, दिग्दर्शक सतीश आळेकर यांना जाहीर; 10 मार्च रोजी होणार वितरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मत्स्य व्यवसाय विभागाच्या 100 दिवसाच्या नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला सविस्तर आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर अखेर कॉंग्रेसच्या कविता उईके तर उपाध्यक्षपदावर अजित पवार गटाचे एकनाथ फेंडर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अंजली दमानिया यांनी घेतली अजित पवारांची भेट, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची केली मागणी, सर्व पुरावे केले सुपूर्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अमरावती श्रमिक पत्रकार संघाकडून ज्येष्ठ पत्रकार प्रकाशदादा चौधरी यांना जीवनगौरव, 50 वर्षांच्या पत्रकारितेत सत्य हाच राहिला कर्मयोग*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्ट इंडिजने 34 वर्षांनंतर पाकिस्तानच्या भूमीवर मिळविला पहिला कसोटी विजय, मालिका 1-1 ने बरोबरीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सोपानराव डोंगरे👤 श्रीनिवास सितावार👤 राम पाटील ढगे👤 सलीम शेख, करखेली👤 राजेश अर्गे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चाचा नेहरू - पंडीत जवाहरलाल नेहरू*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दयाशील अंत:करण म्हणजे प्रत्यक्ष स्वर्ग होय. -- स्वामी विवेकानंद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ड्रोनच्या सहाय्याने टोळधाडीवर नियंत्रण ठेवणारा पहिला देश कोणता ?२) भारतात पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात किती किती खेड्यांचे विद्युतीकरण झाले होते ?३) अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांना भारत सरकारने कोणत्या पुरस्काराने गौरविले ?४) 'संहार' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ग्रामपंचायतीच्या वार्डाची संख्या कोण ठरवतो ? *उत्तरे :-* १) भारत २) ३ हजार ३) पद्मश्री पुरस्कार ४) नाश, विनाश, सर्वनाश, विध्वंस ५) तहसिलदार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *विजेचा धक्का का बसतो ?* 📒 साधा दिवा लावायला जावं किंवा गरम पाण्यासाठी गिझर चालू करायला जावं आणि विजेचा धक्का बसावा, असा अनुभव कित्येक वेळा आलेला असतो. वास्तविक ही उपकरणे चालू करण्यासाठी असलेली बटनं इन्शुलेटेड केलेली असतात. म्हणजेच त्यांच्या बाह्यांगामधून विजेचा प्रवाह खेळणार नाही, अशी व्यवस्था केलेली असते. पण कधी कधी या व्यवस्थेला कुठेतरी तडा जातो आणि केवळ अंतरंगातूनच खेळणारी वीज या बाह्यांगातही प्रवेश करते. तिच्याशी आपला संपर्क आला की मग आपल्याला विजेचा धक्का बसतो. हे असं का होतं ? असा सवाल त्या धक्क्यानं गांगरुन गेल्यावरही आपल्या डोक्यात धुमाकूळ चालत राहतो.विद्युतबल हे विश्वाच्या जन्मापासून अस्तित्वात असलेलं मूलभूत बल आहे. विश्वाचा गाडा सुरळीत चालू राहण्यात ते महत्त्वाची भूमिका वठवत असतं. विद्युतबलामध्ये ऋण आणि धन असे दोन विद्युतभार असतात. सामान विद्युतभार एकमेकांना दूर लोटतात, तर विषम विद्युतभार एकमेकांकडे आकर्षित होतात; पण अशा एकमेकांकडे ओढ असणाऱ्या एक धन आणि दुसरा ऋण अशा विद्युतभारांना आपण एकमेकांपासून काही अंतरावर ठेऊ शकतो. त्यापोटी मग त्या दोन भारांमध्ये स्थितीजन्य ऊर्जा निर्माण होते. यालाच आपण विद्युत पोटेन्शियल म्हणतो. जर ते दोन टोकांवरचे भार एकत्र आले तर ही ऊर्जा व्होल्टेजच्या रूपात मोकळी होते. दूरवर राहूनही त्यांना एकत्र आणण्याचं काम ज्यांच्यामधून विद्युतभार सहजगत्या वाहू शकतो असे विद्युतवाहक करतात. तांब्याची तार किंवा साधं पाणी सुद्धा चांगले विद्युतवाहक आहेत. अशा तारेनं जर ते विद्युत भार जोडले गेले तर त्या वाहकातून म्हणजेच तारेतून विद्युतप्रवाह वाहू लागतो. याउलट लाकूड किंवा पोर्सेलीन यांच्यामधून विद्युतप्रवाह सहजगत्या वाहू शकत नाही. हे पदार्थ त्या प्रवाहाला विरोध करतात. त्यामुळे ते विद्युतरोधक बनतात. प्रवाहापासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी अशा विद्युतरोधकांचा वापर केला जातो.आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपले शरीरही चांगलं विद्युतवाहक असतं. त्यामुळे एका टोकाच्या विद्युतभाराशी आपल्या शरीराचा संपर्क आला तर शरीरातून विद्युतप्रवाह वाहू लागतो. त्यापोटी उद्भवणाऱ्या व्होल्टेजपोटी अनेक शरीरक्रियांमध्ये अडथळे निर्माण होतात. होल्टेजचं प्रमाण जास्त असेल तर या अडथळ्यांची मात्राही जास्त असते. जोरदार धक्का बसल्यासारखी परिस्थिती निर्माण होते.विद्युतप्रवाह नेहमी धन विद्युतभाराकडून ऋण विद्युतभाराकडे वाहत असतो. आपला संपर्क धन विद्युतभार असलेल्या टोकाशी झाला की विद्युतप्रवाह दुसऱ्या टोकाला असलेल्या ऋण विद्युतभाराकडे वाहू लागतो. अर्थात दुसऱ्या टोकाला असा ऋण विद्युतभार असण्याची आवश्यकता असते. जेव्हा आपण जमिनीवर उभे असतो तेव्हा तसा तो असतो; पण आपण लाकडावर जर उभे राहिलो तर दुसऱ्या टोकाला असा विद्युतरोधक असल्यामुळे विद्युतप्रवाह वाहू शकत नाही. त्यामुळे धक्का बसण्यापासून आपली सुटका होते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जननिये जिवलगे येवो पांडुरंगे । शिणलों भेटि दे गे एक वेळां ॥१॥ त्राहे त्राहे त्राहे कृपादृष्टीं पाहे । येऊनियां राहे ह्रदयामाजीं ॥२॥ वासनेच्या संगें शिणलें माझें चित्त । विषयाचे आघात पडती वरी ॥३॥ नाहीं तुझी सेवा केली मनोधर्में । संसार संभ्रमें भ्रांत सदा ॥४॥ नाहीं तुझें नाम गाईलें आवडी । वाळली कुर्वंडी त्रिविधतापें ॥५॥ नामा म्हणे आई धांवें लवलाही । बुडतों चिंताडोहीं तारी मज ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण, आपले दु:ख इतरांना,आपली माणसं समजून सांगत असतो. पण, आपल्या आजूबाजूलाही समाजात अनेक लोक दु:खी आहेत. म्हणून आपले दु:ख इतरांना सांगण्यापेक्षा समाजात दु:खी असलेल्यांच्या विषयी थोडी विचारपुस करून त्यांना आपलेसे करून घ्यावे या कार्याने संपत्ती मिळत नसली तरी मात्र माणुसकीच्या नात्याने त्यांच्यात सहभागी झाल्याने विशेष समाधान मिळत असते. असे प्रयत्न करून बघायला हरकत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सामर्थ्य*एका मध्यरात्री सहदेव झोपेतून उठला आणि अशेजारच्या जंगलातील झोपडीत राहणाऱ्या पांडुरंग नावाच्या आपल्या मित्राकडे गेला. त्याच्या दारावर थाप मारून मारून सहदेवने त्याला उठविले. पांडुरंग झोपेतून उठला. दार उघडून पाहतो तर, बाहेर हातात कंदील घेऊन सहदेव उभा. पांडुरंग म्हणाला, "काय रे सहदेव ! इतक्या रात्री तुला काय हवंय? का माझी झोपमोड केलीस?" सहदेव म्हणाला, "अरे पांडबा ! मला झोपच येईना. जरा विडी ओढवी म्हणून काडेपेटी शोधली तर सापडेना. तेव्हा मला जरा विडी शिलगावण्यासाठी काडेपेटी कशाला हवी? कंदीलावर का नाही विडी पेटवलीस?" ते ऐकून सहदेव खजील झाला. आपल्या हाती दिवा आहे, हे त्याच्या लक्षातच आले नव्हते.* तात्पर्य : स्वतःकडे असणाऱ्या सामर्थ्याची आपणाला ओळख पटायला हवी.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment