✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 एप्रिल 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2021/04/19042021-hanuman.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔴 *_ या वर्षातील १०२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔴 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९८: गेल्या शतकातील साठच्या दशकात हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावणारे सी. सुब्रम्हण्यम यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान**१९९७: पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी राजीनामा दिला.**१९९७: पूर्व प्राथमिक प्रवेशाकरता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर**१९६७: कैलाश नाथ वांछू यांनी भारताचे १० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला**१९६१: रशियाचा युरी गागारिन हा अंतराळात भ्रमण करणारा पहिला मानव बनला. त्याने अंतराळात १०८ मिनिटे भ्रमण करुन पृथ्वीप्रदक्षिणा केली**१९४५: अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.**१६०६: ग्रेट ब्रिटनने ’यूनियन जॅक’ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.* 🔴 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔴••••••••••••••••••••••••••••••••*१९८२: रेवती राहुल जोशी --पत्रकार, लेखिका, संपादिका* *१९७५: डॉ. सच्चिदानंद शंकर बिचेवार -- लेखक* *१९७५: आसाराम लोमटे -- प्रसिद्ध लेखक* *१९७२: रवी वसंत सोनार -- कवी, लेखक गीतकार**१९६७: प्रा. डॉ. मनोहर नाईक -- कवी, लेखक**१९६४: प्रकाश दिनकर सकुंडे -- कवी* *१९६१: शशिकांत हिंगोणेकर -- सुप्रसिद्ध कवी, निवृत्त शिक्षण उपसंचालक**१९६०: मेघना हेमंत साने -- कवयित्री, लेखिका**१९५८: चरणदास वैरागडे -- कवी* *१९५६: रामचंद्र अनंत देखणे - कथाकार, कादंबरीकार, लोककलांचे अभ्यासक (मृत्यू: २६ सप्टेंबर २०२२ )**१९५४: विनय नारायणराव मिरासे (अशांत) -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५४: सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार,लेखक, दिगदर्शक,कवि आणि गीतकार (मृत्यू: २ जानेवारी १९८९ )**१९५०: विजयेंद्र घाटगे -- हिंदी चित्रपट आणि भारतीय दूरचित्रवाणी अभिनेते**१९४९: छाया महाजन -- मराठीतील प्रसिद्ध साहित्यिका* *१९४९: सुभाष त्र्यंबक अवचट -- चित्रकार, लेखक, कवी**१९४५: डॉ. यशवंत शंकर साधू -- संत साहित्यांचे अभ्यासक (मृत्यू: १४ एप्रिल २०२० )**१९४३: सुमित्रा महाजन –भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशमधील वरिष्ठ नेत्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित**१९४२: सुनीती जयंत आफळे -- कथाकार**१९४१: शरद आत्माराम काथवटे -- लेखक**१९३८: गुलशन बावरा(मेहरा) -- चित्रपट गीतकार (मृत्यू: ७ ऑगस्ट२००९ )**१९३२: लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते (मृत्यू: १२ ऑगस्ट २००५ )**१९२०: शैलजा प्रसन्नकुमार राजे -- कथाकार, कादंबरीकार, चरित्रकार(मृत्यू: १६ ऑक्टोबर २००६ )**१९१७: विनू मांकड – सलामीचे फलंदाज व डावखुरे मंदगती गोलंदाज (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७८ )**१९१४: कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव – चित्रपटासाठी कथा, संवाद व गीतलेखन करणारे.(मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९५ )**१९१०: पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८० )**१८७१: वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार (मृत्यू: २ फेब्रुवारी १९३० )*🔴 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••• *२०१४: शरद् पाटील --महाराष्ट्रातील एक विख्यात प्राच्यविद्यापंडित व सत्यशोधक मार्क्सवादी विचारवंत.(जन्म: १७ सप्टेंबर १९२५ )* *२०११: सचिन भौमिक -- हिंदी चित्रपटांचे पटकथा लेखक (जन्म: १७ जुलै १९३० )* *२००६: राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक (जन्म: २४ एप्रिल १९२९ )**२००१: देवांग मेहता -- भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीजचे अध्यक्ष(जन्म: १० ऑगस्ट १९६० )**१९७७: भानुदास बळिराम शिरधनकर ऊर्फ भानू शिरधनकर -- मराठी लेखक (जन्म: १६ ऑक्टोबर १९१५ )**१९४५: फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ३० जानेवारी १८८२ )**१९०६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्‍न’ भट्टाचार्य (जन्म: २२ फेब्रुवारी१८३६ )**१८१७: चार्ल्स मेसिअर – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (जन्म: २६ जून १७३० )**१७२०: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा (जन्म: १ जानेवारी १६६२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हनुमान जयंती विशेष लेख...मनोजवं मारुततुल्य वेगंजिंतेंद्रियम बुद्धीमतां वरीष्ठमवातात्मजं मारुततुल्यवेगमश्रीराम दूतम शरणम प्रपद्ये..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उष्माघाताचा पहिला बळी विदर्भात; 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू, प्रशासन अलर्ट मोडवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *15 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर 16/11च्या हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्रात गडकिल्ल्यांचे पर्यटन, 10 दिवसांची आयकॉनिक रेल्वेटूर सुरू होणार, रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्यासह पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महिन्याच्या 7 तारखेला ST कर्मचाऱ्यांचा पगार, महामंडळाला 120 कोटी तातडीने; मंत्री सरनाईकांच्या बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळून ६ जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'बामू'मध्ये आजपासून ग्रंथ महोत्सव:संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन; शिरसाटांच्या मिश्किल टिप्पणीने सर्वजण खळखळून हसले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - कोलकाताने चेन्नईला 8 विकेटने हरवले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अरुणा कलेपवार, उपक्रमशील शिक्षिका, नांदेड👤 गंगाधर पेंडपवार👤 आकाश वाघमारे👤 बालाजी चुनुपवार, येवती👤 गजानन कुरेवाड, विषय शिक्षक, 👤 मिनाज सय्यद👤 कलीम शेख👤 आसिफ शेख*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 39*खांबासारखे पाय माझे सुपासारखे कान**दात बाहेर आहेत माझे नाक आहे शान* *मेहनती आहे मी प्राणी बुद्धीमान* *सर्कशीत भेटतो मी जरी असले डोळे लहान*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - मेंढी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हाताची पाचच बोटे हजारो कामे करतात, कारण त्यांच्यात ऐक्य असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ४० मी उंचीचा जगातील सर्वात उंच इनडोअर धबधबा कोणता ?२) इंग्रजांविरुद्ध पहिलं पाऊल उचलणारे क्रांतिकारक कोण ?३) 'ई - कॅबिनेट' प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य झाले ?४) 'कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) जैन धर्माचे २४ वे/शेवटचे तीर्थकर कोण होते ? *उत्तरे :-* १) रेन व्हर्टेक्स ( चांगी विमानतळ, सिंगापूर ) २) मंगल पांडे ३) सातवे ४) कर्तव्यदक्ष ५) भगवान महावीर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *डोळे मिटून चालताना तोल का जातो ?* 📕********************काय म्हणता? तुमचा तोल जात नाही? मग करूनच पाहा हा प्रयोग. रूमालाने डोळे बांधा आणि चालायला लागा! काय पडलात का ठेच लागून? डोळे उघडून चालतानाही ठेच लागते, पण ती आपल्या निष्काळजीपणामुळे डोळे मिटल्यानंतर मात्र सर्वांना थोडाफार त्रास होतो. याचे कारण आता पाहू.शरीराचा समतोल राखणे जनावरांना अगदी सोपे असते. कारण त्यांना चार पाय असतात. माणसाला मात्र दोन पायांवर शरीराचा तोल सांभाळावा लागतो. तोल सांभाळता येण्यासाठी लहान मेंदूचे कार्य खूप महत्वाचे असते. सर्कशीत तारेवर चालणारी मुलगी जसा शरीराचा तोल सांभाळत असते, त्याचप्रमाणे आपणही आपल्या नकळत शरीराचा तोल सांभाळत चालत असतो किंवा इतर हालचाली करत असतो. त्यामुळेच पार्किन्सन रोग किंवा सेरेबेलार सिन्ड्रोनसारख्या रोगांमध्ये माणूस नीट चालू शकत नाही. डोळे उघडे असूनही त्याचा तोल जातो. लहान मेंदूखेरीज शरीराच्या हात, पाय, मान या अवयवांच्या सुयोग्य हालचाली देखील तोल सांभाळण्यासाठी आवश्यक असतात.तोल सांभाळण्याच्या प्रक्रियेत डोळ्यांचाही काही प्रमाणात सहभाग असतो. दृष्टीमुळे आपल्याला जगाचे ज्ञान होते. आपण त्यामुळेच आत्मविश्वासाने पावले टाकतो. डोळे बंद केल्यानंतर एक प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण होते. न दिसल्यामुळे अंतराचा, खोलीचाही अंदाज येत नाही. त्यामुळे आपण अडखळत यवकत थवकत चालू लागतो. एक गंमत तुम्ही अनुभवली असलेच.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देशीं परदेशीं जालों तुजविण । माझें समाधान कोण करी ॥१॥ चातक चकोरापरी पाहे वास । तूं कां गे उदास पांडुरंगे ॥२॥ नामा म्हणे चित्त देईं माझ्या बोला । जीउ हा उरला तो निघों पाहे ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कपड्याला स्वतः हून लागलेले डाग एकवेळचे धुतल्याने निघत असते. पण एखाद्या माणसाला मुद्दामहून डाग लावल्या जाते ते डाग कशानेही धुतले तरी जन्मभर निघत नाही. कारण त्या लावलेल्या डागात कपट, कारस्थान, स्वार्थ, छळ, निंदा, चुगली आणि बरेच काही व्यर्थ विकार मिसळवून ते बनविलेले असते म्हणून कोणाचे चांगले करायचे नसेल तर करू नये. पण, कोणाचे जीवन अशा व्यर्थ गोष्टींच्या नादी लागून उद्धस्त करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विद्येची किंमत*एकदा रामकृष्ण परमहंस गंगास्नानासाठी शिष्यासह गंगेवर गेले. त्यावेळी एक सिद्ध पुरुषही तिथे होते. त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली, तसेच परत आले व रामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का ? बारा वर्षे तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे.शिष्याने रामकृष्णांना हे सांगितले ते म्हणाले,” त्यांना सांग तुझा हा चमत्कार दोन आणे किमतीचा आहे.” शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला. तो भलताच भडकला मनाला,” पुन्हा असे म्हणाला तर तुमचे भस्म करून टाकेन.” ‘रामकृष्णाने पुन्हा तसेच म्हटलं तेव्हा प्रत्यक्ष त्यांनाच सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ विचारला रामकृष्ण म्हणाले, ‘नावाडी सुद्धा दोन आण्यात पैलतिराला नेतो. त्याचा इतरांना उपयोग होतो पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे. त्या विद्येचा लोकांना उपयोग होत. नाही तिची किंमत शून्य आहे.तात्पर्य - माणसाने आपल्या विद्येचा कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment