✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 एप्रिल 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://sahityasevak.blogspot.com/2020/04/blog-post_20.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔵 *_विश्व पार्किंसंस दिवस_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••••🔵 *_शिक्षक हक्क दिन_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_ या वर्षातील १०१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••••• *_महाराष्ट्र शासनाने 'शिक्षक हक्क दिन' हा ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे.महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो._**१९९९: अण्वस्त्रमारा करू शकणार्‍या ‘अग्नी-२’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी**१९९२: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर**१९८६: हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडे सहा कोटी किलोमीटर अंतरावरुन गेला. आता हा धूमकेतू २८ जुलै २०६१ रोजी परत पृथ्वीच्या एवढ्या जवळून जाणार आहे* *१९७९: युगांडाचा हुकूमशहा इदी अमीन पदच्यूत. युगांडाचा कसाई (Butcher of Uganda) या नावाने तो कुप्रसिद्ध होता.**१९७०: फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर वरून 'अपोलो-१३' या चांद्रयानाचे प्रक्षेपण झाले.चंद्रावर उतरणारे हे तिसरे यान असणार होते.पण सर्व्हिस मोड्यूलच्या ऑक्सिजन टाकीत बिघाड असल्याचे प्रक्षेपणानंतर दोन दिवसांनी लक्षात आल्यामुळे चंद्रावर न उतरताच त्याला परत यावे लागले.**१९३०: पंडित मोतीलाल नेहरू यांनी आनंद भवनचे स्वराज भवन असे नामकरण करून जनतेला दिले* *१९१९: आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना* 🔵 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८१: शुभांगी अत्रे -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री* *१९७९: प्रशांत दामोदर भरवीरकर -- कवी, लेखक* *१९७६: प्रा. डॉ. प्रमोद भीमराव गारोडे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९६६: प्रा. डॉ. चंद्रकुमार तेजराम राहुले -- लेखक* *१९६२: प्रा. डॉ. विश्वनाथ मुरलीधरराव रत्नाळीकर -- कवी, लेखक**१९६२: सुबोध श्रीकृष्ण कथाकार रिसबूड (सुमेध वडावाला)-- श्रेष्ठ कथाकार* *१९५७: जयंत भास्कर देशपांडे -- कवी, लेखक**१९५३: भानू काळे -- प्रसिद्ध मराठी लेखक, संपादक* *१९५१: रोहिणी हत्तंगडी – अभिनेत्री**१९५०: अंजली प्रभाकर मुळे -- लेखिका, संपादिका**१९५०: प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे -- सुप्रसिद्ध मराठी हिंदी भाषेतील लेखक, कवी, समीक्षक, संपादक, विविध पुरस्काराने सन्मानित**१९४९: डॉ. शेषराव नरवडे -- लेखक**१९४५: विश्वास देवमनराव दामले -- कवी, लेखक* *१९४४: अशोक चंदनमल जैन -- मराठी पत्रकार व लेखक(मृत्यू: १८ फेब्रुवारी २०१४ )* *१९३७: रामनाथन कृष्णन – पद्मभूषण व अर्जुन पुरस्कार विजेते लॉनटेनिस खेळाडू**१९३५: वसंत ला सावंत --मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी (मृत्यू: २३ डिसेंबर १९९६ )**१९३३: राम गोविंद ताकवले -- भौतिकशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, माजी कुलगुरू (पुणे विद्यापीठ)(मृत्यू: १३ मे २०२३ )**१९३०:डॉ. विदुला जवळगेकर -- लेखिका**१९०६: डॉ. सुमित्र मंगेश कत्रे – संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक.(मृत्यू:३१ ऑक्टोबर १९९८)**१९०४: कुंदनलान सैगल – गायक व अभिनेते (मृत्यू: १८ जानेवारी १९४७ )**१८८७: जामिनी रॉय – पद्मभूषण पुरस्कार विजेते चित्रकार (मृत्यू: २४ एप्रिल १९७२ )**१८६९: कस्तुरबा गांधी (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९४४ )**१८२७: जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ ’महात्मा फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक,विषेशत: समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९० )**१७७०: जॉर्ज कॅनिंग – ब्रिटनचे पंतप्रधान (मृत्यू: ८ ऑगस्ट १८२७ )**१७५५: डॉ. जेम्स पार्किन्सन – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे,हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ (मृत्यू: २१ डिसेंबर १८२४ )* 🔵 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१४: नंदू आत्माराम भेंडे (मूळ नाव सदानंद) -- मराठीतील पहिले रॉकस्टार(जन्म:२७ नोव्हेंबर १९५२ )**२००१: कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे – कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित (जन्म: ८ नोव्हेंबर १९१७ )**१९३८: कासीनाधुनी नागेश्वरराव -- भारतीय पत्रकार,राष्ट्रवादी,राजकारणी, व्यापारी(जन्म: १ मे १८६७ )**१९२६: ल्यूथर बरबँक – अमेरिकन वनस्पतीशास्त्रज्ञ व कृषीतज्ञ (जन्म: ७ मार्च १८४९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणसात दिसला देव*याविषयावर अनेक साहित्यिकांचे लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *तब्बल 78 देशांमधील 'आदर्श गाव' या जागतिक सर्वेक्षणात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात वसलेलं बारीपाडा हे गाव दुसऱ्या क्रमांकावर झळकत आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दूरसंचार नियामकाने अलीकडेच दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या वेबसाइट किंवा अॅपवर त्यांच्या नेटवर्क कव्हरेजचा तपशीलवार नकाशा प्रकाशित करण्याचे दिले निर्देश, 120 कोटी नागरिकांना होणार फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *प्रताप सरनाईक ST महामंडळाचेनवे अध्यक्ष, ST ला आर्थिक बळकटी देण्याचा संकल्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापूर – सांगली राष्ट्रीय महामार्गातील भूसंपादनासंदर्भात नव्याने प्रस्ताव सादर करा; महसूल मंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नंदूरबारमध्ये तापमानाचा पारा तब्बल 45.3 अंशांवर, जळगाव व अकोल्यात 43.7 अंशांची नोंद, संपूर्ण राज्यात उष्णतेचा दाह वाढला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *2028 च्या ऑलिम्पिक मध्ये दिसणार क्रिकेटचा थरार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऋतुराज गायकवाडला दुखापत, धोनी पुन्हा सीएसकेचा कर्णधार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रामदास वाघमारे, संपादक👤 देविदास बसवदे, शिक्षक नेते, नांदेड 👤 युवराज पाटील👤 प्रवीण कोडम, संपादक 👤 विनोद चिलकेवार, नांदेड 👤 सिद्धेश रेवंतवार 👤 संजय नागरे 👤 सुरेश द्विदेवार 👤 साईनाथ हवालदार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 38*अंगावर असते कातडी केसाळ* *अन्न माझे वनस्पती गवताळ**उपजाऊ होते शेत माझ्या खताने**पहिला क्लोन बनविला माणसाने**निर्माण करतो लोकराचे**खातात मांस बोलाईचे*ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - कुत्रा••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशस्वी माणूस तो म्हणवला जातो की, जो आपल्यावर इतरांनी फेकलेल्या दगडापासून पायाबांधणी करतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे कितवे छत्रपती होते ?२) गावातील अतिक्रमण हटविण्याचा प्राथमिक अधिकार कोणाला असतो ?३) "फडक्याला जसा फासावर चढवतील तसा मलाही चढवतील, यापेक्षा जास्त काही करणार नाहीत ना ?" असे निर्भय उद्गार कोणी काढले ?४) 'कर्तव्याकडे पाठ फिरवणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) क्रांतिकारक मंगल पांडे यांना इंग्रजांनी फाशी केव्हा दिली ? *उत्तरे :-* १) तिसरे २) ग्रामसेवक ३) सार्वजनिक काका ( गणेश वासुदेव जोशी ) ४) कर्तव्यपरांडमुख ५) ८ एप्रिल १८५७ ( बराकपूर, कोलकाता )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *प्रथिने म्हणजे काय ?* 📙 प्रथिनांची आवश्यकता आपण अनेक वेळा ऐकलेली असते. पेशींची रचना प्रथिनांशिवाय होत नाही, हे ज्ञात असते. पण प्रथिने म्हणजे काय, याचे नेमके उत्तर मात्र अनेकदा माहीत नसते. अॅमिनो अॅसिड या प्रकारची वीस द्रव्ये प्रथिने बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यांचे अजूनही प्रकार आहेत, पण ते सजीव पेशी तयार होण्यासाठी उपयोगी पडत नाहीत.या वीस प्रकारच्या अमिनो अॅसिड्सच्या रेणूंची साखळी बनत जाते व विविध स्वरूपांची प्रथिने निर्माण होऊ लागतात. प्रथिनाच्या रचनेप्रमाणे त्याचे काम ठरते, कार्यकक्षा आखली जाते, उपयुक्तताही ठरते. स्नायूंच्या रचनेसाठी तीन लागतात, त्यावेळी त्यांच्यामुळे पेशी बनतात. याउलट शरीरात काम करणारी असंख्य प्रकारची वितंचके (Enzymes) ही सुद्धा प्रथिने असतात. तोंडातील लाळ, पोटातील पाचक रसातील पदार्थ, रक्तातील काही द्रव्ये, मज्जासंस्थेतील संदेशवहनास उपयोगी पडणारी रसायने हे सर्व प्रथिनांचेच प्रकार आहेत.वीस प्रकारच्या अमिनो अॅसिड्सच्या विविध पद्धतींनी जुळणाऱ्या जोड्यांतून असंख्य प्रथिने होतात. पण यांतील सर्वच अमिनो अॅसिड्स शरीरात तयार होतातच, असे मात्र नाही. ती अन्नातून मिसळावी लागतात. मग त्यांचे दोन प्रकार केले जातात - आवश्यक व अनावश्यक. यांतील आवश्यक प्रकार योग्य प्रमाणात मिळाले नाहीत, तर वाढीवर परिणाम होऊ लागतो, आजार निर्माण होऊ शकतात.आवश्यक प्रकारची अमिनो अॅसिड्स सर्व प्रकारच्या अन्नांत एकत्रित असतातच, असे नाही. कसलीतरी कमतरता असतेच. यासाठीच एकच एक पदार्थ खाऊन कोणीही प्राणी राहू शकत नाही. फक्त मांसावर जगणाऱ्या प्राण्यांना मात्र सर्व आवश्यक अमिनो अॅसिड्स मिळतात. याउलट शाकाहारी माणसाला जरी तांदळात, गव्हात, ज्वारी बाजरी प्रथिने मिळत असली, तरीही त्याबरोबर द्विदलांचा म्हणजे डाळींचा आसरा घ्यावाच लागतो. त्यातूनच आहारपद्धती ठरत गेल्या आहेत.रोजच्या पदार्थातील सर्वात जास्त प्रथिने सोयाबीनमध्ये आढळतात. त्याची टक्केवारी चाळीसपर्यंत असू शकते. यामुळेच शाकाहारी आहारात सोयाबीनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेवढेच काय, पण पाश्चात्य देशांत मांसाची कमतरता भरून काढण्यासाठीही सोयाचा वापर केला जातो. शेंगदाने, चीज यांचा क्रमांक त्यानंतरचा व त्यांतील प्रथिनांची टक्केवारी पंचवीस असते. मांसात २३ टक्के, तर अंड्यांमध्ये १२ टक्के प्रथिने असतात. गहू वा तांदळात ६ ते ८ टक्केच प्रथिने आढळतात. प्रथिनांबद्दल बोलताना अनेकदा प्रथम दर्जाची व दुय्यम दर्जाची अशी वर्गवारी केली जाते. याचा अर्थ ज्यात सर्व आवश्यक अमिनो अॅसिड्स आढळतात, ती प्रथम दर्जाची व अन्य सर्व दुय्यम समजली जातात. थोडक्यात प्राणिज प्रथिने प्रथम दर्जाची असतात. लहान मुले, गर्भावस्था, आजारपण यांमध्ये पेशींची झीज भरून काढणे व वाढीसाठी आवश्यक म्हणून प्रथिनांची गरज असते. मुळात ही गरज या काळात जास्तच असल्याने प्रमाण २० टक्के इतके वाढलेले असते. केवळ प्रथिनयुक्त अन्नाची चव मात्र काहीशी उग्र वासाची असते. थोडीशी कडवटही असते. क्वचित काहींना ती आवडतही नाही. यासाठीच प्रथिनयुक्त अन्न पिष्टमय वा वनस्पतिज पदार्थांबरोबर खाण्याची पद्धत पडली आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देवा माझें मन करोनि स्वाधीन । निमोले स्वामीपण भोगिसीना ॥१॥ फुकाचा कामारा वोळगे निरंतर । न घाली तुज भार कल्पनेचा ॥२॥ तुज नलगे देणें मज नलगे मागणें । असेन अनुसंधानें चरणाचेनि ॥३॥ नामा म्हणे केशवा तूं सर्व जाणता । समयींच्या उचिता चुकों नको ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपमान करण्याचे ठरवणारा अपमानच करत असते.निंदा करणाऱ्याला कोणतेही मुहूर्त बघावे लागत नाही, मदत करणारा आपला माणुसकी धर्म पूर्णपणे निभावत असतो आणि माणूस म्हणून जन्म मिळाला त्यासाठी काहीतरी देणं लागतं यासाठी जो कार्य करत असते ही त्याला लागलेली चांगली सवय आणि आवड असते. या चौघांकडे समाज कोणत्या दृष्टीने बघते हे त्यांच्या कर्मावर अवलंबून असते म्हणून कर्मालाच श्रेष्ठ म्हटले गेले आहे आपणही त्याचे महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कष्टाची कमाईच श्रेष्ठ*एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्‍येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्‍से मध्ये वाटून घेत. आपापला हिस्‍से स्‍वत:साठी व एक हिस्‍सा ईश्‍वराला ठेवतात.असे खूप दिवस चालत होते .एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले. बरीच वेळ भटकंती करूनहीसुद्धा त्‍यांना काही चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही.ते दोघेही थकून एका मंदिरात बसले. तेथे त्‍यांना एक साधू संत मादिरामध्ये झोपलेले दिसले. त्‍यांनी संताला उठवले व म्हणाले कि काही असेल तर द्या नाही तर मारून टाकले जाऊ.संताने त्यांना विचारला तर त्या चोरांनी सांगितले कि आम्ही चोर आहोत.आम्ही चोरी करतो .हे ऐकून संत म्‍हनाले, तुम्‍ही करता ते चांगलेआहे की वाईट याचा कधी विचार केला ?चोर म्‍हणाले,” आम्‍ही चांगलेच करतो कारण आम्ही चोरी करून जे धन मिळवतो ते आम्‍ही तीन हिस्‍से मध्ये वाटतो. एक एक भाग आम्‍ही घेतो आणि तिसरा भाग ईश्‍वराला चरणी अर्पण करतो.हे सगळे ऐकल्यावर संत त्यांच्या जवळील एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना दिला व म्हणाले ”आज तुम्ही काहीही चोरी करू शकले नाहीत त्यामुळे तुम्हीला हा कोंबडादेऊ शकतो बाकी माझ्याकडे काही नाही.पण आता चोरापुढे प्रश्न पडला कि आता याचे हिस्‍से कसे करायचे. ते दोघेही चोर आश्‍चर्यचकित झाले.संताने त्यांना आशय समजावून म्हाणाले कि चोरी हा जगण्याचा पर्याय नाही. तुम्ही कष्‍टाची कमाई करून त्‍यातील एक हिस्‍सा ईश्‍वरचरणी ठेवा. ते खरे सार्थक आहे .हे सगळे म्हणणे त्या चोराला पटले आणि ते दोघेही संताला नमस्‍कार करूनचोरी सोडून द्यायचा निर्णय करून तेथून निघून गेले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment