✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 एप्रिल 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_7.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛟 *_जागतिक कोंकणी भाषा दिन_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_ या वर्षातील ९९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९५: लता मंगेशकर यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते ’अवधरत्‍न’ व साहू सूरसम्मान’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले**१९९४: सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना ’आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान**१९६७: बोइंग-७६७ ने पहिले उड्डाण केले.**१९४०: दुसरे महायुद्ध : जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.**१८६७: रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत ’एक’ मताने मंजुरी मिळाली.*🛟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: शरयू जीवन खाचणे -- कवयित्री* *१९८०: शेख पीरपाशा ईसाक -- कवी**१९७६: प्रा. डॉ. वैजनाथ सोपानराव अनमुलवाड -- कवी, लेखक* *१९६६: कविता आमोणकर -- लेखिका,कवयित्री* *१९६२: भारत मुरलीधर सातपुते -- लोकप्रिय कवी* *१९५४: अनिता कंवर -- हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री* *१९५४: जयराम रमेश -- भारतीय अर्थतज्ज्ञ आणि माजी पर्यावरणमंत्री**१९५१: तुकाराम दासराव गंगावणे -- लेखक* *१९४८: जया बच्चन(भादुरी) – सुप्रसिद्ध अभिनेत्री**१९४६: डॉ. नंदकुमार नाईक -- कवी* *१९३५: बिंदू माधव पाठक -- रुद्र वीणा आणि सतार वादक (मृत्यू: ४ फेब्रुवारी २००४ )* *१९२५: लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (मृत्यू: २१ ऑक्टोबर  १९९५ )**१९०४: सुलभा गोपाळ पाणंदीकर -- शिक्षणशास्त्रज्ञ, निबंधकार* *१९०२: नारायण रामचंद्र मोरे(अशोक) -- कवी, संपादक**१८८७: विष्णू गंगाधर तथा ’दादासाहेब’ केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९५० )**१८७१: केशव विश्वास फणसे -- कवी* *१८२८: गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते (मृत्यू: २५ जुलै १८८० )**१३३६: तैमूरलंग – मंगोल सरदार (मृत्यू: १८ फेब्रुवारी १४०५ )* 🛟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१८: अच्युत अभ्यंकर -- किराणा घराण्याचे गायक( जन्म: २ जानेवारी १९३७)**२०१५: हृषीकेश मुळगावकर -- भारताचे भूतपूर्व वायुसेनाध्यक्ष.(जन्म: १४ ऑगस्ट १९२० )* *२००९: शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते (जन्म: १३ जानेवारी १९२६ )**२००९: अशोकजी परांजपे – महाराष्ट्रातील लोककला संशोधक, गीतकार, नाटककार (जन्म: ३० मार्च १९४१ )**२००१: बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ ’बिझी बी’ – पत्रकार व स्तंभलेखक, ’आफ्टरनून डिस्पॅच अँड कुरियर’ या सायंदैनिकाचे संपादक (जन्म: ११ ऑक्टोबर १९३० )**२००१: शंकरराव खरात – साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: ११ जुलै १९२१ )**१९९४: चंद्र राजेश्वर राव – स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणाच्या लढ्याचे प्रवर्तक,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस (जन्म: ६ जून १९१४ )**१९९०: कमलाकर तोरणे -- मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक,अभिनेते आणि निर्माते(जन्म: १२ नोव्हेंबर १९२५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जन्म मृत्यूची नोंदणी*युनिसेफच्या एव्हरी चाईल्ड ब्राईट ईनेकविट्स अँड बर्थ रजिस्ट्रेशन या नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या 161 देशातील आकडेवारी विश्लेषणाचा अहवालानुसार भारतात प्रत्येक तीन मुलामागे एकाच्या जन्माचे कोणतीही नोंद नसते. पाच वर्षाखालील अशा अनोंदणीकृत मुलांची संख्या तब्बल 71 दशलक्ष असून जागतिक पातळीवर हीच संख्या दोनशे तीस दशलक्ष अशी आहे. यानुसार भारतात जन्म नोंदणीचे प्रमाण 41 टक्के आहे जी की जगात सर्वात कमी आहे. भारतातील हिंदू व मुस्लिम या दोन सर्वाधिक लोकसंख्येच्या समुदायात जन्म नोंदणीचे प्रमाण सर्वांत कमी असून याच्या तुलनेत अल्पसंख्यांक जैन व शीख समुदायात प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वाढलेले तापमान पाहता विदर्भातील शाळांच्या परीक्षा लवकर घेण्याचे नागपूर खंडपीठाने संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यां दिले आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त पदी अभिनव गोयल यांची निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत जळगावचे महेश कोल्हे बनले यशस्वी उद्योजक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई : ‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा नियमित व तांत्रिक देखभालीसाठी १० ते १४ एप्रिल २०२५ अशी पाच दिवस राहील बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात यापुढे M सँड धोरण, सरकारी बांधकामांमध्ये कृत्रिम वाळू वापरणार, घरकुलासाठी 5 ब्रास मोफत; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *क्रिकेटपटू केदार जाधवची भाजपसोबत नवी इनिंग, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित केला प्रवेश; राजकीय मैदान गाजवणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - पंजाबने चेन्नईला 18 धावाने हरवले, प्रियांश आर्य चे 39 चेंडूत वेगवान शतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश मनुरे, संपादक, धर्माबाद👤 राष्ट्रपाल सोनकांबळे, येवती👤 शेख राजू पटेल👤 व्यंकट केक👤 वैभव जाधव👤 मारुती फाळके👤 रमेश कदम👤 दिनेश रेडे👤 श्रीनिवास सैबी, पुणे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 37*मी करतो घराचे रक्षण**चोरापासून देतो संरक्षण**काही जण म्हणती मला श्वान**गुन्हेगारांना देतो शोधून**पोलीस खात्याचा मी शान**ओळखा पाहू मी आहे कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - मांजर ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुप्त चैतन्य व निद्रिस्त शक्ती जागृत करण्याचे एक साधन म्हणजे शिक्षण होय !*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सन १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातील आद्य क्रांतिकारक कोण ?२) लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने व विरोधात किती मते पडली ?३) राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने व विरोधात किती मते पडली ?४) 'कल्पना नसताना आलेले संकट' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) SIM चा फुल फॉर्म काय आहे ? *उत्तरे :-* १) मंगल पांडे २) बाजूने २८८, विरोधात २३२ मते ३) बाजूने १२८, विरोधात ९५ मते ४) घाला ५) Subscriber Identify Module*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 टेलिस्कोप म्हणजे काय ? 📙 खगोलदर्शनासाठी टेलिस्कोप वापरतात. अगदी सहज गंमत म्हणून गच्चीवरून तारे बघायचे असोत किंवा खगोलशास्त्राचा सखोल अभ्यास करावयाचा असो, यासाठीचे मुख्य माध्यम टेलिस्कोपच आहे. टेलिस्कोपचे दोन महत्त्वाचे प्रकार वापरले जातात. प्रकाश किरणांच्या भिंगातून वक्रीकरण करून बनवलेले टेलिस्कोप हे आकाराने खूपच लहान असतात व ते वापरणे सुटसुटीत असते. अर्थात यालाही अपवाद आहेतच. तब्बल एक मीटर व्यासाची बहिर्गोल भिंग वापरून अमेरिकेतील वेधशाळेतील टेलिस्कोप बनला आहे. मोठ्या भिंगातून एकत्रित केलेल्या किरणांची प्रतिमा प्रमाणबद्ध रीतीने दुसऱ्या डोळ्याजवळच्या भिंगातून बघितली जाते. डोळ्याजवळची भिंगे बदलून, त्यांची क्षमता वाढवून प्रतिमा लहान व मोठीही करता येते.प्रकाशकिरणांचे परावर्तन करणारे अंतर्गोल आरसे वापरणे हे जास्त सोयीचे पडते. आरशात प्रकाशाचे विश्लेषण होत नाही. प्रतिमा स्पष्ट राहते; कारण भिंगाची जाडी, वजन व त्यांना द्यावयाचा आधार यापेक्षा आरशाला आधार देऊन त्यातून परावर्तीत प्रतिमा दुसऱ्या आरशातून पुन्हा बघणे हे सोयीचे वाटते. यासाठी प्रचंड अंतर्गोल आरसे वापरले जातात व त्यातून परावर्तीत प्रतिमा साध्या अारशाद्वारे पुन्हा डोळ्याजवळील भिंगाकडे परावर्तित केली जाते. येथेही गरजेप्रमाणे डोळ्याजवळचे भिंग कमी जास्त ताकदीचे वापरता येते. रशियामध्ये सहा मीटर व्यासाचा आरसा वापरून जगातील सर्वात मोठा टेलिस्कोप बसवलेला आहे.मोठाले टेलिस्कोप हे यांत्रिक पद्धतीने हलविण्याची व्यवस्था केली जाते. नेमकी दिशा रोखण्यासाठी पूर्ण यांत्रिक व्यवस्था येथे आवश्यक असते. निरीक्षणासाठी बसणाऱ्या शास्त्रज्ञाला सोयीची बैठक व त्याच्या नजरेला समोरच दिसू शकेल, अशी दृश्य भिंगांची रचना यासाठी गरजेची ठरते. आकाशाकडे बघून निरीक्षण करणे येथे शक्यही नसते व अपेक्षितही नसते.काचेच्या भिंगांचा चष्मा करायचा वापर सुरू झाला, त्यानंतर टेलिस्कोपचा जन्म झाला असावा. नेमका कधी, कसा ते ज्ञात नाही, पण या बाबतीत *हॅन्स लिप्परशे* याचे नाव जनक म्हणून घेतले जाते. *गॅलिलिओ गॅलिली* यांनी व्हेनिसमध्ये १६०९ सालच्या सुमाराला टेलिस्कोप वापरला. यानंतरचा मुख्य शोध होता १६७२ मध्ये सर आयझॅक न्यूटनने परावर्तीत अंतर्गोल आरसा वापरून बनवलेल्या टेलिस्कोपचा.पृथ्वीवरून टेलिस्कोपद्वारे खगोलसंशोधन करताना वातावरणाच्या अडचणी येतात. मग यासाठी अंतराळात जाऊन निरीक्षण करणे जास्त सोयीचे, असे विचार मांडले गेल्याने त्या दिशेने संशोधन पुढे सरकत गेले. याच देशाची एक अवाढव्य निर्मिती म्हणजे हबल टेलिस्कोपची. २.४ मीटर व्यासाचा आरसा असलेला हा टेलिस्कोप १९९० साली अवकाशात पाठवला गेला आहे. पृथ्वीवरील निरीक्षणात दिसणारी अगदी स्पष्ट तारका यातून तब्बल पंचवीस पटींनी स्वच्छ बघता येते. हबमधील दुरुस्त्या करीत, तांत्रिक अडचणींवर मात करीत त्याने पाठवलेल्या असंख्य निरीक्षणांचे विश्लेषण सतत चालू असते. हे काम शास्त्रज्ञांना काही वर्षे पूरुन उरणार आहे.टेलिस्कोपचेच तत्त्व वापरून रेडिओलहरी गोळा करून त्याद्वारे खगोल संशोधन करण्याचाही प्रकार वापरला जातो. रेडिओलहरी, प्रकाशलहरी, क्ष-किरण, इन्फ्रारेड या साऱ्यांची 'जातकुळी' एकच असल्याने हे तत्त्वही सध्या वापरले जाते. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळच्या खोडद येथे या स्वरूपाचा एक मोठा जीएमआरटी प्रकल्प कार्यरत आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देवा माझें मन आणि तुझे चरण । एकत्र करोन दिधली गांठी ॥१॥ होणार तें हो गा सुखें पंढरीनाथा । कासया शिणतां वायांविण ॥२॥ माझिया अदृष्टीं ऐसेंचि पैं आहे । सेवावे तुझे पाय जन्मोजन्मीं ॥३॥ असतां निरंतर येणें अनुसंधानें । प्रारब्ध भोगणें गोड वाटे ॥४॥ ह्रदयीं तुझें रूप वदनीं तुझें नाम । बुद्धि हे निष्काम धरिली देवा ॥५॥ नामा म्हणे तुझीं पाउलें चिंतितां । जाली कृतकृत्यता जन्मोजन्मीं ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीच्या विषयी सर्व काही माहीत असताना सुद्धा नको त्या शब्दात बोलणे तसेच त्याच ठिकाणी एखाद्या व्यक्ती विषयी माहिती नसताना किंवा त्याला न वाचता जसं तोडांला आलं त्याच शब्दात बोलून मोकळे होणे या दोघांमध्ये काहीच फरक नसतो. त्यामुळेच अशा या आपल्या विचारामुळे त्या व्यक्तीला दु:ख तर होतोच पण, समोर असलेल्या काही व्यक्ती समोर आपल्या विषयी किंवा आपल्या विचारांचा आदर असेलच असेही नाही. कारण प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या परिस्थितीतून गेलेली असते त्यामुळे माणसं ओळखण्याची कुठेतरी त्यांना दिव्यदृष्टी असतेच म्हणून कोणालाही न वाचता किंवा त्याच्याविषयी माहीती नसताना स्वतः च्या मनाचे समाधान करण्यासाठी कोणत्याही शब्दात बोलू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शेरास सव्वाशेर*एका शेतकर्‍याने पक्षी धरण्यासाठी एक जाळे मांडून ठेवले होते. त्यात एका पारव्यामागे लागलेली एक घार सापडली. जाळ्यातून सुटून जाण्यासाठी ती पंख फडफडावून धडपड करीत आहे, तोच शेतकरी त्या ठिकाणी आला व तिला धरून ठार मारू लागला. तेव्हा ती त्याची विनवणी करून म्हणाली, 'दादा, मला मारू नको, मी तुझा काही अपराध केलेला नाही. मी त्या पारव्याच्या मागे लागले होते. हे ऐकून शेतकरी तिला विचारू लागला, 'अग, मग त्या पारव्याने तरी तुझा कोणता अपराध केला होता?' असे म्हणून त्याने तिला ठार मारले.*तात्पर्य :-* जे लोक निरपराधी लोकांना विनाकारण त्रास देतात, त्यांना त्रास देणारा त्यांच्यापेक्षा बलिष्ठ असा भेटला म्हणजे ते अगदी दीन होऊन साधूत्वाचा आव आणतात, पण त्याचा काही उपयोग न होता, त्यांच्या वाईट कर्माची फळे त्यांना भोगावीच लागतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment