✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 एप्रिल 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_6.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••♦️ *_जागतिक आरोग्य दिन_* ♦️•••••••••••••••••••••••••••••••••••• ♦️ *_ या वर्षातील ९७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ♦️ *_महत्त्वाच्या घटना:_* ♦️•••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९६: सिंगर करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा फलंदाज सनत जयसूर्या याने केवळ १७ चेंडुत अर्धशतक झळकावण्याचावि विश्व विक्रम केला**१९८९: लठ्ठा नावाची विषारी दारू प्यायल्याने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला.विषारी दारुच्या बळींची ही मोठी दुर्घटना होती.**_१९४८: जागतिक स्तरावर स्वास्थ्य आणि आरोग्याचं संवर्धन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे (United Nations) जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना झाली. व्यक्तिगत आणि सामाजिक आरोग्याची लोकांना जाणीव करुन देण्यासाठी हा दिवस ’जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो._**१९४०: पोस्टाचे तिकीट निघणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.**१९३९: दुसरे महायुद्ध – इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.**१९०६: माऊंट व्हेसुव्हियस या ज्वालामुखीचा उद्रेक होऊन नेपल्स शहर बेचिराख झाले.**१८७५: आर्य समाजाची स्थापना झाली.*♦️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ♦️•••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९५: निलम कृष्णा ठोंबरे -- कवयित्री**१९८९: ज्ञानेश्वर बाबासाहेब शिंदे -- कवी**१९८७: डॉ.राजकुमार तरडे -- लेखक* *१९८०: प्रा. डॉ. राजेंद्र अशोक गवळी -- कवी, लेखक**१९७७: विनोद सूर्यनारायण कुलकर्णी -- लेखक**१९७३: अतुल कहाते -- प्रसिद्ध लेखक, माहिती तंत्रज्ञान, जागतिक घडामोडी, अर्थशास्त्र, संगणकशास्त्र,इ. विषयावर लेखन* *१९६८: डॉ.राम देशपांडे -- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक* *१९६२: राम गोपाल वर्मा -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता**१९६१: सुनील छत्रपाल केदार -- माजी मंत्री* *१९५७: प्रवीण प्र. वाळिंबे -- लेखक, 'स्वरप्रतिभा' दिवाळी अंकाचे संपादक**१९५४: दिवाकर मधुकरराव चौकेकर -- कवी, लेखक* *१९५३: प्रभाकर सोपानराव सुर्वे -- कवी, लेखक* *१९५१: राहुल रवैल --- हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक**१९४९: शरद भास्करराव गायकवाड -- लेखक, प्रकाशक* *१९४२: जितेंद्र – सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता**१९४०: महादेवराव सुकाजी शिवणकर --- माजी मंत्री,माजी खासदार**१९३९: रजनी भास्कर कविमंडन -- कवयित्री, लेखिका (मृत्यू: २४ ऑगस्ट २०१० )**१९३८: काशीराम राणा – भाजपाचे माजी लोकसभा सदस्य (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१२ )**१९३८: अरुण सावळेकर -- प्रसिद्ध साहित्यिक**१९२५: चतुरानन मिश्रा – माजी केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते, कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू: २ जुलै २०११ )**१९२०: पण्डित रवी शंकर – सतार वादक, ’भारतरत्न’ (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२ )**१९१७: प्रा. दत्तात्रेय केशव बर्वे -- मराठी कथालेखक आणि बालसाहित्यकार(मृत्यू: २४ डिसेंबर १९८१ )* *१९११: वामन लक्ष्मण कुलकर्णी -- समीक्षक, टीकाकार ( मृत्यू: २५ डिसेंबर १९९१ )**१९०६:कृष्णाजी विठ्ठल सोमण -- प्रख्यात ज्योतिषतज्ज्ञ आणि गणित अभ्यासक (मृत्यू: ३ जुलै १९७२)**१८९१: सर डेविड लो – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार (मृत्यू: १९ सप्टेंबर १९६३ )**१८६०: विल केलॉग – ’केलॉग्ज’ चा मालक (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९५१ )**१७७०: विल्यम वर्डस्वर्थ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी.त्यांची ’डॅफोडिल्स’ ही अतिशय गाजलेली कविता आहे. (मृत्यू: २३ एप्रिल १८५० )**१५०६: सेंट फ्रान्सिस झेविअर – ख्रिस्ती धर्मप्रसारक.(मृत्यू: ३ डिसेंबर १५५२ )*♦️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ♦️•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२००४: केलुचरण महापात्रा – प्रसिद्ध ओडिसी नर्तक (जन्म: ८ जानेवारी १९२६ )**२००१: गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ.जी.एन.रामचंद्रन – संशोधक,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ (जन्म: ८ ऑक्टोबर १९२२ )**१९७७: राजा बढे -- संपादक, चित्रपट अभिनेते, नाटककार कादंबरीकार, गायक, कवी, गीतकार (जन्म: १ फेब्रुवारी १९१२ )**१९४७: हेन्री फोर्ड – फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक (जन्म: ३० जुलै १८६३ )**१९३५: डॉ.शंकर आबाजी भिसे – भारताचे 'एडिसन' (जन्म: २९ एप्रिल १८६७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्रासंगिक लेख*... आरोग्यम धनसंपदा ....*मनुष्य पृथ्वी तलवार जन्म घेतल्यापासून तर मरेपर्यंत मानवाच्या शरीराचा आरोग्याशी संबंध येतो. शरीर सुदृढ असेल तर त्याचे आरोग्य देखील सुदृढ असते. आरोग्य सुदृढ असेल तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप सोईस्करपणे पार पडत असतात. इंग्रजीत एक म्हण आहे Sound in Body is Sound In Mind अर्थात शरीर मजबूत तर मन मजबूत. मात्र आपले आरोग्य चांगले नसेल तर आपल्या जवळ सर्व काही असून ते काहीच कामाचे नसते. म्हणून प्रत्येक जण............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशात नवा वक्फ कायदा लागू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विधेयकाला मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अयोध्या, काशी, दिल्ली, नागपूरसह देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेतकरी नेते डल्लेवाल यांनी 131 दिवसांनंतर उपोषण सोडले, महापंचायत बोलावून केली घोषणा; केंद्रीय कृषी मंत्री शिवराज यांनी आवाहन केले होते*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूत पहिल्या उभ्या लिफ्ट रेल्वे समुद्री पूलाचा – ‘न्यू पंबन ब्रिज’ चे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गृहपाठ न केल्याने आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना अमानुष शिक्षा, पालघरमध्ये पालकवर्गात संताप*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्याकडून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, उपचार चालू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - गुजरात टायटनने सनरायजर्स हैद्राबादला सात विकेटने हरविले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रामदास धडेकर, शिक्षक, उमरी 👤 पृथ्वीराज काळे 👤 मदन पोखरे 👤 मोसीन खान 👤 गिरीश देशपांडे 👤 संदीप कंजे👤 चैतन्य मोहिते पाटील 👤 मारोती बनेवार 👤 प्रदीप वसंत शिंदे 👤 गंगाप्रसाद इरलोड 👤 निहार घनश्याम पटले, गोरेगाव, जि. गोंदिया*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 35*सर्व प्राण्यात पविन्न स्थान* *दुध आहे माझे आयुर्वेदाची खान* *उपयूक्त आहे मी कामधेनू म्हणून* *प्राचीन ग्रंथात ठेवले आहे नोंदून* *करतात गौरव माता म्हणून**अन्न पचवितो रवंथ करून**ओळखा पाहू मी आहे कोण?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - दूध ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनात जर विश्वास व विजयाची भावना असेल तर यश मिळविता येईल. जर विचार दुर्बल असतील तर अपयश पदरी पडेल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'जागतिक आरोग्य दिवस'* केव्हा साजरा केला जातो ?२) जागतिक आरोग्य दिवस २०२५ ची थीम काय आहे ?३) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?४) 'सतत काम करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) WHO चे फूल फॉर्म काय आहे ? *उत्तरे :-* १) ७ एप्रिल २) निरोगी सुरूवात, आशादायक भविष्य ३) जिनिव्हा ( स्वितझर्लंड ) ४) दीर्घोद्योगी ५) World Health Organization*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌞 *सौर वारा म्हणजे काय ?* 🌞 *************************हलत्या हवेला वारा म्हणतात. आपण शाळेतच हे शिकतो. पण सूर्यावर तर हवाच नाही हेही आपण शिकतो. मग तिथून वारा कसा काय वाहू लागेल ? हे खरं आहे. पण सौरवारा याचा शब्दश: अर्थ न घेता त्याचा भावार्थ समजून घ्यायला हवा. सूर्याच्या अंतरंगात अणुमिलनाच्या अणुभट्ट्या सतत धडधडत असतात. तिथलं तापमानही त्यामुळे कोट्यवधी अंशांइतकं वाढलेलं असतं. त्यापायी मग या ताऱ्याभोवती असलेलं वायूचं वातावरणही तापतं. या बाहेरच्या प्रभावळीतल्या वायूंचं प्लाझ्मा रूपात अवस्थांतर होतं. म्हणजेच त्या वायूच्या रेणूंचे घटक असलेले विद्युतभारधारी मूलकण स्वतंत्र होतात. त्यांच्याठायी असलेल्या प्रकार ऊर्जेमुळे वेगवानही होतात. सूर्यापासून दूरवर जाऊ पाहतात. जेव्हा पोटातल्या आगीपायी खदखदणाऱ्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्या वेळी त्यातून राख, राळ आणि लाव्हा दूरदूरवर फेकला जातो. त्याचप्रकारे सूर्याच्या प्रभावळीतील प्लाझ्मा दूरदूरवर, संपूर्ण सौरमालिकेवर फेकला जातो. *या वेगवान मूलकणांच्या बहुतांश प्रोटॉनच्या, झोतालाच सौरवारा असं म्हणतात.* तसा हा सतत वाहतच असतो. पण अधूनमधून सूर्यावर काही वादळी घटना घडतात. सोलर फ्लेअर्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तुफानांच्या वेळेस सौरवाराही वेगांनं वाहतो. त्याचा वेग सेकंदाला ९०० किलोमीटरपर्यंतही वाढतो.या झोताचा मारा संपूर्ण सौरमालिकेवर होत असतो. कोणताही ग्रह किंवा उपग्रह त्याच्या तावडीतून सुटत नाही. तरीही सूर्याला जवळ असणाऱ्या ग्रहांना त्याचा अधिक फटका बसू शकतो. वेगानं जाणाऱ्या प्रोटॉनच्या अंगी चुंबकीय बलही असतं. त्यामुळे त्या झोताचा प्रसार झालेल्या सर्वच प्रदेशावर चुंबकीय क्षेत्रही फैलावतं. सूर्य स्वतःभोवती गिरकी मारत असल्यामुळे या चुंबकीय क्षेत्राचा आकार एखाद्या स्प्रिंगसारखा किंवा गोलगोल जिन्यासारखा होतो. त्या क्षेत्राचा एक बुडबुडा तयार होऊन तो साऱ्या सौरमालिकेला गवसणी घालतो.ज्या ग्रहांना स्वतःचं चुंबकीय क्षेत्र नसतं त्यांना मग या चुंबकीय क्षेत्राच्या हमल्याच्या परिणामांना तोंड द्यावं लागतं. पृथ्वीचं स्वतःचं चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे त्यावर आदळून हे मूलकण इतरत्र विखुरले जातात. पृथ्वीचा बचाव होतो. धरतीचं चुंबकीय क्षेत्र आणि सौरवारा यांच्यामध्ये होणाऱ्या या अभिक्रियेपोटीच धरतीच्या अतिउत्तरेच्या आणि अतिदक्षिणेच्या आकाशात नयनरम्य रंगांची उधळण करणाऱ्या आॅरोरांचा आविष्कार बघावयास मिळतो. आज आपण अवकाशात अनेक उपग्रह स्थापित केलेले आहेत. त्यांना चुंबकीय संरक्षक आवरण नसतं. त्यामुळे सौरवाऱ्याच्या झोतात सापडून त्यांच्या कामात बाधा येऊ शकते.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देवा तूं प्रथम कर्म भोगिसी । सगरीं जळचरूं मछ जालासी । कमठे पाठीं न संडी कैसी । मर्में कावाविसी केलेंज तुज ॥१॥ अपवित्र नाम आधीं वराह । याहुनि थोर कूर्म कांसव । अर्ध सावज अर्ध मानव । हे भवभाव कर्मांचे ॥२॥ खुजेपणीं बळीसी पाताळीं घातलें । तेणें कर्में तयाचें द्वार रक्षिलें । पितयाचेम वचनीं मातेसी वधिलें । तें कर्में भोगविलें अंतरली सीसा । भालुका तीर्थीं वधियेलें अवचिता । नाम अच्युता तुज जाहलें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना अनेकदा आपल्याला त्रास सहन करावा लागतो. पण त्याच त्रासामधून कधीकधी आपल्याला नवी दिशा सुद्धा मिळत असते.पण काही त्रास आपण स्वतःहून करवून घेतो. विनाकारण इतरांच्याकडे लक्ष देऊन आपली वेळ वाया घालविण्यात आणि आनंद शोधण्यात आपण.स्वतःला. धन्य समजून घेत असतो. त्यामुळे त्याचा कुठेतरी त्रास होत असतो. म्हणून नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःला त्रास करून घेऊ नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• आद्यगुरु शंकराचार्य हिमालयाकडे यात्रेसाठी चालले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व शिष्य हि होते. प्रवास करता करता ते अलकनंदा नदीच्या पात्रापाशी येवून थांबले. तेंव्हा एका शिष्याने शंकराचार्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली. शिष्य म्हणू लागला,"आचार्य ! आपण किती महान आहात, आपले ज्ञान किती मोठे आहे जणू या अलकनंदा नदीच्या पात्राप्रमाणे. हे पात्र जितके विस्तीर्ण आहे तितके तुमचे ज्ञान असावे असे मला वाटते. कदाचित यापेक्षा महासागराइतकेही तुमचे ज्ञान असू शकेल."त्याचवेळी शंकराचार्यांनी आपल्या हातातील दंड पाण्यात बुडवला आणि बाहेर काढला, शिष्य या कृतीकडे पाहत होता. पाण्यातून बाहेर काढलेला दंड शिष्याला दाखवून शंकराचार्य म्हणाले," बघ, किती पाणी आले या दंडावर? एक थेंब इतकेच ना! अरे! मला किती ज्ञान आहे ते सांगू का? जगातील ज्ञान म्हणजे अलकनंदा नदीचे पात्र आहे असे समज आणि दंड बुडवून बाहेर काढल्यावर त्यावर आलेला थेंब म्हणजे माझे ज्ञान." जगात प्रचंड ज्ञान आहे आणि त्यातील केवळ एक थेंब ज्ञान माझ्याकडे आहे असे आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment