✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 एप्रिल 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18qbDBQv9j/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🏵️ *_ या वर्षातील ९८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_महत्त्वाच्या घटना:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••••••*२००५: पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे ४० लाख लोक सहभागी झाले**१९२९: भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.**१९११: डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा (superconductivity) शोध लावला.**१८३८: ’द ग्रेट वेस्टर्न’ हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले.* 🏵️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: ऋतुजा शांतीलाल पाटील -- कादंबरी लेखिका* *१९९८: राजेश्वरी खरात -- मराठी चित्रपट अभिनेत्री* *१९८५: निलेश श्रीकृष्ण कवडे -- कवी, गझलकार* *१९८३: सुशीलकुमार एकनाथ खापर्डे -- कवी**१९७७: समीर लक्ष्मण चव्हाण -- कवी**१९७२: सुप्रिया पाठारे -- मराठी टेलिव्हिजन, थिएटर आणि चित्रपट अभिनेत्री**१९६५: डॉ. मेघा आनंद भावे -- कवयित्री**१९५३: प्रा. सु. म. तडकोर -- कवी, लेखक* *१९५२: डॉ. राजेश्वर शंकर बालेकर -- लेखक, संपादक तथा निवृत्त सहाय्यक संचालक (ग्रंथपाल)**१९४४: मंदा आचार्य -- लेखिका**१९४४: प्रा. डॉ. कृष्णचंद्र भालचंद्र ज्ञाते -- कवी, लेखक* *१९४०: राम सोना नेमाडे -- प्रसिद्ध कवी, लेखक (मृत्यू: १० जानेवारी २०२४ )**१९३८: कोफी अन्नान – संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) चे ७ वे प्रधान सचिव**१९२८: रणजित देसाई – सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक,’स्वामी’कार (मृत्यू: ६ मार्च १९९२ )**१९२४: माधव दत्तात्रय नावडीकर -- लेखक* *१९२४: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ’कुमार गंधर्व’- संगीतकार (मृत्यू: १२ जानेवारी १९९२ )**१९१२: गोपाल सीताराम पंचभाई -- जुन्या पिढीतील लेखक (मृत्यू: ८ ऑगस्ट २००४ )**१८४४: पुरुषोत्तम गोविंद नाडकर्णी -- ' विविधज्ञानविस्तार' मासिकाचे संपादक (मृत्यू: ११ ऑगस्ट१९०० )*🏵️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🏵️•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१३: मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या महिला पंतप्रधान (जन्म: १३ ऑक्टोबर १९२५ )**२०१२: नितीन आखवे -- मराठी गीतकार (जन्म: ७ फेब्रुवारी १९६४ )**२०१०: शैलजा काळे -- कांदबरी,कथासंग्रह, चरित्र,नाटकं लेखन व बालसाहित्यिक लेखिका (जन्म: १८ ऑगस्ट १९४४ )**२०१०: अनंत चापोरकर -- कांदबरीकार, संपादक अनेक विषयांचे गाढे अभ्यासक (जन्म: मार्च १९३४ )**१९९८: डॉ. विष्णू भिकाजी कोलते -- सुप्रसिद्ध मराठी लेखक, महानुभाव साहित्याचे संशोधक व कवी माजी कुलगुरू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: २२ जून १९०८ )**१९९७: श्रीकृष्ण लक्ष्मण (भैयाजी) पांढरीपांडे -- प्राचार्य, संस्थापक (जन्म: १४ जुलै १८९९ )**१९७४: नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक – रंगभूमीवरील कलाकार (जन्म: २४ जून १८९९ )**१९७३: पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार(जन्म: २५ ऑक्टोबर १८८१ )**१९५३: वालचंद हिराचंद दोशी – उद्योगपती (जन्म: २३ नोव्हेंबर १८८२ )**१९२२: ’गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले – अष्टपैलू व चतुरस्त्र शैलीचे ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक,’भारत गायन समाज’ या संस्थेचे संस्थापक (जन्म: १७ ऑक्टोबर १८६९ )**१८९४: बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार,कवी,लेखक आणि पत्रकार (जन्म: २७ जून १८३८ )**१८५७: १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामची सुरूवात करणारा मंगल पांडे याला फाशी देण्यात आली (जन्म: १९ जुलै १८२७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विकासात शिक्षकांचे योगदान*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सीमा सुरक्षा दलासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान - जम्मू दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दहावी-बारावी बोर्डाची वेबसाईट सायबर सुरक्षित करा, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची सूचना; 7 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बीडची ऋचा कुलकर्णीने पहिल्याच प्रयत्नात मिळवले मोठे यश, न्यायाधीश परीक्षेत आली राज्यातून पहिली, पालकांच्या कष्टाचे केले चीज*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जपानमध्ये रूग्णांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले; तिघांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यानंतर आता गॅस सिलेंडर ही 50 रुपयांनी झाला महाग, मध्यरात्रीपासून लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार अकोल्यात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद, अकोल्यात तापमानाचा पारा 44.2 अंशांवर तर चंद्रपूरमध्ये 43.6 अंश तापमानाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बंगळूरूचा मुंबईवर 12 धावाने विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जगन्नाथ लाभशेटवार, शिक्षक, उमरी👤 कौडेवार गंगाधर लक्ष्मण, शिक्षक, धर्माबाद👤 निलेश कवडे, शिक्षक तथा साहित्यिक, अकोला👤 श्री झगरे गुरुजी वाकदकर , शिक्षक तथा कीर्तनकार👤 बद्रीनाथ कुलकर्णी 👤 मनोज पाटील बन्नाळीकर 👤 बालाजी पांचाळ *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 36*मला सर्वात जास्त आवडते दूध**मला म्हणतात वाघाची मावशी**प्रत्येकाच्या घरात माझे वास्तव्य**उठावदार दिसते माझी मिशी**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - गाय••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बुद्धिमान व्यक्तीबरोबर एक वेळेस स्पर्धा केली तरी चालेल, पण मुर्खा बरोबर मित्रत्वही योग्य नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात सर्वाधिक पवन ऊर्जा निर्माण करणारे राज्य कोणते ?२) कर आणि इमिग्रेशन कन्सल्टन्सी नोमॅड कॅपिटलिस्टनुसार जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे ?३) देशातील पहिली हायड्रोजन ट्रेनमध्ये इंधन म्हणून कोणत्या वायूचा वापर करण्यात आला आहे ?४) 'कथा लिहिणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) पहिला राष्ट्रीय सागरी दिवस केव्हा साजरा केला गेला ? *उत्तरे :-* १) तामिळनाडू २) आयर्लंड ३) हायड्रोजन वायू ४) कथाकार, कथालेखक ५) ५ एप्रिल १९६४*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *प्रवाळ म्हणजे काय ?* 📙 समुद्राचे सारे सौंदर्य नेमके कशात एकवटले आहे, असे कोणी विचारले, तर त्याचे उत्तर फक्त एका शब्दात देता येईल - प्रवाळ खडकात. समुद्रकिनाऱ्याला लागून समुद्राच्या पोटात खोलवर दडलेल्या उभ्या खडकांच्या रांगा अनेक ठिकाणी अस्तित्वात आहेत. काही ठिकाणी तर या रांगा कित्येक मैलांच्या आहेत. अर्धवट तुटलेली दरड असो वा सलग खोलवर ज्वालामुखीच्या लाव्हाने तयार झालेली रांग असो, या खडकांवर चित्रविचित्र आकाराच्या प्रवाळांचेच राज्य वसले आहे. सुंदर रंग, चित्रविचित्र आकार, दाटीवाटीने वाढलेल्या या प्रवाळांमुळे खडकांचा अनेक ठिकाणी पत्ताही लागत नाही. झिरपणाऱ्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात ही निसर्गसंपत्ती स्वतःचे सौंदर्य उधळत छोट्या मोठ्या माशांना आसराही देत असते. खेकड्यांसारखे प्राणी तर तेथे हमखास वस्तीलाच असतात.प्रवाळालाच 'कोरल' असे नाव आहे. कित्येक वर्षे प्रवाळ ही वनस्पतीच आहे, असे समजले जाई. पण प्रवाळ हे प्राणीराज्यात मोडतात. हे आता निःसंशय सिद्ध झाले आहे. प्रत्येक प्रवाळप्राणी हा एखाद्या खडकाला पक्का चिकटून असतो. याचे कारण म्हणजे एखाद्या लहान फुग्यासारखा हा प्राणी स्वतःच्या शरीरातून चुनखडीसारखा पदार्थ बाहेर टाकत असतो. त्याचेच कडक कवच त्याच्या शरीराभोवती निर्माण होते. त्याचा तोंडाकडचा भाग नेहमी पाण्यात मोकळाच असतो. त्यातून सतत पाणी शोषून घ्यायचे व त्यातून मिळणारे छोटे प्लांक्टन व अन्य सूक्ष्म कीटक गिळंकृत करायचे काम चालूच असते. तोंडाभोवतीच्या भुजा एखादा प्राणी पकडुन तोंडात ढकलण्यासाठी मदत करतात. अनेकदा पाण्यात एखाद्या प्राण्याची हालचाल जाणवली, तर या भुजा बाह्य कडक कवचाच्या आत ओढून लपवल्या जातात. यामुळेच वरवर बघणाऱ्याला प्रवाळ हा जिवंत प्राणी आहे. यावर विश्वास बसणेही कठीण आहे.हा कीटक मृत झाला, तरी कवच तसेच राहत असते. प्रवाळप्राणी दोन प्रकारे वाढतात. पहिली सोपी पद्धत म्हणजे अस्तित्वातील प्रवाळावरच नवीन प्राणी स्वतःचे बस्तान बसवतो. म्हणजेच त्याच्या कवचाच्या आधाराने स्वतःची वाढ सुरू करतो. या प्रकारात एखाद्या मूळ कवचाला फांद्या फुटत गेल्यासारखे मनोरम दृश्य दिसते. दुसऱया प्रकारात फलित अंडी बाहेर पडतात. त्यातून लहान लहान अळ्या बाहेर पडून त्यांपासून नवीन प्रवाळप्राणी निर्माण होतात व प्रवाळ पसरत जाते.जेथवर सूर्यप्रकाश पोहोचतो, तेथवरच प्रवाळाची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यातही खडकांवर वाढणाऱ्या प्रवाळांना आधार निर्माण करण्यासाठी सुरुवातीस अल्गी वा शेवाळाची गरज असते. शेवाळ्याला सूर्यप्रकाश आवश्यक असतो. त्याशिवाय ते जगूच शकत नाही. पाण्यामध्ये साधारणपणे साठ मीटरपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू शकतो. प्राण्याच्या स्वच्छतेवरही हे प्रमाण थोडेसे अवलंबून असते. या सगळ्या कारणांमुळे प्रवाळ खडकांचा आढळ जास्तीत जास्त साठ मीटरपर्यंतच होतो. प्रवाळ खडकांच्या कपारीचे व रांगांचे मुख्यत: तीन प्रकार आढळतात. पहिला - उथळ समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या खडकांवरील प्रवाळ, दुसरा म्हणजे मुख्य समुद्राच्या बाजूला काढलेल्या एखाद्या डोंगरकड्याने तयार केलेल्या, शांत तळ्याच्या काठाला असलेले प्रवाळ व तिसरा प्रकार म्हणजे पाण्यात बुडालेल्या एखाद्या जुन्या बेटाच्या कडेने तयार झालेले प्रवाळ खडक. हा प्रकार ज्वालामुखी निद्रिस्त झाल्याने तयार झालेल्या खडकांच्या आधारे भरसमुद्रात आढळतो. एखाद्या शीतल शांत समुद्री सरोवरात (Lagoon) प्राणवायूच्या साहाय्याने बुडी मारली, तर तेथील प्रवाळ खडक पाहून व प्रवाळांच्या प्रकारातील वैविध्य पाहून माणूस अक्षरश: वेडावून जातो.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देवा निढळावरी हात दोन्ही । पाहें चक्रपाणि वाट तुझी ॥१॥ धांव गा धांव सख्या पांडुरंगा । जीवीं जिवलगा मायबापा ॥२॥ तुजविण ओस दिसती दाही दिशा । आणि धांव जगदीशा मजसाठीं ॥३॥ नामा म्हणे काय बैसलों निवांत । धांवतो अनंत भक्तांसाठीं ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती ज्या परिस्थितीतून जात असते ती व्यक्ती, परिस्थितीला चांगल्याने ओळखत असते व त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात त्या अश्रूंची भाषा समजत असते ती व्यक्ती,कोणाच्याही डोळ्यातील अश्रू बघून आनंदीत होत नाही. कारण, परिस्थितीचे येणे किंवा जाणे कोणाच्याही हातात नसते. म्हणून कोणावर आलेल्या परिस्थितीवर हसू नये व आनंद घेऊ नये. शक्य झाल्यास माणुसकीच्या नात्याने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चंदनाची बाग**एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते. त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली.**एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्षात पाहिल्यावर लोहाराची परिस्थिती पहिल्या सारखीच आहे असे दिसले, राजाला आश्चर्य वाटले.**सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले, तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का.? तेव्हा लोहाराने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.**राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रडू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली, तेंव्हा राजा म्हणाला "अशी भेट वारंवार भेटत नाही."**मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारासारखेच आहे. मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते. पण... त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते. मानवी जीवन अनमोल आहे. असे सुंदर जीवन परत मिळणार नाही.**तात्पर्य - या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह त्या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment