✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 फेब्रुवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌟 *_ या वर्षातील ४५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌟•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००३: सुप्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणार्या सरस्वती सन्मानासाठी निवड**२०००: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.**१९८९: भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे यूनियन कार्बाईडने कबूल केले**१८८१: भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना**१९६३: अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.**१९४६: पहिला संगणक 'एनियाक' युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.**१९४६: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले**१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्स च्या विमानांनी तुफानी बॉम्बफेक करुन जर्मनीतील ड्रेस्डेन शहर बेचिराख केले.**१९४५: चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१८९९: अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.**१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.* 🌟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९: रेखा वाल्मिक पाटील -- कवयित्री* *१९६८: भाग्यश्री देसाई -- कवयित्री, अभिनेत्री, निर्माती**१९६५: सय्यद अल्लाउद्दीन अमिनुद्दीन -- प्रसिद्ध लेखक**१९६२: विजय कोपरकर -- हिंदुस्थानी शास्त्रीय गायक* *१९६१: डॉ. माधुरी हेमंत वाघ -- कवयित्री, लेखिका**१९६१: मोहनीश बहल -- हिंदी चित्रपटातील अभिनेता**१९६०: कल्पना दिलीप मापूसकर -- कवयित्री**१९५९: प्रा. डॉ. सुनील विभुते -- प्रसिद्ध विज्ञान कथाकार* *१९५८: संजीव खांडेकर -- मराठी लेखक, कवी**१९५३: अलका सुरेशराव कुलकर्णी -- कथा लेखिका**१९५२: सुषमा स्वराज -- माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू: ६ ऑगस्ट २०१९ )**१९५१: ज्योती प्रमोद गोडबोले -- कथा लेखिका**१९५०: कपिल सिबल – सुप्रसिद्ध कायदे तज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री**१९३७: वसंतराव धोत्रे -- माजी सहकार राज्य मंत्री, सहकार नेते,शिवाजी शिक्षण संस्थेचे पूर्व अध्यक्ष (मृत्यू: १० ऑगस्ट २०१८ )**१९३३: मधुकर रामदास सोनार -- कवी, कथाकार (मृत्यू: १५ सप्टेंबर २००४ )**१९३३: मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – अभिनेत्री (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९६९ )**१९३०: वृंदा रघुनाथ लिमये -- कवयित्री, लेखिका* *१९२६: डॉ.वसंत विठ्ठल पारखे -- लेखक संपादक**१९२५: मोहन धारिया –माजी केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: १४ ऑक्टोबर२०१३ )**१९२२: प्रभाकर श्रीधर नेरूरकर -- ललित लेखक (मृत्यू: २९ जून १९९८ )**१९१८: डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे -- संस्कृत भाषा, ऋग्वेद, निरुक्त, महाभारत आणि अवेस्ता (पारशी धर्मग्रंथ) या विषयांचा सखोल अभ्यास असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकांडपंडित (मृत्यू: १९ ऑगस्ट २०२० )**१९१६: संजीवनी मराठे – प्रसिद्ध कवयित्री (मृत्यू: १ एप्रिल २००० )**१९१४: जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार (मृत्यू: ९ ऑगस्ट १९७६ )**१४८३: बाबर – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक (मृत्यू: २६ डिसेंबर १५३० )* 🌟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌟••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: शमीम अहमद खान -- सतारवादक आणि संगीतकार (जन्म:१० सप्टेंबर १९३८)**१९९४: यशवंत नरसिंह केळकर -- कवी, कोशकार, इतिहास संशोधक व इतिहासलेखक (जन्म: १९ जुलै १९०२ )**१९७५: पी. जी. वूडहाऊस – इंग्लिश लेखक (जन्म: १५ ऑक्टोबर१८८१ )**१९७५: ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (जन्म: २२ जून १८८७ )**१९७४: श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (जन्म: १ जानेवारी १९०० )**१७५५: रघुजी भोसले -- नागपूर भोसले घरातील एक शूर सेनापती (जन्म: १६९५)**१४०५: तैमूरलंग – मंगोलियाचा राजा (जन्म: ८ एप्रिल १३३६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *व्हॅलेंटाईन दिनानिमित्त प्रासंगिक लेख* *शतदा प्रेम करावे .....!*प्रेम म्हणजे काय असते? एकमेकांबद्दल असलेला जिव्हाळा, माया, ममता आणि लळा म्हणजे प्रेम. आपल्या आवडत्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून जे काळजी घेतली जाते तिथे प्रेम अनुभवयास मिळते. जीवनात प्रत्येक जण कुणावर नाही तर कुणावर प्रेम करतच असतो. आईचे मुलांवरील प्रेम असो किंवा बहिणीचे भावावरील प्रेम. काही जण आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर तर प्रेम करतातच त्याशिवाय घरातील पाळीव प्राण्यांवर देखील जीवापाड प्रेम करतात. या प्रेमापायी ते जनावर देखील त्यांच्यावर तेवढेच प्रेम करते. आमच्या बाजूला एकाच्या घरी कुत्रा होता. तो खूपच प्रामाणिक होता. त्याचे मालकांवर खूप प्रेम होते. मालकांचे देखील त्याच्यावर खूप प्रेम होते .................. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शालेय शिक्षण विभागाने कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक सिस्टीम बसवण्याची पडताळणी केली सुरू, माध्यमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षण विभागाकडे पाठविला अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुलढण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी केली नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे - कवयित्री अनिता माने यांना रंगत-संगत प्रतिष्ठानचा प्रेमकवी पुरस्कार, डॉ. वर्षा तोडमल यांच्या हस्ते सन्मान; काव्यातून अभिव्यक्तीची उर्मी जपण्याचे कार्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *65 वर्षांवरील रिक्षा चालकांना 10 हजार मिळणार, आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अकोला - राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधन, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन परतत असताना दुचाकीला धडक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत दुकान बंद करण्याचा ग्रामस्थांकडून कठोर आचारसंहिता लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रा.डॉ. अभयकुमार दांडगे, उपसंपादक, दै. प्रजावाणी👤 सतीश कुरमे, सहशिक्षक, माहुर👤 धनराज जाधव, सहशिक्षक, वाशिम👤 विकास बडवे, सहशिक्षक👤 अभिनव भूमाजी मामीडवार👤 योगेश वाघ👤 रुचिता जाधव👤 शिवम चिलकेवार👤 ऋषिकेश उटलवार👤 चंद्रकांत गाडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पी. सावळाराम - निवृत्ती रावजी पाटील*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा क्रोध नम्रतेचे रूप धारण करतो, तेव्हा अभिमानही त्याच्यापुढे नतमस्तक होतो. - सुदर्शन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'वाळवंटाचा जहाज'* असे कोणत्या प्राण्याला म्हणतात ?२) ग्रामपंचायतीच्या वर्षातून किती सभा होतात ?३) नुकत्याच झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यात भारताने किती फरकाने मालिका जिंकली ?४) 'संग्राम' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कमळ हे फूल कशाचे प्रतीक आहे ? *उत्तरे :-* १) उंट २) बारा ३) ३ - ० ने ४) युद्ध, समर, संगर, लढाई ५) पवित्रता*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बहुपयोगी खजूर*खजूर हे पूर्ण अन्न आहे. खजूर उष्ण हवामानात व प्रदेशात तयार होतो. तो पोटात गेल्याबरोबर पचायला सुलभ अशा गुणांचाच असतो. खजूर जशाचा तसा पूर्णपणे आतडय़ांनी ग्रहण केला जातो. पचायला बिलकूल जड नाही. खजूर उष्ण आहे अशी समजूत आहे. खजूर वात व पित्तशामक कार्य करतो. वजन वाढवतो. शरीराला तृप्ती आणतो. म्हातारपणा दूर ठेवतो. खजूर तुपाबरोबर घेतल्यास त्याचे गुण वाढतात. खजुरात ए, बी, सी व्हिटॅमिन व भरपूर साखर तसेच लोह आहे.खजूर सारक आहे. त्यामुळे पोट साफ होते. त्वचेच्या सुरकुत्या दूर होतात. कांती सुधारते, रक्त वाढते.खजुराचा विशेष फायदा, मेंदू, हृदय, वृक्क या अवयवांना बल देण्यात होतो. अतिकृश बालकांना वजन वाढवायला खजुराचा उपयोग होतो.दिवसाची उत्तम सुरूवात करूया ...*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुजविण आम्हां कोण हो पोषिता । अहो जी कृपावंता पंढरिराया ॥१॥ न करीं विठ्ठला आतां लाजिरवाणें । मी तुझें पोसणें पांडुरंगा ॥२॥ काकुळती कोणा येऊं हो मी आतां । अनाथाचे नाथा विठ्ठला तूं ॥३॥ एक वेळ आतां पाहे मजकडे । नामा म्हणे वेडें रंक तुझें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकाला आपुलकी देण्यासाठी दुसऱ्याला नको त्या शब्दात विनाकारण बोलून त्याचा अपमान करणे हा माणुसकी धर्म नाही. कारण ज्याला आपुलकी देणाराही माणूसच असतो , ज्याचा अपमान होतो तोही माणूसच असतो आणि हे दोन्ही कर्म घडवून आणणाराही बोलता, चालता माणूसच असतो. म्हणून असे कोणतेही काम करू नये. ज्याच्यामुळे एखाद्या माणसाचे मन दुखावेल आणि उगाचच त्याच्या मनातून उतरण्याची आपल्यावर वेळ येईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चांगल्या कर्माचे फलीत*एका जंगलामध्ये *एक म्हतारी* आणि तिची नात राहत होती. आणि त्याच जंगलामध्ये *चार दरोडेखोर* लुटमार करण्यासाठी येत असंत. एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .ते चार दरोडेखोर जंगलामध्ये *आश्रयासाठी* सैरभैर पळु लागले .अचानक त्यांना म्हतारीची *झोपडी* दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला. म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता *पाप पुण्याचा विषय* निघाला. प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता.शेवटी म्हतारीने *पैज लावली*. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे *ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.*प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला. असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले.आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत, विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.तात्पर्य :- एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही चार पापी माणसं जगु शकतात. पण त्याने जर साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात. म्हणून पुण्याचा वाटा नेहमी घेत रहा. ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजणार.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment