✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 फेब्रुवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16AvUagYLb/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🧿 *_आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस_* 🧿•••••••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_ या वर्षातील ५३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_महत्त्वाच्या घटना:_* 🧿••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: पुण्याच्या काका पवार यांनी इन्फाळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत कुस्तीतील सुवर्णपदक मिळविले* *१९७९: ’सेंट लुशिया’ ला (ब्रिटनपासून) स्वातंत्र्य मिळाले**१९७८:श्री.यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. या पदावर सर्वात प्रर्दीघ काळ (२६९६ दिवस) त्यांनी काम केले**१९४८: झेकोस्लोव्हाकियामध्ये कम्युनिस्ट क्रांती**१९४२: दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला**१८१९: स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.* 🧿 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🧿 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: केतकी माटेगांवकर --- मराठी अभिनेत्री व गायिका**१९८४: भावेश दत्ताराम लोंढे -- कवी**१९८३: अजिनाथ रावसाहेब सासवडे -- लेखक**१९८१: इंद्रजित गणपत घुले -- कवी, लेखक, संपादक, अनुवादक**१९७८: साईप्रसाद गुंडेवार -- भारतीय अभिनेता आणि मॉडेल (मृत्यू: १० मे २०२० )**१९७७: नामदेव भोसले -- आदिवासी समाजसेवक तथा साहित्यिक* *१९७४: प्रदीप शंकर सुतार -- लेखक* *१९६७: प्रा. डॉ. सोमनाथ महादेव दडस -- लेखक**१९६५: प्रा. डॉ. तीर्थराज कापगते --- कवी, लेखक**१९६५: सूरज आर. बडजात्या -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते* *१९६२: प्रा. प्रकाश जनार्दन कस्तुरे -- लेखक, वक्ते**१९६०: जयंत पवार --- पत्रकार,मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक (मृत्यू: २९ ऑगस्ट २०२१ )**१९५६: सुभाष शांताराम जैन -- कवी, लेखक पत्रकार, छायाचित्रकार**१९५५: सुरेन्द्र पाथरकर -- लेखक* *१९५२: परशुराम खुणे -- झाडीपट्टीतील रंगभूमीचे कलाकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित* *१९५०: नयना आपटे -- मराठी नाटक आणि चित्रपटांतील सुप्रसिद्ध अभिनेत्री**१९४९: विशाखा अनंत गुप्ते -- लेखक* *१९३६: रघुनाथ कृष्ण जोशी -- सुलेखनकार, डिझायनर, कवी आणि शिक्षक (मृत्यू: २० एप्रिल २००८ )**१९३५: प्रा.चंद्रकुमार नलगे -- जेष्ठ साहित्यिक, विविध पुरस्काराने सन्मानित**१९२२: व्ही. जी. जोग – व्हायोलिनवादक (मृत्यू: ३१ जानेवारी २००४ )**१९२२: सुलोचना भीमराव खेडगीकर -- लेखिका (मृत्यू: १८ मार्च २००४ )* *१९२०: इफ्तिखार – चरित्र अभिनेता (मृत्यू: ४ मार्च १९९५ )**१९२०: कमल कपूर -- भारतीय अभिनेता आणि निर्माता(मृत्यू: २ ऑगस्ट २०१० )**१९१०: रामचंद्र अनंत काळेले -- कवी, काव्य समीक्षक (मृत्यू: १२ जून १९८१ )**१९०८: न्या.राम केशव रानडे -- लेखक, विचारवंत,प्रवचनकार( मृत्यू: ३० ऑगस्ट १९८५)**१९०६: पहारी सन्याल -- भारतीय अभिनेता आणि गायक (मृत्यू: १० फेब्रुवारी १९७४ )**१९०२:फ्रिट्झ स्ट्रासमान – जर्मन भौतिकशात्रज्ञ (मृत्यू:२२ एप्रिल १९८०)**१८९८: कमला गोपाळ देशपांडे -- संस्थापक (मृत्यू: ८ जुलै १९६५ )**१८९०: नारायण केशव भागवत -- बौद्ध वाड्:मयाचे संशोधक, लेखक (मृत्यू: २० एप्रिल १९६२ह)**१८५७: हेन्‍रिच हर्ट्‌झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १ जानेवारी १८९४ )**१८५७: लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते (मृत्यू: ८ जानेवारी १९४१ )**१८३६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्‍न’ भट्टाचार्य (मृत्यू: १२ एप्रिल १९०६ )**१७३२: जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १४ डिसेंबर १७९९ )* 🧿 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🧿 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९: लक्ष्मण देशपांडे –’वर्‍हाड निघालंय लंडनला’साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (जन्म: ५ डिसेंबर १९४३ )**२०००: विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे – लेखक व पत्रकार (जन्म: ११ ऑगस्ट १९२८ )**२०००: दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (जन्म: २३ ऑक्टोबर १९२३ )**१९८२: जोश मलिहाबादी – ऊर्दू कवी (जन्म: ५ डिसेंबर १८९४ )**१९५८: मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते,भारताचे पहिले शिक्षणमंत्री,भारतरत्‍न (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८ )**१९४४: कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन (जन्म: ११ एप्रिल १८६९ )**१९२५: सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर (जन्म: २० जुलै १८३६ )**१८२७: चार्ल्स विल्सन पील अमेरिकन – चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक (जन्म: १५ एप्रिल १७४१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नांदेड जिल्ह्याची महती सांगणारी कविता*..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठी भाषा संतांनी टिकवली, आमचे संत पुरोगामी होते, फुरोगामी लोकं काहीही म्हणू देत, दिल्ली मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष तारा भवळकरांच्या भाषणाला मोदी-पवारांची दाद, तर मराठीला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पवारांकडून मोदींचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *समास, जोड्या जुळवा ते निबंध, जालन्यातील परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर फुटला, थेट झेरॉक्स सेंटरवर प्रिंट; महाराष्ट्राच्या शिक्षण वर्तुळात खळबळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छाया कदमची आणखी एक गगनझेप! पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गृहमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते आज ग्रामीण भागातील 10 लाख लाभार्थ्यांना मंजूर निधीचे पहिल्या हप्त्याचे वाटप होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मोदी सरकारकडून पीएम किसान योजनेअंतर्गत लवकरच ९ कोटी ८० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शेख शाहरुख👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 03*उंचच उंच बर्फाच्या राशी**देशाचे करतो सदैव रक्षण**वनौषधींचे आगर आहे**पर्यावरणाचे करतो संरक्षण*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - नदी••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायची इच्छा असेल, तर तो गाठेपर्यंत अनेक खाचखळगे व वळणे घ्यावी लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात धोकादायक पक्षी म्हणून कोणता पक्षी ओळखला जातो ?२) लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट कोणाच्या आयुष्यावर आधारित आहे ?३) दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री कोण ?४) 'हताश' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ट्रान्सपरंसी इंटरनॅशनलकडून करप्शन परसेप्शन इंडेक्स २०२४ नुसार जगातील सर्वात कमी भ्रष्टाचारी देश कोणता ? *उत्तरे :-* १) कॅसोवरी पक्षी ( Cassowary bird ) २) छत्रपती संभाजी महाराज ३) रेखा गुप्ता ४) निराश ५) डेन्मार्क*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔍 *बोटांचे ठसे कसे मिळवतात ?* 🔍 आपल्या तळहातांनी आणि बोटांनी आपण अनेक वस्तू पकडतो. ती पकड सुलभ व्हावी यासाठी निसर्गानं या ठिकाणची कातडी वेगळ्या प्रकारची  बनवलेली आहे. या कातडीवर केस उगवत नाहीत. शिवाय ही कातडी जर गुळगुळीत राहिली तर हातात धरलेल्या वस्तूंवर तिची पकड व्यवस्थित बसणार नाही. यासाठी या कातडीचं त्या वस्तूबरोबर घर्षण होईल आणि तसे होताना कातडीला इजा होणार नाही अशीही व्यवस्था केली आहे. त्यासाठी या कातडीवर निरनिराळ्या वळ्या पडतात. या वळ्यांच्या आत सतत घामाचा स्राव करणाऱ्या छिद्रांच्या रांगा असतात. त्या घामामुळं तळहाताला एक प्रकारचं वंगण मिळत राहतं. तसंच त्या छिद्रांना जोडलेल्या काही ग्रंथींमधून स्निग्ध पदार्थांचाही पाझर होत राहतो. जेव्हा एखाद्या वस्तूवर आपली बोटं टेकतात, तेव्हा हे घाम आणि स्निग्ध पदार्थ यांचं मिश्रण त्या वळ्यांमधून त्या वस्तूवर चिकटतं. तिथं त्या वळ्यांचा ठसा उमटतो. यालाच बोटांचा ठसा म्हणतात.बोटांवरच्या या घर्षणवळ्यांचा रचनाबंध प्रत्येक व्यक्ती जन्मतःच घेऊन येते. कोणाही दोन व्यक्तींचे अगदी एकसारख्या एक जुळ्यांचेही बोटांचे ठसे सारखे नसतात. त्यामुळे या बोटांच्या ठशावरून कोणाचीही निर्विवाद ओळख पटवणे सहज शक्य होतं. याच गुणधर्माचा उपयोग गुन्हेगारांची अशी ओळख पटवण्यासाठी केला जातो. त्याला न्यायालयाचीही मान्यता आहे. ज्या वस्तूला बोटांचा स्पर्श झालेला असेल त्या वस्तूवर बोटांच्या घर्षणवळ्यातील घाम आणि स्निग्ध पदार्थांचं मिश्रण चिकटतं; पण त्यापायी उमटलेला ठसा सुप्त स्वरूपातच असतो. तो डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. त्यासाठी खास प्रकाशलहरींचा वापर करावा लागतो. त्या प्रकाशझोतात तो दिसतो; पण तो डोळ्यांना सहज दिसावा यासाठी एका खास पावडरचा, भुकटीचा वापर केला जातो.बहुतेक भुजटींमध्ये रोझिन, काळ्या रंगाचं फेरीक ऑक्साइड आणि दिव्याची काजळी असते. इतर काही भुकटींमध्ये शिसं, पारा, कॅडमियम, तांबं, टायटॅनियम, बिस्मथ या सारखी रसायनंही असतात. ही भुकटी त्या वस्तूंवर शिंपडली की जिथे ठसा उमटला आहे तिथल्या घाम आणि स्निग्ध पदार्थांच्या मिश्रणाला ती चिकटून बसते. ब्रशनं हलक्या हातानं उरलेली भुकटी काढून टाकली की मग चिकटलेली पावडर म्हणजेच तो ठसा स्पष्ट दिसू लागतो. एक खास पॉलिएस्टरची पट्टी त्या ठिकाणी चिटकवली की तो ठसा त्या पट्टीवर उमटतो. त्याचं छायाचित्र घेता येतं, तसाच तो संगणकातही साठविता येतो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून* 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझिया संतांची अंगसंगति । ते शिणलिया विश्रांति संसारिया ॥१॥ श्रवण कीर्तन ध्यान घडे अनायासें । भेदभ्रम नासे तेचि क्षणीं ॥२॥ ऐसें भाग्य मज देसी कवणें काळीं । होईन पायधुळी वैष्णवांची ॥३॥ वदनीं तुझें नाम वसे निरंतर । राखीन त्यांचे द्वार थोर आशा ॥४॥ येतां जातां मज करिती सावधान । वदनीं कृष्ण कृष्ण म्हणविती ॥५॥  ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या प्रकारे आपण, आपल्या घराची मन लावून दैनंदिन साफसफाई करतो त्याच प्रकारे आपल्या मनाची सुद्धा स्वच्छता त्याच प्रकारे केली तर कोणत्याही विकारांना मुळात स्थान मिळणार नाही. मनाची स्वच्छता अशीच निर्मळ, नि:स्वार्थी व प्रामाणिकपणाची असायला पाहिजे. जेथे स्वछता चांगली असते तेथे प्रसन्नता आणि शांतता मिळते तसेच ज्याचे मन स्वच्छ असते त्या माणसाकडे बघून मन प्रसन्न होते व गहिवरून येते आणि त्या माणसाविषयी सदैव आपुलकी वाटत असते. आज अशाच सकारात्मक विचाराची व माणसांची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सोनेरी शिंगे* " एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले*तात्पर्य- फक्त सौंदर्यच सर्व काही नसते.कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत."*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment