✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 डिसेंबर 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2025/02/nila-satyanarayan.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ♦️ *_ या वर्षातील ३६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ♦️ *_महत्त्वाच्या घटना:_* ♦️••••••••••••••••••••••••••••••••••••*२००४: ’पुण्याची’ स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.**२००३: भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.**१९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.**१९५८: ७,६०० पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.**१९५२: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.**१९४५: दुसरे महायुद्ध – जनरल डग्लस मॅकआर्थर मनिला येथे परतले.**१९२२: रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.**१९१९: चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.**१७६६: माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट* *१६७०: सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणाची आहुती दिली.**१२९४: अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.* ♦️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ♦️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: अर्शदीप सिंग -- भारतीय क्रिकेटपटू**१९८३: आकाश पांडुरंग फुंडकर --कामगार मंत्री म.रा.**१९८१: प्रमोद कमलाकर माने -- ग्रामीण जीवनावर लेखन करणारे मराठी लेखक**१९८०: प्रतिक पाटील -- लेखक**१९७६: अभिषेक बच्चन – प्रसिद्ध अभिनेते**१९७५: दिनेश वासुदेवराव गावंडे -- लेखक, कवी**१९७५: डॉ.संजयकुमार परशराम निंबेकर -- लेखक**१९७३: प्रशांत शहादू वाघ -- कवी* *१९७२: प्रा. डॉ. दिनेश सेवा राठोड -- इंग्रजी व मराठी मध्ये लेखन करणारे लेखक, समीक्षक**१९६७: प्राचार्या डॉ. शरयू बबनराव तायवाडे -- लेखिका* *१९६६: पंडित उदय भवाळकर -- भारतीय शास्त्रीय गायक**१९६५: सुरेंद्र ऋषी मसराम -- कवी**१९६३: डॉ. केशव सखाराम देशमुख -- प्रसिद्ध लेखक आणि कवी**१९६२: वर्षा रमेश दौंड -- कवयित्री**१९५५: सुभाष मधुकरराव कुलकर्णी- तोंडोळकर -- लेखक**१९५५: बलभीम तात्याराव तरकसे -- कवी, लेखक**१९५२: अजित देशमुख -- लेखक**१९४९: प्रा. डॉ. विमल कीर्ती -- पाली भाषा व बौद्ध साहित्याचे अभ्यासक (मृत्यू: १४ डिसेंबर २०२० )**१९४९: नीला सत्यनारायण -- महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त,तथा मराठी साहित्यिक (मृत्यू: १६ जुलै २०२० )**१९४७: सदाशिव सोनु सुतार - लेखक* *१९४६: शशिकला नामदेवराव गावतुरे-- कवयित्री* *१९४३: श्याम सदाशिव किरमोरे -- लेखक* *१९३६: बाबा महाराज सातारकर – ज्येष्ठ कीर्तनकार (मृत्यू: २६ ऑक्टोबर २०२३ )**१९३३: गिरीजा कीर – लेखिका आणि कथाकथनकार (३१: ऑक्टोबर २०१९ )**१९२८: श्रीनिवास दिगंबर इनामदार -- कवी (मृत्यू: ३१ डिसेंबर २०१३ )**१९२२: राजाराम मारोती हुमणे -- चरित्र लेखक, नाटककार* *१९१४: शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे – प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी,संत वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९४ )**१९०५: अच्युतराव पटवर्धन – स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते,भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक,विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२ )**१८४०: जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९२१ )* ♦️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*♦️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२४: मनोहर मुरलीधर शहाणे -- प्रसिद्ध मराठी कथाकार व कादंबरीकार (जन्म: १ मे १९३० )**२०१८: सुधा करमरकर -- नाटयलेखिका (जन्म : १८ मे १९३४ )**२०१५: डॉ.किशोर रामचंद्र महाबळ -- अभ्यासू,अनेक वृत्तपत्रांमध्ये लिखाण करणारे लेखक (जन्म: ९ जानेवारी १९६० )**२०१०: सुजित कुमार – चित्रपट अभिनेता व निर्माता (जन्म: ७ फेब्रुवारी १९३४ )**२००८: महर्षी महेश योगी – योग गुरू (जन्म: १२ जानेवारी १९१७ )**२००३: गणेश गद्रे – ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या 'हरिजन' या मराठी अंकाचे संपादक* *१९८६: लक्ष्मणराव सरदेसाई -- कोंकणी व मराठी भाषेतील लेखक(जन्म: १८ मार्च १९०४ )**१९२७: हजरत इनायत खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक (जन्म: ५ जुलै १८८२ )**१९२०: विष्णू नरसिंह जोग -- आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक(जन्म: १४ सप्टेंबर १८६७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जयंतीनिमित्त विशेष संकलित माहिती ....*महाराष्ट्र राज्याची पहिली महिला राज्य निवडणूक आयुक्त - डॉ. निला सत्यनारायण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली, राहुल करडीले नांदेडचे नवे जिल्हाधिकारी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बोगस पीक विमा भरणाऱ्यांना दणका, राज्यासह परराज्यातील 96 सीएससी आयडी ब्लॉक, उत्तर प्रदेश, हरियाणातील सेंटर्सचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार लाडकी बहीण योजनेची पडताळणी; घरात 'चारचाकी' दिसली तर थेट लाभ होणार रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं, 10 टक्के खर्च आरोग्यावर, आयुक्त भूषण गगराणींनी दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रात पीकविमा योजनेत भ्रष्टाचार, सुप्रिया सुळेंनी लोकसभेत उपस्थित केला प्रश्न, केंद्रीय कृषीमंत्र्यांचे चौकशी करून कारवाईचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मागेल त्याला सौर कृषी पंप, शंभर दिवसांचे उद्दीष्ट 60 दिवसात पूर्ण, 52 हजार 705 पंप बसवले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. इंग्लंड एकदिवसीय सामन्यात फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचा समावेश, BCCI ची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बाळासाहेब कदम , शिक्षक, धर्माबाद👤 विठ्ठल पेंडपवार , नांदेड👤 अच्युत पाटील खानसोळे 👤 निलेश गोधने, शिक्षक, नांदेड👤 श्याम राजफोडे👤 संदीप मुंगले👤 सदाशिव मोकमवार, येताळा👤 भीमराव वाघमारे👤 अक्षय शिंदे👤 बालाजी पाटील👤 सुभाष नाटकर👤 कामन्ना भेंडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वरूपानंद- रामचंद्र विष्णू गोडबोले*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःवर प्रभुत्व असल्याशिवाय इतर सर्वांवर प्रभुत्व गाजविणे हे भ्रमाचे व निराशेचे ठरणारे असते. - महात्मा गांधी .*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) उडतांना सर्वाधिक पंखविस्तार करणारा पक्षी कोणता ?२) महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?३) १९ वर्षाखालील महिला टी - २० विश्वचषक २०२५ कोणत्या संघाने पटकावले ?४) 'सेवक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) नुकत्याच झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी - २० सामन्यात भारताने किती फरकाने मालिका जिंकली ? *उत्तरे :-* १) भटक्या अलबेट्रॉस २) महाबळेश्वर ( १४३८ मी. ) ३) भारत ( दक्षिण आफ्रिका - उपविजेता ) ४) दास, नोकर ५) ४ - १ ने *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तळियाचे पाळीं वृक्षावरी बैसुनी । कैसा चातक बोभाइतो रे । ताहाना फुटे परी उद्क नेघे । मेघाची वाट पाही रे ॥१॥ तैसा येईं बा कान्हया येईं बा कान्हया । जीवींच्या जीवना केशीराजा रे ॥धृ०॥ टाळघोळ कल्लोळ नानापरीचीं वाद्यें । वाजती वोजा रे । रानींच्या मयुरा नृत्या पैं नये । तुजविण मेघराजा रे ॥२॥ जळाविण जळचर पक्षीविण पिलियासी । तैसे जालें नामयासी रे । शंखचक्र गदा पद्म पितांबरधारी । अझुनि कां न पावशी रे ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्याला होत असलेला त्रास फक्त आपल्यालाच चांगल्याप्रकारे माहीत असते आणि त्यातून आलेला अनुभव सुद्धा आपणच, आतून जाणत असतो. म्हणून चुकूनही दुसऱ्याला त्रास देऊ नये व त्रास द्यायला लावू नये कारण, प्रत्येकातच त्या प्रकारचा त्रास सहन करण्याची ताकद नसते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *करावे तसे भरावे*" एक उंट जंगलात चरण्यासाठी जात होता. तेथे राहणारा एक दुष्ट कोल्हा त्याला पाहून रोज विचार करायचा की याला कसे फसवता येईल. एकदा त्याने उंटाला विचारले,''काका, रोज गवत खाऊन तुम्हाला कंटाळा येत नाही का?'' उंट म्हणाला,''बेटा, माझ्या नशिबात गवत खाणेच आहे. या जंगलात दुसरे काय उगवणार?'' तेव्हा कोल्हा म्हणाला,'' मी तर रोज जवळच्याच एका शेतात जातो आणि तेथे गाजर, मुळा, काकडी, भोपळा खातो. तेथील भाज्या व फळे खूप रसाळ आणि ताजी असतात.'' उंटालाही अशी भाजी खावीशी वाटली व कोल्ह्याला त्याने तेथे नेण्यासाठी विनंती केली.उंट कोल्ह्यासोबत शेतात गेला. कोल्ह्याने आधी जाऊन स्वत: खाऊन घेतले व उंटाला नंतर पाठविले. उंट शेतात जाताच कोल्ह्याने मग जोराने कोल्हेकुई सुरु केली. कोल्ह्याचा आवाज ऐकताच शेताचा मालक आणि त्याचे चार गडी शेतात घुसले. त्यांना पाहताच कोल्ह्याने जोरात धूम ठोकली व जंगलात पळून गेला पण बिचारा उंट पळता न आल्यामुळे तिथेच अडकून बसला. शेतक-याने उंटाला बेदम मारहाण केली.त्याला मार खाताना पाहून कोल्ह्याला खूप आनंद झाला. या गोष्टीला काही दिवस गेले. कोल्ह्याने उंटाला परत एकदा फसवून पुन्हा शेतात नेले व पुन्हा एकदा उंटालाच मार पडला. दरवेळी आपल्यालाच मार पडतो ही गोष्ट आता उंटाच्या लक्षात आली व त्याने कोल्ह्याची खोड मोडण्याचे ठरविले. काही दिवसांनी मोठा पाऊस झाला व जंगलामध्ये पाणीच पाणी झाले. चिखल आणि दलदलीमधून छोट्या प्राण्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपविली. उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले मात्र जेव्हा कोल्ह्याची वेळ आली तेव्हा उंटाने मुद्दामच जास्त खोल पाण्यात नेऊन डुबकी मारली. कोल्हा पाण्यात पाण्यात बुडून मरण पावला.*तात्पर्य :- करावे तसे भरावे. जो जसा पेरतो तसेच फळ त्याला मिळते*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment