✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 फेब्रुवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: 'आकाश' या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी* *१९६६: सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.**१९२८: 'सायमन गो बॅक' या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.**१९२५: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.**१९१६: बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना**१८७०: अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.**१७८३: स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.* 🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟣 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: गणेश बाळासाहेब निकम -- लेखक* *१९७८: धिरज पाटील (धनराज) -- कवी**१९७५: हंसिनी अरविंद उचित -- कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या,विविध पुरस्कारांनी सन्मानित**१९७५: प्रा. वर्षा एकनाथराव गायकवाड -- माजी मंत्री म.रा. तथा खासदार* *१९७३: प्रा. डॉ. गिरीश खारकर -- प्रसिद्ध मराठी गजलकार, प्रतिभावंत लेखक, प्रकाशक(मृत्यू: १७ ऑक्टोबर २०१९ )**१९६९: महेश रघुनाथ पानसे -- कवी**१९६७: गजानन निमकर्डे -- कवी* *१९६३: गंगाधर त्र्यंबक अहिरे -- कवी, लेखक, संपादक* *१९६३: अंजली चितळे -- कवयित्री* *१९६३: रघुराम राजन – भारतीय अर्थतज्ञ**१९६२: प्रा. भाऊ काशिनाथ(भाऊसाहेब) गोसावी -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९६२: डॉ. जयराम काळे -- कवी, लेखक* *१९५७: दीप्ती नवल -- अभिनेत्री, दिग्दर्शक आणि लेखिका* *१९५२: नारायण गणपतराव निखाते -- लेखक* *१९५०: प्रा. डॉ. सुदाम जाधव -- आदिवासी साहित्याचे अभ्यासक तथा लेखक* *१९४५: प्रा. डॉ. रामचंद्र कामाजी क्षीरसागर -- लेखक* *१९४२: अरुण कृष्णराव हेबळेकर -- प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार**१९३८: वहिदा रहमान -- प्रसिद्ध अभिनेत्री**१९३५: नारायण बाळकृष्ण ठेंगडी -- पत्रकार, कवी आणि कथाकार (मृत्यू: २५ मार्च १९८८ )**१९३१: प्रा. चंद्रकांत भालेराव -- प्रसिद्ध कथाकार* *१९२९: मोहना -- भारतीय, गायिका,दूरदर्शन निर्माता आणि नृत्यांगना(मृत्यू :११ सप्टेंबर १९९०)**१९२७: अच्युत महादेव बर्वे -- कथाकार, कादंबरीकार(मृत्यू: १६ एप्रिल १९८२ )**१९२७: वसंत शंकर सरवटे -- ख्यातनाम महाराष्ट्रीय व्यंगचित्रकार तसेच लेखक(मृत्यू: २३ डिसेंबर २०१६ )**१९०६: अवधूत महादेव जोशी -- कथाकार, चरित्रलेखक, टीकाकार**१९००: तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७५ )**१८२१: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल – वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर (मृत्यू: ३१ मे १९१० )* 🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२४: माधवरव खाडिलकर -- ज्येष्ठ नाटककार लेखक* *२००७: मधुसूदन शंकर कानेटकर -- संगीत तज्ञ (जन्म: २६ जुलै १९१६)**२००७: हरी अनंत फडके -- संशोधक, अभ्यासक (जन्म: १३ ऑक्टोबर १९३२ )**१९९१: प्रा. कुसुमताई साठे -- लेखिका, कवयित्री, संपादिका (जन्म: १६ डिसेंबर १९२१ )**१९७९: मोरेश्वर दिनकर जोशी-- संस्थापक, व्यवस्थापक, संपादक(जन्म: २८ फेब्रुवारी १९०० )**१९६९: सी. एन. अण्णादुराई – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री (जन्म: १५ सप्टेंबर १९०९ )**१९२४: वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २८ डिसेंबर १८५६ )**१८३२: उमाजी नाईक --पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली.(जन्म: ७ सप्टेंबर १७९१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फ्रेश मॉर्निंग बुलेटिन - शालेय परिपाठ.... समुहात add होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील श्रीकृष्ण देवउखलाई मंदिराचे नवपर्व आणि कलशारोहन संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यभरातील शासकीय ठेकेदार येत्या 14 फेब्रुवारीपासून जाणार संपावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शक्तीपीठ महामार्गाला कोणाचाही विरोध नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अर्थसंकल्प 2025 मधील ठळक बाब - 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असणारे नोकरदार वर्ग होणार करमुक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे मेट्रोला अर्थसंकल्पात 837 कोटी रुपयांची तरतूद*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पाचव्या T20 सामन्यात इंग्लंडचा 150 धावानी पराभव, अभिषेक शर्माची धुवांधार फलंदाजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *U-19 महिला विश्वकपावर भारताने कोरले नाव, दक्षिण आफ्रिकेला हरवून भारतानं सलग दुसऱ्यांदा कोरलं महिला अंडर-19 वर्ल्ड कपवर नाव !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विजयकुमार वडेपल्ली, नांदेड 👤 हंसिनी उचित, साहित्यिक👤 गंगाधर धडेकर, पत्रकार, धर्माबाद👤 ऍड. मल्हार मोरे, भोकर👤 अर्शनपल्ली अजय👤 सुशील कुलकर्णी👤 राजेश पिकले👤 शिवकुमार देवकत्ते👤 विश्वास मापारी👤 ओमकार पाटील चोळाखेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बाबाराव - गणेश दामोदर सावरकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सहानुभूती गोड शब्द, ममतेची दृष्टी यांनी जे काम होते ते पैशाने कधी होत नाही. - महात्मा गांधी .*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील सर्वात उंच पक्षी कोणता ?२) 'जागतिक पाणथळ दिवस' केव्हा साजरा केला जातो ?३) गावाचा ग्रामनिधी कोण सांभाळतो ?४) 'सुंदर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) १५० वर्षे पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) सारस २) २ फेब्रुवारी ३) ग्रामसेवक ४) सुरेख, छान, देखणे ५) शतकोत्तर सुवर्ण महोत्सव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⭐ *ताऱ्यांचं अंतर कसं मोजतात ?* ⭐ **************************तारे आपल्यापासून कितीतरी दूर असतात. आपल्याला सर्वात जवळचा असलेला तारा म्हणजे आपला सूर्य. तोच मुळी पंधरा कोटी किलोमीटर दूर आहे. इतर तारे तर त्याच्या कितीतरी पटींनी दूर आहेत. तेव्हा त्यांच्या पर्यंतचं अंतर मोजण्यासाठी तशीच काहीतरी खास युक्ती योजायला हवी. आपण जेव्हा एखाद्या वस्तूकडे पाहातो तेव्हा आपले दोन डोळे जरा वेगवेगळ्या कोनांमधुन त्या वस्तूकडे पाहतात. त्यामुळे तिच्या दोन प्रतिमा आपल्या डोळ्यांमध्ये उमटतात आणि त्यांच्यामध्ये काही अंतर असतं. समजा आपण आपला एक डोळा मिटला आणि समोरच्या दाराच्या चौकटीच्या बरोबर समोर येईल अशा तर्हेनं एक बोट समोर धरलं. आता तो डोळा उघडून दुसरा मिटला आणि परत पाहिलं तर ते बोट हल्ल्याचं दिसून येईल. कारण त्या दोन डोळ्यांतल्या प्रतिमांमध्ये अंतर असतं. यालाच पॅरॅलॅक्स असं वैज्ञानिक भाषेत म्हणतात. जितकं त्या बोटाचं आपल्या डोळ्यांपासूनचं अंतर कमी तितका पॅरलॅक्स जास्त. उलटपक्षी जितकं बोटाचं अंतर जास्त तितका पॅरलॅक्स कमी. म्हणजेच कोणत्याही वस्तूचं आपल्यापासून असलेलं अंतर आणि तिच्या प्रतिमांमधला पॅरॅलॅक्स यांचं एक नातं असतं. जर पॅरॅलॅक्स मोजला तर गणित करून ते अंतर शोधता येतं. जमिनीचा सर्व्हे करणारे तज्ज्ञ याचाच उपयोग करतात. पण आपल्या दोन डोळ्यांमधलं अंतरच इतकं कमी आहे की दूरवरच्या तार्याचा पॅरॅलॅक्स शून्यवतच असतो. दोन डोळ्यांमधलं अंतर तर वाढवता येत नाही. पण दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून जर पाहिलं तर त्या दोन प्रतिमांमध्ये काही पॅरॅलॅक्स तयार होतो. तरीही दूरवरच्या ताऱ्यांकडे पाहण्यासाठी पृथ्वीवरची दोन टोकंही जरी गाठली तरी ते अंतर अपुरंच पडतं. यासाठी मग पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाचा वापर करण्यात येतो. सूर्याच्या अलीकडून आणि पलीकडून जर आपण पाहू शकलो तर त्या कक्षेच्या व्यासाइतकं अंतर दोन 'डोळ्यांमध्ये' आपण पाडू शकतो. त्यासाठी मग वर्षातल्या दोन वेगवेगळ्या वेळी एकाच ताऱ्याच्या घेतलेल्या प्रतिमांमधला पॅरॅलॅक्स मोजून त्या ताऱ्याचं आपल्यापासून असलेलं अंतर मोजता येतं. अर्थात अशा दूरवरच्या ताऱ्यांकडे पाहण्यासाठी तसेच तेजस्वी 'डोळे' ही असणे गरजेचं असतं. ही गरज अतिशय शक्तिशाली दुर्बिण वापरून पूर्ण केली जाते.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तत्त्व पुसावया गेलों वेदज्ञासी । तंव भरले त्यापासीं विधिनिषेध ॥१॥ तया समाधान नुपजे कदा काळीं । अहंकार बळि जाला तेथेम ॥२॥ म्हणोनि तुझें नाम धरिलें शुद्धभावें । उचित करावें पांडुरंगा ॥३॥ स्वरूप पुसावया गेलों शास्त्रज्ञासी । तंव भरले तयापाशीं भेदाभेदा ॥४॥ एकएकाचिया न मिळती मतासी । भ्रांत गर्वराशि भुलले सदा ॥५॥ पुराणिकासी पुसूं स्वरूपाची स्थिति । तंव त्यासी विश्रांति नाहीं कोठें ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकाला आपुलकी देण्यासाठी दुसऱ्याला नको त्या शब्दात विनाकारण बोलून त्याचा अपमान करणे हा माणुसकी धर्म नाही. कारण ज्याला आपुलकी देणाराही माणूसच असतो , ज्याचा अपमान होतो तोही माणूसच असतो आणि हे दोन्ही कर्म घडवून आणणाराही बोलता, चालता माणूसच असतो. म्हणून असे कोणतेही काम करू नये. ज्याच्यामुळे एखाद्या माणसाचे मन दुखावेल आणि उगाचच त्याच्या मनातून उतरण्याची आपल्यावर वेळ येईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मुंग्याची शिकवण*उन्हाळ्याच्या दिवसात काही मुंग्या आपल्या वारुळाजवळ बसून मिळवून आणलेले दाणे उन्हात वाळवीत होत्या. इतक्यात भुकेने व्याकुळ झालेला एक टोळ त्या ठिकाणी येऊन व दीनवाणे तोंड करून त्यांना म्हणाला, 'बायांनो, यातला एखादा तरी दाणा मला देऊन जर माझा प्राण वाचवाल तर तुम्हाला मोठं पुण्य लागेल.' हे ऐकून त्यातल्या एका मुंगीने त्याला विचारले, 'अरे, सुगीच्या दिवसात आम्ही जसं धान्य जमवून ठेवलं, तसं तू का ठेवलं नाहीस ?' टोळ त्यावर उत्तरला, 'माझा सगळा वेळ खाण्यापिण्यात आणि मौजा मारण्यात गेला. पुढे आपला चरितार्थ कसा चालेल ही कल्पनाही माझ्या मनात त्यावेळी आली नाही.' हे ऐकून मुंगी म्हणते, 'अरे, अशा रीतीने मौजा मारण्यात ज्यांनी आपले दिवस घालविले, ते पुढे उपाशी मरणार हे ठरलेलं आहे. मग आता तुझ्या चरितार्थाची तजवीज आम्ही काय म्हणून करावी बरं ?'तात्पर्य : ज्यांनी आपले तारुण्य केवळ चैनबाजीत घालविले त्यांना बहुतेक वेळा म्हातारपणी दुःख भोगावे लागल्याशिवाय राहात नाही.'आयुष्य ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment