✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 फेब्रुवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🏵️ *_ या वर्षातील ३७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_महत्त्वाच्या घटना:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••••••*२००३: संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.* *१९५२: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन झाले आणि एलिझाबेथ (दुसरी) गादीवर बसली.* *१९४२: दुसरे महायुद्ध – इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.**१९३२: कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या.**१९३२: ’प्रभात’चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’ या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.**१९१८: ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.**१६८५: जेम्स (दुसरा) इंग्लंडचा राजा बनला.*🏵️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: श्रीशांत – क्रिकेटपटू,**१९८३: अंगद सिंग बेदी -- भारतीय अभिनेता* *१९८१: देवदत्त नागे -- भारतीय मराठी अभिनेता**१९८०: डॉ. वीरा राठोड (विनोद रामराव राठोड)-- प्रसिद्ध कवी,संपादक,लेखक साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार विजेते**१९७२: जयश्री रामचंद्र थोरवे-(गव्हाणे) -- कवयित्री, लेखिका**१९६६: महेंद्र भास्करराव पाटील -- कवी* *१९५५: अनिल यशवंत अभ्यंकर प्रसिद्ध नाटककार, लेखक**१९५२: डॉ. रिक चार्ल्सवर्थ – ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक,क्रिकेटपटू आणि राजकारणी**१९५२: नंदू पोळ -- मराठी नाट्य-चित्र अभिनेते, लेखक (मृत्यू: २८ जुलै २०१६)**१९४९: प्रा. सुमती पवार -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री* *१९४७: श्रीधर माडगूळकर -- ज्येष्ठ लेखक, गदिमा यांचे सुपूत्र (मृत्यू: २१ फेब्रुवारी २०१९ )**१९४५: मारुती पाटील -- लेखक**१९४०: डॉ.पंडित कमलाकरराव परळीकर -- ख्यातनाम जेष्ठ कलावंत, प्रसिद्ध गायक, रचनाकार* *१९४०: भूपिंदर सिंग -- भारतीय संगीतकार,गझल गायक आणि बॉलीवूड पार्श्वगायक (मृत्यू: १८ जुलै २०२२ )**१९३१: ओंकार भास्कर धुंडिराज -- चित्रकार, लेखक व कलाप्रसार (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९९९ )**१९३०: डॉ. भास्कर वामन आठवले(भा.वा.) -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक, संगीतकार (मृत्यू:१९ डिसेंबर २०२४)**१९२७: विनायक श्रीपाद राजगुरु -- लेखक (मृत्यू: १० मे १९९० )**१९२५: सुभा करंदीकर -- लेखिका (मृत्यू: ३ फेब्रुवारी २००९)**१९२५: मुरलीधर गोपाळ गुळवणी -- महाराष्ट्रातील अभ्यासू इतिहाससंशोधक, कुशल इतिहासकथनकार, वस्तुसंग्राहक (मृत्यू: १८ डिसेंबर २००० )**१९१६: प्रभाकर विष्णू पाटणकर -- प्रवासवर्णनकार तथा निवृत्त विक्रीकर उपायुक्त* *१९१५: रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी (मृत्यू: ११ डिसेंबर १९९८ )**१९११: रोनाल्ड रेगन – अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ जून २००४ )**१९०६: आदिनाथ नेमिनाथ उपाध्ये -- प्राचीन भाषा तज्ज्ञ, संशोधक(मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७५ )*🏵️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: भारतरत्न लता मंगेशकर -- सुप्रसिद्ध भारतीय गायिका आणि संगीतकार (जन्म: २८ सप्टेंबर,१९२९ )**२००६: ईश्वर बगाजी देशमुख -- क्रीडाशिक्षक, संस्थापक श्री शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने सन्मानित (जन्म: २० मार्च १९२४ )**२००१: बॅ. विठ्ठलराव गाडगीळ –माजी केन्द्रीय नभोवाणी मंत्री (जन्म: २५ फेब्रुवारी १९२८ )* *१९९३: आर्थर अॅश – अमेरिकन टेनिस खेळाडू (जन्म: १० जुलै १९४३ )**१९८६: लक्ष्मण नीळकंठ (अण्णासाहेब) छापेकर -- लेखक, कवी, संपादक (जन्म: १३ सप्टेंबर १९०७ )* *१९७६: ऋत्विक घटक – चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक (जन्म: ४ नोव्हेंबर १९२५ )**१९५२: जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा (जन्म: १४ डिसेंबर १८९५ )**१९३९: सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती, बालविवाह, विधवा विवाहाला संमती दिली.(जन्म: १० मार्च १८६३ )**१९३१: मोतीलाल गंगाधर नेहरू – भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित (जन्म: ६ मे १८६१ )**१८०४: जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ (जन्म: १३ मार्च १७३३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पालकांचे मुख्याध्यापकास पत्र*प्रिय मुख्याध्यापक, सर्व प्रकारच्या शाळा.बऱ्याच दिवसापासून आपल्याशी बोलावे म्हणून मनाशी ठरवलं होतं पण बोलायला वेळ मिळाला नाही किंवा बोलणे टाळलो. पण आज राहवलं नाही कारण माझे पाल्य शाळेतून येताना खूप।अस्वस्थ झाल्यासारखे वाटत होते. भरपूर काम करून एखादा व्यक्ती जेंव्हा थकून भागून घराकडे येतो, तेंव्हा त्यांची स्थिती जशी असते अगदी त्याच अवस्थेत दिसलं. त्याला पाहून माझे मलाच कसं तरी वाटलं ? घरात प्रवेश केल्याबरोबर खांद्यावर असलेलं प्रचंड जड दप्तर बाजूला सारत हाश हुश्श केलं आणि पलंगावर आडवं झालं. आज खरोखर मला माझ्या पाल्याची काळजी वाटायला लागली की ................ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुणे - पिंपरी चिंचवडमध्ये अत्याधुनिक पोलीस आयुक्तालय, 180 कोटींच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत केजरीवालांना मोठा धक्का बसण्याची शक्यता, भाजपला 39 ते 44 जागा, चाणक्यचा सर्व्हे समोर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नागपूर शिक्षण विभागाचा घेतला आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिर्डी संस्थानच्या जेवणासाठी आता कूपन आवश्यक, वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हिंगोली, वाशीम अकोला रेल्वेस्थानकांची पाहणी, दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन यांनी प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा घेतला आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नांदेड - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नांदेड दौरा, नांदेडमध्ये भव्य आभार सभेचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नागपूर : आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामना दुपारी होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुहास सदावर्ते , दै. सकाळ, जालना👤 प्रा.पंजाबराव येडे , बीड👤 वैभव गायकवाड👤 सादिक मोहंमद👤 माधव गणेशराव नारसनवाड👤 लक्ष्मण एडके👤 चंपती सावळे👤 सचिन गिराम👤 कोंडेवार साईनाथ, भैसा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गानकोकिळा - लता मंगेशकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" आंधळ्या श्रद्धेपेक्षा डोळस बुद्धीने विचार करणे केव्हाही श्रेष्ठ होय. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अमेरिकेचे पहिले कृष्णवर्गीय राष्ट्राध्यक्ष कोण होते ?२) नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात ?३) 'गोफण क्लब' ही संस्था कोणी स्थापन केली ?४) 'सैन्य' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला ? *उत्तरे :-* १) बराक ओबामा २) तपकिरी रंग ३) दामोदर चाफेकर ४) फौज, दल ५) सामाजिक गुलामगिरी *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लता मंगेशकर*( हेमा मंगेशकर म्हणून जन्म; २८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा (Nightingale of India) आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणाऱ्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, "द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.त्यांना चार भावंडे होती, मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर, ज्यात त्या सगळ्यात मोठ्या होत्या.लता मंगेशकर यांना कोविड-१९ ची लागण झाल्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. २८ दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे निधन झाले. आज त्यांची तृतीय पुण्यस्मरण दिवस त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन !*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तान्हेलिया जाय उदका लागोनी । पारधी देखोनी मुरडे वेगीं ॥१॥ तैसे तुझे चरण विसरलों देवा । संसार केशवा देखोनियां ॥२॥ तैसी परि मज जहाली जाण देवा । नामा उभा केशवा विनवितो ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजात राहणारा एखादा माणूस जर काहीच करत नसेल तर त्याला रिकामटेकडा म्हणून नाव ठेवले जाते. त्यातच एखादा माणूस काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्याच्या वाटेत अडथळे निर्माण करून व टिंगल, टवाळी करून आनंद घेणारे देखील समाजात बघायला मिळतात. ही आजची वास्तविकता आहे.जी व्यक्ती नित्य नेमाने आपले कार्य करत असते अशा व्यक्तींनी कोणाकडे लक्ष देऊ नये.आपले कार्य निरंतर चालू ठेवावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• एक बोकड एका डोंगराच्या माथ्यावर चरत असता एकाएकी मोठे वादळ झाले. त्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तो बोकड जवळच्या दाट झाडीत जाऊन बसला. ती जागा शांत व निवार्याची असल्याने त्याला तेथेच झोप लागली. काही वेळाने वादळ शांत झाल्यावर तो जागा झाला व घरी जाण्यास निघाला, तेव्हा त्याला असे आढळून आले की, त्याच्या लोकरीत काटेरी झाडाची एक फांदी अडकली आहे. थोडा वेळ हिसकाहिसकी केल्यावर बरीचशी लोकर गेल्यावर ती फांदी बाजूला झाली व तो आपल्या घरी गेला.तात्पर्य - काहीही अपेक्षा न ठेवता आश्रय देणारे किंवा दुसर्याचे रक्षण करणारे लोक थोडेच असतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment