✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 फेब्रुवारी 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌏 *_जागतिक सामाजिक न्याय दिवस_* 🌏•••••••••••••••••••••••••••••••••••• 🌏 *_ या वर्षातील ५१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌏 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌏••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४: बर्याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशच्या विभाजनाचे विधेयक संमत झाल्याने ’तेलंगण’ हे भारताचे २९ वे राज्य बनले.**१९९९: भारत पाक दरम्यान दिल्ली ते लाहोर बस सेवेस प्रारंभ* *१९८८: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून श्री कासू ब्रह्मानंद रेड्डी यांनी सूत्रे हाती घेतली* *१९८७: अरुणाचल प्रदेश स्थापना दिवस भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य**१९८७: मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले**१९७८: शेवटचा ’ऑर्डर ऑफ व्हिक्टरी’ सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.**१९७१ :पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या अर्ध पुतळ्यांचे अनावरण उपराष्ट्रपती डॉ.गोपाळ स्वरूप पाठक यांच्या शुभहस्ते झाले.**१७९२: जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केल्यामुळे अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.* 🌏 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🌏 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५: प्रणाली शैलेश चव्हाटे -- कवयित्री, लेखिका* *१९७८: रचना -- लेखिका, कवयित्री* *१९७६: रोहन सुनील गावस्कर -- भारतीय क्रिकेटपटू**१९६९: विजय अर्जुन सावंत -- कवी, लेखक**१९६६: प्रदीप निवृत्तीनाथ कुलकर्णी -- लेखक**१९६३: नागेश सूर्यकांतराव शेवाळकर-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९६२: मीना शेट्टे-संभू -- लेखिका, संपादिका* *१९५७: प्रा. बसवराज कोरे -- ज्येष्ठ लेखक**१९५६: अन्नू कपूर -- भारतीय चित्रपट अभिनेता* *१९५५: लखनसिंह कटरे -- प्रसिद्ध कवी, कथाकार, झाडीबोली साहित्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष* *१९५२: डॉ. रा. गो. चवरे -- प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार**१९५१: गॉर्डन ब्राऊन – इंग्लंडचे पंतप्रधान**१९४१: प्रा. माधव थोरात -- कवी* *१९३७: सुसंगति महादेव गोखले -- बालसाहितिक* *१९२८: आबाजी नारायण पेडणेकर -- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार,कवी, समीक्षक आणि भाषांतरकार.(मृत्यू: ११ ऑगस्ट २००४ )**१९०४: अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान (मृत्यू: १८ डिसेंबर १९८० )**१८४४: लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ५ सप्टेंबर १९०६ )* 🌏 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌏••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: बेला बोस - भारतीय नृत्यांगना आणि अभिनेत्री (जन्म: १८ एप्रिल १९४१ )**२०१५: गोविंद पानसरे -- महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते (जन्म: २४ नोव्हेंबर १९३३ )**२०१२: डॉ. रत्नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक (जन्म: ६ ऑक्टोबर १९४३ )**२००७: डॉ. किशोर शांताबाई काळे --- डॉक्टर व प्रसिद्ध लेखक.काळे यांचा वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला.(जन्म: १ जून १९६८ )**२००१: इंद्रजित गुप्ता – माजी केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: १८ मार्च १९१९ )**१९९७: श्री. ग. माजगावकर – पत्रकार, लेखक ’माणूस’ साप्ताहिकाचे संपादक (जन्म: १ ऑगस्ट १९२९ )**१९९४: त्र्यं. कृ. टोपे – घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू* *१९७४: केशव नारायण काळे --- मराठीतील एक कवी, नाटककार, समीक्षक, चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक(जन्म: २४ एप्रिल १९०४ )**१९५८: हरिश्चंद्र सखाराम भातावडेकर -- भारतात चित्रपट बनवणारे भारतीय (जन्म: १५ मार्च, १८६८ )**१९५०: बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू (जन्म: ६ सप्टेंबर १८८९ )**१९१०: ब्युट्रोस घाली– इजिप्तचे पंतप्रधान (जन्म: १८४६ )**१९०५: विष्णुपंत छत्रे – भारतातील सर्कस उद्योगाचे जनक (जन्म: १८४६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन च्या समुहात join होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.*~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेतील 10 लाख लाभार्थी बँकेच्या खात्याशी आधार लिंक नसल्याने वंचित*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *26 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांनी स्वीकारला पदभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी, येत्या आठ दिवसात फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा हप्ता बँकेत जमा होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी, विविध ठिकाणी रक्तदान व अन्नदान करण्यात आले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी एप्रिलपर्यंतची मुदतवाढ; पुण्यात 25 लाख वाहनांना बदलावी लागणार नंबर प्लेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन, ते मुंबई निवड संघाचे सदस्य ही होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 60 धावाने केला पराभव, आज भारत विरुद्ध बांगलादेशचा होणार सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागेश शेवाळकर, जेष्ठ साहित्यिक, पुणे👤 नागेश काळे, लातूर👤 उत्तम कानिंदे, शिक्षक तथा निवेदक, किनवट👤 विठ्ठल डोनगिरे👤 बालाजी विठ्ठल उगले👤 विशाल खांडरे👤 व्यंकटेश रोंटे👤 साहेबराव पाटील कदम👤 संतोष कामगोंडे👤 दिलीप लिंगमपल्ले👤 शिरीष गिरी, शिक्षक, बीड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 01*मी आहे प्राणवायूचा साठा**अन्नधान्याची देतो रास**तोडू नका हो मला कोणी**उपयोगी पडतो मी हमखास*मी कोण ..........?संकलन व लेखन - नंदा परदेशीजि.प. शाळा बळसाणे जि. धुळेउत्तर - Whatsapp Status वर••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायची इच्छा असेल, तर तो गाठेपर्यंत अनेक खाचखळगे व वळणे घ्यावी लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गांडूळ श्वसन कोणत्या अवयवामार्फत करते ?२) गांडूळाला शेतकऱ्याचा काय म्हणतात ?३) गांडूळपासून तयार होणाऱ्या खताला काय म्हणतात ?४) गांडूळाला इंग्रजीत काय म्हणतात ?५) गांडूळाच्या शरीरातून स्रवणाऱ्या स्त्रवास स्वच्छ करून एकत्र साठवलेल्या पाण्याला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) त्वचा २) मित्र ३) गांडूळ खत ४) Earthworm ५) गांडूळपाणी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕷 *कोळी जाळं कसं विणतात ?* 🕷🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸कोळ्यांच्या पोटात काही ग्रंथी असतात. त्यातून एक दाट स्राव सतत पाझरत असतो. या स्रावापासून ते रेशमासारखे धागे बनवतात. त्यासाठी त्यांच्या पोटाच्या वरच्या भागात दुसरा एक अवयव असतो. तो त्या स्त्रावाचा धागा तयार करण्याचं काम करतो. या अवयवाला अनेक छिद्रं असतात. या छिद्रांचा व्यास अतिशय लहान असल्यामुळे त्यातून जेव्हा हा स्राव बाहेर पाझरतो तेव्हा त्याचं रूपांतर अतिशय बारीक एखाद्या धाग्याच्या जाडीइतकाच प्रवाह तयार होतो. जोपर्यंत हा प्रवाह कोळ्याच्या शरीरात असतो तोपर्यंत तो द्रवरूप असतो; पण शरीराबाहेर पडून त्याला हवेचा स्पर्श होताच तो घनरूप धारण करतो. त्यामुळे शरीरातून बाहेर पडता पडता त्या स्रावाचा धागा बनतो आणि त्याची लांबी सतत वाढत जाते. हा धागा अशा रितीनं शरीरातून बाहेर पडत असतानाच कोळी वर्तुळाकार रिंगणातून फिरत राहतो, त्यामुळे तो धागाही त्याच्या पाठोपाठ त्या परिघात फिरतो व त्याचं एक वर्तुळ तयार होतं. हा धागा चिकट असल्यामुळे ज्या पृष्ठभागावर तो पडतो तिथं चिकटून बसतो. तसंच जेव्हा ती वर्तुळातली फेरी पूर्ण होते तेव्हा ती टोकं एकमेकांना चिकटून त्या धाग्यांचं रिंगण तयार होतं. त्यानंतर त्याबाहेरचं वर्तुळ विणलं जातं. ही दोन वर्तुळं मग आडव्या धाग्यांनी एक एकमेकांना जोडली जातात. हळूहळू त्याचं जाळं आकार घेऊ लागतं.कोळी तयार करत असलेले हे रेशीम धागेही तीन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यातला चिकट धागा तो जाळ्यातली रिंगणं विणण्यासाठी तसंच माशी वैगेरे कीटकांना पकडण्यासाठी आणि त्यांचा चट्टामट्टा करेपर्यंत त्यांना जखडून ठेवण्यासाठी वापरतो. या रिंगणांना जोडणारे छत्रीच्या किंवा सायकलीच्या चाकांमधल्या काड्यांसारखे जे आडवे धागे असतात ते दुसऱ्या प्रकारच्या चिकट नसलेल्या धाग्यांपासून बनलेले असतात. आणखीही एका प्रकारचं रेशीम कोळी आपल्या कोषासाठी वापरतात. या जाळ्यांचेही विविध प्रकार आहेत. आपल्याला नेहमी दिसणारं षटकोनी प्रकारचं जाळं हा जास्तीत जास्त विणला जाणारा प्रकार आहे. दुसऱ्या प्रकारचं जाळं एखाद्या नरसाळ्यासारखं असतं. त्याच्या रुंद तोंडात शिरलेली कीटक त्याच्या नळीकडून ओढला जातो आणि खाली टपून बसलेल्या कोळ्याच्या 'ताटात' अलगद पडतो. तिसऱ्या प्रकारचं जाळं पाण्याखाली राहणारे कोळी विणतात. त्याचं वरचं तोंडच तेवढं आपल्याला पाण्याच्या पृष्ठभागावर दिसतं. बाकीचा भाग पाण्याखालीच असतो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझिया चरणाचें तुटतां अनुसंधान । जाती माझे प्राण तत्क्षणीं ॥१॥ मग हें ब्रह्मज्ञान कोणापें सांगसी । विचारीं मानसीं केशिराजा ॥२॥ वदनीं तुझें नाम होतांचि खंडणा । शतखंडरसना होइल माझी ॥३॥ सांवळें सुंदर रूप तुझें दृष्टी । न देख्तां उन्मळती नेत्र माझे ॥४॥ तुज परतें साध्य आणिक साधन । साधक माझें मन होईल भ्रान्त ॥५॥ नामा म्हणे केशवा अनाथाचा नाथ । झणीं माझा अंत पाहसी देवा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगल्या विषयावर चिंतन व मनन करावे.चिंतन व मनन केल्याने विचारशक्तीला चालना मिळते.यामुळे आपले काहीच नुकसान होत नाही उलट चांगले विचार करण्याची आपल्याला सवय लागत असते आणि त्याच सवयीमुळे आपल्यात परिवर्तन सुद्धा तेवढेच होत असते. आणि नवीन दिशा सुद्धा सापडत असते. त्यामुळे आपलाच विकास होत नाही तर त्यामुळे इतरांना ही त्यातून प्रेरणा मिळत असते.म्हणून ह्या प्रकारची सवय लावावी जेणेकरून आपली लक्ष इकडे, तिकडे जाणार नाही आणि आपला अनमोल वेळ ही वाया जाणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शिकवण*एका बागेच्या दारात बरीच वर्षे एक भिकारी बसत असे. वयोमानानुसार तो आता वृद्ध झाला होता. शरीराला कुष्ठरोगाने ग्रासले होते. अनेक रोग-व्याधींनी त्याचे शरीर पोखरले होते. तरीही तो तेथेच बसत होता. नित्यनियमाने भीक मागत होता. त्या गावच्या राजपुत्राने त्याला कित्येक वर्षे तिथे बसलेले पाहिलेले होते. पण, आता या अवस्थेत त्याला पाहून राजपुत्राला प्रश्न पडे की, 'हा या अवस्थेत का जगतो आहे ? जगण्याची इतकी लालसा का असावी याला ? अखेर एके दिवशी त्याने हा प्रश्न त्या वृद्ध भिकाऱ्याला विचारला. तो भिकारी म्हणाला, "अरे, हाच प्रश्न मी वारंवार परमेश्वराला करतो आहे की, का जगवतोस मला या अवस्थेत ? लवकर नेत का नाहीस ? कदाचित मला वाटतं, त्याने मला मुद्दाम या अवस्थेतही जगवलं असावं. मला पाहून इतरांना कळावं की, आज जरी ते सुखरूप, धडधाकट असले तरी, त्यांची वृद्धापकाळी अशी अवस्था होऊ शकेल. मला पाहून साऱ्यांनी बोध घ्यावा. असा कदाचित परमेश्वराचा हेतू असेल."* तात्पर्य : आयते खाल्याने मोक्षप्राप्ती नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment