✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 फेब्रुवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔲 *_ या वर्षातील ४८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔲 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔲•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००८: कोसोव्होने स्वातंत्र्य जाहीर केले.**१९६४: अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.**१९५२: नाना जोग लिखित 'भारती' या नाटकाचा प्रथम प्रयोग नागपूर नाट्य मंडळाने नागपूर येथे केला**१९४४: दुसऱ्या महायुद्धात जपानी जिंकलेली अंदमान निकोबार बेटे आजाद हिंद फौजेच्या स्वाधीन करण्यात आली**१९३३: अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही दारुबंदी लागू झाली होतॊ.**१९२७: ’रणदुंदुभि’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९१२: राम गणेश गडकरी यांचे पहिले नाटक "प्रेम संन्यास" रंगभूमीवर आहे.**१८०१: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.*🔲 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔲 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८: प्रफुल्ल अंदुरकर -- कवी* *१९७५: प्रसाद ओक -- प्रसिद्ध अभिनेता, लेखक, कवी* *१९६८: विनायक नारायण अनिखिंडी -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९६५: सदानंद कदम -- प्रसिद्ध लेखक, संग्राहक* *१९६३: सुजाता मिलिंद बाबर -- लेखिका, संपादिका, अनुवादक**१९६१: संजीव वसंत वेलणकर -- लेखक, सोशल मीडियावर दैनंदिन लेखन* *१९६०: डॉ. सुनील सावंत -- कवी, लेखक**१९५७: हेमंत श्रीराम देशपांडे -- लेखक**१९५७: प्रफुल्ल मनोहरभाई पटेल -- माजी केंद्रीय मंत्री**१९५४: कल्वकुंतल चंद्रशेखर राव -- तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री* *१९५०: प्रा. जयंतकुमार गणपतराव बंड -- लेखक, संपादक* *१९५०: प्रा. उद्धव निंबा महाजन -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९४६: अशोक सिंह परदेशी -- कवी**१९४३: डॉ.रूपचंद निखाडे -- लेखक**१९४२: अनुराधा कृष्णराव गुरव -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, शैक्षणिक विचारवंत (मृत्यू: ३० मे २०२० )**१९४०: गजानन जानोजी बागडे -- कवी (मृत्यू: १ सप्टेंबर २०१२ )**१९३६: फातिमा झकेरिया -- मुंबई टाईम्सच्या संपादिका (मृत्यू: ६ एप्रिल २०२१)**१९३५: रवी टंडन -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता(मृत्यू: ११ फेब्रुवारी २०२२ )* *१९३२: सुहासिनी इर्लेकर --- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री आणि समीक्षक(मृत्यू: २८ऑगस्ट २०१० )**१९१८: कृष्ण भालचंद्र फडके -- लेखक* *१९०२: सीताराम गणपतराव मनाठकर -- कवी ( मृत्यू: मे १९४९ )**१९०२: प्रभाकर वासुदेव बापट -- समीक्षक (मृत्यू: २६ जुलै १९४४ )**१८७४: थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती,आय.बी.एम.(IBM) चे अध्यक्ष (मृत्यू: १९ जून १९५६ )**१८५४: फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९०२ )* 🔲 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔲••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: चंद्रकांत मांडरे --- प्रसिद्ध मराठी अभिनेते(जन्म: १३ ऑगस्ट १९१३ )**१९९५: प्रा. पां. कृ. सावळापूरकर -- जुन्या पिढितील संशोधक, विचारवंत (जन्म: १ जुलै १९०७ )* *१९९४: चिमणभाई पटेल -- गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री (जन्म: ३ जून १९२९ )**१९९१: कृष्णाबाई हरी मोटे -- कथाकार, कादंबरीकार(जन्म:२८ जुलै १९०३)**१९८८:कर्पूरी ठाकुर -- बिहारचे माजी मुख्यमंत्री (जन्म: २४ जानेवारी १९२४ )**१९८६: जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ (जन्म: १२ मे १८९५ )**१९७८: पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक (जन्म: २ ऑगस्ट १९१० )**१८८३: वासुदेव बळवंत फडके -- राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी,काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन (जन्म: ४ नोव्हेंबर १८४५ )**१८८१: लहुजी राघोजी साळवे ऊर्फ ’लहुजी वस्ताद’ – क्रांतीवीर,समाजसेवक (जन्म: १८११)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* join होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवी दिल्लीचे मुख्यमंत्री कोण होणार ? आजच्या बैठकीत ठरणार ! उद्या दिल्लीतील रामलीला मैदानावर दुपारी 12 वाजता होणार शपथविधी सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नवी दिल्लीत NCR सह उत्तर भागात पहाटेच्या वेळी भूकंपाचे धक्के*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील दुर्घटनाग्रस्तांना नुकसान भरपाई जाहीर; मृतांच्या कुटुंबियांना सरकार देणार 10 लाख रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईत कोळसा तंदूर भट्टींवर बंदी, नियम न पाळणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *यंदा फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेचा तडाखा, महाराष्ट्रात उन्हाचा पारा चढणार, IMD ने दिला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लाडकी बहीण योजनेत बदल होणार ? दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी आणि लाभार्थींच्या हयातीचे प्रमाणपत्र द्यावे लागणार, उत्पन्नाबाबत प्राप्तीकर विभागाकडून घेणार माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयपीएल 2025 चं वेळापत्रक जाहीर, 22 मार्चला पहिला सामना केकेआर विरुद्ध आरसीबी; कोलकातामधील ईडन गार्डनवर 25 मे रोजी अंतिम सामना, 2 महिने रंगणार थरार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील सामंत, ई साहित्य प्रकाशन, पुणे👤 अगस्ती भाऊसाहेब चासकर 👤 साईनाथ अवधूतवार, धर्माबाद👤 रविकिरण ए. एडके👤 विकास गायकवाड 👤 लक्ष्मण गंगाराम होरके👤 अशोक इंदापुरे, विशेष मागास प्रवर्ग अभ्यासक सोलापूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दया पवार - दगडू मारुती पवार*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या श्रमाचे फळ, हीच जगातील सर्वोत्तम संपत्ती आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पक्षी म्हणजे काय ?२) पक्ष्यांच्या शरीराचं तापमान साधारणपणे किती सेंटिग्रेड असते ?३) "पक्षी म्हणजे परिस्थितीकीचा ( Ecology ) लिटमस कागद आहेत", असे कोण म्हणाले होते ?४) जगात पक्ष्यांच्या जाती किती आहेत ?५) नैसर्गिक विविधतेमुळे भारतात पक्ष्यांच्या जाती किती आहेत ? *उत्तरे :-* १) पिसं असलेला द्विपाद होय. २) ३८° ते ४४° ३) रॉजर टोरी पीटरसन ४) ८,६०० जाती ५) १,२५० जाती*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळ्यात का होते गारपीट, माहिती आहे का ?*गारपीट होणं हे आपल्या महाराष्ट्रात नवं नाही. पावसाळ्याच्या तोंडावर किंवा अगदी ऐन उन्हाळ्यात अनेकदा गारपीट होते आणि आपण ती अनुभवतोसुद्धा विदर्भ असो, नाहीतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडंच गारपीट होतेच. कधी ती जास्त प्रमाणात होते, तर कधी चुकून-माकून. यामुळे शेतीचं नुकसान होतं, हाताशी आलेली पिकं आडवी होतात. पण आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये हे घडणं म्हणजे डोक्यालाच हात लावायची पाळी! त्यामुळेच या घटनेकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल.हवामानशास्त्राच्या परिभाषेत सांगायचं तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक- हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी आणि दुसरी- या हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं. अशी परिस्थिती अवतरली की गारपीट होण्याची शक्यता वाढते.बाष्पाचं प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात ते पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे किंवा कधीकधी अरबी समुद्रावरून येणारे वारे. ते येताना सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. तर हवा जास्त उंचीवर जाण्यासाठी कारणीभूत ठरतात - वाऱ्याचे जेट प्रवाह. ते अतिउंचावर असतात. साधारणपणे 9 ते 12 किलोमीटर उंचीवर. ते फेब्रुवारी-मार्च महिन्यात हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडं सरकतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात. त्यामुळे आता हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते. ही स्थिती हवामानात अस्थिरता निर्माण करते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे भरपूर उंचापर्यंत पोहोचतात. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे. ही स्थिती अशीच दीर्घकाळ कायम राहिल्यास गारपीट तितक्या काळासाठी सुरू राहते.गारा घडताना या गारांचं विश्व भयंकर रंजक आहे. त्यांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं सारं काही भन्नाट आहे. गारा म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नव्हे. तिला कांद्यासारखे पापुद्रे असतात.हे पापुद्रे तिचा आकार वाढवतात. तिला मोठं, अधिक मोठं करतात. जितके पापुद्रे जास्त आणि जाड, तितकी गार मोठ्या आकाराची. गार कधी फोडली तर तिचे पापुद्रे पाहायला मिळतात.हे पापुद्रे का तयार होतात हे समजून घेण्यासाठी गारेची निर्मिती कशी होते ते माहीत करून घ्यावं लागेल. गार म्हणजे पावसाचाच एक प्रकार. फक्त पाण्याऐवजी गोठलेल्या स्वरूपात पडणारा. तसं होण्यासाठी बरंच रामायण घडावं लागतं. पाण्याचे थेंब गोठावे लागतात. त्यासाठी ढग इतक्या उंचीवर जायला हवेत की, जिथं त्यांच्यातून पडणारे पावसाचे थेंब गोठू शकतील. नाहीतर ढगातील पाणी गोठण्याची पातळी काही कारणामुळे खाली सरकावी लागते. हे घडतं, तेव्हाच गारा बनतात.गारेच्या अंतरंगात डोकावताना प्रचंड आकाराचा ढग. त्यात बाष्पाचे सूक्ष्म थेंब. हा ढग उंचावर जातो तेव्हा बाष्पाचे थेंब गोठायला लागतात. वाऱ्यामुळे हालचाल असेल, तर ते सैरावैरा धावतात. एकामेकांना चिकटतात आणि आकाराने मोठे होत जातात. एक थेंब मोठा झाला की त्याच्या भोवती इतर सूक्ष्म थेंब जमा होतात. ते गोठल्यामुळे गार तयार होते. हा झाला गारेचा गाभा, सर्वांत आतला भाग. ही गार वाऱ्यामुळे ढगात फिरत राहते. खाली-वर होत राहते. ती वर-खाली होते, तसे तिच्याभोवती बाष्पाचे थर तयार जमा होतात. हे थर म्हणजेच तिचे पापुद्रे. गार ढगात जितकी जास्त वेळ फिरेल, तितके जास्त थर तिच्याभोवती तयार होतात. तितका आकारही मोठा होतो. गारेचा हा वर-खाली होण्याचा खेळ अवलंबून असतो, दोन गोष्टींवर- गारेचं वजन आणि वरच्या दिशेने वाहणारा वारा. गारेचं वजन वाढलं की ती खाली पडायला लागते. पण वरच्या दिशेने वाहणारा वारा तिला परत वर भिरकावतो. तिचं वजन आणि या वाऱ्याची ताकत यांच्या चढाओढीत ती हेलकावे खात राहते. आकाराने मोठी होत जाते. या खेळात तिचं वजन वाऱ्यावर मात करतं, तेव्हा तिची ढगातून सुटका होते. ती खाली पडते. तिने ढगात कसे-किती हेलकावे खाल्ले आहेत, यावर तिचा आकार आणि तिची ओळख बनते. एवढ्यावरच हे संपत नाही. खाली येतानाही तिला अडथळे असतात. या जमिनीकडं येण्याच्या प्रवासात तिला तापमानाचा सामना करावा लागतो. त्याच्यामुळे ती वितळण्याची शक्यता असते. अनेकदा होतंही तसंच. ती ढगातून गार म्हणून पडायला लागते, पण पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडते. उन्हाळी पावसात आपण पावसाचे टपोरे थेंब पाहतो. ते थेंब टपोरे का असतात, त्यामागचं हेच रहस्य असतं. ही सगळी दिव्यं पार केली तरच गार जमिनीवर पडते. पडल्यावरही कुतुहलाचा विषय बनते. एक मोठं कुतूहल असं की, गारा तासन् तास जमिनीवर पडून राहतात, लवकर विरघळत नाहीत. काही वेळा तर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या तशाच दिसतात. याची अनेक कारणं असतील, पण त्यापैकी मुख्य दोन. एकतर त्या पडल्यामुळे वातावरण थंडगार झालेलं असतं. दुसरं म्हणजे गारांचे पापुद्रे. गारेच्या या थरांमुळंसुद्धा त्या वितळण्याचा वेग कमी असतो. हवामान अभ्यासकांनी केलेली ही कारणमीमांसा. असं हे इवल्याशा गारेचं अनोखं विश्व. हवामान काय किंवा निसर्ग काय, त्याच्याकडं असं बारकाईने पाहिलं तर त्यात असलेली रंजकता उलगडता येते. गारेच्या निमित्ताने हा असाच एक प्रयत्न!बी.बी.सी मराठी*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझा विष्णुदास म्हणतात जगीं । नाहीं माझें अंगीं प्रेमभाव ॥१॥ तेणें थोर लाज वाटे पंढरिराया । ये माझ्य ह्रदया एक वेळां ॥२॥ द्वैताद्वैत भाव आहे माझे ठायीं । अनुभव नाहीं स्वरूपाचा ॥३॥ देखावेखीं बैसें संतांचे संगतीं । नाहीं माझे चित्तीं ध्यान तुझें ॥४॥ साकारलें रूप तैं दिसे चर्मचक्षु । परी नाहीं वोळखी केवळ मनें ॥५॥ नामा म्हणे माझा उजळ करींज माथा । भेटी देउनी संतां निरवीं मज ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके नेहमीच वाचून काढावे त्यातून ज्ञान मिळत असते. सोबतच त्यातून मार्गदर्शन सुध्दा मिळत असते.तसेच आपल्या जीवनात जे काही प्रसंग, अडीअडचणी आले असतील त्या परिस्थितीला सुद्धा कधीही विसरू नये. जसं की पुस्तके आपल्याला घडवत असतात तसेच ज्या परिस्थितीतून आपण गेलेलो असतो ती परिस्थिती सुद्धा आपल्याला अनुभवाने परिपूर्ण बनवत असते.तो अनुभव पैशाने विकत घेता येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बढाईखोर माणूस*एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्यापाजार्यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या काकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.तात्पर्य – आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment