✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 फेब्रुवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☀️ *_जागतिक कर्करोग दिन_* ☀️•••••••••••••••••••••••••••••••••••• ☀️ *_ या वर्षातील ३५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☀️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☀️•••••••••••••••••••••••••••••••••*२००४: मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.**२००३: युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.**१९६१: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान**१९४८: श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.**१९४४: ’चलो दिल्ली’चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे**१९३६: कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.**१९२२: चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.**१७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.**१६७०: ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी 'गड आला पण सिंह गेला ' असे उदगार काढले,त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.* ☀️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: वरुण शर्मा -- भारतीय अभिनेता* *१९८९: पवन सुरेशराव नालट -- कवी**१९८८: श्रीपाद अरुण जोशी -- कवी**१९८७: डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे -- लोकसभेचे खासदार* *१९८२: प्रा. डॉ. पद्माकर तामगाडगे -- कवी, लेखक, संपादक* *१९८२: ईश्वरदास देविदास मते -- कवी, लेखक**१९७४: उर्मिला मातोंडकर – चित्रपट अभिनेत्री**१९६७: संदीप सुरेश शहा -- कवी, लेखक* *१९५७: श्रीराम दुर्गे -- जेष्ठ लेखक (मृत्यू: ३० जुलै २०२१ )**१९५०: डॉ अलीमिया दाऊद परकार -- लेखक**१९५०: हेमंत साने -- लेखक, इतिहास संशोधक* *१९४१: विठ्ठल महादेव बोते -- कवी, लेखक* *१९३९: रमण रामचंद्र माळवदे -- लघुकथा, एकांकिका लेखक* *१९३८: पं. बिरजू महाराज – लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू(मृत्यू: १७ जानेवारी, २०२२ )**१९३६: डाॅ. वासंती फडके -- मराठी लेखिका,अनुवादिका**१९३५: डॉ. लीला गणेश दीक्षित -- बालसाहित्यकार (मृत्यू: १३ ऑक्टोबर २०१७ )**१९३४: आनंद बालाजी देशपांडे (आकाशानंद) -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९३३: श्रीधर चंद्रशेखर गुप्ते पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू (मृत्यू: ११ मार्च २०१५)**१९२२: स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक (मृत्यू: २४ जानेवारी २०११ )**१९०४: त्रिंबक निळकंठ आंभोरकर -- लेखक (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९९२ )**१९०३: शांताबाई नाशिककर -- कथा लेखिका, कादंबरीकार, नाटककार* *१९०२: चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग – धाडसी अमेरिकन वैमानिक. १९२७ मध्ये त्यांनी पॅरिस ते न्यूयॉर्क या ५,८०० किलोमीटरच्या विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धेत भाग घेऊन साडे तेहतीस तासांत ती स्पर्धा जिंकली.वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या ’द स्पिरीट ऑफ सेंट लुईस’ या पुस्तकास पुलित्झर पुरस्कार मिळाला.(मृत्यू: २६ ऑगस्ट १९७४ )**१८९३: चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक (मृत्यू: १६ डिसेंबर १९६० )*☀️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:वाणी जयराम -- हिंदुस्तानी गायिका आणि पार्श्वगायिका (जन्म: ३० नोव्हेंबर १९४५)**२०२०: राघवेंद्र कडकोळ -- जेष्ठ अभिनेते, लेखक (जन्म:१९४३)**२००२: भगवान आबाजी पालव ऊर्फ ’मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (जन्म: १ ऑगस्ट १९१३ )**२००१: पंकज रॉय – क्रिकेटपटू,पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: ३१ मे १९२८ )**१९७४: सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १ जानेवारी १८९४ )**१८९४: अॅडोल्फ सॅक्स – सॅक्सोफोन या वाद्याचे जनक (जन्म: ६ नोव्हेंबर १८१४ )**१६७०: नरवीर तानाजी मालुसरे (जन्म: १६२६ जावळी,सातारा )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फ्रेश मॉर्निंग बुलेटिन मध्ये add होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिवार्य, विरोध केल्यास होणार कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर ए आय चा वापर विचाराधीन - उपमुख्यमंत्री अजित पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *निवडणुकांपूर्वीच स्थानिक कार्यकर्त्यांना संधी; राज्यात 1 लाख 94 हजार SEO ची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अफजलखानाचा कोथळा काढलेली वाघनखे नागपूरला रवाना, साताऱ्यात चार लाख शिवप्रेमींनी घेतले दर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *हिवाळी आशियाई स्पर्धेत भारताची पहिली महिला खेळाडू, पुण्याच्या श्रुती कोतवालकडे स्पीड स्केटिंग संघाचे नेतृत्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कृष्णा तिम्मापुरे, पुण्यनगरी धर्माबाद तालुका प्रतिनिधी👤 जी. राजरेड्डी रामरेड्डी, धर्माबाद👤 संजीवकुमार गायकवाड, पत्रकार, धर्माबाद👤 शंकर कुऱ्हाडे👤 अहमद शेख👤 राजू माळगे👤 विलास थोरमोठे👤 सुमेध पावडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लोहपुरुष - वल्लभभाई पटेल*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनुष्य स्वभावत: कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही. - लो. टिळक.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कान्हा राष्ट्रीय उद्यान/व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?२) कान्हा राष्ट्रीय उद्यान म्हणून कोणत्या वर्षी घोषित झाला ?३) बालकाला शिक्षणाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या परिषदेने दिला ?४) 'सीमा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ३८ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात सुरू आहे ? *उत्तरे :-* १) मध्यप्रदेश २) १ जून १९५५ ३) जागतिक बालहक्क परिषद ४) वेस, मर्यादा, शीव ५) उत्तराखंड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦟 डास चावल्यानं एड्स का होत नाही?🦟डास जेव्हा आपल्याला चावतात तेव्हा ते आपलं रक्त शोषून घेतात. त्यामुळे ज्याला मलेरिया झाला आहे अशा व्यक्तीला डासानं चावा घेतला असल्यास मलेरियास कारणीभूत असणारे रोगजंतू त्या रक्तातून डासांच्या शरीरात शिरतात. असे डास इतरांना चावले तर त्या चाव्यातून मलेरियाचे रोगजंतू त्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात शिरतात. त्या व्यक्तीला मलेरियाची बाधा होते.आपण याचा अनुभव घेतलेला असतो. तर मग असा प्रश्न पडतो, की ज्या व्यक्तीला एड्स झाला आहे अशा व्यक्तीला चावलेला डास इतर कोणाला चावला तर त्या चाव्यातून एड्सची लागण होणार नाही का? एड्स झालेल्या व्यक्तीच्या रक्तात एड्सला कारणीभूत असणारे एचआयव्ही जातीचे विषाणू वावरत असतात हे खरं आहे. म्हणून तर अशा व्यक्तीला इंजेक्शन देताना वापरलेली सिरिंज दुसऱ्या कोणाला तरी इंजेक्शन देण्यासाठी वापरली तर त्या व्यक्तीलाही एड्सची बाधा होऊ शकते. एवढंच काय, पण एड्स झालेल्या व्यक्तीची दाढी किंवा मुंडण करण्यासाठी वापरलेला वस्तरा निर्जंतुक न करता दुसऱ्यासाठी वापरला तरीही त्या वस्तऱ्याला चिकटलेल्या रक्ताच्या थेंबांमधून एचआयव्हीचा शिरकाव दुसऱ्याच्या शरीरात होऊ शकतो, तर मग तो डासांच्या चाव्यामधून का नाही होणार, हा प्रश्न म्हणूनच संयुक्तिक वाटतो. कोणतेही विषाणू परोपजीवी असतात. त्यांना जगण्यासाठी आणि आपल्या वाढीसाठी विशिष्ट यजमान पेशींची गरज भासते. एचआयव्हीचे विषाणू मानवी शरीरातल्या टी-लिम्फ पेशींना आपले यजमान बनवतात. त्यांच्या जिवावर आपली गुजराण करत ते रक्तात वाढत राहतात. अशा रक्ताचा घास जेव्हा एखादा डास घेतो तेव्हा त्यातले काही विषाणू डासाच्या शरीरात निश्चितच प्रवेश करतात; पण तिथं त्या विषाणूंना आपल्या यजमान पेशी सापडत नाहीत. डासाच्या शरीरातल्या पेशींवर ते विषाणू जगू शकत नाहीत. मलेरियाच्या रोगजंतूंच्या वाढीतला काही भाग डासाच्या शरीरातच होत असतो. त्यामुळे ते तगून राहतात. तशी परिस्थिती एड्सच्या रोग्याच्या रक्ताचा घास घेणाऱ्या डासाबाबतीत नसते. त्यामुळे डासाच्या शरीरात शिरलेल्या एचआयव्हीच्या विषाणूंची वाढ तर होतच नाही; पण डासाच्या पचनसंस्थेकडून त्या विषाणूंचं विघटन होऊन त्यांचा नायनाट होतो. त्यामुळे असा डास जेव्हा दुसऱ्या निरोगीव्यक्तीला चावतो तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात टोचण्यासाठी एचआयव्ही विषाणू हजरच नसतात. अर्थात, अशा डासांच्या चाव्यामुळं त्या निरोगी व्यक्तीला एड्सची बाधा होण्याची शक्यताच उरत नाही.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विषयीं ठेवुनि मन सांगति ब्रह्मज्ञान । तेणें समाधान नुपजे कदा ॥७॥ हरिदासासी पुसूं भक्तीच उपाव । तंव तयापाशीं भाव नाहीं कोठें ॥८॥ वाचेंनें सांगती नामाचा बडिवार । विषयीं पडीभर सदाकाळीं ॥९॥ ऐसें विचारितां बहुत भागलों । म्हणोनि शरण आलों पांडुरंगा ॥१०॥ भयभीत जालों संसार येरझारीं । शिणलों असें भारी तारीं मज ॥११॥ नामा म्हणे आतां हिंडतां कष्टलों । म्हणोनि शरण आलों पांडुरंगा ॥१२॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण करत असलेले कार्य पाहून बाहेरच्या लोकांकडून होणारा विरोध तेवढा भयानक नसतो. कधी शिकायला सुद्धा भाग पाडत असते पण जेव्हा त्याच कार्याला आपल्या जवळचेच माणसं आपुलकीचा ढोंग करून विरोध करतात तेव्हा मात्र त्या विरोधाचे मानसिक तणावात रूपांतर होत असते. म्हणून कोणाला साथ देता येत नसेल तर विरोधही करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणुसकी *संस्कृतचे महाकवी माघ निर्धन असले तरी मदत करण्यास कधीच कमी पडत नसत. त्यांच्याकडून जितकी मदत गरजूला होत असे तितकी मदत करण्यास सदैव तयार असत. एकदा कवीराज माघ आपल्या घरी शिशुपाल वध या महाकाव्याचा नववा अध्याय लिहीत असताना दरवाजावर कोणाची तरी हाक ऐकू आली. कोणी हाक मारली हे पाहण्यासाठी ते गेले असता त्यांना दारावर त्यांच्याच गावातील एक गरीब व्यक्ती उभारलेली दिसली. त्यांनी त्या माणसाला आदराने घरात बोलावले. त्याचे योग्य ते आदरातिथ्य केले व येण्याचे प्रयोजन विचारले असता तो गरीब माणूस म्हणाला," कविराज मी मोठी आशा ठेवून आपल्याकडे आलो आहे. माझ्या मुलीचा विवाह ठरला असून त्यासाठी मला धनाची गरज आहे. माझी परिस्थिती तर आपण जाणून आहातच. तरी आपल्याकडून मला जी मदत होईल ती माझ्यादृष्टीने खूप मोठी असणार आहे." महाकवींकडेही आर्थिक चणचण होती. परंतु दारी मदत मागायला आलेल्या माणसाला परत पाठविणे त्यांना योग्य वाटेना. घरात सगळीकडे शोध घेतला पण त्यांना त्या माणसाला देण्याजोगे काहीच मिळेना. शिवाय दानवीर माणसाच्या घरात मौल्यवान असे काय शिल्लक राहणार. जे होते ते त्यांनी लोकांना देऊन टाकले होते. शेवटी महाकवींचे लक्ष पत्नीच्या हाताकडे गेले. पत्नीच्या हातात सोन्यांचे कंकण होते. त्यांनी एका हातातील कंकण काढून घेतले व त्या गरीब माणसाला देऊन टाकले. गरीब माणसाने महाकवींचे आभार मानून तो बाहेर पडणार इतक्यात कविराजांच्या पत्नीने त्या माणसाला परत बोलावले व आपल्या हातातील दुसरे कंकणही त्याला दिले व म्हणाली, "मुलीच्या लग्नात एकच कंकण कसे तिला देणार तिला रिकाम्या हाताने पाठवू नकोस." या दांपत्याच्या दानी वृत्तीला गरीबाने साष्टांग नमस्कार केला.तात्पर्य – आपली परिस्थिती नसतानाही दुस-याला मदत करणे हीच खरी माणुसकी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment