✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 फेब्रुवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18JCv8Nyhf/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📻 *_जागतिक रेडिओ दिन_* 📻••••••••••••••••••••••••••••• 📻 *_ या वर्षातील ४४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 📻 *_महत्त्वाच्या घटना:_* 📻•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१०: पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार,६० जखमी**२००३: चित्रपट निर्माते,दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान**१९८४: युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.**१९८२: भारत आणि फ्रान्स यांच्या संरक्षण करा मिराज विमानाचा समावेश**१७३९: कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.* *१६६८: स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.**१६३०: आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्हाणपूर येथे पोहोचला.*📻 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 📻••••••••••••••••••••••••••••••••••••••*२९८६: रश्मी (शिवानी) देसाई -- टेलिव्हिजन अभिनेत्री* *१९७६: शरद कपूर -- भारतीय अभिनेता* *१९७४: योगिनी वसंत पैठणकर -- कवयित्री**१९६४: रामदास ग. खरे -- कवी, लेखक* *१९६०: स्वाती विनय गाणू -- लेखिका**१९५९: डॉ. गिरीश प्रभाकर पिंगळे -- खगोलशास्त्रचे अभ्यासक, लेखक* *१९४९: चंद्रशेखर ठाकूर. -- ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ* *१९४५: विनोद मेहरा – अभिनेता (मृत्यू: ३० ऑक्टोबर१९९० )**१९४१: प्रा. शिवाजी बाजीराव पाटील -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९३८: रमेश सहस्रबुद्धे -- मराठी विज्ञानकथा लेखक ( मृत्यू: २८ डिसेंबर २०१६ )**१९३७: प्रतिभा द्वारकानाथ लेले -- ज्येष्ठ लेखिका**१९२८: श्रीकृष्ण दामोदर पानवलकर -- कथाकार (मृत्यू: १९ ऑगस्ट १९८५ )**१९२७: मृणालिनी मधुसूदन जोशी -- ज्येष्ठ लेखिका (मृत्यू: २७ ऑक्टोबर २०२२ )* *१९२१: निर्मला भालचंद बापट -- कवयित्री* *१९११: फैज अहमद फैज – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८४ )**१९१०: दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित (मृत्यू: १ मार्च १९९९ )**१८९४: वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार (मृत्यू: १६ जुलै १९८६ )**१८७९: सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (मृत्यू: २ मार्च १९४९ )**१८७०: पार्वतीबाई महादेव आठवले -- हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या, लेखिका (मृत्यू: १० ऑक्टोबर १९५५ )**१८३५: मिर्झा गुलाम अहमद – अहमदिया पंथाचे संस्थापक (मृत्यू: २६ मे १९०८ )**१८३१: लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे -- मराठीतील आद्य कादंबरीकार (मृत्यू: १२ मे १९०४ )**१७६६: थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ डिसेंबर १८३४ )* 📻 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 📻••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: ललिता लाजमी -- भारतीय ज्येष्ठ चित्रकार ( जन्म: १७ मार्च १९३२ )**२०२२: नरेंद्र लांजेवार --ज्येष्ठ साहित्यिक (जन्म: ११ मे १९६८ )**२०१४: बालनाथन बेंजामीन महेंद्र उर्फ बालु महेंद्र -- प्रसिद्ध तमिळ चित्रपट पटकथालेखक व छायादिग्दर्शक (जन्म: १ जानेवारी १९४६ )**२०१४: दिनकर त्रिंबक धारणकर -- मराठी नाट्यकर्मीं, साहित्यिक व ‘सत्य प्रकाश’ या साप्ताहिका’चे माजी संपादक (जन्म: १९३६ )**२०१२: अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी (जन्म: १६ जून १९३६ )**२००८: राजेन्द्र नाथ – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते (जन्म: १९३१ )**२००७: वामन केशव लेले -- भाषा अभ्यासक, समीक्षक (जन्म: २९ मे १९३३ )**१९९४: यशवंत नरसिंह केळकर उर्फ य.न. केळकर -- इतिहासविषयक लेखन करणारे मराठी लेखक (जन्म: १९ जुलै १९०२ )**१९७४: ’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक (जन्म: १५ ऑगस्ट १९१२ )**१९६८: गोपाळकृष्ण भोबे – संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक (जन्म: ६ ऑगस्ट १९२० )* *१९५६: धुंडिराज गणेश बापट-- वैदिक वाङ्मयाचे भाषांतरकार (जन्म: १५ नोव्हेंबर १८८२ )**१९०१: लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (जन्म: ९ मार्च १८६३ )**१८८३: रिचर्ड वॅग्नर – जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक (जन्म: २२ मे १८१३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनिक सकाळ मध्ये व्हॅलेंटाईन दिनानिमित्त मैफल या पानावर प्रकाशित कविता *" ती काय करते ? "*..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबईत होणार तिसरं विमानतळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुगलचे कार्यकारी प्रमुख सुंदर पिचाई यांच्यात महत्वपूर्ण बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे - स्वारगेट बसस्थानक, मेट्रो स्टेशनचा कायापालट होणार, शिवाजीनगर बस स्थानकाप्रमाणे आधुनिक सुविधा; आठ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे परिवहन मंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई - जल जीवन मिशन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरावती - राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा टप्पा महत्वपूर्ण, अमरावतीत 13,665 शिक्षकांना 8 मार्चपर्यंत मिळणार प्रशिक्षण; तज्ज्ञ शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सातारा - कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती, सर्वोत्कृष्ट गुण मिळविलेल्या 31 स्नातकांना पदवी प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अहमदाबाद - भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत सामन्यासह मालिकाही जिंकली, उपकर्णधार शुभमन गिलचे शतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 देवीसिंग ठाकूर, हास्य कलाकार, धर्माबाद👤 नागनाथ भद्रे, धर्माबाद👤 अशोक पाटील, धर्माबाद👤 संगीता ठलाल, लेखिका, गडचिरोली*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशाचा, कीर्तीचा मार्ग स्वर्गाच्या मार्गाइतकाच कष्टदायक आहे. -- स्टर्न*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारत, इजिप्त व व्हिएतनाम या देशांचा राष्ट्रीय फूल कोणता ?२) कमळ या फुलाला 'भारताचे राष्ट्रीय फूल' म्हणून केव्हा घोषित करण्यात आले ?३) कमळाच्या बियांना काय म्हणतात ?४) 'कमळ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'वॉटर लिली' असे कोणत्या फुलाला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) कमळ २) २६ जानेवारी १९५० ३) कमळगठ्ठा/कमळ गठ्ठ्याचे मणी ४) पंकज, अंबुज, राजीव, पुष्कर, पद्म, सरोज, कुमुदिनी ५) कमळ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय महिला दिन National Women's Day in India*भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी बंगाली कुटुंबात हैदराबाद येथे झाला. त्यांनी चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले. 12 व्या वर्षापासूनच त्या कविता लिहायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. भारताच्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देखील योगदान दिले आहे. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुजवांचोनि कांहीं गोड न वाटे जीवा । मज दिव्य केशवा पाय तुझे ॥१॥ लौकिकापासुनि कधीं सोडविसी । सांग ह्रषिकेशी उघडोनि ॥२॥ तुझे पाय दिव्य तुझे पाय दिव्य । तुझे पाय दिव्य रे दातारा ॥३॥ नामा म्हणे जिव्हे काढीन मी रवा । तुझे पाय केशवा दिव्य मज ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण जे, काही कार्य करत आहोत त्या कार्याविषयी आपल्याच माणसांना सहसा कळत नसेल किंवा त्याविषयी त्यांना पुरेपूर अनुभव नसेल तर त्यांच्याकडून विरोध होतच असते किंवा पाहिजे तेवढी त्यांच्याकडून आपल्याला साथ मिळत नाही. त्यावेळी आपण दु:खी होऊ नये. भलेही ते साथ देत नसतील तरी उशीरा का होईना हळूहळू सर्वकाही त्यांनाही कळायला लागते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ एकाग्रता ❃* एकदा एक स्वामीजी काही मुलांचे निरीक्षण करत होते. ती मुले पुलावर उभे राहून नदीवर तरंगत जाणार्या अंड्याच्या टरफलावर बंदुकीने नेम साधण्याचा प्रयत्न करत होती. पाण्यामुळे ती टरफले वर-खाली होत होती. मुलांना त्यांच्यापैकी एकही टरफलावर नेम धरता आला नाही. त्यांनी अनेक वेळेला बंदूक झाडली पण प्रत्येकवेळी त्यांचा नेम चुकत राहिला. त्यांच्याकडे बराच वेळ स्वामीजींचे लक्ष होते. मुलेही हे पाहत होती. मुलांनी स्वामीजींना म्हटले," तुम्ही नुसतेच आमच्याकडे काय पाहत आहात? का आम्हाला नेम धरता येत नाही असे तुम्हाला वाटते? आणि असे असेल तर तुम्ही नेम धरून ती टरफले फोडून दाखवा. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक चांगले जमते असे वाटते का?" स्वामीजी हसले आणि म्हणाले," मी प्रयत्न करून पाहतो." मुले म्हणाली," तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाहीये." स्वामीजींनी बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या अंड्याच्या टरफलावर नेम धरला, काही मिनिटे निश्चल राहिले, मग त्यांनी बंदूक चालवली, त्यांनी बारावेळा गोळ्या झाडल्या आणि बारावेळेला अंड्यांची टरफले उडविण्यात स्वामीजींना यश आले. त्या मुलांना फारच आश्चर्य वाटले,"एखादा माणूस पाण्यातील वाहणार्या अंड्याच्या टरफलावर इतका अचूक कसा नेम साधू शकतो?" असा प्रश्न त्यांना पडला. स्वामीजींनी मुलांच्या मनातील हे ओळखले, त्यांना ती मुले आवडली होती. ते म्हणाले,’’ जे काही तुम्ही करत होता त्यावर तुमचं मन एकाग्र करा. नेमबाजी करा किंवा अन्य काही. तुमचं लक्ष फक्त लक्ष्यावरच पाहिजे. तुमचा नेम कधीच चुकणार नाही. एकाग्रतेने बरेच काही साध्य करता येते. अवघड वाटणा-या गोष्टीसुद्धा या एकाग्रतेने सहजसाध्य होतात.’’ मुले स्वामींजींपुढे नतमस्तक झाली.*_🌀 तात्पर्य_ :~*ध्येय प्राप्तीसाठी एकाग्रता फार महत्वाची आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment