✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 फेब्रुवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_15.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛞 *_ या वर्षातील ३८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛞 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛞••••••••••••••••••••••••••••••••••••*२००३: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.**१९९९: युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी**१९७४: ग्रेनाडा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.**१९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.* *१९६५: मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.**१९४८: कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.**१९२०: बाबूराव पेंटर यांच्या ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ने तयार केलेला ’सैरंध्री’ हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.**१९१५: गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील 'आर्यन' हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्याची अंगठी**१८५६: ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले.सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.**१८४८:पुणे नगर वाचन मंदिराची स्थापना या ग्रंथालयाचे आधीचे नाव दि पूना नेटिव्ह जनरल लायब्ररी असे होते. न्यायमूर्ती रानडे हे संस्थेचे पहिले अध्यक्ष होते* 🛞 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛞 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०: प्राची शाह-पांडया -- भारतीय चित्रपट अभिनेत्री**१९७९: सरला लोटन पाटील -- कवयित्री**१९६५: बी. एल. खान-- कवी* *१९६४: नितीन आखवे -- मराठी गीतकार (मृत्यू: ८ एप्रिल २०१२ )**१९६३: डॉ. दिलीप नारायण पांढरपट्टे -- सुप्रसिद्ध गझलकार, सनदी अधिकारी* *१९५८: सुकुमार जयकुमार कोठारी -- मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये काव्य करणारे कवी* *१९५५: माधव रा.पवार -- प्रसिद्ध गीतकार, कवी* *१९५३: बाळासाहेब थोरात (विजय भाऊसाहेब)-- माजी मंत्री म.रा.**१९५३: माधव जगन्नाथ जोशी -- लेखक**१९५१: रवींद्र साठे -- मराठी चित्रपटांमध्ये व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये पार्श्वगायन करीत असलेले पार्श्वगायक**१९४१: निळकंठ तुळशीराम रणदिवे -- लेखक, कवी**१९४०: विद्या मधुकर जोशी -- लेखिका**१९३८: एस. रामचंद्रन पिल्ले – कम्युनिस्ट नेते**१९३५: उषा वामन भट -- लेखिका* *१९३५: अशोक पुरुषोत्तम शहाणे -- लेखक, भाषातज्ज्ञ, संपादक,व प्रकाशक**१९३४: सुजित कुमार – चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१० )**१९३२: माधव भीमराव थोरात -- लेखक* *१९२८: अनंत महादेव मेहंदळे -- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार(मृत्यू: २४ एप्रिल १९९२ )**१९२३: प्रा. डॉ. बापूसाहेब देवेंद्र खोत -- लेखक* *१८९८: रमाबाई भीमराव आंबेडकर ( मृत्यू: २७ मे १९३५ )**१८८४: लक्ष्मीबाई गणेश अभ्यंकर -- मराठी कवयित्री, कथालेखिका, कीर्तनकार, समाज कार्यकर्त्या आणि प्रभावी वक्त्या( मृत्यू: २० सप्टेंबर १९६९)**१८१२: चार्ल्स डिकन्स – इंग्लिश कादंबरीकार व लेखक (मृत्यू: ९ जून १८७० )* 🛞 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛞 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: आत्माराम भेंडे-- मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक(जन्म: ७ मे १९२३)* *२०१४: डॉ. शरद कोलारकर-- विदर्भातील एक ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, लेखक, विदर्भ संशोधन मंडळाचे माजी कार्याध्यक्ष (जन्म: १७ ऑक्टोबर १९३७ )**१९९९: हुसेन – नवविचारांचा पुरस्कार करुन पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्न करणारे जॉर्डनचे राजे (जन्म: १४ नोव्हेंबर १९३५ )**१९९०: वामनराव हरी देशपांडे -- महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतज्ञ, संगीतसमीक्षक व लेखक (जन्म: २७ जुलै १९०७ )**१९४७: वासुदेव दामोदर मुंडले -- चरीत्रकार (जन्म: १८८० )**१९३८: हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक (जन्म: २० डिसेंबर १८६८ )**१२७४:श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक (जन्म: ४ सप्टेंबर १२२१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लिहिते व्हा .........!*कोणत्याही भाषा विकासातील सर्वात शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे लेखन क्रिया. भाषा विकासात श्रवण, भाषण आणि वाचन या तीन मूलभूत क्रियेनंतर येणाऱ्या लेखन क्रियेकडे सर्वाचेच लक्ष असते. कारण लेखन प्रक्रियेतून आपली माहिती दीर्घकाळ जतन करू शकतो. अभ्यासासाठी देखील त्या लेखी साहित्याचा वापर करता येतो. म्हणून त्यास खुप महत्त्व दिल्या जाते ............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *निबे कंपनीचा वर्धापनदिन आणि मिसाईल कॉम्प्लेक्सचा शुभारंभ, आत्मनिर्भर भारतात संरक्षण क्षेत्रात मोठी क्रांती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशावाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नंदुरबार जिल्ह्यातील 11 लाख लोकांची होणार सिकलसेल तपासणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिक शहरामध्ये वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशी घुसखोरांना अटक !*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी तीन कोटींच्या खर्चाला मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी संजीव सेठी यांची नियुक्ती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई : क्रिकेट समीक्षक, लेखक, मुक्त पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांचे ७४ व्या वर्षी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात निधन, शिवाजी पार्क मध्ये होणार अंतीमसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नागपूर येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा चार विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पंढरीनाथ बोकारे, अध्यक्ष, नानक-साई फाउंडेशन, नांदेड 👤 पवनकुमार गटूवार, सहशिक्षक, कुंडलवाडी👤 संतोष कोयलकोंडे, सहशिक्षक, देगलूर👤 पोतन्ना चिंचलोड, येवती👤 विनायक गोविंदराव पारवे👤 खंडू येरकलवाड, बेळकोणी👤 साईनाथ येनगंटीवार👤 कवी बी. एल. खान*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जेपी - जयप्रकाश नारायण*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" धैर्य हे प्रेमासारखे आहे. नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विदर्भात भारद्वाज पक्ष्याला काय म्हणतात ?२) प्राणी व वनस्पतींना शास्त्रीय नावं देण्याची पद्धत कोणी सुरू केली ?३) प्राणी व वनस्पतींना दिलेला शास्त्रीय नाव किती शब्दांनी बनलेला असतो ?४) 'संशोधक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कोणतंही शास्त्रीय नाव कोणत्या शैलीत लिहिलं जातं ? *उत्तरे :-* १) नपिता ( दारू न पिता ज्यांचे डोळे लाल दिसतात तो नपिता ) २) कॅरोलस लिनियस, स्वीडिश वनस्पती शास्त्रज्ञ ३) दोन ( genus कुल / गोत्र व species जात ) ४) शास्त्रज्ञ ५) तिरकस अक्षरांच्या इटालीक शैलीत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वसाहती अंतराळातील* 📙 ***********************विज्ञानकथाकारांना आकर्षक वाटणारी अंतराळ वसाहतींची कल्पना आता मुर्त ठरू पाहत आहे. १९५७ साली स्पुटनिकने अंतराळ तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. १९६९ मध्ये मानव चंद्रावर गेला. तर १९८०-९० सालच्या दशकात अंतराळवीरांनी पृथ्वीभोवती चक्कर मारणार्या स्पेस शटलसदृश यानात जास्त वेळ राहण्याचे विक्रम सुरू केले. अंतराळ वसाहत म्हणजे अशाच पद्धतीने पृथ्वीभोवताली फिरणारी वसाहतच, जी अंतराळात मानवी जीवनासाठी लागणार्या सर्व सुविधा पुरवू शकेल. अंतराळातील वसाहतीत पृथ्वीपेक्षा सर्वात मोठा जाणवणारा फरक म्हणजे तेथील अतिसूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा. पृथ्वीच्या आकर्षणामुळे प्रत्येक वस्तूला वजन असते. आपल्या शरीराला, मेंदूला, मनाला ह्या वजनाची सवय झालेली असते. अमुक वजन पेलता यावे म्हणून स्नायूंचे गठन झाले असते. अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळजवळ नसल्याने आपण वसाहतीत तरंगू, तसेच वर खालीचा फरक नाही ! पेल्यातला द्रव पेला उघडा केला तर खाली पडत नाही. तो झटकून काढला की, गोळ्याच्या स्वरूपात तरंगतो. अर्थात हे विचित्र अनुभव आपल्याला खातापिताना आणि देहधर्मांसाठी येणार ! अाणि अशा स्थितीत सतत राहिल्याने मानसिक परिणाम काय होतील, ते सतत अभ्यासले जात आहेत. अंतराळात वसाहत उभी करणे वाटते तितके अवघडही नाही; कारण 'वजन' हा गुण नसल्याने सिमेंट काँक्रीटचे भव्य प्रासाद बांधायची सूर नाही, हलके साहित्य चालेल. अशा घरबांधणीचे अर्थातच नवे शास्त्र असेल. शिवाय गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्याने द्रव ठेवायला पेला नको, तसेच दोन द्रवांचे मिश्रण अधांतरी करता येईल. अशा स्थितीचा फायदा घेऊन काही अतिशुद्ध औषधे बनवता येतील, ज्यांना भांड्याचा संसर्ग नाही. धातूंची मिश्रणे (नव्या प्रकारची) करणेसुद्धा अंतराळात शक्य होईल. गुरुत्वाकर्षणविरहित अवस्थेतील वैज्ञानिक प्रयोग इथे करता येतील. एकूण अंतर वसाहत हे आता स्वप्न राहिले नसून विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासातील एक संभाव्य टप्पा आहे. केवळ पृथ्वीवर जागा नाही म्हणून अंतराळात राहावे, असे कोणी म्हणणार नाही. उलट तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन लोकसंख्या काबूत आणणे अधिक व्यवहार्य आहे. परंतु जे औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रकल्प गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर राबवणे शक्य नाही, ते अशा वसाहतीत करता येतील, हे त्यांचे वैशिष्ट्यच. शिवाय अंतराळात जवळजवळ पोकळी असल्याने वसाहतीबाहेरच्या पोकळीतदेखील वेगळे प्रयोग करता येतील. त्यांच्यासाठी पृथ्वीवर कृत्रिम पोकळी निर्माण करणे खर्चाचे असेल.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तान्हेलों भुकेलों । तुझेनि नामें निवालों ॥१॥ तहान नेणें भूक नेणें । अखंड पारणें नामीं तुझ्या ॥२॥ अमुतलिंग केशव हा चित्तीं । तेणें नामया तृप्ति अखंडित ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्याला हवे ते स्थान किंवा पाहिजे ती प्रसिद्धी आजकाल पैशाने सर्वच काही विकत घेता येऊ शकते. पण, जो पर्यंत आपले अवयव साथ देतात आणि हातात पैसे असतात तोपर्यंत विकत घेतलेल्या वस्तूंना महत्व असते.जेव्हा हेच ,आपल्या हातातून हळूहळू दूर व्हायला लागतात तेव्हा, मात्र जवळचे जिवलग मित्र सुद्धा अनोळखी होतात.म्हणून पैसे अशा ठिकाणी खर्च करावा जेथे आपण नसताना सुद्धा त्या पैशाची किंमत झाली पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अंतःकरणातील दुःख*एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी उन्ह खात बसल्या असता त्यापैकी एकजण दुसरीस म्हणाली, 'आमची स्थिती मोठी शोचनीय आहे ! आम्ही फक्त जिवंत आहोत एवढंच, बाकी सगळ्या जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. आमच्या क्षुद्रतेचा धिक्कार असो ! यापेक्षा रानातल्या वार्यासारख्या उड्या मारणार्या हरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती !' हे बोलत असताच एक हरिणामागे लागलेल्या शिकारी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला व धावून थकलेल्या हरणाचा जीव कुत्र्याने घेतलेला तिने प्रत्यक्ष पाहिला. त्यावेळी दुसरी घोरपड आपल्या स्थितीविषयी कुरकुरणार्या पहिल्या घोरपडीला म्हणाली, 'ज्या हरणाचं जीवन आपल्याला मिळावं अशी इच्छा तू करीत होतीस त्या हरणाची स्थिती किती भयंकर आहे, हे आता प्रत्यक्षच पाहा अन् ज्या मोठेपणाबरोबर अनेक दुःखही भोगावी लागतात तो मोठेपणा देवाने आपणास दिला नाही याबद्दल त्याचे आभार मान !'*तात्पर्य :- बाह्य रूपावर जाऊन फसू नये, कारण त्याच्या अंतर्यामी दुःख असण्याचीच शक्यता असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment