✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 फेब्रुवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⭕ *_ या वर्षातील ४२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_महत्त्वाच्या घटना:_* ⭕•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०११: १८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्‍नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.**१९९९: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.**१९९०: २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका**१९७९: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.**१९२९: पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या ’लॅटेरान ट्रिटी’ या विशेष करारानुसार ’व्हॅटिकन सिटी’ हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले. कॅथॉलिक ख्रिश्चनांचे हे प्रमुख धर्मपीठ आहे.**१८३०: मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.**१८१८: इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.**१७५२: पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्‌घाटन झाले.**१६६०: औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनेची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.* ⭕ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: शर्लिन चोप्रा -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल**१९८५: डॉ. कैलास देवराम सलामे -- ग्रामीण कवी**१९८४: अनुष्का मनचंदा -- भारतीय गायिका, संगीतकार**१९८१: आमीन मुजफ्फर सय्यद -- कवी* *१९६९: भीमराव भगवान ठवरे -- लेखक, कवी**१९६६: प्रज्ञा दया पवार(प्रज्ञा लोखंडे) -- प्रसिद्ध,मराठी कवयित्री आणि गद्य लेखिका**१९६५: प्रा. डॉ. विलास भवरे -- लेखक* *१९५७: टीना अंबानी -- भारतीय अभिनेत्री**१९५०: पास्कल (पास्को) लोबो -- कवी, संपादक* *१९४६: काशिनाथ सेवकराम भारंबे -- प्रसिद्ध लेखक,कवी,प्रकाशक* *१९४६: वसुधा पवार -- लेखिका* *१९४६: वसंत बंडोबा काळे -- प्रसिद्ध विज्ञान लेखक**१९४५: कृष्णकांत गणपत लोणे -- कवी, लेखक तथा निवृत्त बँक शाखा व्यवस्थापक**१९४२: गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथा लेखिका आणि कवयित्री (मृत्यू: १ मार्च २००३ )**१९४१: श्रीनिवास दादासाहेब पाटील -- माजी राज्यपाल, माजी खासदार तथा निवृत्त सनदी अधिकारी**१९३७: बिल लॉरी – ऑस्ट्रेलियन क्रिकेटर**१९३५: ललिता नरहर बापट -- प्रसिद्ध लेखिका* *१९३१: लीला चंद्रशेखर धर्मपुरी -- लेखिका**१९२७: प्रा. दत्तात्रेय पांडुरंग आपटे -- अर्थशास्त्राचे अभ्यासक, संशोधक व लेखक*/*१९२६: त्यागराज बाबूराव पेंढारकर -- ज्येष्ठ छायाचित्रकार (मृत्यू: २८ सप्टेंबर २०१८ )**१९१७: सिडनी शेल्डन -- अमेरिकन लेखक (मृत्यू: ३० जानेवारी २००७ )**१९१२: त्रिलोक कपूर -- भारतीय अभिनेता (मृत्यू :२३ सप्टेंबर १९८८)**१८५०: शंकर रामचंद्र हातवळणे -- लेखक (मृत्यू:२७ फेब्रुवारी १९०५)**१८४७: थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक (मृत्यू: १८ आक्टोबर १९३१ )**१८३९: अल्मोन स्ट्राउजर – अमेरिकन संशोधक [टेलिफोन एक्सचेंज] (मृत्यू: २६ मे १९०२ )**१८००: हेन्‍री फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे (मृत्यू: १७ सप्टेंबर १८७७ )*⭕ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: रवी टंडन -- चित्रपट दिग्दर्शक निर्माता कथा लेखक (जन्म:१७ फेब्रुवारी १९३५)**१९९३: सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक,पटकथाकार व कवी (जन्म: १७ जानेवारी १९१८ )**१९८९: पंडित नरेंद्र शर्मा -- हिंदी भाषेतील भारतीय लेखक,कवी आणि गीतकार(जन्म: २८ फेब्रुवारी १९१३ )**१९७७: फक्रुद्दीन अली अहमद – भारताचे ५ वे राष्ट्रपती.१९७४ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसतर्फे ते निवडून आले.२५ जून १९७५ रोजी आणीबाणीची घोषणा त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आली.(जन्म: १३ मे १९०५ )**१९६८: पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ,अर्थतज्ञ,समाजशास्त्री,इतिहासकार, पत्रकार,राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक (जन्म: २५ सप्टेंबर १९१६ )**१९४२: जमनालाल बजाज – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते,स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४ )**१६५०: रेने देकार्त – फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ (जन्म: ३१ मार्च १५९६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फ्रेश मॉर्निंग बुलेटिन समुहात add होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आजपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ. 15 लाखाच्या वर विद्यार्थी देणार आज इंग्रजी विषयाचा पेपर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दहा किंवा त्यापेक्षा कमी पटाच्या जिल्हा परिषदांच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक भरती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने केला रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई - ग्रामीण महिलांना कला कौशल्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या प्रयत्नात सहाय्यक असलेल्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनास आजपासून सुरुवात होत आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशात लवकर जनगणना करा, सोनिया गांधीनी राज्यसभेत उठवला आवाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्राकडून महाराष्ट्राला सोयाबीन खरेदीसाठी 24 दिवसाची मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिकेचा युवा सलामीवीर मॅथ्यू ब्रिट्झकेने न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणातच रचला इतिहास, पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात दीड शतकी खेळी करणारा जगातील बनला पहिला फलंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 माधवराव हिमगिरे, उपक्रमशील शिक्षक, धर्माबाद👤 रविशंकर बोडके, पंचायत समिती, हदगाव👤 राणी पद्मावार👤 प्रभाकर भेरजे👤 कृष्णकांत लोणे👤 प्रमोद शिंदे👤 आदित्य पलीकोंडलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*देशबंधू - चित्तरंजन दास*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्य हाच वाणीतील मध, सत्य हाच धर्मातील प्राण होय. त्यातूनच विश्वप्रेमाचा उगम होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) चीन या देशाचे राष्ट्रीय फूल कोणते ?२) महात्मा फुलेंनी शिक्षित केलेली पहिली महिला कोण ?३) जगातली पहिली रेल्वे सेवा कोणत्या देशात सुरू करण्यात आली ?४) 'स्वेद' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'कुस्तीगीरांचा जिल्हा' म्हणून ओळखले जाते ? *उत्तरे :-* १) ब्लॉसम २) सावित्रीबाई ३) इंग्लंड ( सन १८२५ ) ४) घाम, घर्म ५) कोल्हापूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 तोंडाला पाणी का सुटतं ? 📒आपल्या तोंडात लाळग्रंथी असतात. त्यांचे काम तोंडात लाळेचा स्राव करण्याचं असतं. लाळेमध्ये असलेले काही पाचक पदार्थ व विकरं अन्नाच्या पचनात मोलाची भुमिका बजावत असतात. त्यामुळे जेव्हा आपण अन्नाचा घास तोंडात घेतो तेव्हा या ग्रंथींमधुन आपोआप लाळेचा पाझर व्हायला सुरुवात होते. त्या घासाचे दातांकडुन तुकडे पडत असताना त्यात लाळ मिसळुन त्यातल्या विकरांमुळे म्हणजेच रासायनिक कातर्‍यांमुळे त्यातील रसायनांच्या रेणुंचे तुकडे व्हायला सुरुवात होते. पचन व्हायला तिथुनच सुरुवात होते. या ग्रंथी काहीवेळा अधिकच उत्साह दाखवतात. त्यामुळे घास प्रत्यक्षात तोंडात पडण्यापुर्वी त्याच्या येण्याची वाट न पाहताच त्या कामाला लागतात. आपण अन्नाची चव जशी जिभेनं घेत असतो तशीच ती नाकानेही घेत असतो. खरं तर अन्नाचा स्वाद आणि सुगंध या दोन्हींचा एकत्र वापर करुन आपण अन्नाची चव चाखत असतो. त्यामुळे आवडत्या किंवा मसालेदार पदार्थांचा सुगंध वातावरणात दरवळु लागला की त्या वासानंच आपली भुक चाळवली जाते. सहाजिकच तो पदार्थ आपल्या तोंडात कधी पडतो, याचीच वाट आपण पाहु लागतो. त्या भावनेपोटी मग आपल्या मेंदुतील विवक्षित मज्जापेशी उत्तेजित होतात. त्या आपलं काम करायला सुरुवात करतात आणि लाळग्रंथींना संदेश पाठवु लागतात. त्यांना प्रतिसाद देत मग त्या ग्रंथी कार्यान्वित होतात. त्यांच्यामधुन लाळेचा पाझर होऊ लागतो. यालाच आपण पाणी सुटणं असं म्हणतो. काही वेळा अन्नाला तसा सुवास नसतो. पण तो पदार्थ पाहुनही मज्जापेशी चाळवल्या जातात आणि लाळग्रंथींना आदेश मिळतो. तोंडाला पाणी सुटतं ते यामुळेच. अशारितीनं ती एक प्रतिक्षिप्त म्हणजेच आपोआप होणारी घटना आहे.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुज नेणों ग महेशा । म्हणुनि आलों गर्भवासा । अंध कूपीं पडिला जैसा । रात्रिदिवसा तो नेणों ॥१॥ तुझिया नामाची सांगडी । देई ते न खंडी । पावेन मी पैलथडी । त्या सांगडी आधारें ॥२॥ कामक्रोधादि जलचरीं । कासाविस जालों भारी । व्याकुळ होय चिंतालहरी । दुःखें भारी दाटलों ॥३॥ कल्पना वेली गुंडाळली पायीं । तेणें बुडें विषडोहीं । भंवतें पाहे तंव कोण्हे नाहीं । मग तुज ध्यायीं विश्वेशा ॥४॥ मज बांधुनी कर्मदोरी । घातलें संसारा दुर्धरीं । मायानदीचां महापुरीम । वाहावलों गा दातारा ॥५॥ ऐसा खेदखिन जालों बहुवस । न देखें विश्रांतीची वास । विनवी नामा विष्णुदास । गर्भवास पुरे आतां ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीविषयी नको त्या शब्दात बोलून त्याच्या विषयी इतरांना सांगत फिरणे म्हणजे स्वतःच्या मनाचे समाधान करणे होय.पण,हे सर्व सहजपणे आपल्याला जमत असते. पण,त्याच व्यक्तीमधील चांगल्या गुणांविषयी सांगणे का बरं जमत नाही. ? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून कोणाविषयी चांगले बोलणे होत नसेल तर वाईट ही बोलू नये.कारण जेवढे आपण इतरांविषयी वाईट बोलत असतो त्या क्षणापासून आपलेही नाव एका वेगळ्या यादीत समाविष्ट होत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *समाधान*एकदा काही कोळिणींना बाजारातून गावी परतण्यास वेळ झाला. अंधार पडला म्हणून वाटेत एका फुलबागेच्या शेजारी झोपडीजवळ त्या विश्रांतीसाठी थांबल्या. माळी म्हणाला, "बायांनो ! रात्र खूप झाली आहे, या गरीबाच्या झोपडीत रात्र काढा आणि पहाटेस निघा."कोळिणींना ते पटले, त्या सार्याजणी त्या वृद्ध माळीबाबांच्या झोपडीत मुक्कामास राहिल्या. पण त्यांना त्या झोपडीत जराही झोप लागली नाही. त्या रात्रभर इकडून तिकडे, या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहिल्या. त्या खोलीतील एका कोपऱ्यात चमेलीच्या फुलांनी भरलेली करंडी होती. त्या फुलांचा सुगंध असह्य झाल्यानेच कोळिणींना झोप येत नव्हती. काही वेळाने एक कोळीण उठली. म्हणाली, "हा दुर्गंध काही जात नाही. वाढतोच आहे." असे म्हणून तिने आपल्या मासळीच्या टोपलीवर थोडे पाणी टाकले. ती टोपली उशाशी घेताच तिला गाढ झोप लागली.* तात्पर्य : कोणाला कशाने समाधान लाभेल, हे ज्याच्या त्याच्या सवयीवर अवलंबून असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment