✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 फेब्रुवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18Un67MG6B/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🪩 *_जागतिक कडधान्य दिन_* 🪩••••••••••••••••••••••••••••••••• 🪩 *_ या वर्षातील ४१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🪩 *_महत्त्वाच्या घटना:_* 🪩••••••••••••••••••••••••••••••••••••*२००५: उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.* *१९९६: आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या "डीप ब्लू" या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.**१९४९: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना* *१९३३: न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला.या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.**१९२९: जे. आर. डी. टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.* 🪩 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🪩••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: प्रा. डॉ. गजानन कोर्तलवार -- लेखक* *१९७८: अल्पना देशमुख-नायक -- लेखिका* *१९७७: उत्पल वनिता बाबुराव -- कवी, लेखक, संपादक* *१९७६: मारूती शामराव जाधव-- लेखक, कवी**१९७६: सुरेश प्रभाकरराव फुलारी -- कवी* *१९७५: अॅड. सोमदत वसंतराव मुंजवाडकर -- कवी, गीतकार, लेखक* *१९७३: प्रमोद बबनराव खराडे -- गझलकार**१९७२: अर्चना हरबुडे-धानोरकर -- कवयित्री**१९५९: डॉ. जिवबा रामचंद्र केळुस्कर -- कवी, लेखक* *१९५२: डॉ. राधिका टिपरे -- प्रसिद्ध लेखिका**१९४९: मोहन शिवराम सोनवणे -- ज्येष्ठ कवी, लेखक* *१९४६: ओंकारलाल चैत्रराम पटले -- कवी, लेखक* *१९४५: डॉ. सोमनाथ कोमरपंत -- समीक्षक तथा साहित्यिक**१९४५: राजेश पायलट –माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू: ११ जून २००० )**१९३४: चंद्रकांत महामिने -- ज्येष्ठ विनोदी साहित्यिक (मृत्यू: २२ ऑगस्ट २०२१)* *१९३१: नंद रामदास बैरागी (बालकवी बैरागी) -- भारतातील हिंदी कवी, चित्रपट गीतकार (मृत्यू: १३ मे २०१८ )**१९२९: प्रा. डॉ. ग. का. रावते -- प्रसिद्ध लेखक* *१९२४: श्रीकांत नारायण आगाशे -- कवी, कुमारसाहित्यकार (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९८६ )**१९१०: दुर्गा भागवत – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ (मृत्यू: ७ मे २००२ )**१८९४: हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: २९ डिसेंबर १९८६ )**१८०३: जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ (मृत्यू: ३१ जुलै १८६५ )*🪩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🪩••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: १५ जुलै १९०४ )**१९८२: नरहर कुरुंदकर – विद्वान,टीकाकार आणि लेखक (जन्म: १५ जुलै १९३२ )**१९७८: वालचंद रामचंद कोठारी---संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय नेते, प्रतिभाशाली विचारवंत,प्रसिद्ध साहित्यिक आणि समाजहितैषी पत्रकार(जन्म: १३ सप्टेंबर १८९२ )**१९७८: पंडित बाळाचार्य माधवाचार्य खुपेरकरशास्त्री --राष्ट्रीय पंडित,तत्त्वचिंतक, संस्कृत तज्ज्ञ (जन्म: १२ सप्टेंबर १८८२ )**१९२३: विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २७ मार्च १८४५ )**१९१२: सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (जन्म:५ एप्रिल १८२७)**१८६५: हेन्रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ फेब्रुवारी १८०४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज जागतिक कडधान्य दिन त्यानिमित्ताने विशेष माहिती.......... ...... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आज नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये सकाळी 11 वाजता परीक्षा पे चर्चा, पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना संबोधित करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा राजीनामा, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्लीत आप पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी दिला राजीनामा, उपराज्यपालांनी विधानसभा केली बरखास्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आनंदवन या प्रकल्पाला 10 कोटी रु. शाश्वत निधी देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुदतवाढ न दिल्यास कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, सरकारने पुन्हा खरेदी सुरू करावी, किसान सभा आक्रमक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे - लोकमान्य फेस्टिवलमध्ये 27 लाख सूर्यनमस्कारांचा विक्रम, 375 योग साधकांचा सहभाग, 12 गटांत स्पर्धा; सांगलीच्या डॉ. पटवर्धन यांना 'सूर्यदूत' पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कर्णधार रोहित शर्माच्या शतकामुळे कटकमध्ये भारताने इंग्लंडचा 4 विकेटने पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 म. जावेदोद्दीन, अध्यक्ष, उर्दू हायस्कुल, धर्माबाद👤 प्रशांत येमेवार, पोलीस निरीक्षक 👤 जगन्नाथ पांडुरंग दिंडे, सहशिक्षक, नांदेड👤 आमीन जी. चौहान, पुरस्कार प्राप्त शिक्षक यवतमाळ👤 विजय रच्चेवार, नांदेड👤 बाबुराव बनसोडे, सहशिक्षक, नायगाव👤 शंकर जाधव, नांदेड👤 प्रशांत बेडसे पाटील👤 राहूल कतूरवार, धर्माबाद👤 सुधाकर अपुलवाड👤 राजू गोडगुलवार👤 डॉ. प्रकाश बोटलावार👤 अशोक श्रीमनवार, नांदेड👤 कांतराव ( राजू ) लोखंडे, उमरी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वामी विवेकानंद - नरेंद्र विश्वनाथ दत्त*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••केळीच्या पानात पान असते, तसेच ज्ञानी माणसाच्या शब्दाशब्दात ज्ञान असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मानवी हृदयाचे वजन साधारणपणे किती असते ?२) कोणत्या राज्याने स्वतःचे 'इनलँड मॅग्रोव्ह गुनेरी' नावाचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केले ?३) 'तृतीय रत्न' या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे ?४) 'स्वामी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय ? *उत्तरे :-* १) ३६० ग्रॅम २) गुजरात ३) अंधश्रद्धा व ज्योतिषाच्या नादी न लागणे ४) धनी, मालक ५) नरेंद्र विश्वनाथ दत्त *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वातावरणातील वायूंचे उपयोग* 📙 **************************हवेतील वायू माहिती असतातच. त्यांचे प्रमाण, टक्केवारी, गुणधर्म यांबद्दलची माहिती प्रयोगशाळेत व शैक्षणिक वर्गात नेहमीच घेतली जात असते. पण अनेकदा दैनंदिन वापरात या वायूंची माहिती आपण उपयोगात आणत आहोत, हे मात्र लक्षात येत नाही. हवा बंद बाटलीतील एरिएटेड कोल्ड्रिंक पिताना चुरचुरणारी चव व फसफसणारे पेय हवेहवेसे वाटते. आत विरघळवलेला, दाबाखाली असलेला कार्बन डाय ऑक्साइड हे काम करत असतो. हेच पेय उघडे ठेवले, तर दहा मिनिटांनी त्यातील हा वायू निघून गेल्यावरची चव चांगली असेल; पण जिभेला चुरचुरणारी, गार लागणारी गम्मत निघून गेलेली असेल. सिनेमाचे शूटिंग चालू आहे किंवा स्टेजवर डिस्को रंगात आला आहे, त्याच वेळी धुराचे लोट व धुक्याचा थर सर्वांना वेढून टाकण्याचा अभ्यास निर्माण करायचा आहे, याही वेळा कार्बन डाय ऑक्साइडच उपयोगी पडतो. कोरडा बर्फ या प्रकारातील घन कार्बन डायॉक्साईड जेव्हा वायुरूप होतो, तेव्हा हा आभास निर्माण होतो. टॉन्सिल्सचे ऑपरेशन करायचे झाले, तर याच कोरड्या बर्फाचा वापर करून क्रायोसर्जरी पद्धतीने रक्तहीन ऑपरेशन करण्याची पद्धत जपानी सर्जन वापरतात. आग विझवण्याच्या उपकरणात कार्बन डाय ऑक्साइड वापरला जातोच. त्याचा थर आगीवर पसरवून प्राणवायूचा पुरवठा तोडणे हा त्यातील मुख्य हेतू असतो. नायट्रोजनचा व्यवहारात वापर अनेक ठिकाणी केला जातो. फक्त त्याची जाणीव आपल्याला फार क्वचित होते. ज्वालाग्राही पदार्थ, ज्वालाग्राही तेले, जीवनोपयोगी औषधे, साठवणीची धान्य प्लास्टिकच्या बंद पिशव्यांत भरली जातात वा बंद डब्यात भरतात, तेव्हा मोकळी जागा नायट्रोजनने भरण्याची प्रथा आहे. एवढेच काय निर्वात केलेल्या विजेच्या दिव्यातही नायट्रोजन भरला, तर त्यांचे आयुष्य वाढते, अशी विजेच्या दिव्यांचा वापर सुरू झाला, तेव्हाची पद्धत होती. त्यानंतर मात्र अन्य वायूंचा वापर विविध रंग मिळवण्यासाठी सुरू झाला. प्रत्यक्ष नायट्रोजनचा वापर औद्योगिक निर्मितीत फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. उदाहरणार्थ खते, रंग, स्फोटके, इतकेच काय पण भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांतील एक म्हणजे नायट्रस ऑक्साइड हे नायट्रोजन व प्राणवायूचेच संयुग आहे. वातावरणातील मुख्य घटक नायट्रोजन असल्याने त्याची औद्योगिक निर्मिती वा साठवणही सहज शक्य होते. प्रयोगशाळेत व औद्योगिक वापरात याचा एक महत्त्वाचा वापर म्हणजे द्रव स्वरूपातील नायट्रोजन. एखादी गोष्ट अनंत काळपर्यंत टिकवायची असेल, तर याच्या तापमानाला ठेवायची व्यवस्था केल्यास ती नक्की टिकेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. उदाहरणार्थ जिवंत पेशी या तापमानाला गोठवून पुन्हा पाहिजे त्या वेळी त्यांना नेहमीच्या तापमानात आणता येईल, या दिशेने सतत प्रयोग चालू असून त्यांना यश येत आहे. प्राणवायूशिवाय सजीव जगू शकत नाही. पण याच प्राणवायूचा अशुद्ध पदार्थ शुद्ध करायला गमतीदार वापर केला जातो. लोखंडापासून पोलाद बनवताना त्याची शुद्धता वाढवायला उकळत्या लोखंडाच्या रसात प्राणवायू सोडला जातो. त्याच्या सान्निध्याने अशुद्ध कण चक्क जळून नष्ट होतात, राहते ते शुद्ध लोखंड. हा सोपा उपाय अन्यही काही धातूंच्या शुद्धीकरणात वापरला जातो. शोभेची दारू व स्फोटके यांना हवेतील प्राणवायूचा पुरवठा कमी पडतो. त्यासाठी त्यातच ऑक्सिडायझर मिसळून त्यातून मोठ्या प्रमाणावर प्राणवायू पुरवण्याची व्यवस्था केली जाते. आजार्याला दिला जाणारा प्राणवायू तर सर्वांना माहिती आहेच. त्याचेच सुटसुटीत भावंड पाणबुडे व गिर्यारोहक वापरतात. हायड्रोजनचा वापर तेलापासून वनस्पती तूप व मार्गारीन बनवण्यासाठी केला जातो. तूप म्हणून वापरात असलेले डालडा हे वनस्पतिज तेलावरील हायड्रोजनेशन प्रक्रियेतून तयार होत. बलुन्समध्ये हेलियमचा वापर केला जातो. जखमा धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधासाठी म्हणजे हायड्रोजन पॅराॅक्साइडसाठी हायड्रोजनची गरज असतेच. हायड्रोजनचा वापर इंधन म्हणूनही करता येतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुज दिलें आतां यत्न करी याचा । जीवभाव वाचा काया मनें ॥१॥ भागलों दातारा शीण जाला भारी । आतां मज तारी अनाथासी ॥२॥ नेणताम सोसिली तयांची आटणी । नव्ह्तीं हीं कोणी कांहीं माझीं ॥३॥ वर्स नेणें दिशा हिंडती मोकाट । इंद्रिय सुसाट सर्व पृथ्वी ॥४॥ येरझार फेरा शिणलों सायासीं । आतां ह्रषिकेशी अंगिकारीं ॥५॥ नामा म्हणे मन इंद्रियाचें सोयी । धांव यासी कायी करुं आतां ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांच्या जीवनात सुख, समृद्धी पाहिजे तेवढ्या प्रमाणात नसते तसेच प्रत्येकाला दु:ख नसेलच असेही नाही. सुख आणि दु:ख हे, मानवी जीवनाशी कायम जुळून राहतात.तेव्हाच कुठेतरी कोणाचे दु:ख बघून डोळे भरून येतात.आणि सुख असते तेव्हा क्षणभर आराम सुद्धा मिळत नाही हेही सत्य आहे. म्हणून सुखात असताना कोणाचे मन दुखेल अशा कोणत्याही शब्दात बोलू नये व दु:ख असेल तर रडत बसू नये.कारण, पुढची वाटचाल स्वतःलाच करावी लागते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विश्वासघात*करढोक नावाचा एक पक्षी नदीकाठी राहून व पाण्यात बुड्या मारून मासे धरून खातो. या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसेनासे झाले. त्यामुळे काहीतरी ढोंग करून आपला चरितार्थ चालवण्याचा त्याने विचार केला, 'तो ज्या कालव्याजवळ बसला होता, त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता, तो म्हातारा करढोक त्याला म्हणाला, 'अरे, तुला तुझ्या स्वतःच्या नि तुझ्या भाऊबंदांच्या जिवाबद्दल जर थोडी-बहुत काळजी वाटत असती तर कालव्याचा मालक एकदोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे, याकरता तुम्ही आपले जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय करा.' हे ऐकून तो मासा पाण्याच्या तळाशी गेला आणि सगळ्या माशांची सभा भरवून तो करढोकाचा निरोप त्याने सांगितला. तो ऐकताच आपल्यावर येणार्या संकटाची सूचना देणार्या त्या करढोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचविण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या करढोकास कळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणार्या माशावर सोपविले. त्याप्रमाणे त्याने करढोकास जाऊन आपला ठराव त्याला कळविला. तो ऐकताच करढोक त्याला म्हणाला, 'या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजारच्या तलावात नेऊन पोहचवीन. ती गोष्ट माशांनी कबूल केली. मग करढोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडले व थोड्याच दिवसात त्या सर्वांना गट्ट केले.तात्पर्य - शत्रूच्या गोड शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडणे हा मूर्खपणा होय.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment