✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 फेब्रुवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛟 *_ या वर्षातील ३९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.**१९८४: वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची स्थापना**१९७१:NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.**१९६०:पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर ’हिंदकेसरी’ बनले.**१९४२:दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.**१९३६:१६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या ’बँक ऑफ महाराष्ट्र’चे कामकाज सुरू झाले.**१९३१:महादेव विठ्ठल काळे यांनी 'आत्मोद्धार' नावाचे पाक्षिक सुरू केले.**१८९९:रँडचा खून करण्यार्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडल्या* 🛟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: अॅड.संदीप सुधीर लोखंडे -- लेखक**१९९८: ऋषिकेश मठपती -- कवी* *१९८८: रुचा हसबनीस-जगदाळे -- भारतीय अभिनेत्री* *१९८८: प्रा. गणेश विठ्ठलराव मोताळे -- लेखक* *१९८८: सविता देविदास बांबर्डे -- लेखिका**१९६८: डॉ. ज्योती प्रदीप तुंडूलवार --लेखिका* *१९६४: डॉ. अर्चना जगदीश गोडबोले -- लेखिका तथा जंगल पर्यावरण अभ्यासक**१९६३: मोहम्मद अजहरुद्दीन – भारतीय क्रिकेटपटू**१९५८: राजीव शांताराम थत्ते -- लेखक**१९५८: प्रदीप शांताराम पटवर्धन -- भारतीय अभिनेते आणि विनोदी कलाकार (मृत्यू: ९ ऑगस्ट २०२२ )**१९५४: रेणू वामन देशपांडे -- कवयित्री, लेखिका* *१९४९: ज्योती सुभाष म्हापसेकर -- मराठी साहित्यिक, स्त्री मुक्ती संघटना या संस्थेच्या अध्यक्षा**१९४९: मोहन सीताराम द्रविड -- मराठी भाषेतील लेखक**१९४८: प्रा. न. मा. जोशी -- ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत**१९४१: जगजीतसिंग – गझलगायक (मृत्यू: १० ऑक्टोबर २०११)**१९३९: सुधीर मोघे -- मराठी कवी, गीतकार व संगीतकार (मृत्यू: १५ मार्च २०१४ )**१९३७: प्रा. यशवंत नारायण जोशी -- लेखक**१९३१: यशवंत गोविंद जोशी -- लेखक**१९२५: शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका (मृत्यू: २७ सप्टेंबर २००४ )**१९२१: कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे -- मराठी कीर्तनकार आणि लेखिका (मृत्यू: ११ सप्टेंबर २०१० )**१९११: प्रा. दया पटवर्धन -- लेखिका* *१९०९: प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (मृत्यू: ३ जानेवारी १९९८ )**१८९७: डॉ. झाकिर हुसेन – भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्न (मृत्यू: ३ मे १९६९ )**१८४४: गोविंद शंकरशास्त्री बापट – भाषांतरकार (मृत्यू: ६ मार्च १९०५ )**१८३४: दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २ फेब्रुवारी १९०७ )**१८२८: ज्यूल्स वर्न – फ्रेन्च लेखक (मृत्यू: २४ मार्च १९०५ )**१७००: डॅनियल बर्नोली – डच गणितज्ञ (मृत्यू: १७ मार्च १७८२ )**१६७७: जॅक्स कॅसिनी – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: १६ एप्रिल १७५६ )* 🛟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: दत्तात्रय भास्कर उर्फ काकासाहेब चितळे -- चितळे उद्योगसमुहाचे ज्येष्ठ संचालक**२०१९: विष्णू सूर्या वाघ -- गोव्यातील कवी, नाटककार (जन्म: २४ जुलै १९५४ )**१९९९: डॉ. इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका (जन्म: १४ मे १९२६ )**१९९५: भास्करराव सोमण – भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल. १९६५ च्या भारत - पाक युद्धकाळात ते नौदलप्रमुख होते. (जन्म: ३० मार्च १९१३ )**१९९४: गोपाळराव देऊसकर – ख्यातनाम चित्रकार (जन्म: ११ सप्टेंबर १९११ )**१९९४: यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशाकार, इतिहास संशोधक,इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक (जन्म: १९ जुलै १९०२ )**१९८९: रामचंद्र शंकर वाळिंबे -- टीकाकार, समीक्षक (जन्म: ९ नोव्हेंबर १९११ )**१९७५: सर रॉबर्ट रॉबिनसन – वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १३ सप्टेंबर १८८६ )**१९७१: डॉ.कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, नामवंत साहित्यिक (जन्म:३० डिसेंबर १८८७)**१९२७: बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म: ७ सप्टेंबर १८४९ )**१७२५: पीटर द ग्रेट (पहिला) – रशियाचा झार (जन्म: ९ जून १६७२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जगाला प्रेम अर्पावे .....!*प्रेम या अडीच अक्षरी शब्दात जादुई शक्ती आहे. प्रेमाशिवाय जीवन जगणे अशक्यच नाही तर असंभव आहे. प्रत्येक व्यक्ती जीवनात कुणावर नाहीतर कुणावर जीवापाड प्रेम करतो. जन्म देणाऱ्या आई-वडिलावर सर्वांचेच प्रेम असते कारण ते जन्मदाते असतात. भाऊ-बहिणींचा एकमेकींवर अतूट प्रेम असते, हे आपण सर्वचजण जाणतो. संसारातल्या विविध नातेसंबंधात आपणाला पदोपदी प्रेम दिसून येते. ............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उद्या रविवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कृषी व्यापाराला चालना देण्यासाठी ई-नाम प्लॅटफॉर्मचा विस्तार; ई-नाम प्लॅटफॉर्मवरील वस्तूंची संख्या पोहोचली 231 वर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रेसाठी मुंबई ते सावंतवाडी दरम्यान ४ विशेष गाड्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात 14वी भारतीय छात्र संसद, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; पुढील तीन दिवसांत चार महत्त्वपूर्ण सत्रे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लाडकी बहीण योजनेतून 5 लाख लाभार्थी वगळले, आदिती तटकरे यांची महत्त्वपूर्ण माहिती; इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सावधान ! मुंबईत आढळला GBS चा पहिला रुग्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील ठमके, नांदेड👤 शर्मिष्ठा शिवाजीराव देव्हामुख, वसमत👤 राजेश मनुरे, पत्रकार धर्माबाद👤 राष्ट्रपाल सोनकांबळे, येवती👤 रवींद्र भापकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, शिक्षक अहमदनगर👤 राजेश्वर ऐनवाड, सहशिक्षक, धर्माबाद👤 दिलीप खोब्रागडे👤 मारोती पिकलेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राजा मंगळवेढेकर- वसंत नारायण मंगळवेढेकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" मोती बनवून सोन्याच्या साखळीत राहण्यापेक्षा दवाचा थेंब बनून चातकाची तहान भागविणे हे उत्तम. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) डोळ्याने किती टक्के ज्ञान ग्रहण करता येते ?२) आपली ज्ञानेंद्रिये किती व कोणते ?३) 'गुगली' हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?४) 'संदेश' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) चीनने अलीकडेच कोणते AI चॅटबॉट बाजारात आणले आहे ? *उत्तरे :-* १) ८० टक्के २) पाच - डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ३) क्रिकेट ४) निरोप ५) Deepseek ( डीपसीक )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादी फालतू वाटणारी गोष्टसुद्धा जगाला पुढे घेऊन जाऊ शकते. --------------------------------------- पियाँटिक ह्या जनरल मोटर्सच्या शाखेला एके दिवशी एक तक्रार आली. 'माझ्या गाडीला व्हॅनिला आईसक्रीम आवडत नाही' जनरल मोटर्सने साहजिकच ह्यातक्रारीकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तीने हीच तक्रार केली. ह्यवेळीजनरल मोटर्सने त्याची चौकशी करायची ठरवले. त्यांनी त्या व्यक्तिला त्याची तक्रार व्यवस्थित सांगण्यास सांगितले. व्यक्तीने उत्तरदिले की तो, त्याची पत्नी आणि मुले रोज जेवण केल्यावर आईसक्रीम खायला जातात. रोज वेगवेगळे फ्लेवर घेतात. पण ज्या दिवशी ते व्हॅनिला फ्लेवर घेतात त्या दिवशी त्यांची गाडी सुरु होत नाही. जनरल मोटर्सने असे होउच शकत नाही असा दावा केला आणि दुर्लक्ष केले. इतर लोकांनी आणि कंपन्यांनीसुद्धा त्या व्यक्तीची चेष्टा केली. काही दिवसांनी त्या व्यक्तीने परत हीच तक्रार केली. आता मात्र जनरल मोटर्सपुढे त्याची चौकशी करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी आपला एक इंजीनिअर त्या व्यक्तिकडे पाठवला. इंजीनिअरने गाडी चेक केली. सगळे व्यवस्थित असल्यामुळे नाईलाजाने त्याला त्या व्यक्ती सोबत रहावे लागले. रात्री आईसक्रीम खायला जाताना इंजीनिअरपण सोबत गेला. आईसक्रीम खाऊन सगळे घरी आले. दुसऱ्या दिवशी परत आईसक्रीम खायला गेले. व्यक्तीने व्हॅनिला आईसक्रीम आणले आणि काय आश्चर्य त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे गाडी सुरुच झाली नाही. इंजीनिअरने परत गाडी चेक केली, पण सगळे नीट होते. शेवटी त्याने कंपनीला कळवले की व्यक्तीने सांगितलेली तक्रार खरी आहे. कंपनीने इंजीनियरला तिथेच राहून नीट लक्ष देण्यास सांगितले. त्याप्रमाणे इंजीनिअरने प्रत्येक गोष्टीची पाहणी करायला सुरवात केली. रोज त्या व्यक्तीबरोबर आईसक्रीम खायला गेल्यावरकाही दिवसानंतर इंजीनिअरच्या लक्षात आले की ती व्यक्ती जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला गर्दीमुळे वेळ लागतो. पण व्हॅनिला फ्लेवरला जास्त मागणी असल्यामुळे त्याच्यासाठी वेगळे काउंटर होते आणि सर्विस पण तत्पर होती त्यामुळे तो ते घेऊन लवकर येतो आणि नेमकी हीच गोष्ट इंजीनिअरला पाहिजे होती. त्याने त्या गोष्टीवर खूप अभ्यास केला. तेव्हा लक्षात आले की ती व्यक्ति जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला यायला वेळ लागतो. तोपर्यंत गाडीचे इंजिन थोडे गार होते आणि गाडी पुन्हा लगेच चालू होते. पण ती व्यक्ति जेव्हा व्हॅनिला फ्लेवर घेते तेव्हा तो लगेच परत येतो. त्यामुळे गाडीच्या इंजिनला गार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे इंजिन मधील पेट्रोलचे इव्हॅपरेशन होतेआणि ते ब्लॉक होते व परत चालू होत नाही. आणि मग गाडीच्या इंजिनला गार करण्यासाठी लागणारे संशोधन सुरु झाले. जगातील अग्रमानांकित कंपनी मर्सिडीजने कार्ल बेंझ व विलिअम मेयबैकच्या मदतीने १९०१ साली आपल्या मर्सिडीज ३५' साठी पहिला रेडिएटर बसवला जो आजही इंजिनचा अविभाज्य भाग आहे. एखादी फालतू वाटणारी गोष्टसुद्धा जगालाकिती पुढे घेऊन जाते हेच यातून सिद्ध होते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तापत्रयअग्निची जळतसे सगडी । आहाळोनि कोरडी जाली काया ॥१॥ केव्हां करुणाघना वोळसी अंबरीं । निवविसी नरहरी कृपादृष्टी ॥२॥ शोकमोहाचिया झळंबलों जाळीं । क्रोधाचे काजळीं पोळतसें ॥३॥ चिंतेचा वोणवा लागला चहूंकडां । प्राण होय व्याकुळा धांव देवा ॥४॥ धांवधांव करुनाघना तुजविण । नामा म्हणे प्राण जातो माझा ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांचे विचार वेगवेगळे असतात. प्रत्येकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो,प्रत्येकांची राहणीमान वेगळी असते सोबतच प्रत्येकांचा स्वभाव सुद्धा वेगळा असतो. कारण सर्वजण एक सारखे राहिले असते तर कोणी, कोणाला मान दिले नसते किंवा गोड बोलून फसवणूक केले नसते.म्हणून जीवन जगत असताना प्रत्येक माणसांकडून काहीतरी शिकण्याचा आपण प्रयत्न करावा. कारण प्रत्येकांकडे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आणि मार्गदर्शन असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वतःचे अस्तित्व जाणणे*एका बागेतील एका काजव्याने रात्रीच्या वेळी बागेतल्या वाड्यात दिवे पेटले असता त्याचा लखलखीत प्रकाश पाहून, स्वतःचा प्रकाश मिणमिणता आहे अशी कुरकुर चालविली. परंतु त्याच्या बरोबर असलेला काजवा शहाणा होता. तो म्हणाला, 'अरे, थोडा वेळ थांब, आणि काय मजा होते ते पहा.' काही वेळाने त्या वाड्यातील सर्व दिवे विझले व वाडा व काळोखाने भरून गेला. हे पाहून तो शहाणा काजवा आपल्या मत्सरी सोबत्याला म्हणाला, ' मित्रा, हे दिवे थोडा वेळ प्रकाश पाडतात, नि विझून जातात, पण आपली स्थिती तशी नाही. आपला प्रकाश थोडा असला तरी तो कधी नाहीसा होत नाही.'तात्पर्य :- एकदम श्रीमंती येऊन ती पुन्हा लवकर नाहीशी होण्यापेक्षा कायम टिकणारी मध्यम स्थिती फार चांगली. दुसऱ्याच्या दिखाऊ तात्पुरत्या असलेल्या बाबींवर दुर्लक्ष करून आपल्याकडे असलेल्या कायम बाबींवर लक्ष केंद्रित केलेले कधीही उत्तमच.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment