✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 फेब्रुवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18chfeVSDb/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🫧 *_ या वर्षातील ४९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🫧 *_महत्त्वाच्या घटना:_* 🫧••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार' प्रदान**१९९८: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर**१९७९: सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.* *१९६५: ’गांबिया’ला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.**१९४४: भारतीय ज्ञानपीठ संस्थेची स्थापना* 🫧 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🫧••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: अनुपमा ईश्वरन -- भारतीय अभिनेत्री**१९७०: राणी गुणाजी -- भारतीय मराठी अभिनेत्री* *१९६६: साजिद नाडियादवाला -- भारतीय चित्रपट निर्माता**१९६५: मुग्धा चिटणीस -- मराठी चित्रपट अभिनेत्री व कथाकथनकार(मृत्यू: १० एप्रिल १९९६)**१९६६: पुष्पा साळवे -- कवयित्री, लेखिका**१९६२: तुळशीराम दयाराम मापारी -- कवी**१९६०: स्वाती कर्वे -- लेखिका**१९५१: सूर्यकांत व्यंकप्पा धिवारे -- कवी**१९५०: ज्योती मोहन पुजारी --- ज्येष्ठ लेखिका**१९४९: अरुणकुमार निवृत्ती यादव -- कवी, लेखक**१९४८: डॉ. प्रतिभा जयंत काणेकर -- प्रसिद्ध लेखिका, अनुवादिका* *१९३९: सीताराम रामचंद्र रायकर -- लेखक* *१९३८: अशोक सीताराम चिटणीस -- ज्येष्ठ साहित्यिक, संपादक* *१९३१: रामदास शांताराम कामत -- संगीत नाटकांत काम करणारे मराठी गायक नाट्यअभिनेते आणि संगीततज्ञ (मृत्यू: ८ जानेवारी २०२२ )**१९२७: मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी ऊर्फ ’खय्याम’ – भारतीय चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक (मृत्यू: १९ ऑगस्ट २०१९ )**१९२६: नलिनी जयवंत – अभिनेत्री (मृत्यू: २० डिसेंबर २०१० )**१९२२: डॉ. शकुंतला रघुनाथ लिमये -- लेखिका* *१९१९: हरिश्चंद्र लचके -- मराठी नियतकालिकांमधून व्यंगचित्रे रेखाटणारे चित्रकार (मृत्यू: २४ जुलै २००७ )* *१९११: कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर – ऐतिहासिक कादंबरीकार (मृत्यू: २९ जून २००० )**१८९८: एन्झो फेरारी – रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८८ )**१८९४: रफी अहमद किडवाई -- भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि समाजवादी (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९५४ )**१८८३: क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा (मृत्यू: १७ ऑगस्ट १९०९ )**१८८२: यादव माधव काळे उपाख्य अण्णासाहेब काळे --- विदर्भाचे महान इतिहासकार (मृत्यू: ११ मार्च१९४० )**१८७९: किसन फागुजी बनसोडे -- स्वातंत्र्यपूर्व भारतातील दलित चळवळीचे नेते (मृत्यू: १० ऑक्टोबर १९४६ )**१८७१: बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू (मृत्यू: २२ ऑक्टोबर १९३३ )**१८६०: नारायण लक्ष्मण फडके -- मिल्स,व स्पेन्सर यांच्या ग्रंथाचे अनुवादक (मृत्यू: सप्टेंबर १९२० )**१८३६: रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय – स्वामी विवेकानंदांचे गुरू (मृत्यू: १६ ऑगस्ट १८८६ )**१८२३: रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’ – पत्रकार,समाजसुधारक व इतिहासकार.त्यांनी ४३ मराठी ग्रंथ लिहिले. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १८९२ )**१७४५: अलासांड्रो व्होल्टा – इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ५ मार्च १८२७ )**१४८६: योगी चैतन्य महाप्रभू (मृत्यू: १५ जून १५३४ )* 🫧 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🫧••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: उस्ताद अब्दुल रशीद खान -- हिंदुस्थानी संगीताचे एक भारतीय गायक (जन्म: १९ ऑगस्ट १९०८ )**२०१४: अशोक चंदनमल जैन -- मराठी पत्रकार व लेखक (जन्म: ११ एप्रिल १९४४ )**१९९४: पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते.(जन्म: २२ ऑगस्ट १९३५ )**१९९२: नारायण श्रीधर बेन्द्रे – आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेष आत्मसात केलेले चित्रकार (जन्म: २१ ऑगस्ट १९१० )**१९६७: जे.रॉबर्ट ओपेनहायमर – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ,अणूबॉम्बचे जनक (जन्म: २२ एप्रिल १९०४ )**१५६४: मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार (जन्म: ६ मार्च १४७५ )**१४०५: तैमूरलंग – मंगोल सरदार (जन्म: ९ एप्रिल १३३६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चला परिक्षेवर काही बोलू .....*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त, रात्री उशिरा निर्णय, नव्या कायद्यानुसार सरन्यायाधीशांना वगळून निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री चा 20 फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानावर होणार शपथविधी *•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भांडवली खर्च वाढवून वित्तीय तूट कमी करत करदात्यांची क्रयशक्ती आणि गुंतवणूकीत वाढ करण्यावर भर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारताचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी सीमाशुल्क विभागाची उत्तम कामगिरी - वित्तमंत्री निर्मला सीतारामन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त तयार करण्यात आलेल्या संमेलन गीताचं प्रकाशन.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पीएम-आशा या योजनेच्या अंमलबजावणीला केंद्र सरकारची मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 उमाकांत ओमनवार, नांदेड👤 सुवर्णा पाटील👤 निशांत कसबे👤 लक्ष्मीकांत डेबेकर👤 गणेश पाटील👤 सोमेश्वर तांबोळी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बी रघुनाथ - भगवान रघुनाथ कुलकर्णी*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हातावरील रेषात दडलेलं भाग्य शोधत बसण्यापेक्षा मनगटातील कर्तुत्वाचा उपयोग केल्याने भाग्य निश्चित लाभेल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'* मध्ये नोंद झालेली *जगातली सर्वात महाग गायीचे नाव* काय आहे ?२) आंध्रप्रदेशमधील ओंगोल जातीची गाय ब्राझीलमध्ये किती रुपयांना विकली गेली ?३) 'केसरी टूर्स'चे संस्थापक अध्यक्ष कोण होते ?४) 'गाय' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) "एक प्रज्वलित दिवाच दुसऱ्या दिव्याला प्रकाशमान करू शकतो", असे कोण म्हणाले होते ? *उत्तरे :-* १) वियातिना - १९ २) ४१ कोटी ३) केसरी पाटील ४) धेनू, गो, गोमाता ५) रविंद्रनाथ टागोर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 रोपांची मुळं खालच्या दिशेनं, तर खोडं वरच्या दिशेनं का वाढतात? 📒आयझॅक न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला असताना त्याच्या डोक्यावर एक पिकलेलं फळ पडलं, अशी आख्यायिका आहे. डोक्याला आलेल्या झिणझिण्या थांबवता थांबवता न्यूटननं विचार करायला सुरुवात केली होती. त्यातूनच या विश्वात सर्वत्र गुरुत्वाकर्षणाचं बल कार्यरत असल्याची जाणीव झाली, त्या बलामुळंच मग, वर हवेत फेकलेली कोणतीही वस्तू परत जमिनीकडे ओढली जाते, हेही समजून आलं. याला अर्थात अपवाद आहेत. हलकी असलेली पाण्याची वाफ वरच्या दिशेनं उडून जाते. हेलियम किंवा हायड्रोजनसारख्या वायूनं भरलेला फुगाही वर वर उडत जातो; पण केवळ हलक्या असलेल्या वस्तूच अशा वर वर गुरुत्वाकर्षणाच्या बलावर मात करत वरच्या दिशेनं उडत जाताना दिसतात, खरोखरीच त्या वस्तू त्या बलावर मात करतात, की त्यांचं हे वरच्या दिशेनं उडणंही गुरुत्वाकर्षणाच्या बलाचीच किमया आहे?पक्षी मात्र सहजगत्या आकाशात विहरताना दिसतात. त्यांना हे गुरुत्वाकर्षणाचं बल खालच्या दिशेनं ओढत नाही का? की आपले पंख फडफडवत त्या बलावर मात करण्याची किमया त्यांनी साध्य केली आहे? जेव्हा आपण विमानं तयार करायला लागलो आणि त्याच्यात बसून आकाशात झेप घ्यायला लागलो तेव्हा या प्रश्नाचं उत्तर मिळालं. त्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाच्याच मदतीनं आकाशात उड्डाण कसं करायचं, हेही समजून आलं. तर मग जेव्हा जमिनीत पेरलेल्या बीजाला प्रथम मुळं आणि नंतर अंकुर फुटतात तेव्हा त्यांची वाढ एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं कशी होते, याचाही विचार याच अनुषंगानं करायला हवा. मुळं जमिनीत खोलवर जाऊ पाहतात, तर अंकुर आणि त्यातून पुढं तयार होणारी खोडं मात्र वरच्या दिशेनंच वाटचाल करताना दिसतात. बीज पेरल्यानंतर त्याला पुरेसं पाणी मिळालं, त्याची वाढ होऊ लागली, की त्याला प्रथम मुळं फुटतात. त्या मुळांमध्ये असलेल्या संप्रेरकांच्या प्रभावापोटी ती गुरुत्वाकर्षणाच्या बलाचा वेध घेऊ लागतात. या गुणधर्माला जिओट्रॉपिझम असं म्हणतात. त्यामुळं मग ज्या दिशेनं गुरुत्वाकर्षणाची ओढ जाणवते त्या दिशेनं मुळं वाटचाल करू लागतात.दुसऱ्या बाजूला असलेल्या अंकुरांमध्ये वेगळी संप्रेरकं कार्यरत असतात. ती प्रकाशाला प्रतिसाद देतात. साहजिकच ती इवलीशी रोपं ज्या दिशेला प्रकाश असतो त्या दिशेकडे झेपावतात. या गुणधर्माला फोटोट्रॉपिझम असं म्हणतात. त्यामुळे मग गुरुत्वाकर्षणाच्या ओढीकडे दुर्लक्ष करत वरच्या दिशेनं वाटचाल करणं त्या अंकुरांना आणि त्यांचीच वाढ होत उदयाला येणाऱ्या खोडांना शक्य होतं.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझिया चरणाची न संडी मी आस । मग होत गर्भवास कोटिवरी ॥१॥ हेंचि मज द्यावें जन्मजन्मांतरीं । वाचे नरहरी नाम तुझें ॥२॥ कृपेचें पोसणें मी गा येक दिन । माझा अभिमान न संडावा ॥३॥ नामा म्हणे मज चाड नाहीं येरे । इतुकेंचि पुरे केशिराजा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण, आपले दु:ख इतरांना,आपली माणसं समजून सांगत असतो. पण, आपल्या आजूबाजूलाही समाजात अनेक लोक दु:खी आहेत. म्हणून आपले दु:ख इतरांना सांगण्यापेक्षा समाजात दु:खी असलेल्यांच्या विषयी थोडी विचारपुस करून त्यांना आपलेसे करून घ्यावे या कार्याने संपत्ती मिळत नसली तरी मात्र माणुसकीच्या नात्याने त्यांच्यात सहभागी झाल्याने विशेष समाधान मिळत असते.असे प्रयत्न करून बघायला हरकत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वृक्षसेवेतून समृद्धी*एका गावात एक विधवा महिला आणि तिचा जगत नावाचा मुलगा राहत होते. त्यांच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड होते. जगत आईच्या सांगण्यावरून त्या झाडाला रोज पाणी देत असे. त्याच्याजवळचा परिसर स्वच्छ ठेवत असे. एकदा जगत आजारी पडला तरी त्याने झाडाला पाणी देण्याचे व स्वच्छतेचे काम चालूच ठेवले.आजारपणातही हा मुलगा आपली सेवा करत आहे हे पाहून पिंपळवृक्षात निवास करणा-या एका देवतेला खूप समाधान वाटले. जगत जवळ येताच देवता त्याच्याशी बोलू लागली," हे मुला मी तुझ्या या सेवेवर प्रसन्न झालो आहे. तुला जो काही वर पाहिजे आहे तो मागून घे." जगत म्हणाला," हे वृक्षदेवते, मी तुमची सेवा काही मिळवायची अपेक्षा ठेवून करत नाही. तुमच्यामुळे आम्हाला स्वच्छ हवा, सावली आणि लाकूड मिळते. आमच्या जीवनाचा तूच एकमेव आधार आहेस. मला काहीही नको." यावर वृक्षदेवतेने त्याला काहीतरी मागण्याचा हट्टच धरला. तेव्हा जगतने झाडाखाली पडलेली पाने नेण्याची इच्छा व्यक्त केली. पिंपळदेवतेने त्याला अनुमती दिली. जगतने पाने गोळा केली व घरी आणून एका कोप-यात ठेवली. दुस-या दिवशी सकाळी जेव्हा तो व त्याची आई उठून पाहतात तर काय पिंपळाची सगळी पाने सोन्याच्या पानात बदलली होती. जगतने वृक्षदेवतेचे आभार मानले.तात्पर्य – निरपेक्षबुद्धीने सेवा केल्यास आपल्याला फळ निश्चितच मिळते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment