✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 ऑगस्ट 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~लघुकथा Link - http://kathamaala.blogspot.com/2024/01/paisa-samrat.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📌 महत्वाच्या घटना :- • १८३३ : इंग्लंडमध्ये गुलामगिरी प्रथा बंद करणारा कायदा पारित झाला.• १९१४ : पहिल्या महायुद्धात जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले.• १९६६ : नासाने "लुना ऑर्बिटर १" या उपग्रहाच्या मदतीने चंद्राचे छायाचित्र पृथ्वीवर पाठवले.• १९७६ : चीनमध्ये भूकंपामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला.• २००५ : इराकमध्ये नवीन घटनाला मान्यता मिळाली.📌 जन्म :-• १८७२ : रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – प्रख्यात गणितज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत.• १९१९ : प्रभाकर पाध्ये – मराठी कथाकार, कादंबरीकार व समीक्षक.• १९३१ : व्ही. एस. नायपॉल – भारतीय वंशाचे इंग्रजी लेखक, नोबेल पारितोषिक विजेते.• १९७८ : कोबे ब्रायंट – अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू.📌 मृत्यू :-• १९२६ : रघुनाथ काशिनाथ फडके – भारतीय शिल्पकार.• १९८८ : एम. के. त्यागी – स्वातंत्र्यसैनिक व समाजसेवक.📌 जागतिक दिन / विशेष दिन :-🌍 गुलामगिरी स्मृती दिन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - पैसा-सम्राट*लक्ष्मीकांत हा एक करोडपती, त्याला पैश्याची काही कमी नव्हती. तरी तो सुखी व समाधानी होता का ? त्याला कौटुंबिक सुख मिळाले का ? अंत्यसंस्काराला त्याची दोन्ही मुलं नव्हती, तेव्हा त्याच्या आत्म्याला शांती मिळाली असेल का ? ..... पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोलकाता येथे 5200 कोटी रुपयाच्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पाचे उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील अ, ब आणि क वर्ग महापालिकांची प्रभागरचना सोमवारी प्रसिद्ध होणार; राज्य आयोगाकडून 'निवडणूक' कामाला वेग*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अखेर एसआयटी स्थापन; पुणे सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ SIT प्रमुख*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पंढरपूरवरील महापुराचे संकट टळलं; उजनी धरणातून कमी पाण्याचा विसर्ग, मात्र कर्नाटककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गणेशोत्सवापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवरील सगळे खड्डे बुजणार, मुख्यमंत्र्यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ओबीसीत 29 नव्या जातींचा समावेश करण्याच्या हालचाली, राज्य मागासवर्ग आयोगाकडून शिफारशींचा प्रस्ताव, केंद्र सरकार घेणार अंतिम निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर होताच आता ड्रीम-11 ने देखील घेतला मोठा निर्णय, पे टू प्ले हा ऑप्शन रद्द केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सचिन बोरसे, नांदेड ( सध्या जर्मनी )👤 साई पा. नरवाडे, बाभळीकर👤 रामदास पेंडपवार, निझामाबाद 👤 डॉ. सुनील भेंडे, वसमत 👤 प्रा. लक्ष्मी पुरणशेट्टीवार, लेखिका, नांदेड 👤 यादव ढोणे 👤 भारत सर्वे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 59*असे काय आहे, ज्याला मारताना लोकांना खूप मज्जा येते ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - डोळे ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुबळ्याच्या रस्त्यातील अडसर बनलेला पाषाण हा बलवानांच्या मार्गातील यशाचा एक टप्पा पायरी ठरतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक कोणत्या धातूचे असते ?२) भारतीय टी - ट्वेंटी क्रिकेट संघाचा कप्तान कोण आहे ?३) कोणत्या उपकरणाच्या मदतीने ध्वनीचे मापन केले जाते ?४) 'स्वर्गातील इंद्राची बाग' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) शिवाजी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ? *उत्तरे :-* १) चांदी २) सूर्यकुमार यादव ३) सोनोमीटर ४) नंदनवन ५) कोल्हापूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌈 *इंद्रधनुष्य म्हणजे काय ?* 🌈 ************************पावसाळ्याच्या दिवसांत जेव्हा ऊन पावसाचा खेळ चालू असतो, तेव्हा अनेकदा इंद्रधनुष्य दिसते. खरे म्हणजे हा सप्तरंगांचा खेळ असतो. पण तो आकाशात प्रचंड धनुष्य कृतीच्या आकारात समोर उभा ठाकतो. एक टोक लांबवर जमिनीला भिडलेले तर दुसरे आकाशात उंच कुठेतरी अज्ञातात गेलेले. एवढे मोठे धनुष्य इंद्राशिवाय कोणाचे असणार ? म्हणूनच बहुधा याचे नाव इंद्रधनुष्य पडले असावे. जसजसा सूर्य मावळत जातो, तसे इंद्रधनुष्य दिसेनासे होत जाते किंवा समोर पडणारा पाऊस जसा थांबतो, तसे तेही अदृश्य होते.इंद्रधनुष्य दिसण्यासाठी उन्हाची तिरीप पाहिजे. सूर्य माथ्यावर असून उपयोग नाही. पाऊस कोसळत असून उपयोग नाही. तर त्याची भुरभुर पाहिजे. सूर्यकिरण आपल्यामागून येत असणे महत्त्वाचे, तर पाऊस आपल्यापासून पुढे लांबवर पडत असला पाहिजे. हे सगळे जर जमले तर मग इंद्रधनुष्याची रंगत जमली व बराच काळ टिकली असे नक्की समजावे. स्वच्छ प्रकाश हा सप्तरंगांचे मिश्रण असते. तेव्हा एखाद्या पाणी वा काच यांसारख्या माध्यमातून ते किरण प्रवास करतात. तेव्हा वक्रीभवनाची प्रक्रिया घडते. ही प्रक्रिया घडताना जांभळ्या व निळ्या रंगाच्या प्रकाशकिरणांचा, वक्रीभवनाचा कोन जास्त असतो, तर लाल रंगांचे किरण त्या मानाने कमी वक्र पावतात. किरणांचा वेग मंदावण्याने ही क्रिया घडते. ही गोष्ट जशी एखाद्या लोलकाच्या साहाय्याने आपण एखाद्या प्रकाशझोतात बघू शकतो, तशीच पावसाच्या थेंबाच्या रूपाने ही आकाशात घडते. पावसाचे थेंब असंख्य असल्याने प्रकाशकिरणांच्या वक्रीभवनातून हा एक सलग रंगपट्टाच तयार होतो व त्यालाच आपण इंद्रधनुष्याची उपमा देतो. इंद्रधनुष्य केवळ पावसात दिसते, असेच नव्हे, तर विरणाऱ्या धुक्यामध्येसुद्धा एखाद्या दरीच्या पोटातून निघून थेट पर्वतशिखरांना ओलांडून वर जाताना दिसते. किंबहुना अनेक वेळा इंद्रधनुष्य दिसण्याची जागा म्हणजे खोल दऱ्या व त्यांच्या आसपासची गिरीशिखरे होय. दरीतून वरवर जाणारे बाष्पकण व त्यांवर उतरणारे तिरके सूर्यकिरण हे सहजपणे इंद्रधनूचा खेळ दाखवून जातात. विमानातून खाली ढगांवर दिसणारे गोल चक्राकार इंद्रधनुष्य हाही एक अद्भुत प्रकार आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *श्री गणेश वाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ॐ कार प्रधान रूप गणेशाचेहे तिन्ही देवांचे जन्मस्थान ….. || धृ ||अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णूमकार महेश जाणियेला || १ ||ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्नतो हा गजानन मायबाप ….. || २ ||तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणीपहावी पुराणी व्यासाचीया ….. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• खऱ्या अर्थाने ज्याला काहीतरी करून दाखवायचे असते किंवा एखाद्याची मदत करायची असते ती व्यक्ती कधीच बहाणे करत नाही आणि मुळात खोटे बोलत नाही. अशाच व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास केला जातो. पण त्यातच जर एखाद्याचे काम करायचे नसेल किंवा मदत करायची नसेल तर करू नये पण खोटे बोलून स्वतःलाही फसवू नये आणि दुसऱ्यालाही फसवू नये अशा वागणूकीमुळे एखाद्याचे मन दुखावत असते. ते दुखावलेले मन कधीच दिसत नाही. अशा वागणुकीने त्या व्यक्तिंमधील प्रेरकता कमी होण्याची शक्यता असते..🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महिलेचा निर्भीडपणा*एकदा खलिफा उमरला जनतेस मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे भाषणही प्रभावी झाले. अधूनमधून लोकांनी खलिफांना प्रश्नही विचारले. त्यांची खलिफानी समाधानकारक उत्तरेही दिली. खलिफाकडून धर्म आणि नीतीबाबत औत्स्युक्य असणा-या लोकांच्याही प्रश्नांची उत्तरे दिली. याच क्रमाने खलिफाने लोकांना प्रश्न केले. तो म्हणाला,'' जर मी तुम्हाला लोकांना काही आदेश दिला तर तो पाळाल काय'' मोठ्या संख्येने लोकानी सहमती दर्शविली पण एक महिलेने म्हटले,'' नाही, आम्ही तुमचा आदेश पाळणार नाही.'' हे ऐकताच गर्दीतूनही राग व्यक्त झाला. खलिफाने सर्वांना शांत राहण्यास सुचविले. त्या महिलेला याचे कारण विचारले असताती म्हणाली,''तुम्ही तुमचा पायजमा खूपच लांब घातला आहे. माझ्या पतीचा पायजमा गुडघ्यापर्यंतही येत नाही यावरून असे स्पष्ट होते की तुमच्या शाही भांडारामध्ये तुम्ही तुमच्या हिश्श्यापेक्षा जास्त कपडा घेतला आहे.'' महिलेला यातून असे सुचवायचे होते की खलिफाचे बोलण्याप्रमाणे वर्तन नाही. यावर खलिफा म्हणाला,''मला याबाबत माहित नाही पण माझा मुलगा याबाबत उत्तर देईल.'' खलिफाचा मुलगा पुढे आला व त्याने सांगितले,''माझ्या वडिलांनी शाही भांडारातून कपडा घेतलेला नाही. माझ्या हिश्श्याचे कापड मी वडिलांना दिले. सगळ्याप्रमाणेच माझे वडीलही कापड घेत होते त्यात मी वाढ केली'' महिलेचे या उत्तराने समाधान झाले. यावर खलिफा नाराज न होता त्या महिलेला धन्यवाद देऊ लागले कारण खलिफाच्या मते जोपर्यंत जनतेत प्रामाणिक व निर्भीडपणे बोलणारे लोक असणार नाही तोपर्यंत राज्याला किंवा धर्माला धोका नसतो. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment