✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 ऑगस्ट 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Fy9n7S7X3/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🏛️ महत्वाच्या घटना :- • १६३९ – ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी वडीलदारांच्या मदतीने मद्रास (चेन्नई) येथे वसाहत स्थापन केली.• १९०२ – कै. बाळ गंगाधर टिळक यांच्यावर ब्रिटिशांनी राजद्रोहाचा खटला दाखल केला.• १९०७ – भारताचे राष्ट्रगीत “वंदे मातरम्” प्रथमच जपानमध्ये गायले गेले.• १९७९ – केबुल शहरात सौरऊर्जेवर चालणारे पहिले वीज केंद्र सुरू झाले.🎂 जन्मदिवस :-• १७६२ – जॉर्ज चौथा, ब्रिटनचा राजा.• १८६२ – क्लॉड डेब्युसी, फ्रेंच संगीतकार.• १९०२ – पॉल डिरॅक, नोबेल पारितोषिक विजेते इंग्रज भौतिकशास्त्रज्ञ.• १९२० – रे ब्रॅडबरी, अमेरिकन विज्ञानकथा लेखक.• १९३२ – शेख मुजीबुर रहमान, बांगलादेशचे जनक व पहिले राष्ट्रपती.• १९६७ – गणेश आचार्य, प्रसिद्ध बॉलिवूड नृत्य दिग्दर्शक.🕯️ पुण्यतिथी :-• १९२२ – मायकेल कॉलिन्स, आयर्लंडचा क्रांतिकारक नेता.• १९८० – जयप्रकाश नारायण, समाजवादी नेता.• १९८० – रमेश बेंद्रे, मराठी साहित्यिक.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बैलाचा सण : पोळा*शेतीकामासाठी वा अन्य कामासाठी लोकांना उपयोगी पडणारा प्राणी म्हणजे बैल. बळीराजासाठी तो वर्षभर राबराब राबतो, त्याचे ऋण फेडण्यासाठी श्रावण अमावस्याच्या दिवशी जो सण साजरा केला जातो तो म्हणजे बैलपोळा...... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उपराष्ट्रपती निवडणूक; राधाकृष्णन यांच्या पाठिंब्यासाठी फडणवीसांचा शरद पवार-उद्धव ठाकरे यांना फोन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्य सरकारकडून शासन निर्णय : 1 सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकार्यांचे वेतन 26 ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्व नागरिकांना प्रगत एआय टूल्सचे चॅटजीपीटी, जेमिनी, क्लॉड मोफत सबस्क्रिप्शन द्यावे; संसदेत राघव चढ्ढा यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संसदेचे पावसाळी अधिवेशन संपले, एकूण 21 बैठका, ऑपरेशन सिंदूरवर 16 तास चर्चा, जगदीप धनखड यांचा राजीनामा, बिहार SIR वरून गोंधळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा आढावा, 22 महिन्यांत 2.36 लाख प्रमाणपत्रे वितरित; 2.21 कोटी अभिलेखांची तपासणी पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यात अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन सुरू, देशभरातील 12 संस्थांचा सहभाग, विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *शार्दूल ठाकूर मुंबई संघाचा नवा कर्णधार, अजिंक्य रहाणे पायउतार होताच MCA चा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकर हमंद, केंद्रप्रमुख बिलोली 👤 शंकर गंगुलवार, धर्माबाद 👤 आशिष देशपांडे, कुंडलवाडी 👤 शिवा गैनवार, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 58*दोन वाट्या त्यात दोन गारगोट्या**ओळखा पाहू काय आहे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - भेंडी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खऱ्याला मरण नसते आणि खरे जरी क्षणभर मागे पडल्यासारखे वाटले तरी परिणामी त्याचाच जय होतो. हे शाश्वत सत्य आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात सर्वप्रथम परीक्षेत ओपन बुक प्रणाली कोठे व कोणत्या वर्षी सुरु झाली ?२) आगामी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे ?३) भारत व नेपाळ यांच्यातील सीमा किती किमी आहे ?४) 'सुखाच्या मागे लागलेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) महाराष्ट्रात रेल्वे कोच कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ? *उत्तरे :-* १) हाँगकाँग ( १९५३ ) २) भारत व श्रीलंका ३) १,७५२ किमी ४) सुखलोलुप ५) लातूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *जवळच्या नात्यातील व्यक्तीशी लग्न केल्यास काही दुष्परिणाम होतात का ?* 📙एखाद्या व्यक्तीचे शरीर त्याच्या पेशीतील गुणसूत्रांवरच अवलंबून असते. मातापित्यांकडून मुलाला ही गुणसूत्रे मिळत असतात. त्यामुळेच मुलाचे डोळे आई वा वडिलांसारखे असतात. ते कोणासारखे तरी (आई, वडील, मामा, काका इ.) दिसते. हे होण्याचे कारण म्हणजे रक्ताचे नाते असणाऱ्या लोकांमधील गुणसूत्रात साम्य असते. हे साम्य ते एकाच वा सारखी गुणसूत्रे असणाऱ्या पूर्वजांचे वंशज असतात म्हणून असते. मेंडेलच्या अनुवंशिकतेच्या सिद्धांतानुसार प्रत्येक गुणधर्मासाठी, जसे हिरवे डोळे, गुणसूत्रांचा संच असतो. त्यात सर्वस्व गाजवणारे (Dominant) व दबावाला बळी पडणारे (recessive) असे दोन प्रकार असतात. दोन वर्चस्व गाजवणाऱ्या गुणसूत्रांची गाठ पडली, तर तिसराच गुण तयार होतो. एक वर्चस्व गाजवणारे व दुसरे दबावाला बळी पडणारे गुणसूत्र आले, तर वर्चस्व गाजवणाऱ्या गुणसूत्रांची सरशी होते व त्याप्रमाणे बालकात गुणात दिसून येतात. वेगवेगळ्या समाजातील लोक एक एकत्र आल्यास त्यांच्यात असणारी गुणसूत्रे विविध प्रकारची असतात. साहजिकच त्यांच्यातील वर्चस्व गाजवणाऱ्या गुणसूत्रांचाच संकर होऊन निरोगी समाज जन्माला येतो.एकाच समाजात वारंवार लग्न होत गेल्याने त्या समाजातील दबावाला बळी पडणाऱ्या गुणसूत्रांचा संकर होऊन कमी प्रतीचे गुणधर्म मुलाबाळांत येतात. रक्ताचे नाते असलेल्या व्यक्तींनी परस्परांशी लग्न केले तर गुणसुत्रांमधील दबावाला बळी पडणाऱ्या गुणसूत्रांचे गुण मुलाबाळांत येतात. वेडसरपणा, कोड, रक्ताचे विकार, मधुमेह, मज्जासंस्थेचे विकार असे अनेक रोग, अशाप्रकारे लग्न केलेल्या व्यक्तींच्या मुलांना होऊ शकतात. त्यामुळे काका पुतणी, मामा भाची, बहीण भाऊ अशी लग्ने होऊ देऊ नयेत; हेच बरे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कविता - गाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आला आला पोळा*( तीन शब्दाची कविता )आला आला पोळा लोकं झाली गोळा पोळ्याचा हा दिन बैलाचा आहे सण चिखलाचा बैल करू यथासांग पूजा करू सजवू त्याची शिंगे लावू कपाळाला भिंगे पैंजण बांधू पायावरझूल घालू अंगावर बैलासंगे आपणही मिरवू सायंकाळी गावात फिरवू पुरणपोळीचा नैवेद्य देऊसणासुदीचा आनंद घेऊ - नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांच्याकडे सर्वच काही आहे. त्यांना मानसन्मान देणे वाईट नाही. पण ज्यांच्याकडे काहीच नाही अशांचे वास्तव जगणे आणि परिस्थिती व त्यांच्यात असलेलं प्रामाणिकपणा बघून त्यांची मदत जर कोणी करत असेल तर याला माणुसकी धर्म म्हणता येईल. अशा एका मदतीने किंवा त्यांची कदर केल्याने माणुसकी जिवंत राहते आणि इतरांना त्यातून बोध मिळत असतो आणि ज्या माणसाला अशा एका मदतीने जगण्याला आधार मिळतो त्याच आधाराची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आत्मनियंत्रणाचे महत्व*एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्‍ट शिकण्‍यास तयार होत असे. त्‍याने धनुष्‍यबाण तयार करण्‍यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्‍याच्‍यात अहंकार आला, तो आपल्‍या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्या इतका प्रतिभावंत अन्‍य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्‍यांनी जेव्‍हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्‍हा त्‍यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्‍यावी जी आतापर्यंतच्‍या कलांमध्‍ये श्रेष्‍ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्‍याच्‍याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्‍ही कोण आहात. बुद्ध म्‍हणाले,' 'मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्‍यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्‍हणाले, ''जो धनुष्‍यबाण वापरतो त्‍याला त्‍याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्‍याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्‍वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्‍हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्‍यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्‍य तर स्‍वत:ला नियंत्रणात ठेवण्‍याचे असते.तात्‍पर्य :- ज्‍यांना स्‍वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्‍याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परि‍स्थितीत आपल्‍याला आनंदी ठेवतो. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment