✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 ऑगस्ट 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16w1jcKRk9/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- *सदभावना दिवस*• १८२८: राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.• १८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.• १९१७ : अमेरिकेतल्या पहिल्या एरोनॉटिकल सोसायटीची स्थापना.• १९७९ : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पहिले सुवर्णपदक पटकावले.• १९८८ : प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सईद जाफरी यांना ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा किताब मिळाला.• २००८: कुस्तीगीर सुशील कुमारला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.📌 जन्मदिवस :- • १९१३ : प्रसिद्ध मराठी साहित्यिक कवी, गीतकार ग. दि. माडगूळकर• १९४४ : भारताचे सहावे पंतप्रधान, राजीव गांधी• १९४६: इन्फोसिस चे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती• १९४६ : सईद जाफरी, हिंदी व इंग्रजी चित्रपट अभिनेते.📌 स्मृतिदिन :- • १८२८ : फ्रान्सचे प्रसिद्ध लेखक ऑनरे द बल्झॅक • १९३९: भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक एग्नेस गिबर्ने • १९८४: सुप्रसिद्ध जादूगार रघुवीर भोपळे • १९८५: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल • १९८८: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक माधवराव शिंदे • १९९७: गुजराथी नाटककार लेखक प्रागजी डोस्सा • २०००: चित्रपट निर्माते प्राणलाल मेहता • २००१: प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष एम. आर. यार्दी • २०११: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा • २०१३: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर • २०१३: ज्योतिर्भास्कर, लेखक उद्योजक जयंत साळगावकर • २०१४: भारतीय योग प्रशिक्षक व लेखक तसेच आयंगर योगा चे निर्माते बी. के. अय्यंगार • २०२२: भारतीय ऑलिम्पिक फुटबॉलपटू समर बॅनर्जी • २०२२: भारतीय सिरियाक ऑर्थोडॉक्स प्रीलेट ऑस्टॅथिओस पॅथ्रोस• २०२२: भारतीय राजकारणी, खासदार सय्यद सिब्ते रझी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लिहिण्याला पर्याय नाही*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विरोधीपक्षांच्या इंडिया ब्लॉकने उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांचे नाव केले जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, अंतराळात फडकावलेला तिरंगा दिली खास भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लालूंचा मोठा मुलगा तेज प्रताप यांचा नवा पक्ष - जनशक्ती जनता दल, 2024 मध्ये स्थापना, बासरी चिन्हावर बिहारची निवडणूक लढवणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन, पुण्यात होणार ऑगस्टमध्ये आयोजन, 12 संस्थांचा सहभाग, मान्यवरांचा पुरस्काराने गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचं निधन, दीवार, धर्मात्मा, मुन्नाभाई MBBS, लगान, 3 इडियट्स यांसारख्या हिंदी चित्रपटांत केलं काम*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 महेश कुडलीकर, साहित्यिक, देगलूर👤 हरीश बुटले, संपादक तथा संस्थापक डिपर👤 इरेश्याम झंपलकर, शिक्षक, बिलोली 👤 गणेश येवतीकर, धर्माबाद 👤 विजय दिंडे, शिक्षक, धर्माबाद 👤 विवेक सारडे👤 दीपक पाटील 👤 जयपाल दावनगीरकर 👤 प्रमोद मुधोळकर 👤 कांतीलाल घोडके *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 56*दोन पाय मोठे दोन पाय लहान**शेतात राबतो ताकद महान*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - जीभ व दात ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आई, वडील आणि गुरुजन व वडीलधारी माणसे यांच्याशी नम्रतेने वागावे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राष्ट्रचिन्हावरती असलेले देवनागरी लिपीतील 'सत्यमेव जयते' कोठून घेतले आहे ?२) पाण्याचे बाष्पीभवन कोणत्या प्रकारच्या ऊर्जेच्या बदलामुळे होते ?३) रिझर्व बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापल्या जात असत ?४) 'स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या जिल्ह्यातील नापणे धबधब्यावर उभारण्यात आला आहे ? *उत्तरे :-* १) मंडूक उपनिषद २) उष्णता ऊर्जा ३) ब्रिटिश भारत सरकार ४) सांगकाम्या ५) सिंधुदुर्ग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *कोड म्हणजे काय ?* 📙अंगावर पांढरे चट्टे असलेली व्यक्ती तुम्ही पाहिली असेलच ! तुमच्या घरात कोणत्या तरी नातेवाईकाला किंवा शेजाऱ्या-पाजार्‍यांमधील कोणाला असा रोग झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. या रोगाला *'पांढरे कोड'* असे म्हणतात. पांढरे कोड का होते याचे संपूर्ण शास्त्रशुद्ध अशी कारणमीमांसा आपल्याला ज्ञात नसली तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे त्वचेखालच्या मेलॅनिन या रंगद्रव्याच्या प्रमाणात घट झाली तर कोड होते. मेलॅनोसाईट नावाच्या पेशीमधून मेलॅनीन या रंग द्रव्याची निर्मिती होते. या पेशी मेलॅनोसाईट स्टिम्युलेटिंग हार्मोन या अंतःस्रावाच्या प्रभावाखाली कार्य करतात. या सर्व यंत्रणेत कोणत्याही भागात बिघाड झाल्यास कोड होऊ शकते. त्यामुळे त्याला रोग म्हणण्यापेक्षा शारीरिक बिघाड म्हणणे अधिक योग्य.काही प्रकारचे कोड थोड्या प्रमाणात अनुवांशिक आहे. म्हणजे पुढच्या पिढीत ते उतरू शकते. कोडाबद्दल बरेच गैरसमज आहेत. कोड झालेल्या व्यक्तीच्या शेजारी बसल्यास वा तिला स्पर्श केल्यास कोड होईल, असे बऱ्याच जणांना वाटते. हे अत्यंत चुकीचे आहे. कोड हा संसर्गजन्य तर नाहीच. त्यामुळे अशा प्रकारे त्याचा प्रसार होणे अशक्य आहे.कोडामुळे बऱ्याचदा विद्रुपता येते. त्यामुळे कोड झालेली व्यक्ती न्यूनगंडाची शिकार होण्याची शक्यता असते. त्याबरोबरच समाजात कोडाबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे परिस्थिती जास्तच बिकट बनते. वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या "अमुक तमुक यांचे कोड संपूर्णत: बरे झाले. . ." अशा जाहिरातीकडे या रुग्णांचे लक्ष न गेले तरच नवल ! मग अनेक भोंदू डॉक्टर, वैदू, वैद्य अशा रुग्णाच्या अज्ञानाचा व असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडतात. तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे अगत्याचे आहे. ती म्हणजे कोडावर हमखास परिणामकारक ठरेल असे औषध व उपचार अजून तरी सापडलेला नाही. कोडाच्या उपचारावर संशोधन चालू असून त्यात अतिनील किरणे, काही रसायने वापरून पांढरा झालेला भाग इतर त्वचेसारखा करण्याचे प्रयत्न चालू आहेत.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लंबोदर गिरीजा नंदना देवापूर्ण करी मनोकामना देवा || धृ ||हे मन पावन तव पदी सेवनबुद्धी द्यावी गजानन देवा || १ ||पायी घागुऱ्या वाजती रुणझुणनाचत यावे गजानन देवा … || २ ||एका जनार्दनी विनवितो तुजविद्या द्यावी गजनना देवा … || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या व्यक्तीने आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने वैराग्य धारण केले असते त्याला कशाचीही अपेक्षा नसते. अशा व्यक्तीला व्यर्थ विकार सुद्धा स्पर्श करू शकत नाही. म्हणून ती व्यक्ती, जीवन जगत असताना इतर गोष्टींच्या मागे न धावता कार्य करत असते हीच त्याच्यात असलेली खरी वैराग्यतेची ओळख असते.म्हणून त्याला दु:खी होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून माणसाचा जन्म मिळाला त्यासाठी काहीतरी देणं लागतं हीच भावना आपल्यात असायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *साधू आणि यक्ष*एक साधू तपश्‍चर्येस एका निर्जन स्‍थळी बसले होते. त्‍या ठिकाणी एका यक्षाचे वास्‍तव्‍य होते. या गोष्‍टीची साधूला कल्‍पना नव्‍हती. ते जेव्‍हा तेथे पोहोचले तेव्‍हा निर्जन स्‍थान पाहून त्‍यांनी तेथेच ध्‍यानधारणा सुरु केली. त्‍या वेळी यक्ष तेथे नव्‍हता. रात्री जेव्‍हा यक्ष तेथे आला तेव्‍हा आपल्‍या जागेवर दुस-यास व्‍यक्तीला पाहून त्‍याला राग आला. त्‍याने मोठ्याने आरडाओरड सुरु केली, पण समाधी अवस्‍थेत असलेल्‍या साधूवर त्‍याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्‍यांना भीती दाखविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु ते ध्‍यानस्‍थ असल्‍याने त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्‍याचा प्रयत्‍न केला. कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्‍हा अशा जंगली प्राण्‍यांची रूपे घेतली तरी साधूच्‍या ध्‍यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्‍याने विषारी सापाचे रूप धारण करून त्‍यांना दंश केला तरीही त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम दिसेना. इतक्‍या प्रयत्‍नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्‍याने यक्ष झालेल्‍या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्‍था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्‍यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्‍या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्‍या कृपादृष्‍टीने सापाच्‍या अंगातील विष अमृत बनले. यक्ष साधूंना शरण गेला व त्‍याने त्‍यांना आदरपूर्वक वंदन केले.तात्‍पर्य - एकाग्रता, स्‍नेह आणि प्रेमभावनेने कोणावरही विजय प्राप्त करता येतो. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment