✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 ऑगस्ट 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1C7GxTy2W4/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔥 महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना :-• 1945 – हिरोशिमा दिवस: दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा शहरावर "लिटल बॉय" नावाची अणुबॉम्ब टाकला. या भीषण घटनेत लाखो लोक मृत्युमुखी पडले व ही मानवतेसाठी काळीकपाटी ठरली.• 1962 – जमैका या देशाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.🎂 जन्म :- • 1888 – सर अॅलेक्झांडर फ्लेमिंग, पेनिसिलिन या प्रतिजैविक औषधाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ.• 1928 – अँडी वॉरहॉल, प्रसिद्ध अमेरिकन चित्रकार आणि पॉप आर्ट चळवळीचे प्रवर्तक.🕯️ मृत्यू• 1978 – पोप पॉल सहावा, कॅथोलिक चर्चचे प्रमुख.• 2004 – रूथ एलिस, इंग्लंडमध्ये फाशी दिली गेलेली शेवटची महिला.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हे असं का घडतं ?*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठी सिनेमाला मिळणार अधिक शोज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने स्थापन केली उच्चस्तरीय समिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही, लाडकी बहीण योजनेचा फटका बसल्याची मंत्री छगन भुजबळांची कबुली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ST महामंडळाचं ॲप 'छावा राईड' नावाने धावणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी दिवाळी नंतर; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ राजकारणी सत्यपाल मलिक यांचे वयाच्या 79 व्या वर्षी दिल्लीत झाले निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भिडे वाडा स्मारकाच्या बांधकामासाठी पुण्यात वाहतूक बदल, 25 ऑगस्टपर्यंत छत्रपती शिवाजी रस्त्यावरील वाहतूक रात्री बंद राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. मनिषा मोरे 👤 गंगाधर दगडे, बिलोली 👤 सुदर्शन पाटील जोगदंड, शिक्षक, धर्माबाद 👤 नरसिंह पावडे देशमुख 👤 दिनेश दारमोड 👤 राजेंद्र पोकलवार 👤 दीपक पाटील हिवराळे👤 गणेश धुप्पे 👤 हर्ष पाटील *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 45*माझ्याकडे बऱ्याच Keys आहेत**तरीही मी कोणते कुलूप उघडू शकत नाही**सांगा पाहू मी आहे कोण…?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - घाम ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा क्रोध नम्रतेचे रूप धारण करतो तेव्हा अभिमानही त्याच्यापुढे नतमस्तक होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून दिव्या देशमुख भारताची कितवी महिला ग्रँडमास्टर झाली ?२) श्वसनसंस्थेतील फुप्फुसाचे कार्य काय आहे ?३) भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत ?४) 'डोंगरकपारीत राहणारे लोक' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारताचे पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होणार आहे ? *उत्तरे :-* १) चौथी २) ऑक्सीजन रक्तात शोषून घेणे ३) अमित शहा ४) गिरिजन ५) मध्यप्रदेश*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌞 *सूर्याचं उर्वरित आयुष्य किती आहे ?* 🌞 ************************सूर्य हा एक तारा असला तरी तो चिरंजीव नाही. त्याचाही एक ना एक दिवस मृत्यू होणार आहे. सूर्याचा जन्म अवकाशातील पोकळीत तयार झालेल्या एका धुलीकण आणि वायू यांच्या ढगातून - नेब्युलामधून झाला. त्याला आता जवळजवळ साडेचार अब्ज वर्षं झाली. सुरुवातीला या ढगाला रूप आकार का काहीही नव्हतं. काही लाख वर्षं उलटल्यानंतर त्या ढगामधल्या हायड्रोजन वायूनं पेट घेतला. त्याच्या अणूंचं मिलन होत त्यातून हेलियम अणूंची निर्मिती होऊ लागली. या नाभिकीय प्रक्रियेपायी सूर्य प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करू लागला. तो स्वयंप्रकाशित झाला. त्याचा तारा बनला. तेव्हापासून ही अणूसंमीलनाची प्रक्रिया सूर्याच्या अंतरंगात चालूच आहे. त्या ऊर्जा उत्सर्जनापायी सूर्याकडे केंद्रापसारी बल प्राप्त झाल्यामुळं ते त्याच्या केंद्रभागाकडे खेचणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाला विरोध करत सूर्याला स्थिर बनवत राहिलं आहे.सूर्याच्या अंतरंगातील हायड्रोजन वायूचा साठा अमर्यादित नाही. एक ना एक दिवस तो संपून जाईल. तसं झालं की त्याच्या अंतरंगातल्या अणुभट्ट्या विझतील. त्यानंतर त्यात साचून राहिलेलं हेलियम हे इंधन बनून त्याच्या अणूसंमीलनाची प्रक्रिया सुरू होईल. त्या वेळी सूर्याचं प्रसरण होईल. तो लाल राक्षसी तारा रेड जायंट बनेल. त्यावेळी त्याचा व्यास वाढल्यामुळे तो बुध आणि शुक्र यांना आपल्या कवेत घेईल. ते ग्रह जळून जातील. काही खगोलशास्त्रज्ञांच्या मते कदाचित आपल्या पृथ्वीचीही तीच गत होईल.हेलियमचा साठा ही कालांतराने संपुष्टात येईल. तसं झालं की परत एकदा अणूसंमीलनाच्या भट्ट्या बंद पडतील. त्या वेळी सूर्याच्या बाहेरच्या कडेवरचे पदार्थ उडून जातील आणि सूर्याचं श्वेतबटूत रूपांतर होईल. त्याच्या अंतरंगात फक्त कार्बनच असेल. एखाद्या हिर्यासारखं त्याचं स्वरूप होईल. त्यावेळी त्याचं आक्रमण आजच्या पृथ्वीइतकंच राहील. त्याच्या अंतरंगातली उष्णता त्याचा प्रकाश टिकवून ठेवील; पण अणुभट्ट्या बंद पडल्यामुळे ही उष्णता टिकून राहणार नाही. हळूहळू सूर्याचं तापमान कमी कमी होत जाईल आणि तो विझून जाईल. एक आकाशस्थ गोल म्हणून ही त्याची अखेर असेल. स्वयंप्रकाशित गोल म्हणजे तारा ही व्याख्या आपण प्रमाण मानली, तर ज्या क्षणी त्याचं श्वेतबटूत रूपांतर होईल त्याच क्षणी त्याची तारा म्हणून अखेर होईल. ही वेळ आजपासून साधारण पाच ते सात अब्ज वर्षांमध्ये येईल. अशी खगोलशास्त्रज्ञांची अटकळ आहे; पण तो संपूर्ण विझून जाईपर्यंतचा काळ ध्यानात घ्यायचा म्हटलं तर त्याची अखेर काही हजार अब्ज वर्षांनंतर होईल.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फिरत्या चाकावरती देसी मातीला आकारविठ्ठला तू वेडा कुंभार … || धृ ||माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसाराआभाळाच मग ये आकारातुझ्या घाटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार … || १ ||घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाच्या दैव वेगळेतुझ्या विना हे कोणा न कळेमुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार … || २ ||तूच घडविशी तूच फोडीशी कुरवाळसी तू तूच जोडीशीन कळे यातून काय सांधीशीदेसी डोळे परी निर्मिसी तया पुढे अंधार … || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाचे मन दुखावून स्वतः आनंदीत रहाणे याला माणुसकी म्हणत नाही. बरेचदा अशा वागण्याने एखाद्याच्या मनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून कोणी सावरतात तर कोणी चुकीचे पाऊल उचलतात. म्हणून कोणाचे मन जाणता येत नसेल तर कोणाला दुखावण्याचा प्रयत्न करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ*विचारात गुंग असलेले चोरोबा कुणाच्या तरी अंगावर आदळले. तो एक साधू होता. साधू बघतच चोरोबांना फार आनंद झाला. एकदम लोटांगणच घातले बोवाजीपुढे. बोवाजींनी आशीर्वाद दिला,'' बेटा सुखी राहा!'' तरी चोरोबांनी साधूच्या चरणावरून डोके उचलले नाही, ''बोल, काय हवं तुला ? तू मागशील ते मी देईल.'' ''साधू महाराज , मी एक चोर आहे. मला चोरी करतानाच नेहमी शिपाई पकडतात. तरी अशा वेळी मला कोणी बघू शकणार नाही अस करा .'' साधूबाबांच्या गालाला खळी पडली. ते म्हणाले,' ठीक आहे ! ही घे जादूची भुकटी नाकात ओढताच तू दिसेनासा होशील, '' चोरोबा खुश झाले. चांदोबा डोईवर आला, भुकटी कमरेला खोचून ते कामगिरीला निघाला. सावकाराच घर आलं. चोरोबांनी भिंत पार केली, खिडकीतून तिजोरी जवळ गेले. तिजोरी उघडायचे समान मेजावर ठेवले आणि साधू बाबांचे नाव घेत जादूची भुकटी नाकात कोंबली . ''फड....! फड......!आ ..क शी!!'' चोरोबांना शिंकांनी अगदी हैराण केले. जानवे चाचपत सावकार उठला. दांडे सावरीत नोकर उठले..दिवे लागले... उजेडात तिजोरीशी खाट-खुट करीत असलेले चोरोबा दिसले. ताबडतोब या मंडळींनी चोराला पकडले. भोळसट चोरोबांना जादूची भुकटी चांगलीच भोवली ! कारण ती तपकीर होती . तात्पर्य :- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment