✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 ऑगस्ट 2025💠 वार - श्रावण सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1D5HzBPxPQ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्त्वाची घटनाक्रम :- • १८६८ – फ्रान्समध्ये पॅरिस मेट्रो रेल्वेचे काम सुरू झाले.• १९४५ – नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातग्रस्त झाले अशी घोषणा करण्यात आली.• १९६३ – अमेरिकेतील जेम्स मेरीडिथ या कृष्णवर्णीय विद्यार्थ्याने मिसिसिपी विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.• १९७७ – सोव्हिएत संघाने "सोयुझ-२४" या अंतराळ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले.🎂 जन्म :- • १७७४ – मेरिवेदर लुईस, अमेरिकन शोधक.• १९०० – विजयनगरकर बाबूराव (बाबूराव पेंटर), मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक व कला दिग्दर्शक.• १९१० – फ्लॉरेन्स नाईटिंगेल डेव्हिड, नामवंत ब्रिटिश गणितज्ञ.• १९३३ – रोमन पोलंस्की, प्रसिद्ध पोलिश चित्रपट दिग्दर्शक.• १९४४ – शशी देशपांडे, भारतीय इंग्रजी साहित्यिक.🌹 मृत्यू :- • १८५० – ऑनरे द बल्झाक, फ्रेंच कादंबरीकार.• १९४५ – नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.• १९६७ – जे. रॉबर्ट ओपेनहायमर, अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन शास्त्रज्ञ.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वाढदिवसाची मेणबत्ती विझवण्यापूर्वी .......!*मनुष्याच्या जीवनातील कोणकोणते वाढदिवस खूप महत्वाचे असतात याचा मागोवा घेणारा लेख जरूर वाचा.......... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन NDA कडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत नाव निश्चित, 21 ऑगस्ट रोजी अर्ज दाखल करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुणे :- न्यायाधीश बंडोपंत कुलकर्णी यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन, संत साहित्याचा अभ्यास न्यायदानात मार्गदर्शक ठरतो, न्यायमूर्ती जमादार यांचे मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केरळची ऐतिहासिक झेप, देशातील पहिले डिजिटल साक्षर राज्य, 21 ऑगस्ट रोजी होणार अधिकृत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संगमेश्वरचे सुपुत्र रांगोळी कलाकार सूरज धावडे यांची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोल्हापूर :- सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन, डिव्हिजन बेंचचीही व्यवस्था, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची सोय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या 296 विशेष रेल्वे; ठाणे, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकावर थांबा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कप 2025 साठी भारतीय संघ मंगळवारी जाहीर केला जाणार, 19 ऑगस्ट रोजी मुंबईत बैठकीची पार पडेल आणि त्यानंतर संघाची अधिकृत घोषणा केली जाईल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 समधानी शेख, तंत्रस्नेही शिक्षक, बिलोली 👤 प्रा. गजानन देवकर, भाषा विभाग प्रमुख 👤 शेखर हेमके*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक *इंग्रजी मध्ये असा कोणता शब्द आहे ज्यात डोक्यावरील केस, वारा आणि खुर्ची हे तीन ही शब्द येतात*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - गुलाजाम ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात कितीही दुःख, शल्य, वाईट गोष्टी असल्या तरी जीवनात आनंदही आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अलीकडेच कोणत्या न्यायमूर्तीच्या विरोधात राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला आहे ?२) 'बचपन बचाव' आंदोलनाचे प्रणेते कोण ?३) मानवी हृदय हे किती कप्प्याने बनलेले असते ?४) 'सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे ? *उत्तरे :-* १) न्या. यशवंत वर्मा २) कैलाश सत्यार्थी ३) चार ४) कल्पवृक्ष ५) वाशी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ऑक्टोपस म्हणजे काय ?* 📙 *************************ऑक्टोपस या अष्टपाद जलचराबद्दल त्याने घातलेल्या वेढ्याबद्दल अनेक दंतकथा जगभर प्रचलित आहेत. एखाद्या सिनेमाचा हिरो पाण्यात गेल्यावर त्याला याने घातलेला विळखा व त्यातून त्याने करून घेतलेली सुटका हाही अनेक वेळा सुरस व चमत्कारिकपणे दाखवला गेलेला प्रकार आहे. जमिनीवरचा साप हा प्राणी व पाण्यातला ऑक्टोपस या दोन्हींबद्दल असा टोकाचा दृष्टिकोन मानवाने भीतीपोटी घेतलेला आढळतो. खरे म्हणजे दोन्ही प्राणी विषारी जरूर आहेत; पण मानवाला त्यांच्यापासून मुद्दाम होऊन क्वचितच इजा होते. ऑक्टोपस हा मृदूकाय (Molluse) प्रकारचा प्राणी आहे. त्याला कसलेही कवच नसते. याचे शरीर जेमतेम वीतभर असते पण भुजा मात्र फूटभर लांब असतात. याचे तोंड डोक्याच्या आतील बाजूस बंद केले जाते. डोक्यावर टपोरे डोळे असतात. त्याची दृष्टी तीक्ष्ण असते. त्यामुळे भक्ष्य शोधणे व हल्लेखोरापासून पळ काढणे या दोन्ही गोष्टी त्याला छान जमतात. यासाठी त्याला त्याच्या शरीराच्या ठेवणीची खूपच मदत होते. एखाद्या चेंडूसारखी शरीराची वळकटी करून एखाद्या कपारीत शरीर लोटून दिले की त्याच्यावर हल्ला होऊच शकत नाही. याउलट एखाद्या भक्ष्यावर हल्ला करताना हा तोंडातून पाणी ओढून घेऊन ते शरीरातील एका विशिष्ट नळीवाटे वेगाने बाहेर फेकतो. एखाद्या जेटप्रमाणे बघता बघता हा भक्ष्याजवळ जाऊन पोहोचतो व त्याला आपल्या भुजांनी वेढून टाकतो. याच वेळी त्याच्या तीक्ष्ण दातांनी लहानसा चावा घेऊन थोडेसे विष त्या भक्ष्याला टोचले जाते. भुजांची ताकद व विषामुळे येणारी गुंगी यांमुळे एखादे बळकट भक्ष्यही हा सहज पकडतो व गट्टम करतो. याचे आवडते भक्ष्य म्हणजे समुद्री खेकडे. अर्थातच खेकडे समुद्राच्या किनाऱ्याजवळील ज्या भागात उथळ पाण्यात, कपारीत राहतात तेथेच याचेही वास्तव्य असते.ऑक्टोपस जगभर उथळ पाण्यात आढळतात. याच्या दीडशे जाती आहेत. वीतभर आकारापासून खरोखर अजस्त्र म्हणावा असा पॅसिफिक महासागरात आढळणारा ऑक्टोपस चक्क वीस ते बावीस फूट लांबीच्या भुजा असलेला आढळतो. पण याचेही धड व डोके जेमतेम दीडदोन फुटांचेच असते. अस्ताव्यस्त पसरलेल्या भुजांमुळे हा मोठा वाटतो. ऑक्टोपस हा निशाचर जलचर आहे. खास करून अंधारात हा उदरभरणाला बाहेर पडतो. दिवसा कुठेतरी कपारीत झोपा काढणे याला आवडते. या त्याच्या सवयीमुळेच माणसाशी त्याचा फारसा संबंध खरे म्हणजे येतच नाही. फक्त खास करून ऑस्ट्रेलिया किनाऱ्यावर आढळणारे ऑक्टोपस विषारी डंखाने मानवी मृत्यूला कारणीभूत ठरतात. हा डंखही झाल्याचे कळत नाही, इतका नाजूक असतो. डंख पोहोचणारा माणूस काठावर आला की काही काळाने हृदयक्रिया बंद पडून त्याचा मृत्यू ओढवतो. वांब जातीचा सापासारखा मासा मात्र ऑक्टोपस खाण्यात पटाईत आहे. हा मासाही खूप मोठा म्हणजे सहज आठ दहा फूट लांब व लहान मुलाच्या मांडीएवढा जाड असतो. तीक्ष्ण दातांनी तो बघताबघता याचा फडशा पाडतो. अगदी उथळ पाण्यात, पण डोंगरकपारी असलेल्या भागात मासेमारी करणाऱ्यांना सटीसमासी जाळ्यात अाॅक्टोपस सापडतात. अर्थात एखाद्या जलसंग्रहालयात त्यांची पाठवणी करण्याचा मासेमार प्रयत्न करतात; पण फारच क्वचित हे प्रयत्न यशस्वी होतात. जमिनीवरील काही प्राणी रंग बदलतात. तीच कला ऑक्टोपसच्या काही जातींनाही साध्य आहे. त्याच्या कातडीत असलेल्या काही रंगद्रव्याचा पाण्यातील प्रकाशाप्रमाणे रंग बदलत जातो. त्यामुळे अनेकदा याचे अस्तित्व ओळखणे अन्य प्राण्यांना कठीण होत जाते. ऑक्टोपसची मादी माशांप्रमाणेच कपारीमध्ये अंडी घालते. एका वेळी घातलेल्या अंड्यांची संख्या किती असावी ? एक ते दीड लाख अंडी अगदी सूक्ष्म स्वरूपात एकत्रित करून घातली जातात. पण यातून होणाऱ्या नवनिर्मितीचे प्रमाण मात्र खूपच कमी असते, कारण ही अंडी अनेक जलचरांकडुन नष्ट होतात.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माझिया बोबडिया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला … || धृ ||वारा वाहे भलत्या ठाया, हीच माझी राग छाया … || १ ||गाता येईल तैसेची गावे, मुखी हरी हरी म्हणावे … || २ ||तन मन नेणु देवा, नामा विनवितो केशवा … || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसं बरेच मोठे असतात. जसे की वयाने, अनुभवाने, धनसंपत्तीने तर विचारसरणीने. काहीजण मनाने मोठे असतात. पण,जी व्यक्ती शुन्यातून विश्व निर्माण करत असते ती व्यक्ती नि:स्वार्थ भावनेने मदत करत असते. तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने मोठी असते.अशाच व्यक्तीला निसर्ग सुद्धा वंदन करत असतो.म्हणून स्वतः मोठेपणाची बाजी मारण्यापेक्षा लहान व्यक्तीला नेहमीच मोठ्या मनाने समजून घ्यावे. मोठे होण्यासाठी कुठेही धावाधाव करावी लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरा वेडा कोण ?*एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी अनेक मानसशास्त्रीय चाचण्यांना तोंड द्यावे लागत असे. त्यातील शेवटच्या चाचणीमध्ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्यातील फक्त एकच गोष्ट त्याला उचलण्यास सांगितली जाई. वेड्याने पन्नास रूपये उचचले की त्याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्यास त्याला पुन्हा एकदा चाचण्या पार करायला सांगितल्या जात. गरज पडल्यास पुन्हा उपचारासाठीही पाठविले जाई. हॉस्पीटलमधील एक वेडा शेवटच्या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्या पटापट पार करत असे मात्र शेवटच्या चाचणीला मात्र नापास होत असे. अनेकदा असे घडल्यावर चाचणी घेणारे डॉक्टर कंटाळले व त्यांनी एक युक्ती केली पुढच्या वेळेला त्या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली. हे पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्या आरामात पार करतोस आणि शेवटच्या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्वत:लाच करावा लागणार आहे. त्यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्नास रूपयांची नोट उचलून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून का म्हणून घेऊ''•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment