✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 ऑगस्ट 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16UpuAfG35/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :-• १९४७ – भारताची पहिली महिला पोलीस अधिकारी के. हेमलता पोलीस सेवेत दाखल• १९४७: जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली.• १९५६: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.• २००७: नासा चे फिनिक्स हे अंतराळ यान प्रक्षेपित कण्यात आले.🎂 जन्म :- • १८९४: साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके• १९२९: पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता व पटकथालेखक आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार• १९३१: महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर• १९५०: भारतीय वकील आणि राजकारणी एन. रंगास्वामी• १९६१: अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते बराक ओबामा🌹 मृत्यू :- • १९९७ – जी. एम. करवे, नामवंत मराठी लेखक, समीक्षक व इतिहासकार यांचे निधन.• २०२०: महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चला कवितेच्या जगात*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नागपूर महसूल परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धोरणत्मक निर्णयावर भाष्य, जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ओबीसींच्या जागरासाठी नागपुरातून मंडल यात्रा, 9 ऑगष्टपासून शरद पवार करणार प्रारंभ, विदर्भातील 11 जिल्ह्यांत होणार सभा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शिर्डी नगरपरिषदच्या हद्दीमध्ये ‘नक्शा’ प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोली - राज्यात 03 ते 15 ऑगस्ट काळात अवयवदान पंधरवाडा, विविध उपक्रमाद्वारे होणार जनजागृती, आरोग्य विभागाचा पुढाकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक :- उल्हास-वैतरणा नदजोड प्रकल्पाचे उदघाटन, मंत्री विखे पाटील, छगन भुजबळ यांची उपस्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मतदार याद्यासाठी काम करणाऱ्या बिलओ आणि पर्यवेक्षकांच्या मानधनात केली वाढ, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंड समोर ठेवले 374 धावाचे लक्ष, इंग्लंडला विजयासाठी 35 धावाची गरज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अहमद मुल्ला, शिक्षक, मुखेड 👤 निवेदक विठ्ठल पवार, बीड 👤 व्यंकटेश अमृतवार, उमरी 👤 गणेश गं. उदावंत 👤 शिलानंद बुद्धेवार, बिलोली 👤 अमित सूर्यवंशी👤 प्रभाकर रेब्बावार, देगलूर👤 आनंदराव आवरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 43*मला Head पण आहे.**मला Tail पण आहे.**पण मला Body नाही.**सांगा पाहू मी कोण आहे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - सावली ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रार्थना म्हणजे मौन साधून मागणीरहीत होऊन केलेले आत्मसमर्पण होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मॉर्निंग स्टार/इव्हिनिंग स्टार असे कोणत्या ग्रहाला म्हणतात ?२) पाण्याच्या गोठणबिंदू किती असतो ?३) अल्कोहोलचा गोठणबिंदू किती असतो ?४) 'लोकांचे नेतृत्व करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ कोल्हापूर येथे केव्हा स्थापन होणार आहे ? *उत्तरे :-* १) शुक्र २) ०° सेल्सियस ३) -११४° सेल्सिअस ४) लोकनायक ५) १८ ऑगस्ट २०२५*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *नारू म्हणजे काय ?* 📕नारू, 'नारू निर्मूलन' या गोष्टी अनेकदा ऐकायला मिळतात. तसेच, नारूमध्ये शरीरातून धाग्यासारखे जंतू बाहेर येतात असेही आपण कुठेतरी वाचलेले असते. नारू हा ड्रॅकन्क्युलस मेडीनेन्सीस नावाच्या जंतापासून होणारा रोग आहे. त्वचेखालच्या भागात हा जंत राहतो. या रोगामुळे रुग्ण मरत नसला, तरी हैराण मात्र होतो. नारूची प्रौढ मादी रुग्णाच्या शरीरात सामान्यपणे पायाच्या त्वचेखालील असते. तिची लांबी ५५ ते २२० सेंमी. एवढी असते. तर नर २ ते ३ सेंमी लांब असतो. फलन झालेली मादी रुग्णाच्या अंतः त्वचेत दाह निर्माण करते व परिणामी पायाच्या त्वचेवर फोड येतो. अशी व्यक्ती पाण्यात गेल्यास हा फोड फुटतो व मादी पाण्यात सुमारे १० लाख इतक्या सूक्ष्म अळ्या सोडते. पाण्यातील सायक्लोप नावाचे कीटक या अळ्यांना खातात सायक्लोपच्या शरीरात त्या अळ्यांचा विकास होतो. दुसऱ्या निरोगी व्यक्तीने हे पाणी प्याले, तर पाण्यातील सायवलोप्स त्याच्या पोटात जातात. जठरात सायक्लोपचे पचन होते व या अळ्या बाहेर पडतात. कालांतराने या अळ्या लहान आतड्यातून बाहेर पडतात. मजल दरमजल करत त्वचेखालच्या भागात पोहोचतात.९ ते १२ महिन्यांत अळ्यांची पूर्ण वाढ होऊन त्यांचे मादी व नर तयार होतात व पुन्हा हे चक्र चालू राहते. नारू टाळण्याचे अनेक उपाय आहेत, पण परिणामकारक उपचार नसल्याने त्याचा प्रतिबंध करणेच जास्त महत्त्वाचे ठरते. पायऱ्या असलेल्या विहिरीमुळे याचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे विहिरींना पायच्या नसाव्यात. त्या पक्क्या बांधणीच्या असाव्यात. स्वत:चे संरक्षण करण्यासाठी वारंवार बाहेर खावेप्यावे लागणाऱ्या लोकांनी रुमालाची चौपदरी घडी पाण्याच्या ग्लासवर ठेवावी व पाणी गाळून प्यावे, त्यामुळे सायक्लोप्स पोटात जाणार नाहीत व नारू होणार नाही. पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा, सायक्लोप्स मारण्यासाठी किटकनाशकांचा वापर व लोकांना आरोग्यशिक्षण या तीन मार्गांनी हा रोग नियंत्रणाखाली आणता येईल. भारत सरकारने केलेल्या अविरत परिश्रमांमुळे पाच वर्षापूर्वी या रोगाचे आपण निर्मूलन करू शकलो आहोत. देवी नंतर देशातून निर्मूलन झालेला हा दुसरा रोग आहे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी … || धृ ||बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई … || १ ||पुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती सांगू काय … || २ ||माझी बहिण चंद्रभागा, करीसे पापभंगा … || ३ ||एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण … || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण आपले दु:ख इतरांना, आपली माणसं समजून सांगत असतो. पण आपल्या आजूबाजूलाही समाजात अनेक लोक दु:खी आहेत. म्हणून आपले दु:ख इतरांना सांगण्यापेक्षा समाजात दु:खी असलेल्यांच्या विषयी थोडी विचारपुस करून त्यांना आपलेसे करून घ्यावे या कार्याने संपत्ती मिळत नसली तरी मात्र माणुसकीच्या नात्याने त्यांच्यात सहभागी झाल्याने विशेष समाधान मिळत असते.असे प्रयत्न करून बघायला हरकत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाच लाभ* एकदा एका सिंहाने आणि अस्वलीने एकच झडप घेऊन एका हरणीला यमसदन दाखविले .पण गंमत अशी की ,ही शिकार कोणाची या गोष्टीसाठी सिंहात आणि अस्वलीत चढाओढ सुरु झाली. दोघांचाही संघर्ष समतोल सुरु होता व हे सर्व दृश्य एक कोल्हा लपून बघत होता .त्यांचे युद्ध थांबले .अस्वल आणि सिंह दोघेही थकून जमिनीवर पडले ते एवढे थकले होते की ,त्यांना जागेवरून उठताही येत नव्हते .या सर्व गोष्टींची खात्री करून तो कोल्हा पुढे सरकू लागला .त्याने त्या हरिणीला त्या दोघांमधून उचलून पळवून नेले .तेव्हा तो सिंह म्हणाला ,''अरे ,अरे ! काय आपलं भाग्य बघा .हा एवढा जीवाचा आटापिटा, हा त्रास कशासाठी सोसला? तर या कोल्ह्यासाठी.''तात्पर्य - दोघांच्या भांडणात कधी कधी तिसऱ्याचाच लाभ होतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment