✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 ऑगस्ट 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1XtQS8ETGz/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📜 इतिहासात आजचा दिवस:• १८५८ – ब्रिटीश संसदेमध्ये "गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट" मंजूर, ज्यामुळे भारतात ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपवून ब्रिटीश सरकारने थेट प्रशासन सुरु केले.• १८७६ – व्हाईल्ड वेस्ट शोचे जनक "वाईल्ड बिल हिकॉक" याचा मृत्यू.• १९३२ – महात्मा गांधींनी "हरिजन" या शब्दाचा वापर पहिल्यांदा केला.• १९८० – भारतात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम सुरु करण्याचा निर्णय.🎖️ जन्म :• १९२४ – जेम्स बाल्डविन, अमेरिकन लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता.• १९७५ – सनी देओल, बॉलिवूड अभिनेता आणि राजकारणी.🕯️ पुण्यतिथी :• १९२२ – सर एडवर्ड हेनरी, भारतीय पोलिस सेवेतील "फिंगरप्रिंट सिस्टीम"चे जनक.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विद्यार्थी अप्रगत का राहतो...?*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुणे - रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंडांचे प्रकाशन, अण्णा भाऊंच्या जीवनावर चित्रपट बनवण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोल्हापूरकरांच्या गेल्या 40 वर्षांच्या लढ्याला यश मिळालं असून कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ कार्यरत होणार, नोटिफिकेशन जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधनची खास भेट, जुलै महिन्याचा हप्ता लवकरच होणार जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राणी मुखर्जी सर्वोत्तम अभिनेत्री तर शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना सर्वोत्तम अभिनेतेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अकोला - घरोघर येणाऱ्या घंटागाडी चालकाला द्यावा लागेल आता 50 रुपये महिना, महानगर पालिकेचा दरमहा लाख रुपयांचा खर्च वाचणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाचव्या कसोटी सामान्यात दुसऱ्या दिवशी भारत 224 धावावर सर्वबाद तर इंग्लंड सर्वबाद 247 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जी. पी. मिसाळे, पत्रकार संघटना अध्यक्ष, धर्माबाद 👤 दिगंबर वाघमारे, संपादक, कंधार 👤 आनंद पाटील धानोरकर 👤 दयानंद भूत्ते 👤 दुर्गा डांगे 👤 प्रतिक गाडे 👤 शिलानंद गायकवाड 👤 रवींद्र वाघमारे 👤 काशिनाथ उशलवार, धर्माबाद 👤 कैलास बी. चांदोड, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 42*रंग आहे माझा काळा**उजेडात मी दिसते**अंधारात मी लपते**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - टेबल, खुर्ची, पलंग ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले काम शेवटास नेण्यासाठी वाईट उपाय योजू नयेत, नाहीतर त्या कामाच्या चांगुलपणाला बट्टा लागतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) हरित क्रांतीचे प्रणेते भारतरत्न एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा होणार आहे ?२) भारत कोणत्या वर्षापर्यंत आपले स्वतःचे अवकाश स्थानक स्थापन करणार आहे ?३) राष्ट्रीय सहकार धोरण - २०२५ कधी जाहीर करण्यात आले ?४) 'लोकांचा आवडता' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) ब्रह्मपुत्रा नदीची लांबी किती किमी आहे ? *उत्तरे :-* १) शाश्वत शेती दिन २) सन २०३५ ३) २४ जुलै २०२५ ४) लोकप्रिय ५) २९०० किमी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परागफुलझाडांच्या [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] व प्रकटबीज वनस्पतींच्या अनुक्रमे फुलातील व शंकुतील [शंकूच्या आकाराच्या प्रजोत्पादक इंद्रियातील;⟶ कॉनिफेरेलीझ] केसरदलावर (पुं-केसरावर) असलेले परागकेश (प्रजोत्पादक सूक्ष्म घटक-बीजुके-पराग निर्माण करणारे भाग) पक्व झाल्यावर त्यांतून बाहेर पडणाऱ्या पांढरट किंवा पिवळट रंगाच्या भुकटीसारख्या सूक्ष्म कणांना पराग म्हणतात [⟶ फूल].पराग हा मूळचा संस्कृत शब्द ‘धूळ’ या अर्थी वापरला जातो व परागाचे कण धुळीच्या कणांसारखेच सूक्ष्म आकारमानाचे असतात. श्रीशिवांनी श्रीविष्णूंना⇨ बाहव्याच्या परागांनी प्रथम स्नान घालून नंतर गंगाजलाने स्नान घातल्याचा उल्लेख पुराणात आला आहे. संस्कृत वाङ्मयात परागांचा (पुष्परेणुंचा) अनेकदा उल्लेख केलेला आढळतो.बीजी वनस्पतींतील [⟶ वनस्पति, बीजी विभाग] परागकण वस्तुतः अबीजी वनस्पतींतील लघुबीजुकेच असून त्यांपासून पुं-गंतुकधारी (नर किंवा पुं-जननेंद्रिये धारण करणारी पिढी) व पुं-गंतुके (प्रजोत्पादक नर-कोशिका म्हणजे पेशी) तयार होतात; म्हणजेच ते प्रजोत्पादक घटक आहेत.एका फुलातील (किंवा शंकूतील) पराग त्याच फुलातील (किंवा शंकूतील) अथवा त्याच जातीतील दुसऱ्या वनस्पतीच्या फुलातील (किंवा शंकूतील) स्त्री-केसरावर पडल्या शिवाय [⟶ परागण] प्रजोत्पादनाच्या कार्यास आरंभ होत नाही. फुलझाडांत पराग किंजदलाच्या (स्त्री-केसराच्या) टोकावर (किंजल्कावर) आणि प्रकटबीज वनस्पतींत (उदा., चीड, सायकस, गिंको, देवदार इ.) प्रत्यक्ष बीजकाच्या टोकावर (बीजकरंध्रावर) पडावे लागतात.परागांचा प्रजोत्पादनातील महत्त्वाचा तपशील अलीकडेच पूर्णपणे माहीत झाला असला, तरी त्याची मोघम कल्पना सु. ५००० वर्षांपूर्वी अॅसिरियन पुरोहितांना होती, हे खात्रीलायक पुराव्याने सिद्ध झाले आहे. ते आपल्या हातांनी खजुराच्या नर-वृक्षावरील फुलोरे स्त्री-वृक्षा-वरच्या स्त्री-फुलोऱ्यांवर शिंपीत, कारण त्याशिवाय फळे धरत नाहीत हे त्यांना माहीत होते. आता अन्नोत्पादनाच्या प्रक्रियेत हे ‘हस्तपरागण’ महत्त्वाची कामगिरी बजावीत आहे [⟶ परागण] ; संकरज (दोन भिन्न वंश, जाती वा प्रकार यांपासून निर्माण झालेली) धान्ये, फळे, फुले ही सर्व या प्रक्रियेची आधुनिक देणगी आहे.परागकणप्रत्येक परागकण अतिसूक्ष्म असून त्याचा सरासरी ध्यास २४-५० μ (१μ= १ मायक्रॉन = १० -³ मिमी.) असतो; द्विदलिकित वनस्पतींता तो २-२५० μआणि एकदलिकितांत १५ - १५० μ असतो. विद्यमान प्रकटबीजींत १५-१८० μ व जीवाश्म (शिळाभूत झालेल्या पुरातन) जातींत ११-३०० μअसा व्यासांचा पल्ला आढळतो.एखाद्या कुलातील वनस्पतींच्या जातींत परागकणांचे आकारमान सारखे असतेच असे नाही; त्यात अनेकदा बराच फरक आढळून येतो. पक्व परागकणाचे वजन ०.०००००३५ ते ०.००००७ मिग्रॅ. या पल्ल्यात असते.प्रत्येक सामान्य फुलातून शेकडो परागकण बाहेर पडतात व कित्येक वनस्पतींतून बाहेर पडणाऱ्या अशा परागकणांची संख्या कित्येक सहस्र किंवा लक्ष इतकीसुद्धा भरते (उदा., सायकस, पाइन, खडशेरणी, गवते, पाणकणीस इ.). सूक्ष्मदर्शकातून पाहिल्यावर असे कळून येते की, प्रत्येक परागकणाचा आतला भाग सूक्ष्म थेंबासारख्या (ठिपक्याएवढ्या) जीवद्रव्याचा ( सजीवाच्या कोशिकेतील जिवंत द्रव्याचा; प्राकलाचा) असून त्यात प्रकल (कोशिकेतील प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणारा जटिल गोलसर पुंज), संचित स्टार्च व तेल असतात. त्याभोवती दोन संरक्षक वेष्टने असतात; आतील पातळ वेष्टनाला ‘आलेप’ आणि बाहेरच्या जाड उपत्वचायुक्त किंवा मेणासारख्या पदार्थाने बनलेल्या वेष्टनाला ‘अधिलेप’ म्हणतात.अधिलेपामुळे बहुतेक अम्ले व सु. ३००° से. पर्यंतचे तापमान यांपासून संरक्षण मिळते. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामुळे आलेप व अधिलेप यांची अतिसूक्ष्म रचना समजून येते व त्याचा उपयोग परागकणांची विविधता व त्यांतील सूक्ष्म फरक समजून घेण्यास करतात.त्यांचे आकार, आकारमान व अधिलेपाचे स्वरूप यांत बरीच विविधता असते; परंतु कोणत्याही एकाच कुलातील, जातीतील किंवा वंशातील वनस्पतींचे परागकण मात्र वरील बाबतीत सारखेच असतात. उदा., गवताचे आणि सूर्यफुलाचे परागकण वाटोळे, खजुराचे लंबगोल व गुलाबाचे त्रिकोणी असतात.चौरस, अर्धगोल इ. भिन्न आकारांचे परागकणही आढळतात. झोस्टेरा या पाण्यातील वनस्पतीचे परागकण लांब व बारीक केसासारखे (२,५५० x ३.७μ) असतात. परागकण सामान्यतः हलके असल्यामुळे वाऱ्याबरोबर वाहत दूर जातात; मूळ ठिकाणापासून सहाशे किमी. पेक्षा अधिक दूर गेलेल्या परागकणांची उदाहरणे आहेत. एफेड्रा व नोथोफॅगस यांचे पराग द. अमेरिकेहून पूर्वेकडे सु. ३,८५० किमी. (ट्रिस्टन द कुना) आणि सु. २,२५० किमी. (द. जॉर्जिया बेट) दूरच्या पीटयुक्त प्रदेशात गेलेले आढळतात.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगदेवाजीच्या व्दारी आज रंगला अभंग …. || धृ ||दरबारी आले रंक आणि रावझाले एकरूप नाही भेदभावगाऊ नाचू सारे या हो, होऊनी नि:संग …. || १ ||जन सेवेपायी काया झिजवावीघाव सोसुनिया मने रिझवावीताल देऊनिया बोलतो मृदुंग …. || २ ||हरीभजनाचे सुख मी लुटावेगात गात माझे डोळे मी मिटावेनका करू कोणी माझ्या समाधीचा भंग …. || ३ ||ब्रह्मनंदि देह बुडोनिया जाईएक एक खांब वारकरी होईकैलासीचा राणा, झाला पांडुरंग …. || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या विचाराने माणसं जुळतात तर आपल्या विचारानेच माणसं दूर जातात पण, माणसं तेव्हा जास्त तुटतात जेव्हा आपले विचार परखड, ज्वलंत तसेच सत्य असतात. त्याक्षणी आपण दु:खी होऊ नये.कारण गोड बोलून स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी जेव्हा आपला वापर केला जातो तीच आपली खरी फसवणूक असते. पण, आपल्या परखड, ज्वलंत आणि सत्य विचाराने एखाद्या माणसात जेव्हा परिवर्तन होते तेव्हा खऱ्या अर्थाने तेच परिवर्तन इतरांना दिशा सुद्धा दाखवत असतात आणि त्यातूनच विकास होत असतो.म्हणून समाजात विचारांची पेरणी करताना समाजाचे भले झाले पाहिजे असेच विचार पेरण्याचा आपण प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नक्कल म्हणजे अनुकरण नव्हे* सातवीतला तनिष हा नकला चांगल्या करायचा. मित्रांच्या बोलण्याच्या लकबी, शिक्षकांच्या बोलण्याच्या लकबी तो सहज करत असे. शिक्षकांना त्याच्यातील हा गुण माहिती होता ,त्यामुळे त्याला शिक्षकांनी सांगितले होते की, तू नकला चांगल्या करतोस हे ठीक आहे ; पण नक्कल करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे अनुकरण करावे .नक्कल ह्याचा अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे हुबेहूब वर्तन ,त्याचे हावभाव जसेच्या तसे व्यक्त करणे होय, पण अनुकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीतील चांगले गुण स्वत: रुजवून आपला विकास करणे होय . तनिषने शिक्षकांचे हे म्हणणे काही ऐकले नाही .नक्कल करणेच त्याला योग्य वाटले .एकदा शिक्षकदिनाच्या दिवशी सगळी मूले वेगवेगळ्या वर्गात शिक्षकांचे काम करणार होते .थोडक्यात त्यांना वर्गावर शिक्षकांच्या ऐवजी शिकविण्यासाठी जायचे होते. तनिषही पाचवीच्या वर्गावर शिकवण्यासाठी गेला. त्याला वाटले आपण एखाद्या शिक्षकांची नक्कल करून तास संपवू या. फारसे अवघड काही नाही. असा विश्वास ठेवून तो वर्गावर गेला .विषयांशी निगडित असलेल्या शिक्षकांची त्याने अचूक नक्कल केली .पण शिकवताना त्याला एका विद्यार्थ्याने पाठासंबंधी प्रश्न विचारला .तनिषला केवळ नक्कलच माहित होती. विचारलेल्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे, याचा विचारच त्याने केला नव्हता. सगळी मुले हसायला लागली त्याची थट्टा करू लागली.तात्पर्य - नक्कल करण्यापेक्षा अनुकरण करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. कारण त्यामुळेच आपल्या व्यक्तिमत्वाचा बुद्धीचा विकास होऊ शकतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment