✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 ऑगस्ट 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15uxyQAb5B/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📅 विशेष दिवस :- *आंतरराष्ट्रीय युवा दिन**विश्व हत्ती दिन*🌟 महत्त्वाच्या घटना :- • १६०२ – मुघल बादशाह अकबर यांचा मंत्री अबुल फजल याची बुंदेलखंड येथे हत्या झाली.• १७६५ – इलाहाबाद तहानुसार बंगाल, बिहार व उडीसा प्रांताची दीवानी (राजस्व व प्रशासन हक्क) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे देण्यात आली.• १८७७ – थॉमस अल्वा एडीसन यांनी फोनोग्राफ या ध्वनी रेकॉर्डिंग यंत्राचा शोध लावला.• १९५३ – सोव्हिएत संघाने आपला पहिला हायड्रोजन बॉम्ब यशस्वीरीत्या परीक्षण केला.• १९९० – अमेरिकेत सर्वाधिक जतन केलेला टायरेनोसॉरस रेक्स (Sue) या डायनासोरचा सांगाडा सापडला.🎂 जन्म :-• १९१९ – डॉ. विक्रम साराभाई, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक.• १९२८ – मोहम्मद अली मिर्झा, पाकिस्तानी इस्लामी विद्वान.🕯️ मृत्यु :-• १९६४ – इयान फ्लेमिंग, जेम्स बॉण्ड मालिकेचे सुप्रसिद्ध लेखक.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अन्न हे पूर्णब्रह्म आहे*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी केवळ ऑनलाइनच नोंदणी; 15 ऑगस्टपासून नवी नियमावली, आदेश जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हर घर तिरंगा मोहिम अंतर्गत देशभरात तीन दिवसीय देशभक्तीपर चित्रपट महोत्सवाची सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती; विद्यार्थी सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगाराची संधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाची यादी जाहीर, रायगडमध्ये अदिती तटकरे, तर अमरावतीमध्ये दादाजी भुसे यांच्याकडे जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाचे 5 नवीन विक्रम, एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान, अभियानाची व्याप्ती आणखी वाढविण्यात येईल- राजेंद्र पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिंगोली जिल्ह्याचे प्रशासकीय नेतृत्व करण्याची मुलींना संधी, एक दिवस मुलींसाठी उपक्रम, जिल्हाधिकारी व सीईओंचा पुढाकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पोतन्ना लखमावाड, माजी गटशिक्षणाधिकारी, धर्माबाद 👤 वसंत हंकारे, प्रसिद्ध युवा व्याख्याते, सांगली 👤 प्राचार्य पी. एन. कोतेवार होटाळकर, श्री दत्त माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज, खंडगाव 👤 दीपक कोकरे 👤 भीमा भंडारी 👤 आशिष अग्रवाल 👤 बालाजी घायाळ👤 पांडुरंग गायकवाड 👤 श्रीनिवास बिचकेवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 50*सांगा पाहू**अशी कोणती वस्तू आहे**जी फ्रीज मध्ये ठेवूनही गरमच राहते*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - ऑक्सिजन व रक्त ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्य व शील यांच्या संरक्षणासाठी धाव घेणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून कोण ओळखले जातात ?२) 'चायना कप' हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?३) भारताच्या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?४) 'शत्रूला सामील झालेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पासाठी भारतास कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे ?*उत्तरे :-* १) संत नामदेव २) जिम्नॅस्टिक ३) पं. जवाहरलाल नेहरू ४) फितूर ५) रशिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वसाहती अंतराळातील* 📙 विज्ञानकथाकारांना आकर्षक वाटणारी अंतराळ वसाहतींची कल्पना आता मुर्त ठरू पाहत आहे. १९५७ साली स्पुटनिकने अंतराळ तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. १९६९ मध्ये मानव चंद्रावर गेला. तर १९८०-९० सालच्या दशकात अंतराळवीरांनी पृथ्वीभोवती चक्कर मारणार्‍या स्पेस शटलसदृश यानात जास्त वेळ राहण्याचे विक्रम सुरू केले. अंतराळ वसाहत म्हणजे अशाच पद्धतीने पृथ्वीभोवताली फिरणारी वसाहतच, जी अंतराळात मानवी जीवनासाठी लागणार्‍या सर्व सुविधा पुरवू शकेल.अंतराळातील वसाहतीत पृथ्वीपेक्षा सर्वात मोठा जाणवणारा फरक म्हणजे तेथील अतिसूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा. पृथ्वीच्या आकर्षणामुळे प्रत्येक वस्तूला वजन असते. आपल्या शरीराला, मेंदूला, मनाला ह्या वजनाची सवय झालेली असते. अमुक वजन पेलता यावे म्हणून स्नायूंचे गठन झाले असते. अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळजवळ नसल्याने आपण वसाहतीत तरंगू, तसेच वर खालीचा फरक नाही ! पेल्यातला द्रव पेला उघडा केला तर खाली पडत नाही. तो झटकून काढला की, गोळ्याच्या स्वरूपात तरंगतो. अर्थात हे विचित्र अनुभव आपल्याला खातापिताना आणि देहधर्मांसाठी येणार ! अाणि अशा स्थितीत सतत राहिल्याने मानसिक परिणाम काय होतील, ते सतत अभ्यासले जात आहेत.अंतराळात वसाहत उभी करणे वाटते तितके अवघडही नाही; कारण 'वजन' हा गुण नसल्याने सिमेंट काँक्रीटचे भव्य प्रासाद बांधायची सूर नाही, हलके साहित्य चालेल. अशा घरबांधणीचे अर्थातच नवे शास्त्र असेल. शिवाय गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्याने द्रव ठेवायला पेला नको, तसेच दोन द्रवांचे मिश्रण अधांतरी करता येईल. अशा स्थितीचा फायदा घेऊन काही अतिशुद्ध औषधे बनवता येतील, ज्यांना भांड्याचा संसर्ग नाही. धातूंची मिश्रणे (नव्या प्रकारची) करणेसुद्धा अंतराळात शक्य होईल. गुरुत्वाकर्षणविरहित अवस्थेतील वैज्ञानिक प्रयोग इथे करता येतील.एकूण अंतर वसाहत हे आता स्वप्न राहिले नसून विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासातील एक संभाव्य टप्पा आहे. केवळ पृथ्वीवर जागा नाही म्हणून अंतराळात राहावे, असे कोणी म्हणणार नाही. उलट तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन लोकसंख्या काबूत आणणे अधिक व्यवहार्य आहे. परंतु जे औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रकल्प गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर राबवणे शक्य नाही, ते अशा वसाहतीत करता येतील, हे त्यांचे वैशिष्ट्यच. शिवाय अंतराळात जवळजवळ पोकळी असल्याने वसाहतीबाहेरच्या पोकळीतदेखील वेगळे प्रयोग करता येतील. त्यांच्यासाठी पृथ्वीवर कृत्रिम पोकळी निर्माण करणे खर्चाचे असेल.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबातुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा || धृ ||कोल्हापूरचा राजा राजा फिरतो जत्रेतफिरतो जत्रेत फुले पडती पदरात… आई || १ ||आई ग अंबे माते केस सोनियाच्या ताराकेस सोनियाच्या तारा वैरी कापे थरथरा…. आई || २ ||ढोल वाले दादा ढोल वाजव जोरातढोल वाजव जोरात आई हसते गालात…. आई || ३ ||टाळ वाले दादा टाळ वाजव जोमानटाळ वाजव जोमान अंग भिजल घामान…. आई || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हावं असं नेहमीच प्रत्येकाला वाटत असते.पण, सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडून येत नसतात.अशा वेळी आपल्याला दु:ख होत असते. पण,काही गोष्टी घडायच्या असतात त्याविषयी आपल्याला कळत नाही व ज्या विषयी आपण कधी विचार केला नसतो अचानक काही गोष्टी घडून येतात म्हणून प्रत्येक वेळी आपल्या मताप्रमाणेच घडून येईलच असेही नाही त्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संयम* एक कोल्हा पाण्यात पोहत असताना बराच खाली गेला व दमल्यामुळे विश्रांती घेण्यासाठी तो एका चिखलाच्या जागी जाऊन बसला. तेव्हा त्याच्या अंगावर एक मोठा माशांचा थवा आला आणि त्याला चावू लागला. जवळच बसलेल्या एका साळूने त्याला विचारले, 'मी यांना हाकलून देऊ का ?' तेव्हा कोल्हा म्हणाला, 'नको ग बाई, इतका वेळ माझं रक्त पिऊन त्याचं पोटं भरलं असेल. तेव्हा आता त्या त्रास देणार नाहीत. त्यांना जर तू हाकलून लावशील तर मात्र ताज्या दमाचा दुसरा थवा माझ्या अंगावर येईल अन् माझं रक्त शोषू लागेल त्याचं काय ?'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment