✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 ऑगस्ट 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Ef7A8HTBq/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या वर्षातील 240 वा दिवस 🚩 ठळक घटना :-• १८४५: अमेरिकन लोकप्रिय विज्ञान मासिक 'सायंटिफिक अमेरिकन'चा पहिला अंक प्रकाशित झाला. • १९१६: पहिले महायुद्ध – इटलीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले (रोमानियावरही आक्रमण केले गेले). • १९३१: फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनमध्ये शस्त्रसंधी करार झाला. • १९३७: टोयोटा मोटर्स स्वतंत्र कंपनी म्हणून स्थापन झाली. • १९९०: इराकने कुवेतला आपलाच प्रांत असल्याचे जाहीर केले. 🎂 जन्म :-• १७४९: योहान वोल्फगाँग फॉन ग्यॉटे – जर्मन महाकवी व लेखक. • १८९६: रघुपती सहाय उर्फ फिराक गोरखपुरी – प्रसिद्ध उर्दू शायर. • १९०६: रंगभूमी अभिनेते चिंतामणी गोविंद (मामा पेंडसे). • १९१८: राम कदम – मराठी चित्रपटांचा प्रसिद्ध संगीतकार. • १९२८: एम. जी. के. मेनन (भारतीय पदार्थवैज्ञानिक); तसेच उस्ताद विलायत खाँ (सतारवादक). • १९३४: सुजाता मनोहर – सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा. • १९३८: पॉल मार्टिन – कॅनडाचे पंतप्रधान. • १९५४: रवी कंबुर – भारतीय-इंग्रिश अर्थशास्त्रज्ञ. • १९६५: सातोशी ताजीरी – पोकेमॉनचे निर्माता. • १९६६: प्रिया दत्त – समाजसेवक व माजी खासदार. • १९६१: दीपक तिजोरी – अभिनेते आणि दिग्दर्शक. • १९८३: लसिथ मलिंगा – श्रीलंका क्रिकेटपटू. 🌹 स्मृतिदिन• १६६७: जयपूरचे राजा मिर्झाराजे जयसिंग यांचे निधन. • १९६९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक व विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचे निधन. • २००१: व्यंकटेश माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार यांचे निधन.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मराठी सिनेमा आज आणि उद्या*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गणपती बाप्पाचे महाराष्ट्रात वाजत-गाजत स्वागत, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही गणरायाचे आगमन, देशावरील संकट दूर व्हावेत असे मुख्यमंत्र्यांचे बाप्पाकडे साकडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नझुल जमिनींच्या विशेष अभय योजनेला मुदतवाढ, नागपूर-अमरावती विभागात १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२६ पर्यंत योजना सुरू राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ऊस शेतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन 40 टक्के वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून 500 कोटींची तरतूद - उपमुख्यमंत्री अजित पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पीएम स्वनिधी योजनेला मुदतवाढ, 15 ते 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय, 7332 कोटींचा खर्च येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मनोज जरांगेंना 29 ऑगस्ट पासून आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी अटी शर्ती सह परवानगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जम्मूमध्ये पाऊस आणि भूस्खलनामुळे 8 जणांचा मृत्यू; 22 जवानांची सुटका, मुसळधार पावसामुळे उत्तर भारतातील परिस्थिती गंभीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचे स्टार क्रिकेटर विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची लवकरच होणार फिटनेस टेस्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गणेश घुले, शिक्षक तथा साहित्यिक 👤 D. S. P. पाटील, साहित्यिक, सोलापूर 👤 रवी राजमाने, साहित्यिक, सांगली 👤 सुनिता महाडिक, शिक्षिका, मुंबई 👤 संजय बंटी पाटील, बाळापूर, धर्माबाद 👤 विजय दिंडे, शिक्षक, धर्माबाद 👤 गजानन वासमवार 👤 अशोक मामीडवार 👤 साईनाथ गोणारकर 👤 तिरुपती अंगरोड 👤 आनंद आवरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 62*असे काय आहे, जे आपल्या जवळच असते पण क्षणात जगभर फिरून येते.*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - बटाटा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पूर्वानुभवाच्या मदतीने जीवनातील पुढील प्रत्येक पाऊल टाकले पाहिजे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारत गर्भाशयमुख कर्करोगाच्या बाबतीत जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर आहे ?२) सोवियत संघातून युक्रेन कोणत्या वर्षी स्वतंत्र झाला आहे ?३) भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा किती किमी आहे ?४) 'स्वतःबद्दल अभिमान नसलेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'भारताचे उद्यान' असे कोणत्या शहराला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) चौथ्या २) सन १९९१ ३) ४,०९६ किमी ४) स्वाभिमानशून्य ५) बेंगलोर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोरेश्वर गणपती (मूळ विनायक)*• स्थान : मोरेगाव, ता. बारामती, जि. पुणे (महाराष्ट्र).• नदी : करहे नदीच्या काठी मोरेगाव वसलेले आहे.• अष्टविनायकांमध्ये प्रथम क्रमांक : मोरेश्वर गणपतीला "मूळ विनायक" असेही म्हणतात. कारण अष्टविनायक यात्रेची सुरुवात व शेवट मोरेश्वर गणपतीच्या दर्शनाने करायची प्रथा आहे.*इतिहास व महत्त्व*• मोरेश्वर गणपतीचे मंदिर 14 व्या शतकात बांधले गेले असे मानले जाते.• मंदिराचे जीर्णोद्धार चिमाजीअप्पांनी (बाजीराव पेशव्यांचे बंधू) व इतर पेशव्यांनी केला होता.• गणपतीची मूर्ती काळ्या दगडात कोरलेली आहे.• मूर्तीची दोन सोंडे व चार हात आहेत.• येथेच गणेशाने सिंधुरासुराचा वध करून लोकांना त्रासातून मुक्त केले, अशी पौराणिक कथा सांगितली जाते.*मंदिराची वैशिष्ट्ये*• मंदिर 50 फूट उंच किल्ल्यासारख्या भिंतींनी वेढलेले आहे.• चारही बाजूंना चौकटी असून त्यावर मिनारांसारख्या उंच बुरूज आहेत.• मंदिराच्या आवारात नेमके 23 वेगवेगळ्या गणपतींच्या मूर्ती आहेत.• यात्रेकरूंची श्रद्धा अशी आहे की, मोरेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय अष्टविनायक यात्रा अपूर्ण राहते.*यात्रा व उत्सव*• गणेशोत्सव व माघ शुद्ध चतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते.• देशभरातून भाविक येथे येतात.👉 त्यामुळे मोरेश्वर गणपती हा अष्टविनायक यात्रेचा आरंभ आणि शेवट मानला जातो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्याची गजसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग … || धृ ||ह्या चिक माळेला रेशमी मऊ दार दोरा गमऊ रेशमांच्या दोऱ्यात नारंगी माळ ओविल ग || १ ||अशी चिक माळेला हिऱ्याचे आठ आठ पदर गअशी तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली ग || २ ||मोरया गणपतीला फुलून माळ शोभली गअशी चिक माळ पाहून, गणपती किती हसला ग || ३ ||त्याने गोड हसुनी मोठा आशीर्वाद दिला गचला चला करूया नमन गणरायाला गत्याच्या आशीर्वादाने करू सुरुवातशुभ कार्याला ग || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके नेहमीच वाचून काढावे त्यातून ज्ञान मिळत असते. सोबतच त्यातून मार्गदर्शन सुध्दा मिळत असते. तसेच आपल्या जीवनात जे काही प्रसंग, अडीअडचणी आले असतील त्या परिस्थितीला सुद्धा कधीही विसरू नये. जसं की पुस्तके आपल्याला घडवत असतात तसेच ज्या परिस्थितीतून आपण गेलेलो असतो ती परिस्थिती सुद्धा आपल्याला अनुभवाने परिपूर्ण बनवत असते. तो अनुभव पैशाने विकत घेता येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हि-यापेक्षा जनता महत्वाची*एक राजा होता. त्याचे सुखी व संपन्न राज्य होते. दुर्दैवाने एकदा त्याच्या राज्यात पाऊसच पडला नाही. त्यामुळे दुष्काळाचे संकट उभे ठाकले. गरिबांचे हाल होऊ लागले. बादशहाने आपला खजिना जनतेसाठी खुला केला. एकेदिवशी तो खजिनाही संपला. आता पुढे काय हा प्रश्न राजासमोर उभा ठाकला. प्रजाजनांचे पोषण कसे करता येईल ही एकच चिंता राजाला सतत सतावित होती. त्याने त्याच्या बोटातली हि-याची अंगठी नोकरांना दिली व सांगितले,'' ही अंगठी घेऊन शेजारच्या देशात जा, तेथील राजाला आपली सर्व परिस्थिती सांगा. तो राजा आपली अवस्था जाणेल व हा हिरा फार दुर्मिळ आहे. या हि-याच्या बदल्यात त्याच्याकडून धान्य मागून आणा व जनतेत वाटप करा. '' मंत्र्यांनी राजाला विचारले,''राजन, इतका महागडा, दुर्मिळ हिरा तुम्ही का विकत आहात, दुसरी काहीतरी सोय करता येईल.'' राजा म्हणाला,''माझे राज्य ही माझी संपत्ती आहे. प्रजा उपाशी मरत असताना मी महागडा हिरा का सांभाळत बसू. प्रजा आहे तर मी आहे. असे हिरे पुन्हा प्राप्त करता येतील पण प्रजा एकदा जर नाराज झाली तर पुन्हा अशी प्रजा मला मिळणार नाही.''तात्पर्य :- आपल्या हाती जर सत्ता असेल तर त्याचा योग्य विनियोग कसा करता येईल हे पहाणे इष्ट ठरते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment