✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 ऑगस्ट 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/19ey7V6HsE/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय क्रीडा दिन (National Sports Day): ऑगस्ट 29 रोजी भारतात हा दिवस साजरा केला जातो, ज्याचा संबंध हॉकीचे महानायक मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीशी आहे. हा दिवस खेळ, शारीरिक तंदुरुस्ती, आणि खेळाडूंच्या कर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी समर्पित आहे.• आंतरराष्ट्रीय परमाणू चाचणी विरोधी दिवस• जागतिक मानवतावादी दिन• तेलुगू भाषा दिन🚩 इतिहासातील महत्त्वाच्या घटना:• ७०८: जपानमध्ये तांब्याच्या नाण्यांची निर्मिती• १९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटने समितीची स्थापना• १९६६: द बीटल्स यांनी त्यांचा शेवटचा स्टेज शो दिला• १९७४: चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोकदल पक्षाची स्थापना केली• २००४: फॉर्म्युला वनमध्ये मायकेल शूमाकर यांनी पाचवी वेळा ड्रायव्हर्स चँपियनशिप जिंकली🎂 जन्म:• 1905 - मेजर ध्यानचंद, भारतीय हॉकीपटू • 1958 - मायकेल जॅक्सन • 1923 - हिरालाल गायकवाड• 1959 - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय अभिनेता🌹 मृत्यू:• 1982 - इन्ग्रिड बर्गमन• 1986 - गजानन श्रीपत अण्णासाहेब खेर • 2007 - बनारसीदास• 2008 - जयश्री गडकर ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राष्ट्रीय क्रीडा दिवस त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख.....*शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणासाठी आज जाहीर सभा, संपूर्ण राज्याचे या सभेकडे लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी, लातूर व नांदेड जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यात 45 छायाचित्रकारांच्या 300 छायाचित्रांचे प्रदर्शन, बालगंधर्व कलादालनात 30 ऑगस्टपर्यंत विनामूल्य प्रदर्शन सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित, NARI चा वार्षिक अहवाल, पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *OBC नेत्यांचा मराठा आरक्षणाला कडाडून विरोध, आजपासून राज्यभरात जनजागृती मोहीम; 15 दिवसांत मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन, 'गुंड्याभाऊ' वयाच्या 95 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड; मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *हिंगोलीत कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी, बेमुदत कामबंद आंदोलनाचा १० वा दिवस*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रवी शिंदे, इंग्रजी विषय तज्ञ, कुंडलवाडी👤 रवींद्र केंचे, 👤 शिवराज पाटील चोळाखेकर, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद 👤 गणेश येडमे 👤 ईश्वर शेठीये, हैद्राबाद 👤 सौ. योगिता रामानंद रामदिनवार, नांदेड 👤 सचिन बावणे 👤 गणेश राऊत *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 62*असे काय आहे, ज्याच्या जोरात फिरण्यामुळे आपणाला छान वाटते. तो थांबला की कसे तरी होते.*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - मन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोतीहून सोन्याच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे अधिक चांगले असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'राष्ट्रीय क्रीडा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?२) डी गुकेश हा खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ?३) अमेरिकेला निर्यात होत असलेल्या भारतीय वस्तूवर ५०% टॅरिफ केव्हापासून लागू करण्यात आले ?४) 'दुसऱ्याला काहीही सहजगत्या देणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) नुकतेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोणत्या दोन आधुनिक युद्धक जहाजांचे जलावरण केले ? *उत्तरे :-* १) २९ ऑगस्ट २) बुद्धिबळ / चेस ३) २७ ऑगस्ट २०२५ ४) उदार, दिलदार ५) आयएनएस उदयगिरी व हिमगिरी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🙏 सिद्धटेकचा सिद्धिविनायक बद्दल थोडक्यात माहिती:सिद्धिविनायक गणपती हे अष्टविनायकांपैकी एक गणपती आहेत. त्यांचे मंदिर पुणे जिल्ह्यातील सिद्धटेक (करमाळा तालुका, अहमदनगर सीमेवर) येथे आहे. हे स्थान भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे.🔹 वैशिष्ट्ये :सिद्धिविनायक गणपती हे प्रत्येक साधकाला सिद्धी देणारे म्हणून ओळखले जातात.मूर्तीची सोंड उजव्या बाजूला आहे, जी अत्यंत दुर्मिळ मानली जाते.येथे गणपतीसोबत सिद्धी व बुद्धी या पत्नींच्या मूर्तीही आहेत.🔹 पौराणिक कथा :पूर्वी येथे विघ्रासुर नावाचा असुर गणपतीच्या कृपेने प्रचंड सामर्थ्यशाली झाला. त्याने लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. मग विष्णूने गणपतीची स्तुती करून त्यांच्याकडून कृपा मिळवली. गणपतीच्या सूचनेनुसार विष्णूने विघ्रासुराला नमवले. तेव्हापासून येथे गणपती सिद्धिविनायक या नावाने प्रसिद्ध झाले.🔹 मंदिराचे महत्व :भक्त इथे 21 प्रदक्षिणा घालतात, असे मानले जाते की त्यामुळे मनोकामना पूर्ण होतात.सिद्धिविनायक मंदिर हे शंभरों कोटींच्या विघ्नांचा नाश करणारे व सर्व सिद्धी देणारे मानले जाते.उद्याची पोस्ट :- पालीचा बल्लाळेश्वर *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *श्री गणेश गाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रथम तुला वंदितो कृपाळागजानना गणराया || धृ ||विघ्नविनाशक, गुणीजन पालकदुरित तीमिर हार का, सुखकारक तू दु:ख विदारकतूच तुझ्या सारखा, वक्रतुंड ब्रम्हांड नायकाविनायक प्रभुराया ….. || १ ||सिद्धीविनायक तूच अनंताशिवात्मजा मंगला, शेंदूर वदना विद्याधीशागणाधिपा वत्सला, तूच ईश्वरा साह्य करावे,हा भव सिंधू तराया…. || २ ||गजवदना तव रुप मनोहरशुक्लांबर शिवसुता, चिंतामणी तू अष्टविनायक,सकळांची देवता रिद्धी सिद्धीच्या वर दयाळादेईकृपेची छाया…. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपली ओळख कितीही मोठ्या माणसांशी जरी असेल तरी ती ओळख आणि आपल्या कार्याची किंमत आपली आर्थिक परिस्थिती किंवा आपले आरोग्य चांगले राहते तोपर्यंतच असते. जेव्हा आपले आरोग्य आणि आर्थिक स्थिती हळूहळू कमी व्हायला लागते तेव्हा, कितीही जवळचे लोक का असेनात क्षणात अनोळखी होऊन जातात. म्हणून ह्या सर्व व्यर्थ गोष्टींच्या भ्रमात किंवा गर्वाच्या भोवऱ्यात पडून कोणाचा अपमान करू नये. वेळ आल्यावर गरीबाच्याच घरी प्यायला पाणी मिळते आणि तिथेच आपले कितीही ओळखीचे जरी लोक असतील तरी आपल्याला कमी लेखतात असे अनेक चित्र याच समाजात बघायला मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रामाणिक मुलगा एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्याच्यावर त्याच्या आईवडीलांनी चांगले संस्कार केले होते व त्या संस्कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्याने त्यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने शेजारी घरी परतला त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्याशेजारी सफरचंदे असूनही तो त्यांना हातसुद्धा लावत नाही. मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजा-याला माहित होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्कार केला, शेजा-याने त्याला जवळ घेतले व विचारले,''तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्ले नाहीस'' मुलगा म्हणाला,'' इथेच कोणीच नव्हते, मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते, कोणीच मला पाहात नव्हते पण कोणी पाहत नव्हते पण मी स्वत:ला ते पाहात होतो. परंतु मी स्वत:ला फसवू शकत नाही.'' शेजा-यास त्याच्या या बोलण्याचा आनंद वाटला. त्याने त्याला शाबासकी दिली व म्हणाला,'' आपण करतो ते आपला आत्मा पाहात असतो, आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला लाख फसवू पण स्वत:शी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्यास जग सुखी होईल.''तात्पर्य :- लहानपणीच मुलांना खोटे वागणे, बोलणे यापासून दूर ठेवल्यास मुले भविष्यात योग्य वर्तन करतील. वाईट गुण घेण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही पण चांगले शिकण्यास खूप काळ जावा लागतो. मुले वाईट वर्तनाची निघाल्यास त्याचा दोष आईवडीलांना येतो. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment